महापारेषण भरती 2020 – महापारेषण मध्ये 8500 जागांची भरती

महाराष्ट्र शासनाच्या ऊर्जा विभागात होणार मेगा भरती – महापारेषण भरती 2020

महापारेषण भरती 2020
महापारेषण भरती 2020

 महापारेषण मध्ये 8500 जागांची मेगा भरती 2020 – ऊर्जा मंत्री नितीन राऊत

 ऊर्जा विभागाच्या महापारेषण वीज कंपनीत 8500 / महापारेषण भरती 2020 तांत्रिक श्रेणीतील रिक्त पदे भरण्याचे आदेश ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिलेले आहेत.

 राज्यात वीज पारेषण कंपनीत तांत्रिक श्रेणीतील 8500 पदांची भरती प्रक्रिया आता लवकरच सुरू होणार आहे.   

राज्यात वीज पारेषण कंपनीत तांत्रिक श्रेणीतील 8500 पदांची ही भरती प्रक्रिया आता लवकरच सुरू होणार आहे.  महापारेषण भरती 2020 तांत्रिक संवर्गातील 6750 पदे व अभियंता संवर्गातील 1762 पदांची भरती करण्यासाठी महापारेषण व्यवस्थापन तयारी करीत आहेत.

 ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या सूचनेनुसार महापारेषणचे व्यवस्थापकीय संचालक दिनेश वाघमारे यांनी पदभरती प्रस्ताव तयार करून सादर केला. मंत्रालयात या विषयावर झालेल्या बैठकीत डॉ. राऊत यांनी ही पदभरती लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश दिले.

महाराष्ट्र शासनाने यापूर्वीच मेगा भरती राबवण्याला सुरुवात झाली होती.  मात्र ही मेगाभरती सतत वेगवेगळ्या कारणाने लटकत गेली. 

 नव्याने होणाऱ्या या पद भरतीत आय.टी.आय. उत्तीर्ण विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. याशिवाय अभियांत्रिकी पदवीधारकांना ही नोकरीची संधी या भरतीत निर्माण होणार आहे.

 यासोबतच बक्षी समितीच्या शिफारशीनुसार पदांचा तुलनात्मक विचार करण्यात येऊन भरती प्रक्रिया राबविण्यात यावी व राज्य शासनाचा नवा मंजूर पदाचा आकृतीबंध सादर करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

 पूर्वीच्या महाराष्ट्र राज्य वीज मंडळाचे सन 2005 मध्ये विभाजन  झाले.  यातून महावितरण, महापारेषण, महानिर्मिती अशा तीन कंपन्यांमध्ये हे विभाजन झाले.  महापारेषण कंपनीची निर्मिती झाल्यापासून रिक्त पदांची संख्या वाढत गेली.  पदे रिक्त झाल्यानंतरही अपेक्षित भरती झाली नाही. 

मोठ्या प्रमाणात रिक्त असलेल्या पदांमुळे कार्यरत कर्मचाऱ्यांच्या वरती कामाचा बोजा वाढलेला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये ताण निर्माण झाला आहे.  हा कर्मचाऱ्यांच्या वरील ताण कमी करण्याच्या दृष्टीने आणि महाराष्ट्रातील नवोदित तरुणांना नोकरीची संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने सदर पदभरती महत्त्वाची ठरत आहे.

 यंत्रचालक व तंत्रज्ञ संवर्ग एकत्रीकरण

यंत्रचालक व तंत्रज्ञ संवर्गाचे एकत्रीकरण करण्याचा निर्णय सुद्धा ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी घेतला आहे.  या निर्णयामुळे कनिष्ठ स्तरावर काम करणाऱ्या तांत्रिक कर्मचाऱ्यांना पदोन्नतीचा मार्ग मोकळा होणार आहे. 

महापारेषण भरती 2020
mahapareshan bharti 2020

काळाच्या बदलत्या गरजा नुसार व नवनवीन तंत्रज्ञानानुसार कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. अनेक वर्षे पदे रिक्त असल्याने पदोन्नतीमध्ये निर्माण झालेली कुंठीत अवस्था या मेगा भरती मुळे संपुष्टात येणार आहे. 

शासनाच्या वतीने किंबहुना ऊर्जा विभागाच्या वतीने सदर बातमी देण्यात आली असली तरी महापारेषण भरती 2020 प्रक्रिया सुरू करण्यासंदर्भात निश्चित तारीख कळलेली नाही.  कोरोना कालावधीत महाराष्ट्रातील बहुतांश विद्यार्थ्यांना सरकारी नोकर भरती निघणार नाही असे वाटत असताना  ही ऊर्जा विभागातील पदभरती समस्त मराठी युवकांसाठी आशेचा किरण आणि अभ्यासासाठी नव उमेद घेऊन आलेली आहे. 

MPSC latest syllabus 2020 PSI/STI/ASO syllabus in Marathi

Anganwadi Supervisor exam syllabus in maharashtra

Maharashtra Police Bharti 2020

मी मागील 8 वर्ष MPSC आणि इतर स्पर्धा परीक्षेसंबंधी पुण्यामध्ये Classes घेत आहे, त्यामुळे या स्पर्धा कशा प्रकारे होतात, कोणते प्रश्न विचारले जातात आणि कोणत्या टॉपिक वर प्रश्न विचारले जातात या संबंधी ची पूर्ण माहिती मला असून मी माझा अनुभव या वेबसाइट द्वारे तुम्हा सर्वांपर्यंत पोचवायचा प्रयन्त करत आहे.

3 thoughts on “महापारेषण भरती 2020 – महापारेषण मध्ये 8500 जागांची भरती”

Leave a Comment