विधानसभा निवडणूक – 2022 | ASSEMBLY ELECTION – 2022

 ASSEMBLY ELECTION – 2022 | विधानसभा निवडणूक – 2022

  Assembly election date 2022 : उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर या राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्र त्याचबरोबर इतर दोन निवडणूक आयुक्तांनी दिल्ली येथील विज्ञान भवन येथे पत्रकार परिषद द्वारा या तारखा जाहीर केल्या आहेत. मतदानाची सुरुवात उत्तर प्रदेश राज्यातून 10 फेब्रुवारी पासून होईल.

सर्व राज्यांची एकत्रित 10 मार्च रोजी मतमोजणी केली जाईल. निवडणुकीदरम्यान काटेकोरपणे नियमांचे पालन केले जाईल. सदरच्या पाच राज्यातील मतदात्यांची एकूण संख्या 18.34 कोटी इतकी आहे. त्यापैकी 8.55 कोटी महिला मतदाता आहेत. एकूण मतांपैकी 24.9 लाख मतदार हे पहिल्यांदा मतदान करणार आहेत. त्यापैकी 11.4 लाख मुली पहिल्यांदाच मतदान करतील. निवडणुकीदरम्यान सॅनिटायझर, मास्क उपलब्ध होणार आहे.

     मुख्य निवडणूक आयुक्तांनी तारखांच्या घोषणेपूर्वी सांगितले की, कोरोनामुळे निवडणुका घेणे खूप आव्हानात्मक आहे. परंतु, त्यासाठी आयोगाने जोरदार तयारी केली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्र यांनी माहिती दिली की, 80 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व्यक्ती आणि covid-19 पॉझिटिव व्यक्ती पोस्टल बॅलेट द्वारे मतदान करू शकतात. 15 जानेवारीपर्यंत कोणत्याही भौतिक रॅली, रोड शो, पदयात्रा, सायकल-बाईक रॅलीला परवानगी दिली जाणार नाही.

 दिल्ली येथील विज्ञान भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेतील ठळक मुद्दे :-

 • उमेदवारांना चाळीस लाखापर्यंत खर्च करता येणार आहे.
 • पद यात्रा, रोड शो, सायकल, बाईक रॅली वर 15 जानेवारीपर्यंत बंदी घालण्यात आली आहे.
 • अधिकाधिक  व्हर्च्युअल कार्यक्रम करण्यावर जोर.
 • विजयानंतर मिरवणूक काढण्यावर बंदी असेल.
 • निवडणूक प्रचारानंतर रात्री आठ वाजेपर्यंत बंदी.
 • केवळ पाच लोक डोअर टू डोअर प्रचार करू शकतील.
 • प्रत्येक बुथवर 1250 मतदार मतदान करू शकतील.
 • उमेदवाराला गुन्हेगारी रेकॉर्ड सांगावा लागेल.
 • सर्व कार्यक्रमांची व्हिडिओ रेकॉर्डिंग असेल.
 • सर्व आवश्यक यंत्रणांना सतर्क करण्यात आलेले आहे.
 • उमेदवारांना ऑनलाइन नोंदणी करता येणार आहे.
 • उमेदवारांना सुविधा ॲप द्वारे ऑनलाइन नाव नोंदणी करता येणार आहे.
 • कोरोनाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार निवडणुका घेतल्या जातील.
 • C vigil ॲप वर तक्रार दाखल केली जाईल.
 • सर्व निवडणूक कार्यकर्त्यांकडे कोविड लसीचे दोन्ही डोस घेतलेले असावे.
 • प्रत्येक बुथवर मास्क आणि सॅनिटायझर अनिवार्य.
 • 16 टक्के मतदान केंद्रात वाढ.
 • पर्यवेक्षक निवडणुकीवर लक्ष ठेवतील.
 • संवेदनशील बूथचे वेब कास्टिंग असेल.
 • पोलिंग बूथ पूर्णपणे स्वच्छ केली जातील.
 • सर्व निवडणूक कर्मचारी आघाडीचे कार्यकर्ते असतील.

पुढील प्रमाणे राज्यांमध्ये पार पडणार निवडणुका:- Assembly Election Date

उत्तर प्रदेशात सात टप्प्यांमध्ये निवडणुका होणार आहेत. Uttar Pradesh Assembly Election

🔹 पहिल्या टप्प्यात – 10 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे.

🔹 दुसरा टप्पा – 14 फेब्रुवारी, 2022

🔹तिसरा टप्पा – 20 फेब्रुवारी, 2022

 🔹चौथा टप्पा –  23 फेब्रुवारी, 2022

 🔹पाचवा टप्पा – 27 फेब्रुवारी, 2022

 🔹सहावा टप्पा – 3 मार्च, 2022

🔹सातवा टप्पा – 7 मार्च, 2022

पंजाब, उत्तराखंड, गोवा या तीन राज्यांमध्ये 14 फेब्रुवारी, 2022  रोजी एका टप्प्यात मतदान पार पडणार आहे.

मणिपूरमध्ये 27 फेब्रुवारी आणि 3  मार्च 2022 रोजी दोन टप्प्यात मतदान पार पडणार आहे.

Assembly Election 2017 चा निवडणुकीचा निकाल काय सांगतो? :-

उत्तर प्रदेश मधील 2017 च्या विधानसभा निवडणुकीचा निकाल पुढीलप्रमाणे –

एकूण जागा – 403 (बहुमताचा आकडा -202)

भाजपा – 325

सपा – 47

बसपा – 19

काँग्रेस – 7

इतर – 5

पंजाब मधील 2017 च्या विधानसभा निवडणुकीचा निकाल पुढील प्रमाणे – Panjab Assembly Election

एकूण जागा – 117 (बहुमताचा आकडा – 59)

काँग्रेस – 77

आम आदमी पार्टी – 20

शिरोमणी अकाली दल – 15

भारतीय जनता पार्टी – 03

लोक इंसाफ पार्टी – 02

उत्तराखंड मधील 2017 च्या विधानसभा निवडणुकीचा निकाल पुढील प्रमाणे – Uttarakhand Assembly Election

एकूण जागा – 70 (बहुमताचा आकडा – 36)

भाजपा – 57

काँग्रेस – 11

इतर – 02

Goa Assembly Election गोवा मधील 2017 च्या विधानसभा निवडणुकीचा निकाल पुढील प्रमाणे –

एकूण जागा – 40 (बहुमताचा आकडा – 21)

भाजपा – 13

काँग्रेस  – 17

आप – 00

इतर 10

Manipur Assembly Election मणिपूर मधील 2017 च्या विधानसभा निवडणुकीचा निकाल पुढील प्रमाणे –

एकूण जागा – 60 (बहुमताचा आकडा – 31)

काँग्रेस  – 28

भाजपा – 21

इतर – 11

उत्तर प्रदेश राज्यातील सध्याची परिस्थिती खालील प्रमाणे असेल :-

मुख्यमंत्री पदाचे दावेदार :-

1) योगी आदित्यनाथ :- भाजपा युतीचे सध्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे मुख्यमंत्री पदाचा एक महत्त्वाचा चेहरा असेल.  2017 मध्ये कोणत्याही चेहराविना लढणाऱ्या भाजपाला या निवडणुकीत पूर्वीच्या प्रदर्शनाला साजेशी निवडणूक लढवण्याचे आव्हान असेल. तर 2017 मध्ये भाजपाचे सहयोगी राहिलेले ओम प्रकाश सध्या समाजवादी पार्टी सोबत आहेत. अशावेळी भाजपाला पूर्वीय भागात आव्हाने वाढू शकतात.  तसेच, शेतकरी आंदोलनांमुळे पश्चिमी उत्तर प्रदेशामध्ये 2017 सारखे प्रदर्शन करणे हे देखील एक मोठे आव्हान असेल.

2) अखिलेश यादव :- सपाचे मुख्य अखिलेश यादव हे विपक्षकडून मुख्यमंत्रीपदासाठीचा मुख्य चेहरा आहे. अखिलेश यादव यांच्या जलद प्रचाराने भाजपाच्या विरुद्ध एक मोठा चेहरा म्हणून ते उभे असणार आहेत. अखिलेश हे 2012 ते 2017 मध्ये उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत.

3) मायावती :- चार वेळा उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री राहिलेल्या मायावती यावेळी बसपचा मुख्य चेहरा असेल मायावतींनी सध्या तरी मोठ्या प्रमाणावर प्रचाराला सुरुवात केली नाही परंतु बस पाच बोट बँक नेहमी मायावती यांच्या सोबत असतो.

UP Assembly Election निवडणूक प्रचारातील महत्त्वाचे मुद्दे :-

विपक्ष सरकार नेहमी उत्तर प्रदेश मध्ये महागाई हा मुद्दा उचलून धरते. अखिलेश, प्रियंका यासारखे नेते पेट्रोल-डिझेल सोबतच खाद्यतेलाच्या वाढत्या किमतीचा उल्लेख आपल्या जनसभा मध्ये करताना दिसतात.

 Assembly Election पंजाब निवडणुकीबाबत थोडक्यात :-

     2017 च्या तुलनेने यावेळी पंजाबमधील निवडणुकीत अनेक बदल झालेले दिसतील. त्यावेळी सत्तेमध्ये भाजपा-अकाली यांची युती होती. यावेळी मात्र हे वेगळे असतील. भाजपने कॅप्टन अमरिंदर यांच्या नवीन पार्टीसोबत गठबंधन केलेली आहे. त्याचबरोबर, अकाली दल बसपाच्या सोबत असेल. 2017 मध्ये कॅप्टन काँग्रेसचा मुख्य चेहरा होता. यावेळी ते काँग्रेसच्या विरुद्ध असतील. यावेळी सिद्धू हा काँग्रेसचा मोठा चेहरा असेल. यावेळी आम आदमी पार्टी चंदीगड महानगरपालिका निवडणूक यशामुळे  उत्साहित आहे.

 मुख्यमंत्री पदाचे दावेदार :-

1)चरणजीत सिंह चन्नी :- सध्याचे मुख्यमंत्री चरणजित सिंह चन्नी काँग्रेसकडून मुख्यमंत्री पदाचे प्रबळ दावेदारीमध्ये सामील आहेत. पार्टी त्यांना पुढेदेखील मुख्यमंत्री पदावर राखण्यासाठी चर्चा करत आहेत. मात्र नवजोत  सिद्धू सतत स्वतः पुढील निवडणुकीत मुख्यमंत्री पदाचा चेहरा बनण्यासाठी दबाव टाकत आहेत.

2)सुखबीर बादल :- अकाली दलाकडून सुखबीर बादल मुख्यमंत्री पदाचा चेहरा असतील. 2012 ते 2017 पर्यंत राज्याचे उपमुख्यमंत्री राहिलेले आहेत. वडील प्रकाश सिंह बादल यांच्या वयामुळे सध्या ते पार्टीचा चेहरा बनलेले आहेत.

3) कॅप्टन अमरिंदर सिंह :- नवीन पार्टी तयार करून भाजपा बरोबर समझोता करण्याचे त्यांनी जाहीर केले आहे.

निवडणूक प्रचारातील महत्त्वाचे मुद्दे :-

1)कृषी कायदा आणि शेतकरी :- तिन्ही कृषी कायदे मागे घेण्यात आले असले तरीही निवडणुकीतील हा महत्त्वाचा मुद्दा असेल. या कायद्यांना सर्वात जास्त विरोध पंजाबमध्ये झालेला होता. या कायद्यामुळेच अकाली दल ने भाजपा बरोबरची जुनी युती तोडली होती.

2) बेरोजगारी :- निवडणूक प्रचार सभामध्ये मध्ये विपक्ष बेरोजगारीचा मुद्दा उठवतील. पंजाब मधील युवकांमध्ये रोजगाराच्या कमी संधीमुळे असंतोष नेहमीच वाढत राहिला आहे.

उत्तराखंड निवडणूकीबाबत थोडक्यात :-

     एकूण 70 जागा असलेल्या उत्तराखंड विधानसभेचा कार्यकाल 23 मार्च, 2022 रोजी संपत आहे. मात्र, राज्यात निवडणुकीचे वातावरण तापलेले आहे. तेथे काँग्रेससह, भाजप, आम आदमी पार्टी, बसपा आणि अनेक छोटी पक्ष आपले नशीब आजमावणार आहेत. तथापि, उत्तराखंडची निवडणूक भाजपसाठी सर्वात आव्हानात्मक आहे. कारण तेथे गेल्या दोन दशकांपासून दर पाच वर्षांनी सत्ता बदलण्याची परंपरा आहे. अशा स्थितीत काँग्रेसला पुन्हा सत्तेत येण्याची आशा आहे. पण काँग्रेसला टक्कर देत भाजप सत्ता परिवर्तनाची परंपरा मोडीत काढण्यासाठी प्रयत्न करेल.

 मुख्यमंत्री पदाचे दावेदार :-

1)पुष्कर सिंह धामी :- ऐन निवडणुकीच्या पूर्वी मुख्यमंत्री बनलेले धामी हे या निवडणुकीमध्ये भाजप पक्षाकडून मुख्यमंत्रिपदाचा मुख्य चेहरा असेल.

2) हरीश रावत :- काँग्रेस पक्षाने या निवडणुकीसाठी मुख्यमंत्री पदासाठी उमेदवार घोषित केलेला नाही. असे असले तरी हरीश रावत हे मुख्यमंत्री पदासाठी सर्वात मोठे दावेदार आहेत.

3) अजय कोठियाल :- आम आदमी पार्टी करून कर्नल अजय कोठियाल मुख्यमंत्री पदाचा चेहरा असेल. आप ने मागील 17 ऑगस्टला पक्षाच्या मुख्यमंत्री चेहऱ्याची घोषणा केली होती. कोठीवाल यांनी 26 वर्षे लष्करामध्ये सेवा दिलेली आहे.

 निवडणूक प्रचारातील महत्त्वाचे मुद्दे :-

1) नवीन जिल्ह्यांची निर्मिती :- 2000 साली नवीन राज्य म्हणून निर्मिती झाल्यानंतर एकही नवीन जिल्हा बनलेला नाही. काँग्रेस सरकारने नवीन जिल्ह्यांची निर्मिती करणार असल्याचे सांगितले आहे. तसेच आम आदमी पार्टीनेदेखील सत्तेमध्ये आल्यास 6 नवीन जिल्ह्यांची निर्मिती करण्याचे वचन दिलेले आहे. भाजपने सांगितले की, जिल्हा निर्मितीसाठी निर्माण केलेल्या आयोगाच्या अहवालाच्या आधारावर निर्णय घेतला जाईल.

2) बेरोजगारी आणि पलायन :- रोजगाराच्या संधी उपलब्ध नसल्याने डोंगरी भागातील लोकांचे पलायन हा एक मोठा मुद्दा आहे. पलायन या ठिकाणचा इतका मोठा मुद्दा आहे की सरकारने पलायन थांबवण्यासाठी पलायन आयोगाची स्थापना केली होती. हाच आयोग सांगतो की, जवळपास 60% लोकांनी उत्तराखंडमधून घरे सोडलेली आहेत.

गोवा निवडणूकीबाबत थोडक्यात :-

     यावेळी भाजप आणि काँग्रेससोबत निवडणुकीच्या रिंगणात आम आदमी पक्ष आणि तृणमूल काँग्रेसही उतरले आहे. गोव्यात गेल्या 10 वर्षांपासून भाजप सत्तेत आहेत. भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डाही पूर्ण 8ताकदीनीशी निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. तर दुसरीकडे काँग्रेसही पूर्णपणे ताकदीनीशी उतरण्याच्या तयारीत आहे. काँग्रेसच्या काही नेत्यांनी निवडणुकीपूर्वी टीएमसी मध्ये प्रवेश केला आहे. 2017 मध्ये पार पडलेल्या निवडणुकांमध्ये आम आदमी पक्षाला एकाही जागेवर विजय मिळवता आला नव्हता.

मुख्यमंत्री पदाचे दावेदार :-

1)प्रमोद सावंत :- सत्तारूढ भाजपचे सध्याचे मुख्यमंत्री या निवडणुकीतील भाजपचे मुख्यमंत्री पदाचे प्रबळ दावेदार आहेत.

2) दिगंबर कामत :- साल 2007 ते 2012 पर्यंत गोव्याचे मुख्यमंत्री राहिलेले दिगंबर कामत यावेळी काँग्रेसचा मुख्य चेहरा असेल.

3)अमित पालेकर :- गोव्यात आम आदमी पक्षाने अमित पालेकर यांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा बनवले आहे. मुख्यमंत्री पदाच्या उमेदवारीसाठी त्यांचे नाव आघाडीवर होते. आपला मुख्यमंत्री पदाचा चेहरा भंडारी समाजाचा असेल, असे आपने आधीच सांगितले होते. गोव्यातील सुमारे 35% लोकसंख्या भंडारी समाजाची आहे.

निवडणुकीतील महत्त्वाचे मुद्दे :-

1) उत्खननाचा मुद्दा :- पहिल्या राज्याच्या अर्थव्यवस्थेमध्ये लोहच्या उत्खननाचा हिस्सा 75 टक्के पर्यंत होता.  साल 2012 पूर्वी राज्याच्या अर्थव्यवस्थांमध्ये याचा हिस्सा पर्यटन क्षेत्रापेक्षा जास्त होता. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर राज्यात दहा वर्षांसाठी उत्खनन बंद आहे. यामुळे राज्यात मुख्यत्वेकरुन दक्षिण गोव्यामध्ये निवडणूक प्रचारातील हा मोठा मुद्दा असेल. या निवडणुकीत सर्वच पक्ष उत्खनन पुन्हा सुरू करण्याचे आश्वासन देत आहेत.

2) बेरोजगारी :- राज्यातील तरुणांमध्ये बाकी राज्यांप्रमाणेच रोजगाराची कमी उपलब्धता हा एक मोठा मुद्दा असेल. कोरोना व्हायरस महामारीमुळे पर्यटनावर झालेल्या परिणामामुळे बेरोजगारीमध्ये वाढ झाली आहे.

3)नशा आणि जुगार :- गोव्याच्या समुद्रकिनारी iनशा आणि जुगारच्या विरोधात मागील सरकारने मोठ्या प्रमाणात सक्ती केलेली आहे. हा मुद्दा देखील महत्त्वाचा असेल.

मणिपूर निवडणुकीबाबत थोडक्यात :-

   कोरोना संकटामध्ये मणिपूरमध्ये दोन टप्प्यात मतदान होत आहेत. पहिल्या टप्प्यात 27 फेब्रुवारी 2022 रोजी मतदान केले जाईल. पहिल्या टप्प्यात 38 जागांसाठी मतदान होईल. राहिलेल्या 22 जागांसाठी दुसऱ्या टप्प्यात 3 मार्च 2022 रोजी मतदान होईल.

मुख्यमंत्री पदाचे दावेदार :-

1)एन बिरेन सिंह :- बिरेन सिंह राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री आहेत. पाच वर्षे सरकार चालवणारे बिरेन सिंह पुन्हा एखादा मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीमध्ये आहेत.

2) थोंगम बिस्वजीत सिंह :- आरएसएसचा संबंध असलेले 2017 मध्ये भाजपा सरकारच्या युतीमध्ये महत्वाची भूमिका राहिलेली आहे. भाजपा जर मणिपूरमध्ये आसाम मॉडेल लागू केला तर निवडणूक जिंकल्यानंतर बिस्वजीत नवीन मुख्यमंत्री बनू शकतात.

3) इकरार इबोबी सिंह :- 15 वर्षे मुख्यमंत्री राहिलेले इकरार इबोबी सिंह यावेळी काँग्रेसमधून मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीमध्ये आहेत.

निवडणूक प्रचारातील महत्त्वाचे मुद्दे :-

1)अफस्पा(AFSPA):अन्य ईशान्य राज्यांप्रमाणेच मणिपूरमध्येदेखील अफस्पा हा मुख्य मुद्दा आहे. केवळ विरोधी पक्षच नाही तर भाजपाचे सहयोगी एपीएफ आणि एनपीपीने देखिल हा कायदा मागे घेण्यासाठी प्रयत्न केले आहेत. मणिपूर प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्यकारी अध्यक्ष मेघचंद्र यांचा दावा आहे की, जर 2022 मध्ये काँग्रेस पुन्हा सत्तेत आली तर संपूर्ण मणिपूरमधून अफस्पा कायदा मागे घेण्याचा निर्णय घेण्यात येईल.

2) बेरोजगारी :- राज्यामध्ये बेरोजगारी देखील महत्वाचा निवडणूक मुद्दा आहे.  विपक्षी सरकारचा आरोप आहे की, 2017 मध्ये भाजपाने प्रत्येक घरी एक नोकरीची संधी देण्याचे आश्‍वासन दिले होते. मात्र आजही राज्यातील लोकांचे सरासरी उत्पन्न देशाच्या सरासरी उत्पन्नाच्या निम्मे आहे.

      वरील माहिती जर आपणास उपयुक्त वाटली असेल तर लिंक शेअर करायला विसरू नका आणि खाली कमेंट करायला सुद्धा विसरू नका.

मी मागील 8 वर्ष MPSC आणि इतर स्पर्धा परीक्षेसंबंधी पुण्यामध्ये Classes घेत आहे, त्यामुळे या स्पर्धा कशा प्रकारे होतात, कोणते प्रश्न विचारले जातात आणि कोणत्या टॉपिक वर प्रश्न विचारले जातात या संबंधी ची पूर्ण माहिती मला असून मी माझा अनुभव या वेबसाइट द्वारे तुम्हा सर्वांपर्यंत पोचवायचा प्रयन्त करत आहे.

Leave a Comment