Jana Gana Mana | National Anthem | Rashtrageet In Marathi 2024

Jana Gana Mana | Jana Gana Mana | National Anthem |  Rashtrageet In Marathi 2024

jana gana mana

Jana Gana Mana in Marathi: भारताचे राष्ट्रगीत जनगणमन (Jana Gana Mana) हे आहे. जनगणमन या भारतीय राष्ट्रगीताची रचना कवी रवींद्रनाथ टागोर यांनी बंगाली भाषेमध्ये केली होती.

जनगणमन हे राष्ट्रगीत बंगाली भाषेमध्ये ‘भारतो भाग्यो बिधाता’ या नावाने लिहिले गेले होते. या गीतावरती संस्कृतचा प्रभाव आहे. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या गीतांजली या काव्यसंग्रहातून हे गीत घेतलेले आहे.

श्री रवींद्रनाथ टागोर यांच्या गीतांजली या काव्यसंग्रहाला जगातील नामांकित नोबेल पुरस्कार मिळालेला आहे. 

श्री रवींद्रनाथ टागोर यांनी रचलेल्या भारतो भाग्यो बिधाता या गीतातील पहिला परिच्छेद आपले राष्ट्रगीत आहे. या गीताचे एकूण पाच परिच्छेद आहेत. 

भारतीय संविधान सभेने दिनांक 24 जानेवारी 1950 रोजी हे गीत राष्ट्रगीत म्हणून स्वीकारले. याच दिवशी घटना सभेने भारताच्या राष्ट्रीय गीताला मान्यता दिली. भारताचे राष्ट्रीय गीत वंदे मातरम हे आहे.

अधिकृतरित्या राष्ट्रगीत म्हणण्यासाठी 48 ते 52 सेकंदाचा कालावधी लागतो. म्हणजेच राष्ट्रगीत 48 ते 52 सेकंद यामध्ये म्हटले गेले जावे.

जनगणमन हे राष्ट्रगीत सर्वप्रथम भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या कलकत्ता अधिवेशनामध्ये दिनांक 27 डिसेंबर 1911 रोजी गायले गेले होते. 

भारताचे राष्ट्रगीत | National anthem in Marathi | Rashtra geet in marathi

जनगणमन अधिनायक जय हे 

भारत भाग्य-विधाता |

पंजाब, सिंधू, गुजरात, मराठा, द्राविड, उत्कल, बंग, 

विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा, 

उच्छल जलधितरंग, 

तव शुभ नामे जागे तव शुभ आशिस मागे,

गाहे तव जयगाथा,

जनगण मंगलदायक जय हे,

भारत भाग्य-विधाता|

जय हे, जय हे, जय हे, 

जय जय जय, जय हे||

Jana Gana Mana | National Anthem राष्ट्रगीताचा मराठी अर्थ

जनगणमन अधिनायक जय हे भारत भाग्यविधाता|

तू जनतेच्या हृदयाचा स्वामी आहेस भारताचा भाग्योदय करणारा आहेस तुझा जय जयकार असो

पंजाब, सिंध, गुजरात, मराठा, द्राविड, उत्कल, बंग

पंजाब, सिंध, गुजरात, महाराष्ट्र, द्राविड म्हणजे भारताचा दक्षिण भाग, उत्कल म्हणजेच आजचा ओडिशा आणि बंगाल या सर्व प्रदेशांना तुझा नामघोष जागृत करतो.

विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा उच्छल जलधितरंग,

विंध्य पर्वतापासून ते हिमालय पर्वतापर्यंत आणि गंगा यमुनेच्या प्रवाहामध्ये तुझे यशोगाण निनादत राहू दे. उसळी मारणाऱ्या समुद्राच्या लाटाही तुझ्या नामाचा गजर करतात.

तव शुभ नामे जागे तव शुभ आशिष मागे गाहे तो जय गाथा जनगणमंगलदायक जय हे भारत भाग्यविधाता|

हे सर्व तुझ्यापाशी आशीर्वाद मागतात. तुझी कीर्ती गातात तू सर्व लोकांचं मंगल करणारा आहेस. 

जय हे, जय हे, जय हे, जय जय जय जय हे||

तुझा जय जयकार असो त्रिवार जयजयकार असो

Jana Gana Mana | National Anthem राष्ट्रगीत कधी म्हणावे?

  • भारताच्या स्वातंत्र्यदिनी
  • भारताच्या प्रजासत्ताक दिनी
  • शासकीय कार्यक्रमाप्रसंगी
  • माननीय राष्ट्रपती यांच्या उपस्थितीतील कार्यक्रमांमध्ये
  • राज्यपाल उपराज्यपाल मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीतील कार्यक्रमाप्रसंगी
  • लष्करी रेजिमेंटला राष्ट्रध्वज प्रदान करताना
  • नौदलात राष्ट्रध्वज उभारण्यात येत असताना

हे देखील वाचा

भारतीय घटना कशी तयार झाली ?

Rajya sabha In Marathi

FAQ – वारंवार विचारले जाणारे प्रश्न

भारताचे राष्ट्रगीत कोणी लिहिले आहे?

भारताचे राष्ट्रगीत गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेले आहे.

भारताचे राष्ट्रगीत गीत कशातून घेतले आहे?

भारताचे राष्ट्रगीत जनगणमन हे गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या गीतांजली या काव्यसंग्रहातून घेतले आहे.

भारताचे राष्ट्रगीत म्हणण्यासाठी किती कालावधी लागतो?

भारताचे राष्ट्रगीत म्हणण्यासाठी 48 ते 52 सेकंदाचा कालावधी लागतो.

भारताचे राष्ट्रीय गीत कोणते?

भारताचे राष्ट्रीय गीत वंदे मातरम हे आहे.

मी मागील 8 वर्ष MPSC आणि इतर स्पर्धा परीक्षेसंबंधी पुण्यामध्ये Classes घेत आहे, त्यामुळे या स्पर्धा कशा प्रकारे होतात, कोणते प्रश्न विचारले जातात आणि कोणत्या टॉपिक वर प्रश्न विचारले जातात या संबंधी ची पूर्ण माहिती मला असून मी माझा अनुभव या वेबसाइट द्वारे तुम्हा सर्वांपर्यंत पोचवायचा प्रयन्त करत आहे.

Leave a Comment