Post Office Recruitment 2020 Maharashtra | Postman

Post Office Recruitment 2020 in Maharashtra – postman, mail guard, mts.

भारतीय पोस्ट खात्याने फक्त महाराष्ट्र सर्कलसाठी विविध पोस्ट ऑफिस मध्ये भरावयाच्या पदांची जाहिरात नुकतीच प्रसिद्ध केली आहे. पोस्ट विभागामध्ये एकूण भरावयाच्या जागा 1371 इतक्या आहेत (Postman etc.).  अर्ज करण्याची मुदत 10 नोव्हेंबर 2020 पर्यंत आहे. (मूळ जाहिरातीमध्ये मुदत तीन नोव्हेंबर पर्यंत होती मात्र ती दहा नोव्हेंबर पर्यंत वाढवण्यात आलेली आहे )

 एकूण भरावयाच्या जागा – 1371

 पोस्टमन(Postman) – 1029

मेल गार्ड(Mail Guard) – 15

 मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) – 375

अर्ज करण्याची मुदत – 5 ऑक्टोबर 2020 ते 10 नोव्हेंबर 2020

 वेतन (Pay Scale)   

पोस्टमन / मेल गार्ड – 21700 – 69100

 मल्टी टास्किंग स्टाफ – 18000 – 56900

अर्ज फी (Application Fee) – 

  • उमेदवार जर एका पदासाठी अर्ज करणार असेल तर
    •  खुला प्रवर्ग – 500  रुपये
    •  आरक्षित  सर्व प्रवर्ग – 100 रुपये
  •  उमेदवार जर दोन्ही पदासाठी अर्ज करणार असेल तर
    •  खुला प्रवर्ग – 1000 रुपये
    •  आरक्षित सर्व प्रवर्ग – 200  रुपये

वयोमर्यादा (Age Limit ) – 

  • पोस्टमन/ मेल गार्ड पदासाठी – 18 – 27 
  • मल्टी टास्किंग स्टाफ  पदासाठी – 18 – 25

अनुसूचित जाती व जमातींसाठी (SC / ST)  पाच  व इतर मागास वर्गासाठी (OBC) तीन वर्ष शिथिलक्षम

शैक्षणिक पात्रता

पोस्टमन(Postman)1029  आणि मेल गार्ड (Mail Guard) पदासाठी शैक्षणिक पात्रता

  • 1)  बारावी पास
  • 2)  किमान दहावीपर्यंत मराठी विषय अभ्यासला असावा.
  • 3)  संगणकाचे ज्ञान

मल्टी टास्किंग स्टाफ पदासाठी शैक्षणिक पात्रता

  • 1) दहावी पास
  • 2) किमान दहावीपर्यंत मराठी विषय अभ्यासला असावा.
  • 3) संगणकाचे ज्ञान

उमेदवार  पोस्टमन म्हणून निवड झाला तर वाहनचालक परवाना धारण करणे आवश्यक आहे. (as directed by post office recruitment advertisement)

post exam syllabus 2020

परीक्षा पद्धती व अभ्यासक्रम Pattern and syllabus of examination

 एकूण तीन टप्प्यांमध्ये ही परीक्षा होणार आहे. 

पेपर 1, पेपर 2, पेपर 3

 पेपर 1

 संगणकाधारित ऑनलाइन परीक्षा

गुण – 100  

 प्रश्न संख्या – 100       

वेळ – 90  मिनिटे

 परीक्षेचे माध्यम  – इंग्रजी, हिंदी, मराठी, कोकणी

या परीक्षेच्या पात्रतेसाठी  उमेदवाराने आपल्या सामाजिक प्रवर्गानुसार  पुढील प्रमाणे गुण  मिळवणे गरजेचे आहे.

खुला प्रवर्ग (Open)40%
इतर मागास प्रवर्ग (OBC)37% 
अनुसूचित जाती जमाती प्रवर्ग (SC/ST)33%
Cut off for post exam 2020 maharashtra

अभ्यासक्रम / Syllabus 

A)  सामान्य ज्ञान (General Knowledge)30 प्रश्न
B)  मूलभूत अंकगणित (Basic Arithmetic)40 प्रश्न
C) तर्क आणि विश्लेषणात्मक क्षमता (reasoning and analytical ability)30 प्रश्न
एकूण100
syllabus for post exam 2020 maharashtra

पेपर 2

गुण – 60        वेळ – 45 मिनिटे

परीक्षा पद्धती

इंग्रजीमधून स्थानिक भाषेत शब्दांचे अनुवाद (बहुपर्यायी) –   15 गुण

स्थानिक भाषेतून इंग्रजीमध्ये शब्दांचे भाषांतर (बहुपर्यायी)    – 15 गुण

80 ते 100 शब्दांमध्ये स्थानिक भाषेत पत्र लिहिणे            – 15 गुण

(3 पर्यायांपैकी 1 प्रश्न)

स्थानिक भाषेत परिच्छेद / लहान निबंध 80 ते 100 शब्दांमध्ये      –  15 गुण

(3 पर्यायांपैकी 1 प्रश्न).

पेपर तीन 

गुण – 40                                        वेळ – 20 मिनिटे

संगणकावर 20 मिनिटांकरिता डेटा एंट्रीची कौशल्य चाचणी 

Maharashtra Police Bharti 2020 | महाराष्ट्र पोलिस भरती 2020

परीक्षा केंद्र (Examination Center)

महाराष्ट्रामधील एकूण 36 जिल्ह्यांपैकी 24 परीक्षा केंद्रे दिलेली आहेत. एक गोवा राज्यातील परीक्षा केंद्र आहे. असे एकूण 25 परीक्षा केंद्रे आहेत. 

अहमदनगरनागपूर
अकोलानांदेड
अमरावतीनाशिक
औरंगाबादपालघर
बीडपुणे
चंद्रपूररत्नागिरी
धुळेसांगली
जळगावसातारा
कोल्हापूरसोलापूर
लातूरठाणे
मुंबई शहरवर्धा
मुंबई उपनगरयवतमाळ
गोवा
Exam center for post exam 2020 maharashtra

उमेदवारांनी महाराष्ट्रातल्या 36 जिल्हा पैकी सर्व 36 केंद्र नाहीत याची नोंद घेणे गरजेचे आहे.  ज्या जिल्ह्यांमध्ये परीक्षा केंद्र नाही त्या  जिल्ह्यातील उमेदवारांनी सोयीस्कर जिल्हा  परीक्षा केंद्र म्हणून निवडणे गरजेचे आहे.

चालू घडामोडी – २०२० | Current Affairs 2020 | chalu ghadamodi

कररचना, कर म्हणजे काय? चांगल्या करपद्धती चे गुणधर्म

Book List For Preparation

मी मागील 8 वर्ष MPSC आणि इतर स्पर्धा परीक्षेसंबंधी पुण्यामध्ये Classes घेत आहे, त्यामुळे या स्पर्धा कशा प्रकारे होतात, कोणते प्रश्न विचारले जातात आणि कोणत्या टॉपिक वर प्रश्न विचारले जातात या संबंधी ची पूर्ण माहिती मला असून मी माझा अनुभव या वेबसाइट द्वारे तुम्हा सर्वांपर्यंत पोचवायचा प्रयन्त करत आहे.

Leave a Comment