पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2021 लवकरच New

पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2021 पुढील टप्पा

पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2021
पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2021

पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2021 पुढील टप्पा – राज्यात २०१७ मध्ये १२०४१ शिक्षकांच्या भरतीसाठी सुरुवात झाली. यासाठी पवित्र पोर्टल मार्फत ही भरती प्रक्रिया राबविण्याचे ठरविण्यात आले. पवित्र पोर्टल अंतर्गत राज्यातील शैक्षणिक पात्रता धारक व अभियोग्यता धारक विद्यार्थ्यांकडून शिक्षक भरती साठी आवेदन भरून घेण्यात आली. 

सध्या मात्र ही भरती प्रक्रिया विविध टप्प्यामध्ये अडकलेली दिसून येते. या भरती प्रक्रियेचा पुढील टप्पा पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2021 राबविण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. 

शिक्षकाची व्यवसायिक पात्रता धारण करणारा विद्यार्थी पवित्र पोर्टल अंतर्गत अभियोग्यता दिलेला असेल,. राष्ट्रीय स्तरावरील कायद्याप्रमाणे शिक्षक पात्रता परीक्षा पात्र असेल, अशा उमेदवाराची नियुक्ती शिक्षक म्हणून होणे आवश्यक आहे.असा कायदा असताना राज्यांमध्ये मात्र शिक्षक भरतीमध्ये विविध मुद्दे अडथळे ठरलेले दिसून येतात.

पवित्र पोर्टल अंतर्गत खाजगी अनुदानित शाळांमधील शिक्षक भरती एप्रिल मे मध्ये होणार आहे यामध्ये मुलाखती सह भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.

पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2021 नुसार राज्यामध्ये एकूण पवित्र पोर्टल अंतर्गत नोंदणी केलेल्या 950 खाजगी शाळांमध्ये रिक्त असणारी तीन हजार पदे या प्रक्रियेतून भरली जाणार आहेत.

पवित्र पोर्टल चा शिक्षक भरती मधील पहिल्या टप्प्यामध्ये मुलाखतीशिवायची पदे गुणवत्तेवर आधारित करण्यात आलेली आहेत. यामध्ये ५९७० उमेदवारांना शिक्षक म्हणून नियुक्त्या मिळालेल्या आहेत.यातील काही उमेदवार अपात्र,गैरहजर, अन्यत्र निवड व इतर तांत्रिक कारणामुळे सुमारे १५०० उमेदवार प्रत्यक्षात शाळांमध्ये जाऊ शकलेले नाहीत.या जागा ही रिक्त राहिल्या आहेत.

माजी सैनिकांच्या जागेसाठी पुरेसे माजी सैनिक उमेदवार मिळाले नाहीत यामुळे या जागा इतर सामाजिक प्रवर्गामध्ये समाविष्ट करण्यात येणार आहेत.

दुसऱ्या टप्प्यामध्ये खाजगी शाळांमधील शिक्षकांची भरती करण्यात येणार आहेत. यासाठी खाजगी संस्थांना मुलाखतीचा पर्याय देण्यात आलेला होता.मुलाखती सह होणाऱ्या या पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2021 मध्ये पुढील दोन महिन्याच्या कालावधीत उमेदवारांची यादी तयार करणे उमेदवारांच्या मुलाखतीचे वेळापत्रक जाहीर करणे आणि त्यांना नियुक्त्या देणे इत्यादी कार्यवाही पार पाडली जाणार आहे. 

MPSC information in marathi

मुलाखतींमध्ये अव्वल ठरणाऱ्या उमेदवारांना शैक्षणिक वर्ष २०२१/२२ या वर्षात जून मध्ये नियुक्त करण्यात येणार आहे.

महाराष्ट्रातील शिक्षक भरती ही नक्कीच एक चर्चेचा विषय ठरलेली आहे. कारण २०१७ मध्ये निघालेली शिक्षक भरती २०२१ पर्यंत सुद्धा पूर्ण होऊ शकत नाही. ही महाराष्ट्रातल्या शैक्षणिक व्यवस्थेमध्ये असलेली शोकांतिका म्हणावी लागेल.

शिक्षक भरती विषयक आणखी वाचा….

महाराष्ट्र शिक्षक भरती २०२१

Maha TET बद्दल सर्व काही

स्पर्धा परीक्षा उपयुक्त पुस्तके

पवित्र पोर्टल

मी मागील 8 वर्ष MPSC आणि इतर स्पर्धा परीक्षेसंबंधी पुण्यामध्ये Classes घेत आहे, त्यामुळे या स्पर्धा कशा प्रकारे होतात, कोणते प्रश्न विचारले जातात आणि कोणत्या टॉपिक वर प्रश्न विचारले जातात या संबंधी ची पूर्ण माहिती मला असून मी माझा अनुभव या वेबसाइट द्वारे तुम्हा सर्वांपर्यंत पोचवायचा प्रयन्त करत आहे.

Leave a Comment