पुणे महानगरपालिका भरती 2022 | Pune Mahanagarpalika Bharti
पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील गट दोन आणि गट तीन मधील रिक्त असणारी पदे सरळ सेवा प्रवेशाने भरण्यासाठी पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
पुणे महानगरपालिका भरती 2022 ही जाहिरात 20 जुलै 2022 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
प्रस्तुत जाहिरातीमधून एकूण 44 + 4 = 448 पदांकरिता इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
सदर पदांच्या जाहिराती बाबत रिक्त पदांचा तपशील पदांकरिता आवश्यक शैक्षणिक अर्हता, वेतनश्रेणी, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क, ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत, अर्ज करण्याची मुदत व इतर आवश्यक अटी व शर्ती इत्यादी बाबी पुढीलप्रमाणे आहेत.
क्रमांक | तपशील | दिनांक व वेळ |
1 | ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारण्याचा दिनांक | 20/07/2022 |
2 | अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक | 10/08/2022 |
3 | ऑनलाइन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक | 10/08/2022 |
4 | प्रवेश पत्र उपलब्ध होण्याचा दिनांक | परीक्षेच्या पूर्वी सात दिवस |
5 | ऑनलाइन परीक्षेचा दिनांक | अंदाजे ऑगस्ट/सप्टेंबर 2022 |
वरील माहितीवरून काही बाबी स्पष्ट होतात त्या पुढील प्रमाणे
- परीक्षा ऑनलाइन पद्धतीने होणार आहे.
- परीक्षेचा निश्चित दिनांक दिलेला नाही.
Pune Mahanagarpalika Bharti 2022 / पुणे महानगरपालिका भरती 2022 सरळसेवेने भरण्यात येणारे पदे पुढील प्रमाणे..
क्र. | पदाचे नाव | एकूण उपलब्ध पदसंख्या |
1 | सहाय्यक विधी अधिकारी श्रेणी – 2 | 4 |
2 | लिपिक टंकलेखक श्रेणी – 3 | 200 |
3 | कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) श्रेणी – 3 | 135 |
4 | कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी)श्रेणी – 3 | 5 |
5 | कनिष्ठ अभियंता (वाहतूक नियोजन) – श्रेणी – 3 | 4 |
6 | सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक श्रेणी – 3 | 100 |
( टिप – नमूद केलेल्या पदसंख्या मध्ये व आरक्षणामध्ये बदल होण्याची शक्यता आहे.)
Pune Mahanagarpalika Bharti 2022 वेतन
Pune Mahanagarpalika Bharti 2022 वयोमर्यादा
अर्ज स्वीकृती च्या अंतिम दिनांकास…
कमीत कमी वयोमर्यादा – 18 वर्षे
जास्तीत जास्त वयोमर्यादा – 38 वर्षे खुल्या प्रवर्गाकरिता / 43 वर्षे मागास प्रवर्ग करिता
Pune Mahanagarpalika Bharti 2022 परीक्षा शुल्क
खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी – 1000 रुपये
मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी – 800 रुपये
Pune Mahanagarpalika Bharti 2022 – Download PDF
मूळ जाहिरात पाहण्यासाठी अधिकृत वेबसाईट
www.pmc.gov.in