तालिबान काय आहे? तालिबानचा उदय कसा झाला? | Taliban Information in marathi

तालिबान काय आहे? | Taliban Information in marathi

 Taliban in marathi
Taliban in marathi

        मित्रांनो अजाच्य या लेखात आपण तालिबान या विषयाबद्दल पाहणार आहोत. तालिबान बद्दल आपण ऐकलंच असेल कारण सध्या संपूर्ण जगभरात तालिबान या बद्दल चर्चा होत आहे. कारण तिथे अचानक तालिबान अफगाणिस्थान वर सत्ता म्हणजेच कब्जा केला आहे. तर आपण या लेखात संपूर्ण तालिबान याबद्दल पाहणार आहोत. या मध्ये तालिबान म्हणजे काय? तालिबान काय आहे? इत्यादी असे अनेक प्रकारचे तुम्हाला प्रश्न पडले असतील त्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आजच्या या लेखातून मिळेल.

∆ तालिबानकडे पैसा येतो कुठून?  Taliban in marathi

         तालिबान्यांनी साधारणतः पाच ते सहा वर्षे अफगाणिस्तानवर सत्ता गाजवली. आणि ते आताही अफगाणिस्तान वर सत्ता काबीज केली आहे. आणि 2 दशकापूर्वी अफगाणिस्तानातून तालिबानी ना सत्याच्युत (Dissappeared/गायब) करण्यात आला होता. पण या लोकांकडे म्हणजेच तालिबानाकडे या 20 वर्षामध्ये आपला संघर्ष चालू किंवा टिकून ठेवण्यासाठी पैसा भरपूर लागला पण हा लागणारा पैसा त्यांच्यकडे आला कुठून? 

           तर अफगाणिस्तान मध्ये अफू हे उत्पन्नाचे मोठे स्त्रोत आहे. आणि अफूचे उत्पादन हे अख्ख्या जगात एकट्या अफगाणिस्तानात होते. आणि या अफूच्या शेतीवर पूर्णता तालिबान्यांचा वर्चस्व आहे. आणि हे तालिबानी लोक अफूच्या व्यापारावर कर आकारतात. या कर आकारणीतून तालिबानींना मोठ्या प्रमाणात पैसा मिळतो. महत्त्वाचे म्हणजे अफगाणिस्तानात अवैधरित्या उत्खनन करणाऱ्या कंपन्यांकडूनही तालिबानी लोक हे कर वसुली करतात असे अनेक प्रकारचे लोकांवर व शेतकऱ्यावर कारवाई करून तालिबानला प्रचंड असे अधिक प्रमाणात उत्पन्न मिळते. 

∆ अफगाणिस्तानात भारताची कशा कशात गुंतवणूक आहे?  Taliban in marathi

       या दोन्ही देशात द्विपक्षीय व्यापार याचा करार झाला आहे. अफगाणिस्तानात भारताचा मोठ्याप्रमाणात गुंतवणूक आहे व तसेच अफगाणिस्तानातून काही वस्तू आयात केली जाते व भारतातून अफगाणिस्तानला निर्यातही केली जाते. 

 भारताची कशा कशात गुंतवणूक आहे? 

  • दूरसंचार क्षेत्र
  • शिक्षण
  • पायाभूत सुविधांची उभारणी
  • नागरी वसाहतीचे बांधकाम

   इत्यादी असे भारताची गुंतवणूक आहे. 

अफगाणिस्तानातून भारतात कोणती वस्तू आयात केली जाते? 

       अफगाणिस्तानातून भारतात अनेक वस्तू आयात केली जाते. ते म्हणजेच उदा: अक्रोड, बदाम, काजू, पिस्ता, केसर, किसमिस, टरबूज, जिरे, हिंग, खरबूज इत्यादी अशा अनेक वस्तूंची आयात केली जाते. 

भारतातून अफगाणिस्तानात कोणती वस्तू निर्यात केली जाते? 

        भारतातून अफगाणिस्तानात अनेक वस्तूंची निर्यात केली जाते ते म्हणजेच रसायने, उपकरणे, अभियांत्रिकीय सामान, इलेक्ट्रॉनिक्स चे वस्तू इत्यादी निर्यात होते. तसेच मोठ्या प्रमाणात पिकांचेही निर्यात होते. उदा: वेलची पूड, तंबाखू, गहू, कॉफी, काळी मिरी इत्यादी निर्यात होते. याशिवाय वनस्पती तूप, मत्स्य उत्पादन, तयार कपडे इत्यादी अशाही वस्तूंची भारतातून अफगाणिस्तानात निर्यात केले जातात. 

∆ तालिबानचा उदय कसा झाला? 

        3.5 लाख अफगाण सैनिकांनी तालिबान समोर नांगी टाकली. आणि अफगाणिस्तान अलगदपणे तालिबान च्या घशात गेला. 

      तालिबान चा उदय कसा झाला? व हा तालिबान आहे तरी कोण? ज्याला अफगाणिस्तानचे लष्करही घाबरतात. 

      तालिबानचा उदय 1990 च्या दशकात उत्तर पाकिस्तानात झाला. 

      त्यानंतर 1985 च्या आसपास अफगाणिस्तानची सत्ता ही रशियाकडे होती. त्यामध्ये रशिया ला विरोध करणारे अनेक मुजाहिद म्हणजेच धर्म सैनिक गट होते. त्यापैकी एक गट हा मुल्ला ओमार हा चालवत होता त्यावेळेस ओमार व रशियन लोकांबरोबर झालेल्या एका चकमकीत त्याचा एक डोळा गेला होता. त्यानंतर 1990 ला रशियाला अफगाणिस्तानमधून हकलल्यानंतर मुजाहिदीनच्या संघटनांमध्ये आपापसात मारामारी सुरू झाली. कारण प्रत्येक गटाला अफगाणिस्तानची सत्ता हवी होती. त्यानंतर रशियन सरकार कोसळलं पण रशियन सरकारच्या जागी कोणताही पर्याय सरकार येत नव्हतं कारण देशात अनावस्था होती, लुटालूट होत होती, संपूर्ण जनता हैराण झाली होती. त्यानंतर तालिबानने कंदहार नावाच्या शहराला आपले पहिले केंद्र बनवले. त्यानंतर तालिबानी सुमारे जवळपास वीस वर्षानंतर कंदहार शहराचा ताबा घेतला आहे. 

          अफगाणिस्तानच्या जमिनीवर एकेकाळी सोव्हिएत संघाची फौज होती. त्यानंतर जवळपास सुमारे 1989 च्या काळात कट्टरतावादी बंडखोरांनी म्हणजेच सोव्हिएत फौजांनी माघार जाण्यास भाग पाडले. सोव्हिएत फौजा विरोधात लढणाऱ्या कट्टर वाद्यांचा कमांडर म्हणून ओळखला जाणारा मुल्ला मोहम्मद ओमर याने पुढे जाऊन तालिबानची स्थापना केली. 

          एकदा कंदाहार शहरामध्ये रस्त्यावर लूटमार चालली होती ही लूटमार चालल्याची बातमी मदरशात पसरली गेली. त्यानंतर ओमारन मदरशांमधील तालिब गोळा केले व रस्त्यावर पोहोचला तिथे जाऊन लुटालूट करणाऱ्यांना मारहाण केले. तसेच तालिबान्यांना गनिमी लढाई करताना बंदुकी मिळाल्या होत्या त्या बंदुकांचा लोकांवर धाक टाकण्यासाठी याचा वापर तालिब करत. तसेच आसपासचे मदरशांतले तालिब त्यामध्ये सामील झाले व एकत्र आले. त्यानंतर तालिबानची संख्या वाढली. एकेकाळी तालिबानची सेनाच तयार झाली. आणि ही सेना संपूर्ण देशभर फिरू लागली. असे करत 1996 च्या सुमारे ओमारंन इतर सर्व मुजाहि्द गटांना मागे टाकले व मारून टाकले. आणि असेच ओमार यांच्या तालिबानची सत्ता अफगाणिस्तानवर स्थापना झाली. 

∆ तालिबानची स्थापना केव्हा झाली :- 

           सध्या आता तालिबानच्या या उदया मागे पाकिस्तानचा हात आहे असे म्हटले जात आहे. कारण तालिबान मधील सदस्यांनी पाकिस्तान मधील मदरशा शहरामध्ये आपले शिक्षण घेतले होते. तसेच आणि सध्या सुरू असलेल्या तालिबानची दहशत किंवा लढाई करण्यासाठी पाकिस्तान मदत करत आहे. असेही म्हटले जात आहे. पश्तू भाषेत तालिब चा अर्थ विद्यार्थी असा होतो. या पश्तू एकवचनाचा तालिबान हे बहुवचन. या संघटनेतील सर्व सदस्य हे मुल्ला ओमर चे विद्यार्थी होते. ओमर हा कट्टरतावादी अफगाण चा इस्लामी नेता होता. 1994 मध्ये ओमर ने कंदहार मधे तालिबानची स्थापना केली. त्यावेळी त्यांच्याकडे फक्त 50 सदस्य होते. 

∆ अंतिम निष्कर्ष :- 

       तर मित्रांनो तुम्हाला या लेखांमधून तालिबान कोण आहे? व तालिबान चा उदय कसा झाला? व तालिबानने अफगाणिस्तान वर कसा कब्जा केला? या बद्दल संपूर्ण माहिती मिळालीच असेल. तरी तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल तर आपण कॉमेंट बॉक्स (Comment Section) मध्ये विचारू शकता. 

     आमचा हाच प्रयत्न असतो की विद्यार्थ्याला हवी असणारी संपूर्ण विषयाबद्दलची माहिती आपणापर्यंत एकाच वेबसाईटवरुन पोहोचविणे हाच आमचा उद्देश असतो. तरी तुम्हाला हा लेख आवडल्यास तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करा जेणेकरून त्यांनाही तालिबान कोण होता? व तालिबान चा उदय कसा झाला? व त्याने अफगाणिस्तानवर आपली सत्ता कशी मिळवली किंवा अफगानिस्तान वर कसा कब्जा केला? इत्यादी याबद्दलची माहिती मिळेल.

हे हि वाचा ….

कृषी क्षेत्रातील क्रांती – Krushi Kranti

भारतरत्न पुरस्कार मिळालेल्या व्यक्ती 2021

मी मागील 8 वर्ष MPSC आणि इतर स्पर्धा परीक्षेसंबंधी पुण्यामध्ये Classes घेत आहे, त्यामुळे या स्पर्धा कशा प्रकारे होतात, कोणते प्रश्न विचारले जातात आणि कोणत्या टॉपिक वर प्रश्न विचारले जातात या संबंधी ची पूर्ण माहिती मला असून मी माझा अनुभव या वेबसाइट द्वारे तुम्हा सर्वांपर्यंत पोचवायचा प्रयन्त करत आहे.

1 thought on “तालिबान काय आहे? तालिबानचा उदय कसा झाला? | Taliban Information in marathi”

Leave a Comment