MAHA CET 2023 | MHT CET Exam 2023

MAHA CET 2023 | MHT CET Exam 2023

महाराष्ट्र कॉमन एन्ट्रन्स टेस्ट Maharashtra common entrance test महाराष्ट्र राज्यामध्ये महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष यांच्याकडून आयोजित केली जाते.

महाराष्ट्र राज्यामध्ये तांत्रिक शिक्षण, वैद्यकीय शिक्षण, इत्यादी शैक्षणिक अभ्यासक्रमांना प्रवेश देण्याचे काम या कक्षाकडे असते. यासाठी महाराष्ट्र मध्ये Maharashtra common entrance test घेतली जाते.याशिवाय कृषी शिक्षण, ललित कला शिक्षण, शिक्षण शास्त्र, कायदे अभ्यासक्रम प्रवेश इत्यादी अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी महाराष्ट्र कॉमन एंट्रन्स टेस्ट Maharashtra common entrance test आयोजित केली जात असते.

MAHA CET
Maharashtra common entrance test

MAHA CET – महाराष्ट्र कॉमन एन्ट्रन्स टेस्ट मधून पदवी कोर्सेसना प्रवेश दिला जातो. तर काही पदव्युत्तर पदवी कोर्सेस ना सुद्धा प्रवेश देण्याबाबत महाराष्ट्र कॉमन एन्ट्रन्स टेस्ट होत असते.

MAHA CET 2023 कोण कोणत्या अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा आयोजित केल्या जातात ?
अभ्यासक्रमांमध्ये मूळ शाखेव्यतिरिक्त पदवी अभ्यासक्रम व पदव्युत्तर अभ्यासक्रम असे दोन भाग केले जातात.

 • पदवी अभ्यासक्रम
 • पदव्युत्तर अभ्यासक्रम

पदवी अभ्यासक्रम
पुढील पदवी अभ्यासक्रमासाठी सामायिक प्रवेश परीक्षा घेण्यात येते.

तांत्रिक शिक्षण

 • BE Bachelor of Engineering Bachelor of Technology
 • Bachelor of Pharmacy
 • Bachelor of architecture
 • Bachelor of Planning
 • BHMCT (Bachelor of Hotel Management and Catering Technology [BHMCT])

उच्च शिक्षण कोर्सेस

 • Legum Baccalaureus or LLB
 • B.Ed
 • B.P.Ed
 • B.A.B.Ed / B.Sc.B.Ed Integrated

वैद्यकीय शिक्षण पदवी कोर्सेस

 • NEET – UG
 • आयुष कोर्सेस

पदव्युत्तर अभ्यासक्रम

तांत्रिक शिक्षण

 • MBA/MMS
 • MCA
 • M.E. / M. Tech
 • Master of architecture
 • MHMCT (Master of Hotel Management and Catering Technology [BHMCT])
 • Master of planning

उच्च शिक्षण कोर्सेस

 • M.Ed
 • M.P.Ed
 • B.Ed- M.Ed integrated

वैद्यकीय शिक्षण पदवी कोर्सेस
NEET-PGM/PGD

याशिवाय कृषी व ललित कला महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळवून देण्यासाठी परीक्षा घेण्यात येतात.

महाराष्ट्र राज्यामध्ये शैक्षणिक अभ्यासक्रमांना प्रवेश देत असताना विविध परीक्षांचे किंवा प्रवेश परीक्षांचे आयोजन करावे लागते. या सर्व परीक्षांची माहिती एकत्रितरीत्या पाहण्याची व्यवस्था या एकाच ठिकाणी करण्यात आलेली आहे.

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष, महाराष्ट्र राज्य यांनी जाहीर केलेले आहे की Maharashtra common entrance test साठी असणारा अभ्यासक्रम इयत्ता 11 वी चा 20 टक्के आणि बारावीचा अभ्यासक्रम 80 टक्के आहे. या अभ्यासक्रमाच्या आधारे प्रवेश परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातील. प्रश्नांची काठिण्य पातळी इतकी सोपी ही असणार नाही. केंद्रीय NEET परीक्षांच्या व JEE परीक्षांच्या धरतीवर या परीक्षा वैद्यकीय व तांत्रिक प्रवेश परीक्षेसाठी घेण्यात येतील.

विविध परीक्षांच्या नोंदणीपासून या परीक्षांच्या आयोजन करण्यापर्यंत व निकाल जाहीर करण्यापर्यंतची ची महत्वाची भूमिका या सामायिक परीक्षा कक्षाच्या माध्यमातून पार पाडल्या जातात.

MHT CET 2023
Mahacet 2023 परीक्षेसाठी महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षा द्वारे अभियांत्रिकी, औषधनिर्माण व कृषी च्या प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या MHT CET 2023 परीक्षेचा अभ्यासक्रम जाहीर करण्यात आलेला आहे.

mhtcet exam date
Physics-chemistry-maths साठी परीक्षा 9 ते 13 मे 2023 मध्ये होईल. Physics-chemistry-biology साठी परीक्षा 15 ते 20 मे 2023 रोजी होईल. याव्यतिरिक्त अधिक माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

Maha Cet Syllabus

MHT CET 2023 Books

MHTCET Exam 2023

❑ महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष, मुंबई तर्फे शैक्षणिक वर्ष 2023-23 साठी व्यावसायिक पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी नोंदणी अर्ज कालावधी खालील प्रमाणे –

● MBA MAHA CET 2023 अर्ज कालावधी : ☞ 23.02.2023 ते 06.03.2023

● MCA CET 2023 अर्ज कालावधी : ☞ 27.02.2023 ते 09.03.2023

● विधी 5 वर्ष CET 2023 अर्ज कालावधी : ☞ 01.03.2023 ते 11.03.2023

● M.P.Ed CET 2023 अर्ज कालावधी : ☞ 09.03.2023 ते 18.03.2023

● B.Ed CET 2023 अर्ज कालावधी : ☞ 09.03.2023 ते 14.03.2023

● विधी 3 वर्ष CET 2023 अर्ज कालावधी : ☞ 15.03.2023 ते 25.03.2023

● B.P.Ed CET 2023 अर्ज कालावधी : ☞ 20.03.2023 ते 30.03.2023

● M.Ed MAHA CET 2023 अर्ज कालावधी : ☞ 23.03.2023 ते 03.04.23

mpsc exam information in marathi

विद्यार्थ्यांचा खास करून अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शिक्षणाकडे कल असतो. अशा अभ्यासक्रमांना प्रवेश घेत असताना विविध महाविद्यालय प्रवेश देत असतात. यावेळी विद्यार्थ्यांना महाविद्यालयांमध्ये प्रवेश देण्यासाठी राज्यपातळीवर ती एकच सामायिक परीक्षा असणे हे विद्यार्थ्यांच्या दृष्टीने जास्त सोयीचे आहे. सोबत वैद्यकीय आणि अभियांत्रिकी अभ्यासक्रमाबरोबरच इतर उच्च शिक्षण विषयक अभ्यासक्रमांना प्रवेशासाठी एकत्रित नियमन पद्धती पहावयास मिळते. प्रवेशाबाबत विद्यार्थ्यांचे आर्थिक व मानसिक शोषण थांबवण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा भाग म्हणजे राज्य सामायिक प्रवेश परीक्षा MAHA CET होय.

महाराष्ट्र राज्यातील या सामायिक पूर्व परीक्षा वर्षातून एकदा होत असतात. परीक्षेची काठिण्यपातळी महाराष्ट्र राज्यातील शालेय स्तरावर ती असणाऱ्या अभ्यासक्रमाला अनुसरून असते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे परीक्षा ऑनलाइन पद्धतीने आयोजित केली जाते.

राज्यातील विविध महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्याची प्रक्रिया Maharashtra Common Entrance Test या माध्यमातून पार पाडली जाते. महाराष्ट्रातील सुमारे 500 हून अधिक महाविद्यालय या प्रक्रियेमध्ये हे सहभागी आहेत.

भारतीय न्याय व्यवस्था – सर्वोच्च न्यायालय|sarvochch nyayalay

Visit Official Site

मी मागील 8 वर्ष MPSC आणि इतर स्पर्धा परीक्षेसंबंधी पुण्यामध्ये Classes घेत आहे, त्यामुळे या स्पर्धा कशा प्रकारे होतात, कोणते प्रश्न विचारले जातात आणि कोणत्या टॉपिक वर प्रश्न विचारले जातात या संबंधी ची पूर्ण माहिती मला असून मी माझा अनुभव या वेबसाइट द्वारे तुम्हा सर्वांपर्यंत पोचवायचा प्रयन्त करत आहे.

Leave a Comment