Maharashtra Arogya Bharti 2021 Apply Now

Arogya bharti 2021

महाराष्ट्र शासनाने नुकतीच आरोग्य विभागातील भरती प्रक्रिया करता जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे. सदर जाहिराती मधील महत्वाचे मुद्दे आपण या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत. Arogya bharti 2021

arogya bharti

 महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत गट क संवर्गातील सरळसेवेने रिक्त पदे भरण्याबाबत ची जाहिरात २०२१

आयुक्त आरोग्य सेवा आयुक्तालय मुंबई यांच्या अधिपत्याखालील विविध नियुक्ती प्राधिकारी यांच्या आस्थापनेवरील खालील नमूद केलेल्या गट क संवर्गातील 52 पदांची भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. 

 ५२ प्रकाराची पदे यामध्ये देण्यात आलेली आहेत. एकूण २७२५ इतकी पदांची भरती होणार आहे.

या विविध प्रकारच्या पदांमध्ये  वस्त्रपाल,  प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, क्ष-किरण तंत्रज्ञ, औषध निर्माण अधिकारी, आहार तज्ञ, कनिष्ठ लिपिक, ग्रंथपाल या सारख्या विविध पदांचा समावेश आहे. 

सदरील महत्त्वाची पदे  उपसंचालक,आरोग्य सेवा मंडळ –  पुणे, ठाणे, कोल्हापूर, नाशिक, अकोला, नागपूर, लातूर, औरंगाबाद, मुंबई या विविध कार्यालयांमध्ये भरावयाचे आहेत. 

विभागानुसार जागांचा तपशील खालीलप्रमाणे देण्यात आलेला आहे.

उपरोक्त पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने आहे.  यासाठी अर्ज करण्यासाठी महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग यांच्या माध्यमातून आवेदन दिनांक 6 ऑगस्ट 2021 पासून 20 ऑगस्ट 2021 पर्यंत स्वीकारली जाणार आहेत. 

यासाठी अधिकृत वेबसाईट पुढीलप्रमाणे 

www.arogyabharti2021.in 

आणखी वाचा

MAHATET Syllabus 2021 In Marathi | MAHATET 2021

Reference Books for Competitive Exam 2021

मी मागील 8 वर्ष MPSC आणि इतर स्पर्धा परीक्षेसंबंधी पुण्यामध्ये Classes घेत आहे, त्यामुळे या स्पर्धा कशा प्रकारे होतात, कोणते प्रश्न विचारले जातात आणि कोणत्या टॉपिक वर प्रश्न विचारले जातात या संबंधी ची पूर्ण माहिती मला असून मी माझा अनुभव या वेबसाइट द्वारे तुम्हा सर्वांपर्यंत पोचवायचा प्रयन्त करत आहे.

1 thought on “Maharashtra Arogya Bharti 2021 Apply Now”

Leave a Comment