YCM B. Ed Admission 2021-23

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत नूतन शैक्षणिक वर्ष 2021- 23 साठी बीएड प्रवेश परीक्षा प्रक्रिया 

 सर्व उमेदवारांना प्रश्न पडलेला होता की यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत नूतन शैक्षणिक वर्ष 2021- 23 साठी बीएड प्रवेश परीक्षा कधी होणार? प्रवेश परीक्षा बद्दल GR कधी निघणार? व परीक्षा कधी होणार याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागून होते. त्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे जे विद्यार्थी बीएड प्रवेश परीक्षेची अभ्यास करीत आहेत. ऑनलाईन अर्ज भरण्याची तारीख जाहीर झाली आहे. 

ऑनलाईन फॉर्म भरण्याचा दिनांक – 8 जुलै 2021 ते 31 जुलै 2021 

अर्जाचे स्वयं संपादन मुदत – 1 ऑगस्ट 2021 ते 3 ऑगस्ट 2021 

शिक्षणक्रम शुल्क 

  1. प्रथम वर्ष :-  
  • विद्यापीठ शुल्क  –  ₹11,000/- 
  • अभ्यास केंद्र शुल्क  –  ₹10,500/-
  • एकूण शुल्क –  ₹ 21,500/- 
  1. द्वितीय वर्ष :- 
  • विद्यापीठ शुल्क  –  ₹11,000/- 
  • अभ्यास केंद्र शुल्क  –  ₹10,500/-
  • एकूण शुल्क –  ₹ 21,500/- 

Information About – MPSC

प्रवेश अर्ज कसा भरावा? 

सर्व उमेदवाराला प्रश्न पडलेला असतो की ऑनलाइन प्रवेश अर्ज कसा भरावा? विद्यार्थ्याला महत्त्वाची सूचना आहे की आपण प्रवेश अर्ज भरताना आपली सर्व माहिती बिनचूक भरावी. कारण ऑनलाइन भरलेल्या अर्जाच्या आधारेच गुणवत्ता यादी तयार केली जाते. त्यामुळे अर्ज भरताना आपली खरी माहिती भरावी. 

तुम्हाला ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर त्या अर्जाची एक कॉपी आपल्याजवळ ठेवावी. कारण अभ्यास केंद्रावर प्रत्यक्ष प्रवेश घेताना आपल्याजवळ सदर अर्ज व मूळ कागदपत्रे लागतात. अर्जामध्ये माहिती भरल्या प्रमाणेच त्यामध्ये आपला अनुभव, पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षणाचे गुण व श्रेणी आणि प्रवर्गाच्या आरक्षणा आधारेच प्रवेश गुणवत्ता यादी निश्चित केली जाते. प्रवेश गुणवत्ता यादी प्रसिद्ध होण्याआधी प्रवेश इच्छुकांना आपण भरलेल्या अर्जात काही त्रुटी असतील तर त्या सुधारणा करण्यासाठी प्रवेश अर्ज अंतिम तारखेनंतर मुदत दिली जाते.   उमेदवारांनी या विद्यापीठाच्या अधिकृत वेबसाईट वर जाऊन अर्ज  सादर करावे.

आरक्षण तक्ता 

प्रवर्ग निहाय टक्केवारी – 

  • अनुसूचित जाती – 13 %   एकूण जागा – 5 
  • अनुसूचित जमाती – 07%  एकूण जागा – 3 
  • विमुक्त जाती अ – 03%  एकूण जागा – 1
  • भटक्या जमाती ब – 2.5%  एकूण जागा – 1
  • भटक्या जमाती क – 3.5%  एकूण जागा – 2
  • भटक्या जमाती ड – 0.2%  एकूण जागा – 1
  • इतर मागास प्रवर्ग – 19%  एकूण जागा – 8
  • EWS – 10%  एकूण जागा – 4 
  • SEBC – शासन नियमानुसार आधारित 

प्रवेश पात्रता 

युजीसी मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी किंवा पदव्युत्तर पदवी अनिवार्य आहे. 

पदवी किंवा पदव्युत्तर पदवी परीक्षेत खुल्या प्रवर्गातील उमेदवाराला किमान 50% गुण असणे अनिवार्य आहे. व मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवाराला किमान 45% गुण असणे अनिवार्य आहे. 

महाराष्ट्र शासनाने ज्या प्राथमिक शिक्षकांना पदवीधर स्केल लागू केला आहे अशा प्रवेशास इच्छुक असणाऱ्या उमेदवारास पदवी किंवा पदव्युत्तर पदवी परीक्षा उत्तीर्ण तेच्या गुणांची अट नाही, मात्र त्या परीक्षेत उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. 

आपण आजच्या या लेखात यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत नूतन शैक्षणिक वर्ष 2021- 23 साठी बीएड प्रवेश परीक्षा प्रक्रिया कशी आहे? व अर्ज कसे भरू शकतो? इत्यादी बद्दल संपूर्ण माहिती घेण्याचा प्रयत्न केला. जरी तुम्हाला काही प्रवेशा संदर्भात शंका किंवा अडचण असतील तर आपण आम्हाला comment Section मधून विचारू शकता.

उमेदवाराला हवी असेल ती सर्व माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहविण्याचा प्रयत्न केला आहे. जरी तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर आपण विद्यापीठाच्या वेबसाईट वर जाऊन पाहू शकता. 

हे हि वाचा …

Hotel management information in Marathi हॉटेल मॅनेजमेंट कसे करावे?

मी मागील 8 वर्ष MPSC आणि इतर स्पर्धा परीक्षेसंबंधी पुण्यामध्ये Classes घेत आहे, त्यामुळे या स्पर्धा कशा प्रकारे होतात, कोणते प्रश्न विचारले जातात आणि कोणत्या टॉपिक वर प्रश्न विचारले जातात या संबंधी ची पूर्ण माहिती मला असून मी माझा अनुभव या वेबसाइट द्वारे तुम्हा सर्वांपर्यंत पोचवायचा प्रयन्त करत आहे.

Leave a Comment