अंगणवाडी पर्यवेक्षिका भरती 2024 | Anganwadi Supervisor exam syllabus in Marathi 2024

अंगणवाडी पर्यवेक्षिका भरती 2024 | Anganwadi Supervisor exam syllabus in Maharashtra 2024

अंगणवाडी सुपरवायझर  किंवा पर्यवेक्षिका (Anganwadi Supervisor) जिल्हा परिषद अंतर्गत  महिलांसाठी असणारे महत्त्वाचे  पद आहे. या मध्ये पुरुष उमेदवार अपात्र ठरतात. 

अंगणवाडी पर्यवेक्षिका Anganwadi Supervisorया पदाची भरती जिल्हा परिषदेमार्फत महाराष्ट्रामध्ये केली जाते. अंगणवाडी पर्यवेक्षिका पदाची काठिण्यपातळी पदवी पर्यंतची आहे. मराठी विषयासाठी काठिण्यपातळी बारावीपर्यंतची आहे. इतर विषयांसाठी  पदवी ही परीक्षेची काठिण्यपातळी आहे.

Anganwadi Supervisor Marathi Mahiti/अंगणवाडी पर्यवेक्षिका पदासाठी पात्रता

अंगणवाडी पर्यवेक्षिका पदाचा अर्ज करताना उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असणे गरजेचे आहे. ज्या महिला उमेदवारांनी एखाद्या संविधिक विद्यापीठाची समाजशास्त्र, गृह विज्ञान, शिक्षण, बालविकास, पोषण या विषयातील स्नातक पदवी धारण केलेली आहे अशा उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल. संबंधित विषयातील उमेदवारांना फक्त प्राधान्य देण्यात येईल असं म्हटलेलं आहे. याचा अर्थ इतर विषयातील पदवीधारक या पदासाठी पात्र नाहीत असा चुकीचा अर्थ काढून नये.

परीक्षेचा कालावधी

अंगणवाडी पर्यवेक्षिका पदासाठी परीक्षा 200 गुणांसाठी आयोजित केली जाईल ज्यामध्ये 100 प्रश्न असतील. परीक्षेसाठी कालावधी दीड तासाचा म्हणजेच 90 मिनिटांचा आहे.परीक्षा मध्ये चार विषयांवरती प्रश्न विचारले जातील त्याचा आराखडा पुढील प्रमाणे आहे.

विषय प्रश्न संख्या गुण 
इंग्रजी २५ ५०
मराठी २५ ५०
सामान्य ज्ञान २५ ५०
तर्क क्षमता व अनुमानात्मक चाचणी २५ ५०
Anganwadi Supervisor Exam Scheme

परीक्षेचे स्वरूप – सरळ सेवा परीक्षा | Anganwadi Exam In Marathi

 सरळ सेवा म्हणजे घेण्यात येणाऱ्या परीक्षेचे मध्ये गुणानुक्रमे निवड झालेल्या उमेदवारांची इतर कोणत्याही प्रकारची चाचणी घेण्यात येणार  नाही.  निवड झालेल्या जिल्हा परिषदेमध्ये कागदपत्रांची पडताळणी होईल.

प्रश्नपत्रिकेचे माध्यम

 मराठी विषय हा फक्त मराठी भाषेतून असेल इतर विषय इंग्रजी व मराठी भाषेतून असते. इंग्रजी विषय फक्त इंग्रजी भाषेतून असेल.

अंगणवाडी सुपरवायझर साठी वेतन पुढील प्रमाणे

9300 – 34800  ग्रेड वेतन- 4100

जाहिरात कोण देतात?

 महाराष्ट्रामध्ये अंगणवाडी पर्यवेक्षिका पदांच्या भरती चे अधिकार संबंधित जिल्हा परिषदेला आहे.  जिल्हा परिषद आपल्या विविध पदांच्या भरती संदर्भात जाहिरात  काढते तेव्हा  या पदाची जाहिरात येत असते.

अंगणवाडी पर्यवेक्षिका परीक्षेचा तयारी करता उपयुक्त पुस्तके

ही पुस्तके याठिकाणी तुम्ही पाहू शकता.

मराठी – सुगम मराठी  व्याकरण व लेखन (मो. रा. वाळिंबे)

अंकगणित – संपूर्ण गणित (पंढरीनाथ राणे)

बुद्धिमत्ता – समग्र बुद्धिमत्ता चाचणी (फिरोज पठाण)

अंगणवाडी पर्यवेक्षिका पदांची  भरती 2019  मध्ये करण्यात आली होती. अपेक्षा आहे आपल्या प्रश्नांची उत्तरे या  ठिकाणी मिळाली असतील. तरीही काही शंका व सूचना असतील तर स्वागत आहे.

Refference Books for Competitive Exam

मी मागील 8 वर्ष MPSC आणि इतर स्पर्धा परीक्षेसंबंधी पुण्यामध्ये Classes घेत आहे, त्यामुळे या स्पर्धा कशा प्रकारे होतात, कोणते प्रश्न विचारले जातात आणि कोणत्या टॉपिक वर प्रश्न विचारले जातात या संबंधी ची पूर्ण माहिती मला असून मी माझा अनुभव या वेबसाइट द्वारे तुम्हा सर्वांपर्यंत पोचवायचा प्रयन्त करत आहे.

31 thoughts on “अंगणवाडी पर्यवेक्षिका भरती 2024 | Anganwadi Supervisor exam syllabus in Marathi 2024”

  • कोरोना परिस्थिती सामान्य होताच रखडलेल्या सर्वच परीक्षा होतील. Thanks for having support.

   Reply
 1. मी b.sci केलयं मला superviser पदासाठी MSW कराव लागेल का कूठला विषय घेण योग्य ठरेल

  Reply
  • सध्या कोरोना मूळे आणि काही तांत्रिक कारणामुळे भरती झालेली नाही. काही update आल्यास कळविले जाईल.
   अधिक माहितीसाठी हे पहा https://youtu.be/DUYSjrV487c

   Reply
   • सर मी एम ए पूर्ण केले आहेत मी पण अंगणवाडी सुपरवायझर चे फॉर्म भरून शेकते का

    Reply
 2. Dear
  Sir , madam
  I ‘ m completed M.ed degree .I’m allijab this job in Aganwadi supervisor..and I request for you so please this information job..

  Reply
 3. Mi anganwadi sevika ahe mala anganwadi suparvhayjhrcha fom bharaycha ahe .to kothe ani kadhi bharaycha. Na me – Shital Kamble

  Reply
 4. Form भरण्यासाठी शेवटची तारीख कोणती आहे ? Plz लिंक शेअर करा .

  Reply
 5. सर मी एम ए पूर्ण केले आहेत मी पण अंगणवाडी सुपरवायझर चे फॉर्म भरून शेकते का

  Reply
  • हो update आल्यावर कळविले जाईल. आपल्या अमूल्य प्रतिसादाबद्दल आभारी आहोत.

   Reply
 6. मी अंगणवाडी सेविका आहे मला मुख्य सेविका या पदावर काम करायच आहे. कृपया सुपरवायझर ची भरती कधी होणार आहे परिक्षा फॉर्म कधी भरावा लागेल कृपया कळवा.मी एम.ए.एम एस डब्ल्यू पदवी घेतली आहे. सेविका म्हणून 11 वर्षे पूर्ण झाली आहेत.कोल्हापुर जिल्हात कधी भरती येणार आहे कृपया कळवा ही विनंती

  Reply
  • मी अंगणवाडी सेविका आहे मला मुख्य सेविका या पदावर काम करायच आहे. कृपया सुपरवायझर ची भरती कधी होणार आहे परिक्षा फॉर्म कधी भरावा लागेल कृपया कळवा.मी एम.ए.एम एस डब्ल्यू पदवी घेतली आहे. सेविका म्हणून 11 वर्षे पूर्ण झाली आहेत.कोल्हापुर जिल्हात कधी भरती येणार आहे कृपया कळवा ही विनंती

   Reply
  • हो मॅडम अपडेट आले की कळवण्यात येईल. आपल्या अमूल्य प्रतिसादाबद्दल आभारी आहोत. सदर ब्लॉग ची लिंक शेअर करून सहकार्य करावे ही नम्र विनंती.

   Reply
 7. मि छाया पावडे मिसातवि शिकलेलि आहे मला मदतनिस चा फाम भरायचा आहेतो कधि सुटनार आहे

  Reply
  • अपडेट आल्यानंतर कळवले जाईल. वेळोवेळी वेबसाईटला भेट देत चला. आपल्या अमूल्य प्रतिसादाबद्दल आभारी आहोत.

   Reply
 8. मी अंगणवाडी सेविका या पदावर कार्यरत आहे तरी पर्यवेक्षिका पदासाठी प्रयत्न करायचे आहेत.
  माझे शिक्षण 1)B.Com
  2)computer course one year diploma
  11 वर्षाचा अंगणवाडी सेविकेचा अनुभव आहे
  कृपया भरती बाबत माहिती द्यावी.

  Reply
  • ICDS चे प्रश्न सामान्य ज्ञान विषयाअंतर्गत येतात. आपल्या अमूल्य प्रतिसादाबद्दल आभारी आहोत.www.nitinsir.in

   Reply
 9. mi anganwadi sevika ahe mala 10 varsh purn zalet mala supervisior sathi apply karayacha ahe kadhi jaga nightil tar~ sangal sir “`

  Reply

Leave a Comment