Ramsar Karar 1971 Marathi Mahiti | रामसर करार 1971

Ramsar Karar 1971 Marathi Mahiti | रामसर करार 1971

Ramsar Karar 1971 Marathi Mahiti: रामसर करार हा जगातील एक असा महत्त्वाचा करार आहे जो नैसर्गिक शाश्वत विकासाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा आहे. पर्यावरणातील विविध परिस्थितीकीय परिसंस्था पैकी एक परिसंस्था म्हणजे रामसर ठिकाणे होय. आपल्या भाषेत आपण याला थोडक्यात दलदलीचा प्रदेश किंवा पाणथळ प्रदेश असे म्हणू शकतो.

जागतिक रामसर करारा अंतर्गत दलदलीच्या क्षेत्रांचे संवर्धन व संरक्षण करण्यासंदर्भात एक वाक्यता करण्यात आलेली आहे. पाणथळ क्षेत्रांचे पर्यावरणीय, जीवशास्त्रीय, वनस्पती शास्त्रीय महत्व यातून अधोरेखित झालेले आहे. 

 काय आहे रामसर करार ? Ramsar Karar , Ramsar Convention

इराण मधील रामसर या शहरांमध्ये दिनांक 2 फेब्रुवारी 1971 रोजी पाणथळ जागांच्या संरक्षणासाठीच्या उपाययोजनावर चर्चा करण्यासाठी एक परिषद भरवण्यात आलेली होती. या परिषदेतील चर्चेअंती एक ठराव करण्यात आला तो ठराव रामसर ठराव म्हणून ओळखला जातो. यालाच रामसर करार असे देखील म्हटले जाते.

रामसर ठराव जरी १९७१ मध्ये झालेला असला तरी त्याची अंमलबजावणी मात्र 1975 पासून सुरू झालेली आहे.  भारताने मात्र Ramsar Karar हा करार 1 फेब्रुवारी 1982 रोजी स्वीकारला. Ramsar Karar या करारामध्ये 1982 आणि 1987 सुधारणा करण्यात आलेली आहे.

 Ramsar Karar रामसर कराराचा उद्देश काय? 

 स्थानिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याने सर्व पाणथळ जागांचे संवर्धन आणि विवेकी वापर करणे आणि त्यातून जगाचा शाश्वत विकास साधने हे Ramsar Karar रामसर कराराचे मुख्य उद्देश आहे. 

पाणथळ जागा म्हणजे कोणत्या जागा? 

पाणथळ जागा एक स्वायत्त पर्यावरणीय परिसंस्था म्हणून ओळखल्या जातात.पाणथळ जागा मध्ये सर्व तलाव, नद्या, दलदली, दलदलीतील गवताळ प्रदेश, भात शेती, पाणी साठे,  मिठागरे, खारफुटीची  वने, प्रवाळ बेटे यासारख्या नैसर्गिक व मानवनिर्मित ठिकाणांचा समावेश पाणथळ जागा मध्ये होतो. 

भारतीय स्वातंत्र्याच्या 75 वर्षात 13 ऑगस्ट 2022 पासून भारतामध्ये एकूण 75 रामसर ठिकाणांची नोंद करण्यात आलेली आहे. 

 Ramsar Sites

रामसर स्थळे म्हणून घोषित  नवीन 10 पाणथळ जागा पुढीलप्रमाणे: 

  1. कुंथनकुलम पक्षी अभयारण्य, तामिळनाडू
  2. सातकोसिया घाट, ओडिशा
  3. नंदा तलाव, गोवा
  4. मन्नार मरीन बायोस्फीअर रिझर्व्हचे आखात, तामिळनाडू
  5. रंगनाथिटू बीएस, कर्नाटक
  6. वेंबन्नूर वेटलँड कॉम्प्लेक्स, तामिळनाडू
  7. वेल्लोड पक्षी अभयारण्य, तामिळनाडू
  8. सिरपूर वेटलँड, मध्य प्रदेश
  9. वेदांतंगल पक्षी अभयारण्य, तामिळनाडू
  10. उदयमार्थंडपुरम पक्षी अभयारण्य, तामिळनाडू

 जगात एकूण किती रामसर स्थळे आहेत? 

 आजपर्यंत जगामध्ये 2200 पेक्षा जास्त स्थळांना रामसर स्थळे म्हणून मान्यता देण्यात आली आहे.

भारतातील रामसर स्थळे – Ramsar Sites in India

〉 कोलेरू तलाव » आंध्र प्रदेश » 2022

〉 दिपोर बील » आसाम » 2002

〉 काबर्टल वेटलँड » बिहार » 2020

〉 खिजाडिया वन्यजीव अभयारण्य » गुजरात » 2021

〉 नळ सरोवर पक्षी अभयारण्य » गुजरात » 2012

〉 तलाव वन्यजीव अभयारण्य » गुजरात » 2021

〉 वाधवणा वेटलँड » गुजरात » 2021

〉 भिंडावास वन्यजीव अभयारण्य » हरियाणा » 2021

〉 सुलतानपूर राष्ट्रीय उद्यान » हरियाणा » 2021

〉 चंदरताल वेटलँड » हिमाचल प्रदेश » 2005

〉 पाँग डॅम तलाव » हिमाचल प्रदेश » 2002 

〉 रेणुका वेटलँड » हिमाचल प्रदेश » 2005

〉 वुलर सरोवर » जम्मू व काश्मीर » 1990

〉 होकेरा वेटलँड » जम्मू व काश्मीर » 2005 

〉 सुरीनसर मनसार तलाव » जम्मू व काश्मीर » 2005 

〉 त्सोमोरिरी तलाव » जम्मू व काश्मीर » 2002

〉 अस्थमुडी वेटलँड » केरळ » 2002

〉 सस्थमकोट्टा तलाव » केरळ » 2002 

〉 वेंबनाड कोल वेटलँड » केरळ » 2002

〉 त्सो कार वेटलँड कॉम्प्लेक्स » लडाख » 2020

〉 भोज वेटलँड्स » मध्य प्रदेश » 2002

〉 लोणार सरोवर » महाराष्ट्र » 2020 

〉 नांदूर मधमेश्वर » महाराष्ट्र » 2019

〉 लोकतक तलाव » मणिपूर »1990 

〉 भितरकणिका खारफुटी » ओरिसा » 2002 

〉 चिल्का सरोवर » ओरिसा »1981

〉 बियास संवर्धन » पंजाब » 2019 

〉 हरीके सरोवर » पंजाब » 1990

〉 कांजळी सरोवर » पंजाब » 2002

〉 कोशोपूर मियाणी » पंजाब » 2019

〉 नांगल वन्यजीव अभयारण्य » पंजाब » 2019

〉 रोपल सरोवर » पंजाब » 2019

〉 केवलदेव घाना अभयारण्य » राजस्थान » 1981

〉 सांभर सरोवर » राजस्थान » 1990 

〉 पॉइंट कॅलिमरे वन्यजीव आणि पक्षी अभयारण्य » तमिळनाडू » 2002

〉 रुद्रसागर सरोवर » त्रिपुरा » 2005

〉 बखिरा वन्यजीव अभयारण्य » उत्तर प्रदेश » 2021

〉 हैदरपूल वेटलँड » उत्तर प्रदेश » 2021

〉 नवाबगंज पक्षी अभयारण्य » उत्तर प्रदेश » 2019

〉 पार्वती आग्रा पक्षी अभयारण्य » उत्तर प्रदेश » 2019

〉 सामन पक्षी अभयारण्य » उत्तर प्रदेश » 2019

〉 समसपुर पक्षी अभयारण्य » उत्तर प्रदेश » 2019 

〉 सांडी पक्षी अभयारण्य » उत्तर प्रदेश » 2019

〉 सरसाई नवर झील » उत्तर प्रदेश » 2019 

〉 सूर सरोवर » उत्तर प्रदेश » 2020

〉 अप्पर गंगा नदी 【ब्रिजघाट ते नरोरा स्ट्रेच】 » उत्तर प्रदेश » 2005

〉 आसन संवर्धन क्षेत्र » उत्तराखंड » 2020

〉 पूर्व कोलकाता वेटलँड्स » पश्चिम बंगाल » 2002

〉 सुंदरबन वेटलँड » पश्चिम बंगाल » 2019

〉 काीकिली पक्षी अभयारण्य » तमिळनाडू » 2022

〉 पल्लिकरणाई पाणथळ राजू अभयारण्य » तमिळनाडू » 2022

〉 पिचावरम कांदळवन » तमिळनाडू » 2022 

〉 पाला पाणथळ प्रदेश » मिझोराम » 2022

〉 सख्य सागर » मध्य प्रदेश » 2022

〉 कुंथनकुलम पक्षी अभयारण्य » तमिळनाडू » 2021

〉 सातकोसिया घाट » ओरिसा » 2021

〉 नंदा सरोवर » गोवा » 2022

〉 मन्नार मरीन बायोस्फीअर रिझर्व्हचे आखात» तमिळनाडू » 2022

〉 रंगनाथटू बीएस » कर्नाटक » 2022

〉 वेंबन्नूर वेटलँड कॉम्प्लेक्स » तमिळनाडू » 2022

〉 वेल्लोड पक्षी अभयारण्य » तमिळनाडू » 2022

〉 सिरपूर वेटलँड » मध्य प्रदेश » 2022

〉 वेदांतंगल पक्षी अभयारण्य » तमिळनाडू » 2022

〉 उदयमार्थंडपुरम पक्षी अभयारण्य » तमिळनाडू » 2022

〉 तांपारा सरोवर » ओरिसा » 2022 –

〉 हिराकुड जलाशय » ओरिसा » 2022

〉 अनसुपा सरोवर » ओरिसा » 2022

〉 यशवंत सागर » मध्य प्रदेश » 2022

〉 चित्रागुडी पक्षी अभयारण्य » तमिळनाडू » 2022

〉 सुचिंद्रम थेऊर वेटलँड कॉम्प्लेक्स » तमिळनाडू » 2022

〉 वडूवूर पक्षी अभयारण्य » तमिळनाडू » 2022

〉 कांजिटंकुलम पक्षी अभयारण्य » तमिळनाडू » 2022

〉 ठाणे खाडी » महाराष्ट्र » 2022

〉 हायगम वेटलँड कंझर्व्हेशन रिझर्व्ह » जम्मू व काश्मीर » 2022

〉 शालबुग वेटलँड कंझर्व्हेशन रिझर्व्ह » जम्मू व काश्मीर » 2022

राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे |margdarshak tatve 36-51

Maharashtratil Leni | महाराष्ट्रातील लेणी

Best Book For Talathi Exam | Download Free Question Paper

Visit Official Site Click Here

रामसर स्थळ म्हणजे काय?

रामसर स्थळ म्हणजे असा दलदलीचा प्रदेश ज्याचे संवर्धन होणे गरजेचे आहे.

भारतातील सर्वात मोठे रामसर स्थळ कोणते?

भारतातील सर्वात मोठे रामसर स्थळ पश्चिम बंगालमधील सुंदरबन हे आहे.

भारतातील सर्वात लहान रामसर ठिकाण कोणते?

भारतातील सर्वात लहान रामसर ठिकाण हिमाचल प्रदेश राज्यातील रेणुका वेटलँड हे सर्वात लहान रामसर ठिकाण आहे.

 भारतातील कोणत्या राज्यामध्ये सर्वाधिक रामसर ठिकाणे आहेत?

 भारतातील उत्तर प्रदेश राज्यामध्ये सर्वाधिक म्हणजे आठ रामसर ठिकाणे आहेत.

जगातील सर्वात पहिले रामसर ठिकाण कोणत्या देशामध्ये आहे?

जगातील सर्वात पहिले रामसर ठिकाण ऑस्ट्रेलियामध्ये आहे.ऑस्ट्रेलियातील कोबर्ग द्वीपकल्प हे जगातील पहिले रामसर ठिकाण आहे.

रामसर करार कोणत्या देशामध्ये घडून आला?

रामसर करार इराण देशामध्ये रामसर या ठिकाणी घडून आला.

मी मागील 8 वर्ष MPSC आणि इतर स्पर्धा परीक्षेसंबंधी पुण्यामध्ये Classes घेत आहे, त्यामुळे या स्पर्धा कशा प्रकारे होतात, कोणते प्रश्न विचारले जातात आणि कोणत्या टॉपिक वर प्रश्न विचारले जातात या संबंधी ची पूर्ण माहिती मला असून मी माझा अनुभव या वेबसाइट द्वारे तुम्हा सर्वांपर्यंत पोचवायचा प्रयन्त करत आहे.

Leave a Comment