Arogya Vibhag Bharti 2024 Information in Marathi | Arogya Sevak Mahiti

गट-क भरती प्रकिया संदर्भात वारंवार विचारले जाणारे प्रश्न Arogya Vibhag Bharti 2024

Arogya Vibhag Bharti 2024 Mahiti: आरोग्य विभाग भरती जाहिरात सन 2021 मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेली होती परंतु परीक्षेदरम्यान पपेरफुटी झाल्याने आता या वर्षी 2024 मध्ये पुन्हा एकदा आरोग्य विभाग गट क आणि गट द विभागासाठी पून्हा परीक्षा होणार आहेत.

गट-क भरती प्रकिया संदर्भात वारंवार विचारले जाणारे प्रश्न व संभाव्य उत्तरे 

1) मुळ जाहिरातीमध्ये ज्या प्रवर्गाला पद संख्या दर्शविलेला आहे त्या प्रवर्गासाठी पदसंख्या संकेत स्थळावरील भरावी याची पदसंख्या मॅट्रीक्स मध्ये दर्शविलेली नाही. तर काय करावे?

उत्तर – शारानाने ५० टक्के पद भरतीस मान्यता दिली आहे. त्यानुसार बिंदू नामावली प्रमाणित केली असता, आपल प्रवर्गास पद येत नाही, याची नोद घ्यायी, तथापि खुल्या प्रवर्गात पद रिक्त असल्यामुळे सदर मागास उमेदवारांना परिक्षा देता येईल आणि खुला प्रवर्गातून स्पर्धा करावी लागेल.

2) संकेतस्थळावरील वेकेन्सी मेंट्रीक्स मध्ये ज्या प्रवर्गाचा पद दर्शविले नाही तसेच खुला प्रवर्गाचा देखील पद दर्शविले नाही तरी परिक्षेचे हॉल तिकीट पाठविणार आहात किंवा कसे, पाठविले तरी आम्हाला परीक्षा देऊनही काही उपयोग होईल का?

उत्तर– अशा परिस्थितीत हॉल तिकिट दिले जाणार नाही पर्यायाने परिक्षेला बसण्याचा प्रश्न उदभवत नाही.

३) Arogya Vibhag Bharti परीक्षा एकाच दिवशी होणार आहेत आणि दोन पेक्षा जास्त पदांकरीता वेगवेगळ्या जिल्हयात / मंडळात अर्ज केलेले आहेत तेव्हा परिक्षा कसे देता येईल?

उत्तर – लेखी परिक्षेचे वेळापत्रक विभागाच्या संकेतस्थळावर, प्रसिध्द करण्यात येईल. तेव्हा उमेदवाराने त्यांच्या ईच्छेनुसार व वेळापत्रकानुसार आवश्यक त्या पदाची परीक्षा द्यावी.

4) एसईबीसी अंतर्गत अर्ज केलेल्या उमेदवारांना ईडब्ल्यूएस अथवा खुला प्रवर्गाचा विकल्प उपलब्ध करुनदिल्याचे जाहीर करण्यात आले आहे. संकेतस्थळावर प्रसिध्द केलेल्या वेकेन्सी मॅट्रीक्समध्ये ईडब्ल्यूएस /खुल्या प्रवर्गात पद संख्या नाही, अतिरिक्त परिक्षा शुल्क भरावे किंवा कसे, अतिरिक्त परिक्षा शुल्क भरुन हीपरिक्षेचे हॉल तिकिट मिळणार आहे का, परिक्षा देऊन काही उपयोग होणार आहे काय?

उत्तर – ईडब्ल्यएस / खुला या दोन्ही प्रवर्गात पद उपलब्ध नसल्यास परिक्षेस बसता येणार नाही त्यामुळे शुल्क भरण्याचा प्रश्न उदभवत नाही. याआधीच विभागाने संकेतस्थळावर जाहीर प्रकटनाच्दारे एसईबीसी उमेदवारांना ईडब्ल्यूएस/खुला प्रवर्गाचा विकल्प पोर्टलवर उपलब्ध करुन देण्यात येईल असे कळविले आहे.

५) गेले कित्येक वर्षे स्पर्धा परिक्षेची तयारी करुन देखील आता, आमच्या प्रवर्गात पद संख्या शुन्य दर्शविले आहे तरी भरलेली परिक्षा शुल्क परत मिळणार आहे काय?

उत्तर – Arogya Vibhag Bharti पदभरतीच्या जाहिरातीमध्ये भरलेली परिक्षा शुल्क ना-परतावा असल्याचे स्पष्ट करण्यात आले असल्यामुळे भरलेली परीक्षा शुल्क परत मिळणार नाही. कृपया जाहिरातीचे पुनश्च अवलोकन करावे.

६) एसईबीसी उमेदवारांनी ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र मिळविले आहे तर त्यांना परिक्षा घेणा-या संरथेमार्फतसंकेतस्थळावरून ईडब्ल्यूएस / खुला प्रवर्गाचा विकल्प निवडण्याचे लिंक उपलब्ध करून देणार आहात काय?

उत्तर– परिक्षा घेणा-या संस्थेमार्फत एसईबीसी उमेदवारांना ईडब्ल्यूएस / खुला प्रवर्गाचा विकल्प निवडण्यासाठी लिंक उपलब्ध करुन देण्यात येईल. याबाबतची माहिती जाहिर प्रकटनामध्ये प्रकाशित केलेल्या विभागाच्या ससंकेतस्थळावर ती प्रसिद्ध करण्यात येईल.

७) पदनिहाय प्रश्नपत्रिकेचे स्वरूप संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल किंवा कसे?

उत्तर – प्रश्नपत्रिकेचे स्वरूप जाहिरातीमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहे कृपया पुनश्च अवलोकन करावे.

८)  परीक्षा जिल्हा स्तरावर किंवा मंडळ निहाय घेण्यात येईल?

उत्तर – मंडळ स्तरावरील पदांची परीक्षा मंडळ स्तरावर पुणे स्थित कार्यक्रम प्रमुखां कडील पदांची परीक्षा पुणे येथे व मुंबईस्थित नर्सिंग व अंधत्व कार्यालयाकडील परीक्षा ठाणे येथे आणि आरोग्य कर्मचारी पुरुष संवर्गाची परीक्षा जिल्हास्तरावर घेण्यात येईल सविस्तर वेळापत्रक संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.

९) अर्जामध्ये परीक्षेचा अर्ज भरला त्या अर्जामध्ये तीन सेंटरचा पर्याय देण्यात आला होता आता त्या अनुषंगाने परीक्षेचे केंद्र मिळणार किंवा कसे.  पोर्टलवर अर्जामध्ये असा उल्लेख आहे की जो प्रथम पर्याय आहे त्या केंद्रात प्राधान्याने दिले जाईल याबद्दल काही मार्गदर्शन.

उत्तर – सर्व उमेदवारांना हॉल तिकीट वर परीक्षा केंद्राची माहिती कळवली जाईल.

१०)  हॉल तिकीट वर सूचना काय राहतील?

उत्तर – हॉल तिकिटावर ज्या पदाची परीक्षा आहे त्या पदाचे नाव, परीक्षेचे ठिकाण, परीक्षेचे वेळापत्रक, उमेदवाराचे स्कॅन फोटो व सही, परीक्षेसंबंधी सर्वसाधारण सूचना व ओएमआर उत्तर पत्रिके बाबत सूचना, उमेदवाराची स्वाक्षरी वगैरे सर्व बाबींचा उल्लेख हॉल तिकीटवर राहतील.

११) उमेदवारांनी प्रचंड प्रमाणात अर्ज केले असल्यामुळे उमेदवारांना हॉल तिकीट वितरणाची माहिती देणे व बैठक व्यवस्थेचे काय नियोजन आहे?

 परीक्षा घेणाऱ्या संस्थेकडून पदनिहाय उमेदवारांचे हॉल तिकीट जनरेट केले जाईल व त्याची माहिती विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल तेव्हा उमेदवारांनी त्यांचे एप्लीकेशन आयडी चा वापर करून हॉल तिकीट जनरेट करून घ्यावे व त्यानुसार परीक्षा द्यावी.

१२)  काही उमेदवार अर्ज करतेवेळी वयोमर्यादेत होते आता ते वय आधिक्य झाले आहेत तर त्यांच्या अर्जाचा विचार करणार नाहीत काय?

उत्तर – अर्ज करतेवेळी अर्जदार वयोमर्यादेत असल्यामुळे त्यांना परीक्षा देता येईल व त्यांच्या अर्जाचा विचार करण्यात येईल.

१३)  ज्या पदांना अनुभवाची गरज आहे अशा पदाकरिता अर्ज केलेल्या उमेदवारांना प्रथम परीक्षा नंतर अनुभव प्रमाणपत्राची पडताळणी करणार किंवा कसे?

उत्तर – अशा उमेदवाराचे प्रथम परीक्षा घेतली जाईल निवड यादी नुसार उमेदवारांचे अनुभवाच्या प्रमाणपत्रांची पडताळणी करून ते जर पात्र ठरत असल्यास त्यांना नियुक्ती देण्यात येईल.

१४) विविध संवर्गांच्या पदांच्या परीक्षा कोणत्या वेळी घेतल्या जातील?

उत्तर – सर्व संवर्धन च्या परीक्षा एकाच दिवशी दोन सत्रांमध्ये घेतल्या जातील 14 संवर्गाच्या परीक्षा सकाळच्या सत्रामध्ये तर 40 संवर्गाच्या परीक्षा दुपारच्या सत्रामध्ये घेतल्या जातील सोबत पदनिहाय व सत्र निहाय यादी जोडली आहे.

एकूण जागा

 • Arogya Vibhag Group C (गट क) Posts Total Vacancies: 6939 Vacancies
 • Arogya Vibhag Group D (गट ड) Posts Total Vacancies: 4010 Vacancies
 • Total Group C + Group D Vacancies: 10949 Vacancies

गट क विभागनिहाय जागा – 

 1. मुंबई मंडळ: 804 Vacancies,
 2. पुणे मंडळ: 1671 Vacancies,
 3. नाशिक मंडळ: 1031 Vacancies,
 4. कोल्हापूर मंडळ: 639 Vacancies,
 5. छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) मंडळ: 470 Vacancies,
 6. लातूर मंडळ: 428 Vacancies,
 7. अकोला मंडळ: 806 Vacancies,
 8. नागपूर मंडळ: 1090 Vacancies.

गट  विभागनिहाय जागा – 

आपल्या अभ्यासासाठी आणखी वाचनीय लेख

Reference Books for Competitive Exam 2021

Maharashtra police bharti 2021 | महाराष्ट्र पोलीस भरती 2021

मी मागील 8 वर्ष MPSC आणि इतर स्पर्धा परीक्षेसंबंधी पुण्यामध्ये Classes घेत आहे, त्यामुळे या स्पर्धा कशा प्रकारे होतात, कोणते प्रश्न विचारले जातात आणि कोणत्या टॉपिक वर प्रश्न विचारले जातात या संबंधी ची पूर्ण माहिती मला असून मी माझा अनुभव या वेबसाइट द्वारे तुम्हा सर्वांपर्यंत पोचवायचा प्रयन्त करत आहे.

Leave a Comment