psiexam|MPSC PSI|PSI Syllabus

PSI Syllabus | MPSC psi | psiexam

PSI हे महाराष्ट्रातील पोलीस विभागांमधील महत्त्वाचे पद आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत संयुक्त पूर्व परीक्षा psiexam घेण्यात येते. 

संयुक्त पूर्व परीक्षा PSI (Police Sub Inspector),STI (State Tax Inspector),ASO (Assistant Section Officer) या पदांसाठी घेण्यात येत असे.मात्र 2023  पासून  महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा  एकत्रित रित्या घेण्यात येणार आहे. यातील PSI (पोलीस उपनिरीक्षक)पदाविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत.

PSI हे पद महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाअंतर्गत येणारे पद आहे. या पदासाठी शारीरिक पात्रता व वयोमर्यादा ही इतर पदांपेक्षा वेगळी असते.  ती कशी?  पहा पुढे…

MPSC PSI Age Limit

घटकPSI ASOSTI
किमान वयोमर्यादा191819
कमाल वयोमर्यादा313838
psiexam age limit

(टीप  – सदर वयोमर्यादा ही सर्वसामान्य  दर्शवलेली आहे. यामध्ये मागासवर्गीय, अनाथ, प्राविण्य प्राप्त खेळाडू, माजी सैनिक, दिव्यांग, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, यासारख्या आरक्षित संवर्गामध्ये वयोमर्यादेमध्ये सूट मिळते.)

psiexam
MPSC PSI

MPSC PSI  शारीरिक पात्रता – PSI Physical

 पुरुषांसाठी

 उंची 165 सेंटिमीटर (अनवाणी  म्हणजे पायात कोणतेही प्रकारचे चप्पल किंवा बूट न घालता.) (कमीत कमी) 

 छाती न फुगविता 79 सेंटीमीटर फुगवण्याची क्षमता किमान पाच सेंटीमीटर आवश्यक

 महिलांसाठी

 उंची 157 सेंटीमीटर (अनवाणी  म्हणजे पायात कोणतेही प्रकारचे चप्पल किंवा बूट न घालता.) (कमीत कमी) 

MPSC Combine Group B & C Exam 2023 Apply Now

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या PSI परीक्षेचा अभ्यासक्रम (psi exam syllabus) पुढील प्रमाणे –

MPSC PSI परीक्षेचे टप्पे

१) संयुक्त पूर्व परीक्षा १०० गुण

  २) मुख्य परीक्षा ४०० गुण (पेपर १ संयुक्त व पेपर २ स्वतंत्र)

संयुक्त पूर्व परीक्षा – १०० गुण

विषय व संकेतांक प्रश्न संख्याएकूण गुणदर्जामाध्यमकालावधीप्रश्नपत्रिकेचे स्वरूप
सामान्य क्षमता चाचणी१००१००पदवीमराठी आणि इंग्रजीएक तासवस्तुनिष्ठ बहुपर्यायी

PSI अभ्यासक्रम, psiexam syllabus

१) चालू घडामोडी – जागतिक तसेच भारतातील 

२) नागरिक शास्त्र – भारताच्या घटनेचा प्राथमिक अभ्यास, राज्य व्यवस्थापन (प्रशासन), ग्राम व्यवस्थापन (प्रशासन), 

३) इतिहास – आधुनिक भारताचा विशेषत: महाराष्ट्राचा इतिहास 

४) भूगोल (महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह) – पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अक्षांश व रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे इत्यादी. 

५) अर्थव्यवस्था – भारतीय अर्थव्यवस्था – राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्र्य व बेरोजगारी, मुद्रा आणि राजकोशीय नीती इत्यादी. शासकीय अर्थव्यवस्था – अर्थसंकल्प, लेखा, लेखापरीक्षण.

६) सामान्य विज्ञान – भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, प्राणिशास्त्र, वनस्पतिशास्त्र, आरोग्यशास्त्र.

७) बुद्धिमापन चाचणी व अंकगणित

बुद्धिमापन चाचणी – उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठी प्रश्न

अंकगणित – बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश अपूर्णांक व टक्केवारी

PSI होण्यासाठी मुख्य परीक्षा पुढीलप्रमाणे घेतली जाते.

MPSC PSI Exam Mains

प्रश्नपत्रिकांची संख्या  –  दोन 

एकूण गुण – ४००

पेपर १ (संयुक्त पेपर) – २०० गुण

पेपर २ (स्वतंत्र पेपर) – २०० गुण

पेपर क्रमांकविषयगुणप्रश्र्नसंख्यादर्जामाध्यमकालावधी
मराठी१००५०मराठी – बारावीमराठीएक तास
इंग्रजी६०३०इंग्रजी – पदवीइंग्रजी
सामान्य ज्ञान४०२०पदवीमराठी व इंग्रजी
सामान्य क्षमता चाचणी व पदाच्या कर्तव्यासाठी आवश्यक ज्ञान२००१००पदवीमराठी व इंग्रजीएक तास
psiexam

PSI मुख्य परीक्षा अभ्यासक्रम/ psiexam syllabus – Mains

(संयुक्त पेपर) पेपर १ – २०० गुण

मराठी – सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्यप्रचार, यांचा अर्थ आणि उपयोग तसेच उताऱ्यावरील प्रश्नांची उत्तरे.

इंग्रजी – Common vocabulary, sentence structure, grammar, use of idioms and phrases, and their meaning and comprehension of passage.

सामान्य ज्ञान

१) चालू घडामोडी – जागतिक तसेच भारतातील

२) माहिती अधिकार अधिनियम २००५ व महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५

३) संगणक व माहिती तंत्रज्ञान – आधुनिक समाजातील संगणकाची भूमिका, वेगवेगळ्या क्षेत्रातील जीवनात संगणकाचा वापर, डाटा कम्युनिकेशन, नेटवर्किंग आणि वेब टेक्नॉलॉजी, सायबर गुन्हे व त्यावरील प्रतिबंध, नवीन उद्योग म्हणून माहिती तंत्रज्ञानाचा निरनिराळ्या सेवासुविधांची माहिती मिळण्यासाठी होणारा उपयोग, भारतातील माहिती तंत्रज्ञान उद्योगाची वाढ व त्याचा दर्जा, शासनाचे कार्यक्रम – जसे मीडिया लॅब एशिया, विद्या वाहिनी, ज्ञान वाहिनी, सामूहिक माहिती केंद्र इत्यादी, माहिती तंत्रज्ञान उद्योगातील मूलभूत प्रश्न व त्यांचे भवितव्य.

MPSC Combined Exam Book List | Free Download | MPSC PSI Book List 2023

पेपर २ (स्वतंत्र पेपर) – २०० गुण

१) बुद्धिमत्ता चाचणी

२) महाराष्ट्राचा भूगोल – महाराष्ट्राचा रचनात्मक (Physical)भूगोल, मुख्य रचनात्मक (Physiography) विभाग, हवामान, पर्जन्यातील विभागवार बदल, नद्या, पर्वत, डोंगर, राजकीय विभाग, प्रशासकीय विभाग, नैसर्गिक संपत्ती – वने व खनिजे, मानवी व सामाजिक भूगोल  – लोकसंख्या व त्यांचे परिणाम, ग्रामीण वस्त्या व तांडे, झोपडपट्ट्या व त्यांचे प्रश्न, संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान

३) महाराष्ट्राचा इतिहास –  सामाजिक व आर्थिक जागृती (१८८५-१९४७), महत्त्वांच्या व्यक्तीचे काम, स्वातंत्र्यपूर्व भारतातील सामाजिक जागृती तील वर्तमानपत्रे व शिक्षणाचा परिणाम, स्वातंत्र्यपूर्व काळातील इतर समकालीन चळवळी, राष्ट्रीय चळवळ.

४) भारतीय राज्यघटना – घटना कशी तयार झाली आणि घटनेच्या प्रस्तावना मागची भूमिका व तत्वे, घटनेची महत्वाची कलमे /ठळक वैशिष्ट्ये, केंद्र-राज्य संबंध, निधर्मी राज्य, मूलभूत हक्क व कर्तव्य राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे, शिक्षण, युनिफॉर्म सिव्हिल कोड, स्वतंत्र न्यायपालिका.

५) मानवी हक्क व जबाबदाऱ्या – संकल्पना, आंतरराष्ट्रीय मानवी हक्क मानक, त्यासंदर्भातील भारतीय राज्य घटनेतील तरतुदी, भारतातील मानवी हक्क व जवाबदार्‍या यंत्रणेची अंमलबजावणी व संरक्षण, भारतातील मानवी हक्क चळवळ, मानवी हक्कापासून वंचित राहण्याच्या समस्या, गरिबी, निरक्षरता, बेकारी, सामाजिक – सांस्कृतिक – धार्मिक प्रथा यासारख्या अडचणी,(हिंसाचार, भ्रष्टाचार, दहशतवाद, कामगारांचे शोषण, संरक्षित गुन्हेगार, इत्यादी.) लोकशाही व्यवस्थेतील एकमेकांचे हक्क आणि मानवी प्रतिष्ठा व एकतेचा आदर करण्यासंबंधी प्रशिक्षणाची गरज व महत्त्व, नागरी हक्क संरक्षण अधिनियम १९५५, मानवी हक्क संरक्षण अधिनियम १९९३, कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम २००५, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचारास प्रतिबंध)अधिनियम १९८९, हुंडाबंदी अधिनियम १९६१, महात्मा गांधी तंटामुक्ती अभियान.

६) महाराष्ट्र पोलीस अधिनियम,१९५१ (Maharashtra Police Act)

७) भारतीय दंड संहिता, १८६० (Indian penal code)

८) फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ ( Criminal Procedure Code)

९)  भारतीय पुरावा अधिनियम १८७२ (Indian Evidence Act.)

PSI मुलाखत

मुख्य परीक्षेनंतर पोलीस उपनिरीक्षक पदासाठी मुलाखत घेतले जाते. या मुलाखतीमध्ये शारीरिक चाचणी अंतर्भूत असते. निवडीच्या अंतिम टप्प्यामध्ये मुख्य परीक्षा व मुलाखत यातील मिळालेल्या गुणांच्या आधारे अंतिम निवड यादी जाहीर केली जाते.

पी.एस.आय. पदासाठी मुलाखत 40 गुणांची असते.  मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची अर्जामध्ये दिलेल्या माहितीनुसार कागदपत्रांची पडताळणी होते. त्यानंतरच उमेदवार मुलाखतीसाठी पात्र ठरतो व त्याची मुलाखत घेतली जाते.

PSI शारीरिक चाचणी – एकूण गुण १०० 

पुरुषांसाठी 

१) गोळाफेक (वजन ७.२६० किलो) – अंतर ७.५० केल्यास १५ गुण 

२) पुल अप्स (८ पुल अप्स प्रत्येकी २.५ गुण एकूण २० गुण 

३) लांब उडी ४.५० मी. – एकूण गुण १५ गुण 

४) धावणे ८०० मी. – वेळ २ मिनिटे ३० सेकंद – ५० गुण 

एकूण १०० गुण 

महिलांसाठी 

१) गोळाफेक (वजन ४ कि. ग्रॅ) अंतर ६ मी. – २० गुण 

२) धावणे २०० मी. वेळ ३५ सेकंद – ४० गुण 

३) चालणे ३ किमी. वेळ २३ मिनिटे – ४० गुण 

एकूण १०० गुण 

मुलाखतीस पात्र होण्यासाठी शारीरिक चाचणीमध्ये किमान ५० गुण मिळविणे आवश्यक आहे. अशाप्रकारे ४०० गुणांची मुख्य, १०० गुणांची शारीरिक चाचणी आणि ४० गुणांची मुलाखत एकूण ५४० गुणांपैकी पीएसआय पदासाठी निवड केली जाते. 

याव्यतिरिक्त तुम्हाला काही माहिती हवी असल्यास तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून विचारू शकता. सदर माहिती आवडल्यास आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत शेअर करून सहकार्य करायला विसरू नका. पुन्हा भेटू, धन्यवाद!

MPSC Combined Exam Book List | Free Download | MPSC PSI Book List 2023

BIMSTEC | बिमस्टेक म्हणजे  काय?

View Official Site

मी मागील 8 वर्ष MPSC आणि इतर स्पर्धा परीक्षेसंबंधी पुण्यामध्ये Classes घेत आहे, त्यामुळे या स्पर्धा कशा प्रकारे होतात, कोणते प्रश्न विचारले जातात आणि कोणत्या टॉपिक वर प्रश्न विचारले जातात या संबंधी ची पूर्ण माहिती मला असून मी माझा अनुभव या वेबसाइट द्वारे तुम्हा सर्वांपर्यंत पोचवायचा प्रयन्त करत आहे.

3 thoughts on “psiexam|MPSC PSI|PSI Syllabus”

  1. आदरणीय सर, अत्यंत महत्वाची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद,
    सर, 2023 ची PSI मुख्य परीक्षा – पेपर क्रमांक – 2 हा स्वतंत्र पणे होणार आहे की, ASO, STI ह्यांच्यासोबत एकत्रित होणार आहे ?

    Reply

Leave a Comment