MPSC Recruitment 2022 | सहाय्यक सरकारी अभियोक्ता Latest

MPSC Recruitment 2022 एम.पी.एस.सी. मार्फत सहाय्यक सरकारी अभियोक्ता  भरती-2022

MPSC Recruitment 2022 :-  महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे विविध पदांची भरती केली जाणार आहे.  त्यापैकी एक जाहिरात 07 जानेवारी, 2022 रोजी प्रसिद्ध करण्यात आली असून या पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता व अनुभव, एकूण पदसंख्या, वेतन श्रेणी, वयोमर्यादा, परीक्षा स्वरूप, महत्त्वाच्या तारखा, इत्यादी घटकांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. एमपीएससीतर्फे सहायक सरकारी अभियोक्ता पदभरती अंतर्गत जागा भरण्यात येणार आहेत. MPSC

MPSC – Assistant Public Prosecutor | सहाय्यक सरकारी अभियोक्ता पदभरतीचा तपशील :- 

महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाच्या आस्थापनेवरील सहाय्यक सरकारी अभियोक्ता, गट-ब या संवर्गातील 547 पदावरील भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. यासंदर्भात आयोगाच्या वेबसाईटवर जाहिरात (जाहिरात क्रमांक 001/2022) प्रसिद्ध करण्यात आली आहे.

MPSC – Assistant Public Prosecutor vacancy | सहाय्यक सरकारी अभियोक्ता उपलब्ध पदसंख्या :-  547

भरावयाच्या पदांचा सामाजिक समांतर आरक्षण याबाबतचा तपशील पुढीलप्रमाणे :-

प्रवर्गएकूण पदेसर्वसाधारणमहिलाखेळाडू
अ. जा.60391803
अ. ज.25160801
वि. जा. (अ.)18120501
भ. ज. (ब.)17110501
भ. ज. (क.)27180801
भ. ज. (ड.)12070401
वि. मा. प्र.16100501
आ. दु. घ.55351703
इ. मा. व.105683205
एकूण आरक्षित33521610217
आराखीव (खुला)2121376411
एकूण पदे54735316628

 एकूण 547 पदांपैकी अनाथांसाठी 05 आणि दिव्यांगांसाठी 22 पदे राखीव ठेवण्यात आली आहेत.

MPSC Assistant Public Prosecutor // सहाय्यक सरकारी अभियोक्ता वेतन श्रेणी :-

स्तर एस-20  रुपये 56,000/- ते रुपये 1,77,500/- अधिक नियमानुसार अनुज्ञेय भत्ते.

MPSC Assistant Public Prosecutor // सहाय्यक सरकारी अभियोक्ता पात्रता निकष :-

1)भारतीय नागरिकत्व

2) वयोमर्यादा-

अ. क्र.प्रवर्गकिमान वयकमाल वय
1आराखीव (खुला)1838
2मागासवर्गीय/आ. दु. घ./अनाथ1843
3प्राविण्य प्राप्त खेळाडू अराखीव मागासवर्गीय/आ. दु. घ./अनाथ1843
4दिव्यांग उमेदवार1845

 वयोमर्यादा गणण्याचा दिनांक 1 मे, 2022  हा असेल.

MPSC Assistant Public Prosecutor // सहाय्यक सरकारी अभियोक्ता शैक्षणिक अर्हता आणि अनुभव :-

 शैक्षणिक अर्हता  :- Possess a degree in law,        and thereafter

 अनुभव :- possess experience of working as an advocate in the High Court or in a court sub-ordinate thereto,  for a period of not less than 5 years.

MPSC Assistant Public Prosecutor // सहाय्यक सरकारी अभियोक्ता कर्तव्य व जबाबदाऱ्या:-

 प्रस्तुत पदाच्या कर्तव्य व जबाबदाऱ्या याबाबतचा तपशील आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

MPSC Assistant Public Prosecutor // सहाय्यक सरकारी अभियोक्ता निवड प्रक्रिया :-

1) प्रस्तुत जाहिरातीमध्ये नमूद केलेली शैक्षणिक अर्हता, अनुभव, इत्यादी अर्हता  किमान असून, किमान अर्हता धारण केली म्हणून उमेदवार मुलाखतीस बोलविण्यात करता पात्र असणार नाही.

2) जाहिरातीस अनुसरून प्राप्त अर्जांची संख्या आयोगाच्या कार्यनियमावलीतील तरतुदीनुसार वाजवी प्रमाणापेक्षा जास्त असेल आणि अर्ज सादर केलेल्या सर्व पात्र उमेदवारांच्या मुलाखती घेणे सोयीस्कर नसल्यास मुलाखतीसाठी उमेदवारांची संख्या मर्यादित करण्याच्या दृष्टीने जाहिरातीमध्ये नमूद शैक्षणिक अर्हता आणि/अथवा अनुभव यापेक्षा अधिक शैक्षणिक अर्हता/अनुभव किंवा अन्य योग्य निकषांच्या आधारे अथवा चाळणी परीक्षेद्वारे मुलाखतीस पात्र उमेदवारांची संख्या मर्यादित करण्यात येईल.

Mpsc Book List

3) चाळणी परीक्षेचा अभ्यासक्रम, परीक्षेचे माध्यम व इतर बाबी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येतील.

4) चाळणी परीक्षा घेतल्यास चाचणी परीक्षेचे गुण व मुलाखतीचे गुण एकत्ररित्या विचारात घेऊन तर चाळणी परीक्षा न घेतल्यास केवळ मुलाखतीच्या गुणांच्या आधारे उमेदवारांची शिफारस करण्यात येईल.

5) मुलाखतीमध्ये किमान 41% व त्यापेक्षा जास्त गुण मिळवणार्‍या उमेदवारांचाच शिफारसीसाठी विचार केला जाईल.

MPSC Assistant Public Prosecutor // सहाय्यक सरकारी अभियोक्ता अर्ज करण्याची पद्धत :-

1)आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणाली वर खाते(Profile) तयार करणे.

2)आवश्यकता असल्यास खाते अद्ययावत करणे.

3)विहित कालावधीत तसेच विहित पद्धतीने आवश्यक कागदपत्रे अपलोड करून अर्ज सादर करणे.

4) परीक्षा शुल्काचा भरणा विहित पद्धतीने करणे.

MPSC Assistant Public Prosecutor // सहाय्यक सरकारी अभियोक्ता महत्त्वाच्या तारखPublic

MPSC Assistant Public Prosecutor Recruitment -2022Important DatesEventsDates
जाहिरात अधिसूचना07 जानेवारी, 2022
अर्ज सादर करण्यास सुरुवात07 जानेवारी, 2022(14:00 वाजल्यापासून)
अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक27 जानेवारी, 2022 (23:59 वाजेपर्यंत)
ऑनलाइन परीक्षा शुल्क भरण्यास करता अंतिम दिनांक27 जानेवारी, 2022 (23:59 वाजेपर्यंत)

MPSC Assistant Public Prosecutor // सहाय्यक सरकारी अभियोक्ता अर्ज शुल्क(रुपये) :-

1)अराखीव(खुला) –  रुपये 719/-

2) मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ – रुपये 449/-

3) उपरोक्त परीक्षा शुल्क व्यतिरिक्त बँक चार्जेस तसेच त्यावरील देय कर अतिरिक्त असतील.

4) परीक्षा शुल्क ना परतावा (Non-refundable) आहे.

  प्रस्तुत लेखामध्ये परीक्षेसंदर्भातील संक्षिप्त तपशील दिलेला आहे. अर्ज स्वीकारण्याची पद्धत, आवश्यक अर्हता, आरक्षण,  वयोमर्यादा, शुल्क, निवडीची सर्वसाधारण प्रक्रिया, इत्यादी बाबतच्या सविस्तर तपशिलासाठी आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावरील ‘उमेदवारांना सर्वसाधारण सूचना’ मध्ये उपलब्ध करून देण्यात आलेल्या माहितीचे अवलोकन करू शकता.

MPSC Group C advertisement 2022

  सदर जाहिरात आयोगाच्या https://mpsc.gov.in तसेच https://mpsconline.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

  आशा करतो की, सदरची माहिती तुम्हाला नक्कीच उपयोगी ठरली असेल.

For More Information

मी मागील 8 वर्ष MPSC आणि इतर स्पर्धा परीक्षेसंबंधी पुण्यामध्ये Classes घेत आहे, त्यामुळे या स्पर्धा कशा प्रकारे होतात, कोणते प्रश्न विचारले जातात आणि कोणत्या टॉपिक वर प्रश्न विचारले जातात या संबंधी ची पूर्ण माहिती मला असून मी माझा अनुभव या वेबसाइट द्वारे तुम्हा सर्वांपर्यंत पोचवायचा प्रयन्त करत आहे.

Leave a Comment