तलाठी पदासाठी निवडीचा मार्ग मोकळा | Talathi bharti 2020

Talathi bharti 2020

बीड, औरंगाबाद, नांदेड ,सोलापूर, सातारा ,धुळे आणि अहमदनगर अशा जिल्ह्यातील तलाठी पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांच्या पद भरतीचा talathi bharti 2020 मार्ग मोकळा झाला आहे.

S.E.B.C. (एस.इ.बी.सी.) संवर्गातील पदे वगळता इतर प्रवर्गातील निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती देण्यात येणार talathi bharti असल्याची माहिती महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली.

थोरात म्हणाले, सात जिल्ह्यातील निवड झालेल्या उमेदवारांच्या नियुक्तीबाबत अडचण निर्माण झाली होती. त्यामुळे सामान्य प्रशासन विभाग आणि विधी व न्याय विभागाच्या अभिप्रायास अनुसरून सात जिल्ह्यातील सन 2019 तलाठी पद भरतीतील एसइबीसी संवर्गातील पदे वगळता इतर प्रवर्गातील निवड झालेल्या उमेदवारांच्या नियुक्तीबाबत मान्यता मिळाली आहे. त्यामुळे बीड,औरंगाबाद ,नांदेड, सोलापूर, सातारा, धुळे आणि अहमदनगर अशा सात जिल्ह्यातील सर्व संबंधित जिल्हाधिकारी यांना या निर्णयाबाबत कळविण्यात आले आहे.

सन 2019 मध्ये राज्यातील तलाठी talathi bharti संवर्गातील रिक्त पदे भरण्याची भरती प्रक्रिया राबविण्यात आली.यापूर्वी राज्यातील 26 जिल्ह्यातील तलाठी भरती प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.

1) यामध्ये कोकण विभागातील मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, रत्नागिरी ,सिंधुदुर्ग हे जिल्हे.

2) अमरावती विभागातील अकोला,वाशिम , बुलढाणा, यवतमाळ हे जिल्हे.

3) नागपूर विभागातील नागपूर, वर्धा , चंद्रपूर, गडचिरोली ,भंडारा, गोंदिया हे जिल्हे.

4) औरंगाबाद विभागातील औरंगाबाद,जालना, परभणी, हिंगोली, उस्मानाबाद ,लातूर हे जिल्हे.

5) नाशिक विभागातील जळगाव, नाशिक हे जिल्हे.

6) पुणे विभागातील पुणे, कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यात भरतीची प्रक्रिया पूर्ण केलेली होती.

औरंगाबाद विभागातील औरंगाबाद, नांदेड, बीड ,नाशिक , विभागातील नंदुरबार, धुळे, अहमदनगर व पुणे विभागातील सोलापूर, सातारा या जिल्ह्यात तलाठी पद भरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात असताना वित्त विभागाने 4 मे 2020 रोजी च्या शासन निर्णयानुसार पद भरतीवर निर्बंध घातले होते.

मात्र, भरतीप्रक्रिया वित्त विभागाच्या मान्यतेनेच सुरू करण्यात आली असल्याने उर्वरित आठ जिल्ह्यातील निवड झालेल्या उमेदवारांच्या संदर्भात वेगळी भूमिका घेणे उचित ठरणार नसल्याने आठ जिल्ह्यातील निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती आदेश निर्गमित करण्यास विशेष बाब म्हणून मान्यता देण्यात आली. याच अनुषंगाने 9 सप्टेंबर 2020 रोजी पदभरतीची कार्यवाही पूर्ण करण्याबाबत संबंधित जिल्हाधिकारी यांना कळविण्यात आले. तथापि, सर्वोच्च न्यायालयाने 9 सप्टेंबर 2020 रोजी आदेश पारित करून S.E.B.C. (एस.इ.बी.सी.) आरक्षणास स्थगिती दिली आहे.

त्याचप्रमाणे नंदुरबार जिल्हा पेसा क्षेत्राखाली असल्याने नंदुरबार जिल्हाधिकारी यांनी 16 नोव्हेंबर 2020 रोजी नियुक्ती आदेश पारित करण्यात आले असल्याचेही थोरात यांनी सांगितले.

talathi bharti question paper with answer

स्टाफ सिलेक्शन कमिशन सुचना जाहीरCombined higher secondary level examination – 2020

Refference Books for Competitive Exam

मी मागील 8 वर्ष MPSC आणि इतर स्पर्धा परीक्षेसंबंधी पुण्यामध्ये Classes घेत आहे, त्यामुळे या स्पर्धा कशा प्रकारे होतात, कोणते प्रश्न विचारले जातात आणि कोणत्या टॉपिक वर प्रश्न विचारले जातात या संबंधी ची पूर्ण माहिती मला असून मी माझा अनुभव या वेबसाइट द्वारे तुम्हा सर्वांपर्यंत पोचवायचा प्रयन्त करत आहे.

Leave a Comment