महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021
महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2021 – महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक ११ एप्रिल २०२१ रोजी नियोजित असलेली महाराष्ट्र दुय्यम सेवा गट ब संयुक्त पूर्व परीक्षा २०२० कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पुढे ढकलण्यात आलेली आहे.
दिनांक ९ एप्रिल २०२१ च्या प्रसिद्धी पत्रकामध्ये लोकसेवा आयोगाने ही माहिती दिलेली आहे. महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा २०२० च्या आयोजना संदर्भात शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडून दिनांक ९ एप्रिल २०२१ रोजी च्या पत्राद्वारे आयोगास खालील प्रमाणे कळविण्यात आले आहे.
“ दिनांक ११ एप्रिल २०२१ रोजी आयोगामार्फत आयोजित होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात यावी तसेच covid-19 या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव आटोक्यात आल्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने राज्य शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन महसूल व वन विभागाची सल्लामसलत करून परीक्षेची पुढील तारीख जाहीर करावी.”
राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने आयोगाला सांगितलेले आहे की, परीक्षा पुढे ढकलण्यात यावी. आणि येणाऱ्या कालावधीत परीक्षेसाठी पुढील तारीख शासनाशी विचार विनिमय करून ठरविण्यात यावी.
सदर परीक्षा पुढे ढकलल्यामुळे कोणत्याही विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही आणि परीक्षा अर्ज भरताना विद्यार्थ्यांचे वय जे होते ते गृहीत धरले जाणार असल्याने वयाची अडचण सुद्धा येणार नाही अशी स्पष्टता देण्यात आली आहे.
संयुक्त पूर्व परीक्षा 2020 या परीक्षेला सुद्धा कोरोना ने फटका दिलेला आहे. कोरोना ची दुसरी लाट ही अधिक प्रभावी असल्याचे म्हटले जात असताना हा सावधगिरीचा उपाय म्हणून योग्य निर्णय असल्याचे मानले जाते. MPSC Combine Syllabus
दरम्यान लोकसेवा आयोगाच्या परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संदर्भात दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू कोरोना ने झाला असल्याने परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची सुद्धा परीक्षा पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी होती. महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2021 जाहिरात येईल का ? महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2021 परीक्षा होईल का हे देखील अजून स्पष्ट नाही. वाढत कोरोना प्रादुर्भाव हे एकमेव आणि खरे कारण या सद्यस्थिती मागे आहे.
परीक्षेसाठी चा पुढील दिनांक येणाऱ्या कालावधीत आपल्याला या ठिकाणी सुद्धा पाहायला मिळेल. सोबत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या संकेत स्थळावरही पाहू शकाल.
वाचनासाठी आणखीन माहितीपूर्ण लेख पुढील प्रमाणे….