Maharashtra Direct Recruitment GR latest 2021

Maharashtra Direct Recruitment GR

Maharashtra Direct Recruitment GR
Maharashtra Direct Recruitment GR

Maharashtra Direct Recruitment GR महाराष्ट्र भरती प्रक्रिया सुधारणा करण्यात आली असून त्याबाबतचा नवीन निर्णय सामान्य प्रशासन विभागाने नुकताच प्रसिद्ध केला आहे. पूर्वीचा महापोर्टल रद्द करून नवीन पद्धतीने भरती करण्यात येणार आहे.

विविध शासकीय विभागात भरती करण्यासाठी महापोर्टल मार्फत ऑनलाइन परीक्षा घेण्यात येत होती. या परीक्षा पद्धतीत सुधारणा अपेक्षित होती. कारण राज्यभरातून हजारो तक्रारी या पोर्टलच्या कारभाराबाबत आल्या होत्या. म्हणून शासनाने हे पोर्टल रद्द करण्याचा निर्णय घेतला.

काही महत्वाचे मुद्दे या नवीन शासन निर्णय प्रक्रियेत समाविष्ट आहेत. हे महत्त्वाचे मुद्दे पुढील प्रमाणे.

  • भरती प्रक्रिया राबवण्यासाठी 3 स्तर करण्यात आलेले आहेत. जिल्हास्तर राज्यस्तर आणि विभागीय स्तर या प्रत्येक स्तरावर ती स्वतंत्र कमिटी/समिती कार्यरत असतील.
  • पदांची जाहिरात निवड प्रक्रिया ते अंतिम निवड यादी प्रसिद्ध करण्यास पर्यंत संपूर्ण जबाबदारी संबंधित निवड समितीचे राहील.
  • ऑनलाईन परीक्षेच्या आयोजनासाठी OMR vender (service provider) यांच्यासोबत योग्य तो करार करण्याचे स्वातंत्र्य या समितीला असेल.
  • परीक्षेच्या प्रत्यक्ष आयोजनासाठी अभ्यासक्रमानुसार प्रश्नपत्रिका तज्ञ व्यक्तीकडून तयार करून घेणे व उत्तर पत्रिका तयार करणे याची जबाबदारी जिल्हा/ प्रादेशिक/ राज्य निवड समिती यांच्या अध्यक्षांची राहील.
  • यापूर्वीच्या ज्या परीक्षा प्रक्रिया अपूर्ण आहेत त्यात सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सदर पद्धतीचा अवलंब करण्यात यावा.

नव्या ठाकरे सरकारने नवीन भरती प्रक्रिया राबवण्याची खात्री दिली होती. यालाच अनुसरून हा निर्णय महत्वाचा आहे. किंबहुना महाराष्ट्रातील युवकांना एक समाधानाची बाब आहे.

शासकीय विभागात भरती करण्यासाठी नवीन निर्णय / Maharashtra Direct Recruitment gr

MPSC latest syllabus 2020 PSI/STI/ASO syllabus in Marathi

talathi bharti question paper with answer FREE Download

Maharashtra Police Bharti 2020

मी मागील 8 वर्ष MPSC आणि इतर स्पर्धा परीक्षेसंबंधी पुण्यामध्ये Classes घेत आहे, त्यामुळे या स्पर्धा कशा प्रकारे होतात, कोणते प्रश्न विचारले जातात आणि कोणत्या टॉपिक वर प्रश्न विचारले जातात या संबंधी ची पूर्ण माहिती मला असून मी माझा अनुभव या वेबसाइट द्वारे तुम्हा सर्वांपर्यंत पोचवायचा प्रयन्त करत आहे.

Leave a Comment