रेल्वे भरती 2021 जाहीर | railway bharti 2021, railway bharti 2020

NTPC and Group D Exam 2021 | railway bharti 2020

railway bharti 2020(railway bharti 2021) कधी होणार हा प्रश्‍न बऱ्याच विद्यार्थ्यांना पडलेला आहे.  मात्र याचे उत्तर मिळत नव्हते आता याचे उत्तर मिळणार आहे. रेल्वे  भरतीची वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना  उपयुक्त अशी माहिती येथे  मिळेल. त्याचबरोबर रेल्वे भरती 2021, railway bharti 2021 साठी देखील अतिशय उपयुक्त  माहिती  येथे देण्यात आलेली आहे. railway bharti information in marathi.

railway bharti 2021
railway bharti 2021

भारतीय रेल्वेमध्ये दरवर्षी  विविध जागांची भरती होत असते.  त्याच पद्धतीने रेल्वे भरती 2020 जाहीर करण्यात आली.  फेब्रुवारी 2019 मध्ये या परीक्षेसाठी विविध विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहेत.  मात्र ही परीक्षा अजूनही झालेली नाही. 

 फेब्रुवारी 2019 मध्ये ग्रुप डी आणि एनटीपीसी NTPC (NON TECHNICAL POPULAR CATEGORY)  मध्ये विविध जागा निघालेल्या होत्या.  सदरची भरती एक लाख 40 हजार पदांची होती.  मात्र वेगवेगळ्या तात्कालिक उद्भवणार्‍या कारणांमुळे ही परीक्षा पुढे ढकलण्यात येत होती.

रेल्वे मंत्री माननीय पियुष गोयल यांनी कळवले आहे की वेबसाईट वरती तारखा जाहीर करण्यात आलेल्या आहेत. 

एनटीपीसी NTPC (NON TECHNICAL POPULAR CATEGORY) मधील विविध पदांच्या परीक्षा 28 डिसेंबर 2020 ते मार्च 2021 पर्यंत घेण्यात येणार आहेत.  ग्रुप डी मधील विविध पदांसाठीच्या परीक्षा एप्रिल 2021 30 जून 2021 पर्यंत घेण्यात येणार आहेत(railway bharti 2021)

एकत्रितपणे जाहिरात 1 लाख 40 हजार पदांसाठी आहे.  त्यामध्ये 103769 पदे ग्रुप डी साठी आहेत.  ग्रुप डी मधील गँगमन ट्रॅकमन गेटमन पॉइंट्स मन पोर्टर आणि हेल्पर या विविध पदांची भरती आहे.  ग्रुप डी मधील पदांसाठी शैक्षणिक पात्रता इयत्ता दहावी पास इतकी आहे.

एनटीपीसी NTPC (NON TECHNICAL POPULAR CATEGORY) मधील विविध पदांमध्ये स्टेशन मास्तर, गुड्स गार्ड, वरिष्ठ लिपिक, टायपिस्ट, लेखा लीपिक, तिकीट लिपिक इत्यादी पदांचा समावेश आहे. 140000 मधील 35 हजार 208 पदे एनटीपीसी मधील आहेत. एनटीपीसी साठी शैक्षणिक पात्रता इयत्ता बारावी इतकी आहे. 

ग्रुप डी व एनटीपीसी सर्व पदांसाठी वयोमर्यादा 18 ते 33 वर्षे खुल्या गटाची एससी-एसटी साठी पाच वर्षे शिथिल तर ओबीसीसाठी तीन वर्षे शिथिल आहेत.(railway bharti 2021)

NTPC परिक्षा 

ऑनलाईन पद्धतीने टप्प्याटप्प्याने परिक्षा घेण्यात येणार आहे. परिक्षा दोन टप्प्यात घेण्यात येणार आहे. स्टेज 3 मधे कागदपत्र पडताळणी करण्यात येणार आहे.

पहिल्या टप्प्यामध्ये सर्वांचीच ऑनलाइन परीक्षा होणार आहे.  या परीक्षेमधून दुसऱ्या टप्प्यासाठी एकाच वीस 1:20 असे उमेदवार निवडले जातील. दुसऱ्या टप्प्यामध्ये ऑनलाइन स्वरूपाची वस्तुनिष्ठ परीक्षा असेल.  यामध्ये नकारात्मक गुणदान योजना लागू आहे.  तीन चुकीच्या उत्तरासाठी एक गुण मिळणाऱ्या गुणा मधून कमी केले जाईल.  याच परीक्षेमधून मिळणाऱ्या गुणांच्या आधारावर अंतिम निवड होईल. 

एनटीपीसी परीक्षेकरिता अभ्यासक्रम ( railway bharti 2021)

  •  परीक्षेचा टप्पा क्रमांक 1

 पहिल्या टप्प्यामध्ये संगणकाधारित ऑनलाइन परीक्षा होणार आहे.  या परीक्षेमध्ये एकूण शंभर प्रश्न असतील.  एकूण गुण देखील 100 असतील.  या परीक्षेसाठी 90 मिनिटांचा वेळ देण्यात येणार आहे.

 अंकगणित, बुद्धिमत्ता चाचणी आणि जनरल अवेअरनेस हे घटक या परीक्षेमध्ये समाविष्ट असणार आहेत.

विषयप्रश्न संख्यागुण
अंकगणित3030
बुद्धिमत्ता3030
जनरल अवेयरनेस4040
railway exam 2021 stage 1

पहिल्या टप्प्याची परीक्षा झाल्यानंतर मिळणाऱ्या गुन्हा मधून दुसऱ्या टप्प्यातील परीक्षेसाठी उमेदवारांची निवड होईल.  यासाठी 1:20  असे प्रमाण असणार आहे.  म्हणजे एका जागेसाठी पहिल्या परीक्षेमधून वीस उमेदवार निवडण्यात येणार आहे.  अंतिम निवड एका जागेसाठी 20 मधील सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या एकाची निवड होणार आहे.  लक्षात असू द्या यासाठी मिळणाऱ्या गुणा नुसार निवड होणार आहे.

  •   परीक्षेचा टप्पा क्रमांक 2

 परीक्षेच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये 120 गुणांसाठी ही परीक्षा होणार आहे.  वस्तुनिष्ठ ऑनलाइन स्वरूपाची परीक्षा असणार आहे.  120 गुणांसाठी 120 प्रश्न विचारण्यात येणार आहेत परीक्षेचा कालावधी मात्र 90 मिनिटांचा असणार आहे.  म्हणजे उमेदवाराने कमी कालावधीत जास्तीत जास्त उदाहरणे सोडविण्याचा सराव करणे अपेक्षित आहे. 

विषयप्रश्न संख्यागुण
अंकगणित3535
बुद्धिमत्ता3535
जनरल अवेयरनेस5050
railway exam 2021 stage 2

दुसऱ्या टप्प्याच्या परीक्षेनंतर उमेदवारांची कागदपत्रांची पडताळणी होणार आहे. 

रेल्वे वर्ग ड पदांसाठी परीक्षा

 वर्ग ड पदाची परीक्षा एनटीपीसी परीक्षेपेक्षा थोडीशी वेगळी असणार आहे.  यामध्ये परीक्षेचे दोन टप्पे होणार नसून एकाच टप्प्यामध्ये परीक्षा होणार आहे.  परीक्षेकरिता 100 गुणांची प्रश्नपत्रिका 90 मिनिटांमध्ये सोडवावी लागणार आहे. यामध्ये पुढील चार विषयांचा समावेश असणार आहे. 

विषयप्रश्न संख्यागुण
अंकगणित2525
सामान्य विज्ञान2525
बुद्धिमत्ता2525
जनरल अवेयरनेस2525
railway exam 2021 group d

ऑनलाइन परीक्षेनंतर शारीरिक पात्रता परीक्षा व वैद्यकीय चाचणी आणि कागदपत्रांची पडताळणी केली जाणार आहे. 

तसेच आगामी येणाऱ्या रेल्वे भरती बोर्डामार्फत च्या रेल्वे भरती 2021, railway bharti 2021 साठी देखील परीक्षापद्धती अशाच पद्धतीने असण्याची शक्यता आहे.  म्हणून येथील माहिती फॉर्म भरलेल्या आणि भविष्यात रेल्वे ची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरते.

 अशा पद्धतीने रेल्वे परीक्षांच्या संदर्भात माहिती आपल्याला घेता येईल. railway bharti 2020 साठी वरील प्रमाणे आराखडा असेल.  ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षेला फॉर्म भरलेले आहेत, अश्या मराठी विद्यार्थी मित्रांना मराठी माहिती मिळवून देण्याचा हा माझा प्रयत्न कसा वाटला हे कळवायला विसरू नका.

 हेही वाचा….

तलाठी पदासाठी निवडीचा मार्ग मोकळा | Talathi bharti 2020

महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी पुस्तकांची सूची, Maharashtra Police Bharti Book List 2020

सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्ग आरक्षण

मी मागील 8 वर्ष MPSC आणि इतर स्पर्धा परीक्षेसंबंधी पुण्यामध्ये Classes घेत आहे, त्यामुळे या स्पर्धा कशा प्रकारे होतात, कोणते प्रश्न विचारले जातात आणि कोणत्या टॉपिक वर प्रश्न विचारले जातात या संबंधी ची पूर्ण माहिती मला असून मी माझा अनुभव या वेबसाइट द्वारे तुम्हा सर्वांपर्यंत पोचवायचा प्रयन्त करत आहे.

Leave a Comment