Maharashtra Engineering Service information in Marathi | महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा 2024

महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा 2024 | Maharashtra Engineering Service in Marathi

महाराष्ट्र शासन अभियांत्रिकी सेवेमध्ये कोणकोणत्या सेवांचा समावेश होतो आणि अभियांत्रिकी पदवी कशा पद्धतीने भरले जातात याच्या संदर्भात माहिती याठिकाणी आणि घेणार आहोत. 

महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा योजना कशा पद्धतीची असते याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

महाराष्ट्र शासनाच्या वेगवेगळ्या विभागांमध्ये ते अभियंत्यांची भरती करण्यासाठी महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षा आयोजित केली जाते.  सर्वात आधी पूर्व परीक्षेचा टप्पा हा विविध शाखेतील अभियंत्यांसाठी संयुक्तपणे आयोजित केला जातो.  यालाच संयुक्त पूर्व परीक्षा असे देखील म्हटले जाते. 

प्रश्नपत्रिका स्वरूप

पूर्व परीक्षा एकूण 100 गुणांसाठी आयोजित केली जाते. 

पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका स्वरूप वस्तुनिष्ठ बहुपर्यायी असते.  यामध्ये विषयवार गुणविभाजन पुढीलप्रमाणे.

विषय प्रश्न संख्या गुण दर्जा माध्यम कालावधी
मराठी 10 10 बारावी मराठी  
इंग्रजी 10 10 पदवी इंग्रजी  
सामान्य ज्ञान 20 20 पदवी मराठी व इंग्रजी  
अभियांत्रिकी अभियोग्यता चाचणी 60 60 पदवी इंग्रजी  
एकूण 100 100     दीड तास
Maharashtra Engineering Service pre Exam

अभ्यासक्रम – Maharashtra Engineering Services Syllabus

1)  मराठी –  मराठी सर्वसामान्य शब्दसमूह वाक्यरचना व्याकरण म्हणी व वाक्यप्रचार यांचा अर्थ उपयोग तसेच उताऱ्यावरील प्रश्नांची उत्तरे. 

2)  इंग्रजी –  Common Vocabulary, sentence structure, Grammar, use of idioms and phrases,  and their meaning and comprehension of passage. 

3)  सामान्य ज्ञान  –  भारताचा विशेषत महाराष्ट्राचा इतिहास, भारताचा विशेषत महाराष्ट्राचा भूगोल, भारतीय अर्थव्यवस्था, भारतीय आयात निर्यात, राष्ट्रीय विकासात सरकारी सहकारी ग्रामीण बँकांची भूमिका, शासकीय अर्थव्यवस्था अर्थसंकल्प लेखा व लेखा परीक्षण इत्यादी, पंचवार्षिक योजना, किमती वाढण्याची कारणे व उपाय, भारतीय राज्यव्यवस्था, जागतिक तसेच भारतातील चालू घडामोडी, पर्यावरण –  मानवी विकास व पर्यावरण पर्यावरणपूरक विकास नैसर्गिक साधन संपत्तीचे संधारण वनसंरक्षण, विविध प्रकारचे प्रदूषण व पर्यावरणीय आपत्ती, पर्यावरण संवर्धनात कार्यरत असणाऱ्या राज्य राष्ट्र जागतिक पातळीवरील संस्था संघटना.

4)  अभियांत्रिकी अभियोग्यता चाचणी

  • Applied mechanics
  • Engineering mechanics
  • Elements of civil engineering
  • Elements of Mechanical Engineering
  • Elements  of electrical engineering

Maharashtra Engineering Service in Marathi | गुणदान योजना

महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा साठी ही नकारात्मक अनुदाने योजना लागू आहे.  चार चुकीच्या उत्तरा मागे एका बरोबर प्रश्नाचे गुण मिळालेल्या गुणांमध्ये दोन वजा करण्यात येतात. MPSC

 अभियांत्रिकी पूर्व परीक्षा संयुक्तपणे घेतली जात असली तरी मुख्य परीक्षा अभियांत्रिकीच्या प्रत्येक शाखेसाठी स्वतंत्रपणे आयोजित केली जाते.  पर्यायाने प्रत्येक शाखेसाठी स्वतंत्रपणे पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर केला जातो. 

महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा मधून  भरावयाच्या एकूण पदाच्या आठ पट जास्त उमेदवार निवडले जातात. पूर्व परीक्षा ही एक चाळणी परीक्षा आहे. 

परीक्षा शुल्क

 बिगर मागास (Open)उमेदवारांसाठी परीक्षा शुल्क 524 रुपये आहे.

दररोज सर्व प्रवर्गासाठी परीक्षा शुल्क 324 रुपये इतके घेण्यात येते.

माहितीसाठी आणखी उपयुक्त लेख… 

न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग Judicial magistrate First Class JMFC

भूकंप कसा होतो?  भारतातील भूकंप प्रवण क्षेत्र कोणती?

MPSC Books List In Marathi for mpsc exam 2021

मी मागील 8 वर्ष MPSC आणि इतर स्पर्धा परीक्षेसंबंधी पुण्यामध्ये Classes घेत आहे, त्यामुळे या स्पर्धा कशा प्रकारे होतात, कोणते प्रश्न विचारले जातात आणि कोणत्या टॉपिक वर प्रश्न विचारले जातात या संबंधी ची पूर्ण माहिती मला असून मी माझा अनुभव या वेबसाइट द्वारे तुम्हा सर्वांपर्यंत पोचवायचा प्रयन्त करत आहे.

Leave a Comment