TAIT Exam Preparation| TAIT परीक्षा तयारी

TAIT Exam Preparation| TAIT परीक्षा तयारी

शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2023

TAIT Time table वेळापत्रक:📙✒️

१. परीक्षा अर्ज भरणे – 31 जानेवारी 2023 ते 12 फेब्रुवारी 2023२.

ऑनलाइन परीक्षा – 22 फेब्रुवारी 2023 ते 3 मार्च 2023३.प्रवेशपत्र

ऑनलाइन प्रिंट काढणे- अंदाजे 15 फेब्रुवारी 2023 पासून उपलब्ध होतील.

TAIT Syllabus 2023

TAIT Form Apply Now

#TAIT 2023 अभ्यासक्रम व महत्वपूर्ण अभ्यास संदर्भ:■ TAIT संपूर्ण अभ्यासक्रम तयारीसाठी उपयुक्त संदर्भ:

✅️ १. समग्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी – के सागर.

✅️ २. संपूर्ण शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी – डॉ.शशिकांत अन्नदाते.

■ TAIT अभ्यासक्रम घटकनिहाय महत्वपूर्ण संदर्भ:

★ बुद्धिमत्ता चाचणी – समग्र बुद्धिमत्ता चाचणी अभ्यासा.

★ अंकगणित – सचिन ढवळे/के सागर/प्रमोद हुमने/नितीन महाले/सतीश वसे/ पंढरीनाथ राणे, लोळे यापैकी तुम्हाला आवडणारी कोणतीही 2 पुस्तके अभ्यासा.

★ शिक्षक अभियोग्यता व मानसशास्त्रातील कल, आवड, समायोजन व व्यक्तिमत्व इत्यादी घटक.

★ संपूर्ण शिक्षक अभियोग्यता, बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र – डॉ.शशिकांत अन्नदाते सर (मानसशास्त्र घटकातील विविध संकल्पना,परीक्षाभिमुख तयारीसाठी व भरपूर वस्तुनिष्ठ प्रश्न सरावासाठी अत्यंत उपयुक्त संदर्भ)

★ शैक्षणिक व प्रायोगिक मानसशास्त्र- डॉ.ह.ना.जगताप सर

★ शिक्षक अभियोग्यता विशेष तयारी – स्वाती शेटे (दुसरी आवृत्ती)

★ भाषिक क्षमता मराठी- मो.रा.वाळिंबे पुस्तक अभ्यासा.

★ भाषिक क्षमता इंग्रजी – के सागर/ बाळासाहेब शिंदे/सुदेश वेळापुरे/ एम.जे.शेख यापैकी कोणतेही एक पुस्तक अभ्यासा

★ सामान्यज्ञान- के’सागर/ विनायक घायाळ/नवनीत यापैकी कोणतेही एक पुस्तक अभ्यासावे.

★ TAIT मागील ऑनलाइन प्रश्नपत्रिकेसाठी विनायक घायाळ / ऑनलाइन मागील प्रश्नपत्रिका असलेले कोणतेही एक पुस्तक अभ्यासा.

★ TAIT प्रश्नपत्रिका सरावासाठी स्वाती शेटे यांचे “TAIT 7 सराव प्रश्नपत्रिका” हे पुस्तक उपयुक्त ठरेल.

परीक्षेसाठी उपलब्ध वेळेचा सदुपयोग करून मनापासून अभ्यास करा.परीक्षेत यशस्वी होण्यासाठी हार्दिक शुभेच्छा*

#ALL_THE_BEST.!👍

पवित्र पोर्टलमार्फत मेरिटच्या आधारे #शिक्षक म्हणून शासकीय सेवेत दाखल होण्याची #सुवर्णसंधी असल्याने प्रत्येक डी.एड./बी.एड./एम.एड. पदवी धारण करणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत सदर माहिती शेअर करावी ही विनंती. 🙏🙏🙏

मी मागील 8 वर्ष MPSC आणि इतर स्पर्धा परीक्षेसंबंधी पुण्यामध्ये Classes घेत आहे, त्यामुळे या स्पर्धा कशा प्रकारे होतात, कोणते प्रश्न विचारले जातात आणि कोणत्या टॉपिक वर प्रश्न विचारले जातात या संबंधी ची पूर्ण माहिती मला असून मी माझा अनुभव या वेबसाइट द्वारे तुम्हा सर्वांपर्यंत पोचवायचा प्रयन्त करत आहे.

Leave a Comment