MPSC Practice Question in Marathi | MPSC Question Set in Marathi

MPSC Practice Question in Marathi | MPSC Question Set in Marathi

1) राष्ट्रपती हे देशाचे …….. असतात.

 • a) वास्तव प्रमुख 
 • b) परराष्ट्र धोरणाचे प्रवक्ते 
 • c) कार्यकारी प्रमुख 
 • d) राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष.

Ans – कार्यकारी प्रमुख.


2) धर्म, वंश, जात, लिंग, जन्मस्थान यासारख्या कोणत्याही भेदभावा विना नागरिकांना समान वर्तणूक प्रदान करणे म्हणजे …….. होय.

 • a) आर्थिक न्याय
 • b) धार्मिक न्याय
 • c) सामाजिक न्याय
 • d) राजकीय न्याय

Ans.सामाजिक न्याय


3.भारतीय संविधानाचे पहिले परिशिष्ट……. संबंधित आहे.

 • a) अधिकृत भाषा 
 • b) संघराज्य व राज्य क्षेत्र 
 • c) मूलभूत हक्क 
 • d) निवडणुका

Ans – संघराज्य व राज्य क्षेत्र (MPSC IMP question in Marathi)


4) खालीलपैकी कोणती जोडी बिनचूक आहे.

 • a) संसदेची निर्मिती कलम   81
 • b) राष्ट्रपतीपदा ची निवडणूक कलम 54 
 • c) भारताचे उपराष्ट्रपती कलम 64 
 • d) भारताचा महान्यायवादी कलम 76

Ans – भारताचा महान्यायवादी कलम 76


5) जेव्हा ……अविश्वास ठराव संमत होतो तेव्हा मंत्रिपरिषद बरखास्त होते.

 • a) लोकसभेत 
 • b) राज्यसभेत
 • c) विधानपरीषदेत 
 • d) संसदेत

Ans. लोकसभेत


6.भारतात राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मतदार कोण नसतात?

 • a) लोकसभेचे निर्वाचित सदस्य 
 • b) राज्यसभेचे निर्वाचित सदस्य 
 • c) विधानसभेचे निर्वाचित सदस्य 
 • d) राज्यसभेचे नामनिर्देशित सदस्य

Ans – राज्यसभेचे नामनिर्देशित सदस्य


7.राष्ट्रपती कडून पंतप्रधानांची निवड खालीलपैकी कोणत्या निकषावर केली जाते?

अ) ती व्यक्ती लोकसभेतील बहुमत कारी पक्षाचे नेता असावी.

ब) ती व्यक्ती राष्ट्रपती च्या मर्जीतील असावी.

क) ती व्यक्ती लोकसभेतील बहुमताचा विश्वास प्राप्त करू शकणारी असावी.

ड) संबंधित व्यक्तीच्या पक्षाला लोकसभेत किंवा राज्यसभेत बहुमत असले पाहिजे.

 • a) फक्त अ
 • b) अ आणि ब
 • c) अ आणि क
 • d) अ,क आणि ड

Ans. – अ आणि क


8.……..या विधेयकाला संसदेच्या प्रत्येक सभागृहाने विशेष बहुमताने संमत करणे बंधनकारक असते.

 • a) वित्तीय विधेयक 
 • b) धन विधेयक 
 • c) घटनादुरुस्ती विधेयक 
 • d) सर्वसाधारण विधेयक

Ans-  घटना दुरुस्ती विधेयक


9.भारतीय संविधानात दहा मूलभूत कर्तव्य यांचा समावेश केव्हा करण्यात आला?

 • a) 1969
 • b) 1951 
 • c) 1975
 • d) 1976

Ans. 1976


10.भारतीय राज्यघटनेमध्ये आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा यांचा समावेश पुढीलपैकी कशात केलेला आहे?

 • a) राज्यघटनेची उद्देशपत्रिका
 • b) मार्गदर्शक तत्वे
 • c) मूलभूत कर्तव्य
 • d) नववी सूची

Ans – मार्गदर्शक तत्वे (mpsc question set)

11.मूलभूत अधिकारातील ‘खाजगीपणाचा अधिकार’ कोणत्या कलमामध्ये समाविष्ट करण्यात आला आहे?

 • a) जीविताचा व व्यक्तिगत स्वातंत्र्याचा अधिकार
 • b) समानतेचा अधिकार
 • c) शोषणाविरुद्धचा अधिकार
 • d) धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार

Ans. जीविताचा व व्यक्तिगत स्वातंत्र्याचा अधिकार


12.भारतीय राज्यघटनेचा सरनामा मध्ये खालीलपैकी कशाचा प्रथम उल्लेख करण्यात आला आहे?

 • a) स्वातंत्र्य
 • b) समता
 • c) बंधुता
 • d) न्याय

Ans. न्याय


13.भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमानुसार देवनागरी लिपी मध्ये हिंदी अधिकृत व्यवहार भाषा आहे?

 • a) कलम 340
 • b) कलम 343
 • c) कलम 350
 • d) कलम 352

Ans. कलम 343 (mpsc question set)


14.भारतीय राज्यघटनेचे स्त्रोत बाबत खालील विधानांचा विचार करा.

अ)संसदीय लोकशाही = ब्रिटिश राज्यघटना 

ब)संघराज्य = अमेरिकेचे राज्यघटना 

क)मार्गदर्शक तत्वे = आयर्लंडचे राज्यघटना 

ड) सामायिक सूची = ऑस्ट्रेलियाची राज्यघटना

यातील कोणती जोडी चुकीची आहे?

 • a) ड
 • b) ब
 • c) क
 • d) सर्व बरोबर

Ans. सर्व बरोबर


15.कोणत्या समित्यांमध्ये बाबासाहेब आंबेडकर यांनी सदस्य म्हणून कार्य केले?

अ) मूलभूत अधिकार समिती

ब) अल्पसंख्यांक उपसमिती

क) सल्लागार समिती

ड) राज्य समिती

 • a) अ,ब,क
 • b) ब,क,ड
 • c) अ,ब,ड
 • d) अ,क,ड

Ans. अ, ब, क


16.नागरिकत्व कायदा 1955 अंतर्गत खालीलपैकी कोणत्या पर्यायाद्वारे एखादी व्यक्ती भारताच्या नागरिक बनू शकते?

अ) भूमी अधिग्रहित झाल्यामुळे 

ब) वारसाहक्काने 

क) जन्म भारतात झाल्याने 

ड) राष्ट्रीयीकरणाद्वारे 

ई) नोंदणी द्वारे

 • a) ब, क, ड आणि ई
 • b) अ, ब, क आणि ड
 • c) अ,ड,क आणि ई
 • d) अ,ब,क आणि ई

Ans.अ,ब,क आणि ई


17.खालीलपैकी कोणते मार्गदर्शक तत्व ही समाजवादी तत्त्व नाही?

 • a) सर्वांना समान कामाबद्दल समान वेतन
 • b) समान न्याय व मोफत कायदेविषयक सहाय्य
 • c) समान नागरी कायदा
 • d) संपत्ती व उत्पादन साधनाचे केंद्रीकरण रोखणे

Ans. समान नागरी कायदा


18. खालीलपैकी कोणत्या प्रकरणात भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने राज्य घटनेच्या मूलभूत संरचनेत संस्थेला बदल करता येणार नाही असा निर्णय दिला?

 • a) शंकरी प्रसाद विरुद्ध भारत सरकार
 • b) गोलकनाथ विरुद्ध पंजाब राज्य
 • c) केशवानंद भारती विरुद्ध केरळ राज्य
 • d) मिनर्वा मिल्स लिमिटेड विरुद्ध भारत सरकार

Ans. केशवानंद भारती विरुद्ध केरळ राज्य


19.जर एखाद्या व्यक्तीचे राष्ट्रपती म्हणून झालेली निवडणूक सर्वोच्च न्यायालयाने रद्द केली तर त्या व्यक्तीने तत्पूर्वी केलेले आदेश.

 • a) विधी अग्राह्य ठरतात 
 • b) विधिग्राह्य राहतात 
 • c) विधीग्राह्य अथवा अग्राह्य सर्वोच्च न्यायालय ठरवते 
 • d) प्रकरण परत्वे ठरवले जाते

Ans. विधिग्राह्य राहतात.


20.भारताच्या उपराष्ट्रपती बाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे.

अ) या पदासाठी असलेल्या निर्वाचन मंडळांमध्ये संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या निर्वाचित सदस्यांचा समावेश असतो.

ब) ते राष्ट्रपती च्या अनुपस्थितीमध्ये सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ नाही इतक्या कालावधीसाठी राष्ट्रपती पदावर राहू शकतात.

क) या पदाच्या निवडणुकीसाठी किमान वीस मतदार हे प्रस्तावक आणि 20 मतदार हे अनुमोदक असणे आवश्यक असते.

 • a) अ
 • b) ब
 • c) क
 • d) सर्व योग्य

Ans. अ


21.भारतीय राज्यघटनेत व्यक्तीच्या मूलभूत कर्तव्य ची तरतूद कोणत्या देशाच्या राज्यघटने वरून घेण्यात आली आहे?

 • a) फ्रान्स 
 • b) यु एस ए 
 • c) यु एस एस आर 
 • d) यु के

Ans. यु एस एस आर


22.केशवानंद भारती खटला 1973 नुसार योग्य विधान/ विधाने निवडा.

अ)भारतीय संसद पूर्णपणे सार्वभौम नाही.

ब)भारताचे सर्वोच्च न्यायालय पूर्णपणे सार्वभौम आहे.

 • a) फक्त अ
 • b) फक्त ब
 • k) अ व ब दोन्ही
 • d) दोन्ही नाहीत

Ans. फक्त अ


23.खालीलपैकी कोणी भारतीय संविधानाला अर्ध संघराज्य असे म्हटले आहे?

 • a) के.सी. व्हेअर
 • b) मॉरीस जोन्स
 • c) एवोर जिनिंग
 • d) ग्रनविल ऑस्टिन

Ans. के.सी. व्हेअर


24.दिलेल्या विधानातून अयोग्य विधान निवडा.

 • a) भारत सार्वभौम आहे म्हणजेच भारतावर कोणत्याही बाह्य शक्तीचा प्रभाव नाही.
 • b) भारतीय समाजावाद हा फक्त गांधीवादावर अवलंबून आहे.
 • c) भारतात कोणत्याही धर्माचे आचरण करण्यास प्रत्येकास मुक्त स्वातंत्र्य बहाल केलेले आहे.
 • d) भारत हे गणराज्य आहे.

Ans. भारतीय समाजवाद हा फक्त गांधीवादावर अवलंबून आहे.


25. उपराष्ट्रपती पदाची निवडणूक कलम 66 नुसार पार पडते. याबाबत अयोग्य विधान ओळखा.

 • a) वयाची पस्तीस वर्षे पूर्ण केलेली असावीत.
 • b) तू राज्यसभेचा किंवा लोकसभेचा उमेदवार म्हणून निवडून येण्यास पात्र असावा.
 • c) उमेदवारी अर्ज भरताना आवेदनपत्र किमान वीस मतदा त्यांचा पाठिंबा व वीस मतदा त्यांचे अनुमोदन असावी लागते.
 • d) रिझर्व बँक ऑफ इंडिया मध्ये पंधरा हजार रुपये अनामत रक्कम भरावी लागते.

Ans. तो राज्यसभेच्या किंवा लोकसभेचा उमेदवार…


26. लोकसभा अध्यक्ष आणि त्यांचे हक्क याबाबत कोणते विधान चुकीचे आहे?

 • a) संयुक्त बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवणे.
 • b) गण संख्येच्या अभावी सभा तहकूब करणे.
 • c) निर्णायक मत देणे.
 • d) संसदेचे अधिवेशन बोलणे व समाप्त करणे.

Ans. संसदेचे अधिवेशन बोलावले व समाप्त करणे.


27. अयोग्य विधान निवडा.

 • a) अनुदानाची मागणी राष्ट्रपतीच्या संमतीनेच करता येते.
 • b) राष्ट्रपतींना केंद्राचा व राज्याचा वित्त आयोग नेमण्याचा अधिकार आहे.
 • c) राज्यपाल राज्याच्या आकस्मिक खर्च निधीतून अग्रीम राशीची तरतूद करू शकतात.
 • d) वरील सर्व विधाने योग्य आहेत.

Ans. राष्ट्रपतींना केंद्राचा व राज्याचा वित्त आयोग नेमण्याचा अधिकार आहे.


28.राष्ट्रीय राजधानी प्रदेश दिल्ली संबंधी संदर्भ …………….. मध्ये सापडतात.

 • a) अनुच्छेद 239 A
 • b) अनुच्छेद 239 AA
 • c) अनुच्छेद 239 AB
 • d) अनुच्छेद 239 B

Ans. अनुच्छेद 239 aa


29. खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला पदावरून दूर करताना महाभियोग पद्धत वापरली जात नाही?

a) राष्ट्रपती राज्यपाल

b) मुख्य निवडणूक

c) आयुक्त सर्वोच्च

d) न्यायालयाचे न्यायाधीश

उत्तर – राज्यपाल

भारतीय शेती चे महत्व आणि अर्थव्यवस्थेतील स्थान

mpsc question set

मी मागील 8 वर्ष MPSC आणि इतर स्पर्धा परीक्षेसंबंधी पुण्यामध्ये Classes घेत आहे, त्यामुळे या स्पर्धा कशा प्रकारे होतात, कोणते प्रश्न विचारले जातात आणि कोणत्या टॉपिक वर प्रश्न विचारले जातात या संबंधी ची पूर्ण माहिती मला असून मी माझा अनुभव या वेबसाइट द्वारे तुम्हा सर्वांपर्यंत पोचवायचा प्रयन्त करत आहे.

3 thoughts on “MPSC Practice Question in Marathi | MPSC Question Set in Marathi”

Leave a Comment