भारतीय राज्यघटनेतील महत्त्वाची कलमे | Important Constitutional Articles in Marathi

संविधानात्मक महत्वाची कलमे | Important Constitutional Articles in Marathi

Important Constitutional Articles in Marathi: लोकशाही प्रशासन असणाऱ्या राष्ट्रांमध्ये लोकांच्या हाती सत्ता एकवटलेली  असते.  लोकशाही प्रशासनामध्ये लोक महत्त्वाची भूमिका पार पाडत असतात.  अशा लोकांना आपले हक्क व अधिकार माहित असणे गरजेचे असते.  आणि असे हक्क-अधिकार लोकशाही राष्ट्राच्या संविधाना कडून मिळत असतात.  संविधानामध्ये हे अधिकार स्पष्ट करणारी महत्त्वाची कलमे असतात. 

 भारतीय संघराज्याने सुद्धा लोकशाही प्रशासन व्यवस्था स्वीकारलेली आहे. म्हणून आपल्या देशात लोकांना खूप महत्त्वाचे स्थान आहे.  भारतीय संघराज्यातील प्रत्येक नागरिक महत्त्वाचा आहे. अशा प्रत्येक नागरिकाला संविधानाने दिलेले हक्क आणि अधिकार विषयक  संविधानात्मक महत्वाची कलमे  या ठिकाणी पाहणार आहोत.

Mahatvachi kalame in Marathi | Important kalam in Marathi

कलम 1 – संघराज्य या राज्यांचा संघ असेल असे म्हटले आहे 

कलम 2 – मध्ये भारतीय संघात योग्य वाटतील त्या अटी आणि शर्ती वर नवीन राज्यांना समाविष्ट करणे हा अधिकार कलम 2 ने संसदेला दिला 

कलम 3 – मध्ये नवीन राज्याची निर्मिती व विद्यमान राज्याच्या क्षेत्रात सिमात किंवा नावात बदल 

कलम 4 – परिशिष्ट 1 व परिशिष्ट 4 ची दुरुस्ती आणि पूरक अनुषंगिक आणि त्यातून उत्पन्न होणाऱ्या त्यासंबंधी कलम 2 व कलम 3 अंतर्गत करण्यात आलेले कायदे

राज्यघटनेतील भाग दोन मध्ये कलम 5 ते कलम 11 पर्यंतच्या तरतुदी नागरिकत्वाशी संबंधित आहेत.

कलम 5 – राज्य घटनेच्या प्रारंभीचे नागरिकत्व 

कलम 6 – पाकिस्तान मधून भारतात स्थलांतरित झालेल्या विवाहित व्यक्तींचे नागरिकत्वाचे हक्क 

कलम 7 – पाकिस्तानात स्थलांतरित झालेल्या विवक्षित व्यक्तींचे नागरिकत्वाचे हक्क 

कलम 8 – मूळ भारतीय असणाऱ्या पण भारताबाहेर राहणाऱ्या विवक्षित व्यक्तींचे नागरिकत्वाचे हक्क 

कलम 9 – परकीय देशाचे नागरिकत्व स्वेच्छेने संपादन करणाऱ्या व्यक्ती भारताच्या नागरिक नसणे 

कलम 10 – नागरिकत्वाचे हक्क चालू राहणे 

कलम 11 – कायद्याद्वारे संसद नागरिकत्वाच्या याचे नियमन करेल.

भारतीय राज्यघटनेच्या भाग-3 मधील तरतुदी मूलभूत हक्काचे संबंधित असून अमेरिकेच्या घटनेवरून या स्वीकारण्यात आलेल्या आहेत. कलम 12 ते 35 या कलमांचा समावेश मूलभूत हक्कांमध्ये होतो.

*समानतेचा हक्क कलम 14 ते 18 

*स्वातंत्र्याचा हक्क कलम 19 ते 22 

*शोषणाविरुद्धचा हक्क कलम 23 ते 24 

*धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क कलम 25 ते 28 

*सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क कलम 29 30 

*घटनात्मक उपाययोजनेचा हक्क कलम 32

कलम 31 – (निरसित)

कलम 33 – सैन्य दलासाठी मूलभूत फक्त संसदेला अधिकार 

कलम 34 – लष्करी कायदा लागू मूलभूत हक्कावर मर्यादा 

कलम 35 – मूलभूत कशासाठी तरतुदी लागू करण्याचा कायदा

भारतीय राज्यघटनेच्या भाग-4 मध्ये राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे देण्यात आलेली आहेत. ही मार्गदर्शक तत्त्वे कलम 36 ते 51 पर्यंत आहेत.

कलम 36 – राज्याची व्याख्या

कलम 37 – निर्देशक तत्वाचे उपयोजन

कलम 38 – लोककल्याणाच्या संवर्धनासाठी राज्याने समाजव्यवस्था प्रस्थापित करणे

कलम 39 – राज्याने अनुसरा वयाच्या धोरणाची विवक्षित तत्वे

कलम 39 a – समान न्याय व कायदेविषयक मोफत सहाय्य

कलम 40 – ग्रामपंचायतीचे संघटन

कलम 41 – कामाचा शिक्षणाचा आणि युवक शेत बाबतीत लोक सहाय्याचा यांची तरतुदी

कलम 42 – कामाच्या ठिकाणी न्याय व मानवीय परिस्थिती आणि प्रसुती विषयक सहाय्य याची तरतूद

कलम 43 – कामगारांना निर्वाह वेतन इत्यादी

कलम 43 A – औद्योगिक व्यवस्थापनामध्ये कामगारांचा सहभाग

कलम 43 B – सहकार संस्थांचे प्रवर्तन

कलम 44 -नागरिकांसाठी समान नागरी संहिता 

कलम 45 – 6 वर्षाखालील बालकांची प्रारंभिक बाल्य अवस्थेतील देखभाल व शिक्षणाची तरतूद 

कलम 46 – अनुसूचित जाती जमाती आणि इतर दुर्बल घटकांचे शैक्षणिक आणि आर्थिक हित संवर्धन 

कलम 47 – पोषणाचा व जीवनमानाचा स्तर उंचावणे आणि सार्वजनिक आरोग्य सुधारणे हे राज्यांचे कर्तव्य 

कलम 48 – कृषी आणि पशुसंवर्धन यांची सुसूत्र व्यवस्था करणे 

कलम 48 A – पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करणे आणि वने व जीवसृष्टी यांचे रक्षण करणे 

कलम 49 – राष्ट्रीय दृष्ट्या महत्त्वाची स्मारके ठिकाने वास्तू यांचे संरक्षण 

कलम 50 – कार्यकारी यंत्रणेने पासून न्याय यंत्रणेची फारकत

कलम 51 – आंतरराष्ट्रिय शांतता आणि सुरक्षा यांचे संवर्धन

भारतीय राज्यघटनेत किती कलमे आहेत ? | Bhartiy Rajyaghatnet kiti Kalme aahet?

भारतीय राज्यघटनेमध्ये 395 कलमे आणि 22 भाग आहेत. आज पर्यंत म्हणजे दिनांक 15 जुलै 2022 पर्यंत भारतीय घटनेमध्ये 104 वेळा दुरुस्ती करण्यात आलेली आहे. तरीदेखील अंतिम कलम क्रमांक 395 असेच आहे.

वरील महत्त्वाची कलमे नागरिकाला माहीतच असली पाहिजेत. अपेक्षा आहे संदर्भात लेख आपल्याला उपयुक्त ठरला असेल.  आणखी वाचनासाठी काही महत्त्वाचे लेख खाली देत आहे.

Bhartiya samvidhan Marathi | constitution in Marathi | bhartiya samvidhan in marathi

१. भारतीय संविधान हे जगातील सर्वात लांब लिखित संविधान आहे. यात 12 वेळापत्रकांसह 25 भागांमध्ये 448 कलमे आहेत.
2. डॉ.बी.आर. आंबेडकरांना भारतीय राज्यघटनेचे जनक म्हणून ओळखले जाते. ते मसुदा समितीचे अध्यक्ष होते आणि त्यांनी घटना घडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.
3. आपले संविधान हे 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकारले गेले आणि 26 जानेवारी 1950 रोजी लागू झाले. या दिवशी भारताच्या इतिहासातील एका नवीन युगाची सुरुवात झाली.
4. भारतीय राज्यघटना हे एक संघीय दस्तऐवज आहे जे तीन शाखांसह लोकशाही सरकार स्थापन करते – कायदेमंडळ, कार्यकारी आणि न्यायपालिका.
५. संविधानाने सर्व नागरिकांना मूलभूत अधिकारांची हमी दिली आहे, ज्यात भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार, कायद्यासमोर समानतेचा अधिकार आणि जीवनाचा आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचा अधिकार यांचा समावेश आहे.
6. सुप्रीम कोर्ट ही सर्वोच्च न्यायिक संस्था असल्याने स्वतंत्र न्यायव्यवस्थेचीही संविधानात तरतूद आहे.
७. राज्यघटनेत सरकारच्या संसदीय स्वरूपाची तरतूद आहे, ज्यामध्ये पंतप्रधान हे सरकारचे प्रमुख आणि राष्ट्रपती राज्याचे प्रमुख आहेत.
8. राज्यघटनेत शासनाच्या तीन शाखांमध्ये अधिकारांचे पृथक्करण करण्याची तरतूद आहे, ज्यामुळे चेक आणि बॅलन्सची व्यवस्था सुनिश्चित होते.
९. संविधानाने 22 भाषांना भारताच्या अधिकृत भाषा म्हणून मान्यता दिली असून, हिंदी आणि इंग्रजी या संघाच्या अधिकृत भाषा आहेत.
10. देशाच्या बदलत्या गरजा प्रतिबिंबित करण्यासाठी संविधानात अनेक वेळा दुरुस्ती करण्यात आली आहे. सर्वात अलीकडील दुरुस्ती 2020 मध्ये करण्यात आली, ज्याने जम्मू आणि काश्मीरच्या केंद्रशासित प्रदेशाची पुनर्रचना केली.

FAQ

Q. भारतीय राज्यघटनेत किती कलमे आहेत?

A. ३९५ कलमे आणि ८ अनुसूची

Q. संविधानाच्या कलम 1 मध्ये भारताबद्दल काय म्हटले आहे?

A. कलम १(१) नुसार भारत हा राज्यांचा संघ असेल असे म्हटले आहे.

Q. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदात ‘प्रेस स्वातंत्र्य’ दिले गेले आहे?

A. कलम १९ (i)

Q. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार भारताच्या राष्ट्रपतींवर महाभियोग चालविला जाऊ शकतो?

A. कलम ६१

NEET Exam Information in Marathi

Refference Books for Competitive Exam

भारताचे पंतप्रधान, Prime Minister Information in Marathi

 

मी मागील 8 वर्ष MPSC आणि इतर स्पर्धा परीक्षेसंबंधी पुण्यामध्ये Classes घेत आहे, त्यामुळे या स्पर्धा कशा प्रकारे होतात, कोणते प्रश्न विचारले जातात आणि कोणत्या टॉपिक वर प्रश्न विचारले जातात या संबंधी ची पूर्ण माहिती मला असून मी माझा अनुभव या वेबसाइट द्वारे तुम्हा सर्वांपर्यंत पोचवायचा प्रयन्त करत आहे.

3 thoughts on “भारतीय राज्यघटनेतील महत्त्वाची कलमे | Important Constitutional Articles in Marathi”

  1. भारतात कुठेही कोणीही व्यवसाय सुरू करणे . कायदा कोणता आहे ?आणि कसा आहे याची माहिती ….please Sir

    Reply
    • भारतीय राज्यघटनेतील कलम क्रमांक 19 व्यवसाय स्वातंत्र्य भारतीय नागरिकाला बहाल करते. या अंतर्गत आपण व्यवसाय भारताच्या भागांमध्ये कोठेही करू शकतो. आपल्या अमूल्य प्रतिसादाबद्दल आभारी आहोत. वरील माहितीची लिंक शेअर करून सहकार्य करा.

      Reply

Leave a Comment