MPSC Combined Exam Date 2022 | MPSC Combine

Mpsc Combined Exam 2022 | MPSC Combine

महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2022 साठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दिनांक 23 जून 2022 रोजी जाहिरात प्रसिद्ध केली आहे.

सदर जाहिरातीच्या माध्यमातून महाराष्ट्र लोकसेवा आयोग महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागाअंतर्गत 800 पदांच्या भरती करिता परीक्षा आयोजित करणार आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी जागा थोड्या जास्त असल्या तरी संधी मोठी आहे. MPSC Combined Exam Date 2022 | MPSC Combine.

महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब (MPSC Combine) ही परीक्षा मुख्यतः चार पदांसाठी घेण्यात येते.

  • सहाय्यक कक्ष अधिकारी – सामान्य प्रशासन विभाग (ASO) Assistant Section Officer
  • राज्य कर निरीक्षक – वित्त विभाग (STI) State Tax Inspector
  • पोलीस उपनिरीक्षक – गृह विभाग (PSI) Police Sub Inspector
  • दुय्यम निबंधक व मुद्रांक निरीक्षक Secondary registrar/Inspector of Stamps

MPSC Combined Exam Date 2022

उपरोक्त पदाकरिता संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये शनिवार दिनांक 8 ऑक्टोबर 2022 रोजी महाराष्ट्रातील एकूण 37 जिल्हा केंद्रावर परीक्षा घेण्यात येणार आहे. तरी सदर जाहिरात ही 2022 मध्ये महाराष्ट्र शासनाने मागितलेल्या मागणी पत्रकानुसार आहे. म्हणून ही जाहिरात 2022 साठी आहे. MPSC Combined Exam Date 2022

यापूर्वी 26 फेब्रुवारी 2022 रोजी MPSC Combined Exam झालेली होती. ही परीक्षा 2021 ची होती.

mpsc exam
MPSC Combined Exam Date

वेतनश्रेणी – ३८६०० – १,२२,८०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे इतर देय भत्ते.

वयोमर्यादा – सदर परीक्षेसाठी किमान वयोमर्यादा 18 ते कमाल वयोमर्यादा 43 पर्यंत आहे.

MPSC PSI Age Limit

पीएसआय या पदासाठी किमान वयोमर्यादा 19 वर्षे तर कमाल वयोमर्यादा खुल्या प्रवर्गासाठी 31 वर्षे असून मागासवर्गीय प्रवर्गासाठी 34 वर्षे आहे तर प्राविण्य पात्र खेळाडूं/माजी सैनिक साठी 36 वर्षे इतकी वयोमर्यादा आहे.

शैक्षणिक पात्रता – महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 साठी शैक्षणिक पात्रता कोणत्याही विषयातील पदवी ही आहे.

MPSC Combined Exam Pattern

सदर परीक्षा एकूण तीन टप्प्यांमध्ये होत असते. सहाय्यक कक्ष अधिकारी व राज्य कर निरीक्षक दुय्यम निबंधक व मुद्रांक निरीक्षक यासाठी ही परीक्षा दोन टप्प्यांमध्ये होते तर पोलीस उपनिरीक्षक पदासाठी ही परीक्षा तीन टप्प्यांमध्ये होते. परीक्षेचे टप्पे पुढीलप्रमाणे..

  • पूर्व परीक्षा – गुण 100 – सदर परीक्षा चारही पदासाठी संयुक्तरित्या घेतली जाते.
  • मुख्य परीक्षा – गुण 400 – हा टप्पा चारही पदांसाठी वेगळा असतो.
  • शारीरिक चाचणी व मुलाखत कार्यक्रम – शारीरिक चाचणी 100 गुण मुलाखत 40 गुण.

परीक्षा शुल्क – या परीक्षेसाठी व मागास विद्यार्थ्यांना 394 रुपये तर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना 294 रुपये इतके आहे.

MPSC Combined Exam Date 2022 – अर्ज सादर करण्याचा कालावधी – दिनांक 25 जून 2022 ते 15 जुलै 2022 पर्यंत या परीक्षेसाठी अर्ज करता येतो.

या परीक्षेसाठी आवश्यक असणारी पुस्तकांची सूची book list for MPSC combine Exam

MPSC Combine Book List

आणखी पहा..

MPSC Combine Exam Apply Now

मी मागील 8 वर्ष MPSC आणि इतर स्पर्धा परीक्षेसंबंधी पुण्यामध्ये Classes घेत आहे, त्यामुळे या स्पर्धा कशा प्रकारे होतात, कोणते प्रश्न विचारले जातात आणि कोणत्या टॉपिक वर प्रश्न विचारले जातात या संबंधी ची पूर्ण माहिती मला असून मी माझा अनुभव या वेबसाइट द्वारे तुम्हा सर्वांपर्यंत पोचवायचा प्रयन्त करत आहे.

Leave a Comment