Best Book For Talathi Exam | Download Free Question Paper

Best book for talathi exam | Talathi Exam Books

Book for Talathi exam, महाराष्ट्र तलाठी भरती साठी आवश्यक असणाऱ्या पुस्तकांच्या शोधात असाल तर तुम्ही योग्य ठिकाणी आलेला आहात.

Best Book For Talathi Exam प्रस्तुत लेखामध्ये तलाठी भरती विषयक आवश्यक माहिती आपल्याला मिळणार आहे.

तलाठी भरती विषयक विविध प्रश्न मनामध्ये असतात जसे की तलाठी भरती परीक्षा कशी होते? तलाठी भरतीचा अभ्यासक्रम काय असतो? तलाठी भरतीचा पेपर कसा असतो? या विषयक सर्व माहिती तुम्हाला या ठिकाणी मिळेल. ही माहिती पूर्णतः वाचल्यास आणि त्या पद्धतीने तयारी केल्यास….. तुम्ही तलाठी होणारच. 

Talathi Bharti Syllabus Books

तलाठी भरती मध्ये मुख्यतः चार विषय असतात.

  • मराठी 
  • इंग्रजी
  • गणित बुद्धिमत्ता
  • सामान्य ज्ञान

प्रत्येक विषयाचे ५० गुणांसाठी २५ प्रश्न असतात. म्हणजे प्रत्येक प्रश्न दोन गुणांसाठी असतो. विशेष महत्त्वाची टीप प्रस्तुत लेखाच्या शेवटच्या भागांमध्ये दिले आहे. Talathi Bharti

तलाठी परीक्षेच्या तयारीसाठी एकत्रित पुस्तकClick Here

Talathi Bharti Book

मराठी विषयाची तयारी करण्यासाठी विशेष प्रयत्नांची गरज नसली तरी सराव मात्र नियमित असावा लागतो. मराठी ही आपली मातृभाषा असली तरी दैनंदिन वापरातील मराठी, अभ्यासक्रमातील मराठी किंवा तलाठी झाल्यानंतर प्रशासकीय स्तरावर वापरली जाणारी मराठी यामध्ये फरक असतो. म्हणून मराठी व्याकरण व्यवस्थित अभ्यासणे गरजेचे असते. मराठी विषयाच्या सविस्तर तयारीसाठी खाली दिलेले पुस्तक वापरावे.

Click For Book – Best Book For Talathi Exam – Marathi Grammar

तलाठी भरती परीक्षामध्ये दुसरा विषय आणि महत्त्वाचा विषय म्हणजे इंग्रजी होय. इंग्रजी विषयाची तयारी करताना जास्त कष्ट करावे लागतात. याची दोन कारणे सांगता येतील. 

एक म्हणजे इंग्रजी व्याकरण हे आपल्यासाठी मातृभाषा नसल्यामुळे नवीन असते. 

दुसरे म्हणजे इंग्रजी भाषा लेखन स्वरूप हे आपल्या देवनागरी भाषेपेक्षा वेगळे असल्यामुळे किंवा लॅटिन/रोमन स्वरूपामध्ये असल्यामुळे इंग्रजी भाषा कठीण वाटते.

अगदी शालेय पातळी पासून तयारी करूनही हा विषय बहुतांश जणांचा कच्चा असतो. म्हणून तलाठी भरती मध्ये सर्वात कमी मार्क देणारा हा विषय असला तरी मेरिट लिस्ट मध्ये तुमचे नाव सर्वात वर ठेवण्याची धमक याच विषयांमध्ये असते हे विसरून चालणार नाही.  इंग्रजी विषयाच्या व्यवस्थित तयारीसाठी खालील पुस्तक योग्य ठरते.

Click for Book – Best Book For Talathi ExamEnglish Grammar

गणित बुद्धिमत्ता हा विषय स्वतःच स्पष्टता देतो की माझ्या परिपूर्ण तयारीसाठी दैनंदिन सराव महत्त्वाचा आहे.

म्हणून गणित बुद्धिमत्ता विषयामध्ये नेहमी कागद पेन घेऊन प्रत्यक्ष सराव करावा. अगदी दोन अधिक दोन बरोबर चार हे तोंडी आपल्याला येत असले तरी नियमित सराव करावा. हे उदाहरण हास्यास्पद वाटत असले तरी अनेक जणांची यशोगाथा आपल्याला हेच दर्शवते की गणित कितीही साधे असू दे कागदावरती त्याचा प्रत्यक्ष सराव महत्वाचा ठरतो.

गणित बुद्धिमत्ता विषयाच्या तयारीसाठी पुढील पुस्तक तुम्ही वापरू शकता.

Click for Book – Best Book for Talathi Bharti

गणित बुद्धिमत्ता

तलाठी भरती अभ्यासक्रमामध्ये सामान्य ज्ञान हा विषय थोडा क्लिष्ट व मोठी व्याप्ति असणारा आहे. त्यामुळे प्रमाणित पुस्तकाचा वापर महत्त्वाचा ठरतो. सामान्य ज्ञान विषयांमध्ये नेमकं येते काय ? याचे सरळ सोपे आणि साधे उत्तर आहे की इयत्ता तिसरी पासून ते इयत्ता बारावी पर्यंतचा इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, सामान्य विज्ञान या विषयांमध्ये दिलेला भाग यामध्ये अंतर्भूत होतो. 

सामान्य ज्ञान विषयांमध्ये या व्यतिरिक्त आणखी एक छुपा मुद्दा असतो तो म्हणजे चालू घडामोडीचा भाग. 

ज्याप्रमाणे गणित, बुद्धिमत्तामध्ये गणित आणि बुद्धिमत्ता हे दोन स्वतंत्र भाग दिलेले असतात त्याचप्रमाणे सामान्य ज्ञान विषयांमध्ये सामान्य ज्ञान व चालू घडामोडी या दोन भागांचा अभ्यास करायचा असतो. 

सामान्य ज्ञान विषयाच्या तयारीसाठी खालील पुस्तक तुम्ही वापरू शकता.

Click For Book – Best Book for Talathi Examसामान्य ज्ञान

वरती ठळक अक्षरांमध्ये दिल्याप्रमाणे एक महत्त्वाची टीप आणि जी यशदायी ठरू शकते ती म्हणजे प्रश्नपत्रिकांचा सराव.

प्रश्नपत्रिकांच्या सरावासाठी खाली दिलेल्या प्रश्नपत्रिका तुम्ही वापरू शकता.

Talathi Bharti Question Paper

याशिवाय आताही प्रश्नपत्रिका संच तुम्ही वापरू शकाल. यासाठी खाली काही प्रश्नपत्रिका संच दिलेले आहेत. यांचा वापर सुद्धा फलदायी ठरतो.

Click for Book – Best Book for Talathi ExamQuestion set

मित्र-मैत्रिणींनो सगळ्यात महत्त्वाची सूचना किंवा टीप म्हणजे कोणत्याही परीक्षेची पुस्तके एकदा किंवा दोन वेळा वाचून त्याची तयारी होत नसते. हे ध्यानात ठेवा. 

पुस्तकांचा सराव जितका जास्त कराल तितके तुम्ही यशाच्या जवळ पोहोचाल. 

अपेक्षा आहे की तलाठी भरती संदर्भात पुस्तकांची सूची तुम्हाला या लेखातून मिळाली असेल. याव्यतिरिक्त काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता.

ही पुस्तकांची सूची तुमच्या मित्र-मैत्रिणींशी सुद्धा व्हाट्सअप, टेलिग्राम यावरती शेअर करा.

आपल्या भावी वाटचालीस मनापासून शुभेच्छा. तुम्ही तलाठी होणारच!

TALATHI BHARTI BASIC INFORMATION

MPSC Combined Exam Book List | Free Download

Upsc Book List In Marathi 2022 Free Download

Maharashtra Police Bharti 2023

मी मागील 8 वर्ष MPSC आणि इतर स्पर्धा परीक्षेसंबंधी पुण्यामध्ये Classes घेत आहे, त्यामुळे या स्पर्धा कशा प्रकारे होतात, कोणते प्रश्न विचारले जातात आणि कोणत्या टॉपिक वर प्रश्न विचारले जातात या संबंधी ची पूर्ण माहिती मला असून मी माझा अनुभव या वेबसाइट द्वारे तुम्हा सर्वांपर्यंत पोचवायचा प्रयन्त करत आहे.

2 thoughts on “Best Book For Talathi Exam | Download Free Question Paper”

    • सब्जेक्ट के हिसाब से अलग अलग चार बुक्स रेफर करोगे तो अच्छा रहेगा| आपल्या अमूल्य प्रतिसादाबद्दल आभारी आहोत. Share the link https://nitinsir.in/

      Reply

Leave a Comment