MPSC Combined Exam Book List | MPSC Combine Book List
MPSC Combined Exam Book List च्या शोधात असाल तर तुमचा शोध येथे संपणार आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये अनेक यशस्वी विद्यार्थ्यांनी सुचविलेले आणि विश्वसनीय पुस्तकांची यादी तुम्हाला इथे मिळेल. कोणत्याही प्रकारची साशंकता मनामध्ये न वापरता जर या पुस्तकांचा तुम्ही वापर केला तर शंभर टक्के यश तुम्हाला मिळणार आहे.
पुस्तकांची यादी सुरुवात करण्याआधी सदर परीक्षेसाठी MPSC Combined Exam अगदी अलिकडे आलेली जाहिरात तुम्हाला या ठिकाणी मिळेल. म्हणजे अंतर्भूत असणाऱ्या तिन्ही पदांसाठी किती जागा आहेत हे आपल्याला कळून येईल. त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या अभ्यासाची रणनीती वापरू शकता.
सदर परीक्षेची जाहिरात ही एकूण तीन पदांसाठी येत असते.
या पदासाठी एकत्रितरीत्या संयुक्तपणे पूर्वपरीक्षा घेतली जात असते. यामध्ये अभ्यासाचे एकूण सात विषय असतात. विचारले जाणारे प्रश्न पत्रिका ही 100 गुणांसाठी असते. एकूण प्रश्न संख्या 100 असते. यासाठी उपयुक्त संदर्भ ग्रंथ सूची पुढीलप्रमाणे.
MPSC Combined Exam Book List
महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रितगट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021
एकूण जागा – 666
परीक्षेचा दिनांक – 26 फेब्रुवारी 2022
पूर्व परीक्षा एकूण गुण – 100
अभ्यासाचे एकूण विषय – 7
1) चालू घडामोडी – दररोज लोकसत्ता वर्तमानपत्र वाचणे, पृथ्वी परिक्रमा,
2) नागरिक शास्त्र – इंडियन पॉलिटी – लक्ष्मीकांत (Click For Book)
3) इतिहास – अकरावी स्टेट बोर्ड, आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास – डॉ. एस एस गाठाळ (Click For Book)
4) भूगोल (महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह) – महाराष्ट्राचा भूगोल – ए. बी. सवदी (Click For Book)
5) अर्थव्यवस्था – भारतीय अर्थव्यवस्था रंजन कोळंबे / इकॉनोमिक किरण देसले (Click For Book 1 / Book 2)
6) सामान्य विज्ञान – स्टेट बोर्ड सहावी ते दहावी (Click For Book)
7) बुद्धिमापन चाचणी व अंकगणित – मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका सोडविणे, अभिनव प्रकाशन चे पुस्तक (Click For Book)
सदरील संदर्भ ग्रंथसूची फक्त पूर्व परीक्षेसाठी उपयुक्त आहे. मुख्य परीक्षेचे संदर्भ ग्रंथ सूची वेगळी असते. यासाठी वरील तीनही पदांच्या अनुषंगाने विषयाचे ज्ञान परीक्षा मध्ये विचारले जात असते. म्हणून इतर पुस्तके विषयाच्या अनुषंगाने वापरणे गरजेचे असते. शिवाय मुख्य परीक्षेमध्ये मराठी व इंग्रजी या भाषा विषयांचा पेपर देखील अंतर्भूत असतो. त्यामुळे मुख्य परीक्षेमध्ये मराठी आणि इंग्रजी चा अभ्यास करावा लागतो. म्हणून MPSC Combined Exam Book List मुख्य परीक्षेसाठी वेगळी असते.
पूर्व परीक्षेचा अभ्यास सुरू करा आणि पूर्व परीक्षेमध्ये घवघवीत यश मिळवा.
Best Of Luck
आणखी पहा..
न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग । Judicial Magistrate First Class (JMFC)
भारत प्राकृतिक रचना
Oi
Book