Maharashtratil Leni information in Marathi | महाराष्ट्रातील लेणी
Maharashtratil Leni information in Marathi: प्राचीन काळामध्ये खडकावर केलेल्या कोरीव कामाला लेणी असे म्हणतात. महाराष्ट्रातील तीन लेण्या आहेत त्यांचा उल्लेख किंवा नोंद आपल्याला जागतिक वारसा स्थळांमध्ये पाहायला मिळतो. जगामध्ये 1154 जागतिक वारसा स्थळे आहेत भारतामध्ये 40 तर महाराष्ट्रात पाच आहेत. त्यातील दोन शिल्पे आहेत. जागतिक वारसा स्थळांमधील लेणी म्हणजेच वेरूळ लेणी, अजिंठा लेणी आणि एलिफंटा लेणी.
लेणी | ठिकाण | जिल्हा |
पितळखोरा | औरंगाबाद | औरंगाबाद |
अजिंठा | अजिंठा | औरंगाबाद |
वेरूळ | वेरूळ | औरंगाबाद |
घारापुरी | घारापुरी | रायगड |
पांडव लेण्या | नाशिक | नाशिक |
कान्हेरी जोगेश्वरी | मुंबई उपनगर | मुंबई उपनगर |
अंबरनाथ | अंबरनाथ | ठाणे |
कारला | कारला | पुणे |
भाजे | भाजे | पुणे |
बेडसे | बेडसे | पुणे |
पुणे | पुणे | पुणे |
धाराशिव | धाराशिव | उस्मानाबाद |
जैन लेणी | जिंतूर | परभणी |
खरोसा | औसा | लातूर |
1. Maharashtratil Leni – Ajanta leni (अजिंठा लेणी)
- अजिंठा लेणी ही औरंगाबाद जिल्ह्यामध्ये सह्याद्री पर्वत रांगेमध्ये वाघुर या नदीकाठी या लेण्या आहेत.
- या लेणीची स्थापना इसवी सन पूर्व दुसऱ्या शतकापासून ते इसवी सन सातव्या शतकापर्यंत पाहायला मिळते.
- अजिंठा लेण्याचे स्थानिक नाव फरदापुर लेणी असे आहे. अजिंठा लेण्यांमध्ये 30 लेण्यांचा समावेश होतो.
- अजिंठा लेण्या चा 1983 मध्ये जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश करण्यात आला.
2. Maharashtratil Leni – Verual Leni (वेरूळ लेणी)
- वेरूळ लेणी या खुलताबाद औरंगाबाद येथे पाहायला मिळतात.
- 34 लेण्या आपल्याला वेरूळ लेणी समूहामध्ये पाहायला मिळतात.
- त्यातील 17 हिंदू ,12 बौद्ध आणि 5 जैन लेण्या वेरूळ लेण्यांमध्ये पाहायला मिळतात.
- या लेण्यांमध्ये सोळावी लेणी आहे तिचे नाव कैलास लेणी आहे.
- या लेणीचे वैशिष्ट्य म्हणजे त्याच्यामध्ये कोरले गेलेले शिवमंदिर आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य असे आहे की आधी कळस नंतर पाया.
- या मंदिराची निर्मिती राष्ट्रकूट राजा कृष्णराज यांनी या मंदिराची स्थापना केली. या मंदिराचे काम होण्यासाठी अडीचशे वर्षे लागली आहेत.
3. घारापुरी लेणी Gharapuri Leni (एलिफंटा लेणी)
- ही लेणी मुंबई जवळ घारापुरी बेटावर आहेत त्यामुळे आपण यांना घारापुरी लेण्या असे म्हणतो.
- या बेटावर हत्तीचे शिल्प आहे म्हणून या लेण्याचे नामकरण हे एलिफंटा लेणी असे करण्यात आले.
- घारापुरी लेणी याची स्थापना सातव्या शतकामध्ये आहे.
- यामध्ये सात लेण्या आहेत यापैकी पाच शैव समाजाच्या आणि दोन या बौद्ध लेण्या पाहायला मिळतात.
- या लेण्या 1987 मध्ये जागतिक वारसा स्थळांमध्ये करण्यात आलेले आहे.
4. पितळखोरी लेणी – Pitalkhori Leni
- ही लेणी औरंगाबाद जिल्ह्यामध्ये कन्नड तालुक्यामध्ये आहे.
- पितळखोरी लेणी ही भारतातील सर्वात जुनी लेणी म्हणून ओळखली जाते.
- या लेणीची स्थापना इसवी सन पूर्व तिसऱ्या शतकामध्ये पाहायला मिळते
- या लेणीमध्ये पाली भाषेतील शिल्प आपल्याला पाहायला मिळतात.
5. भाजे लेणी – Bhaje Leni
- विसापूर किल्ल्याजवळ पुणे मध्ये या लेण्या आहेत.
- यामध्ये बावीस लेणे आहेत मध्यभागी एक चैत्यगृह व उर्वरित 20 विहार आहेत.
- खडकावर कोरीव काम करून युगुले व या क्षणी कोरले आहेत.
6. कान्हेरी लेणी – Kanheri Leni
- संजय गांधी नॅशनल पार्क बोरवली मुंबई येथे या लेण्या आहेत.
- या बौद्ध लेण्या आहेत.
- बौद्ध भिक्षूंसाठी विहार सभागृह अशा वास्तू तिथे केलेल्या होत्या.
- या 21 व्या लेणीत मागाठाने या लेणीचा उल्लेख आहे.
7. पांडवलेणी किंवा त्रिरश्मी लेण्या
- या लेण्या नाशिक जिल्ह्यामध्ये आहेत.
- या लेण्या बौद्ध लोक लेण्यांसाठी प्रसिद्ध आहे.
- सातवाहन व क्षेत्र या राजवंशांच्या काळात या खोदल्या गेलेल्या आहेत.
- या लेण्यांना भारत सरकारने महाराष्ट्रातील संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे.
8. धाराशिव लेणी – Dharashiv Leni
- या लेण्या आपल्याला उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये धाराशिव गावाजवळ पाहायला मिळतात. बालाघाट डोंगर रांगेत आहेत.
- त्यांना चांभार लेणी असेही म्हटले जाते. येथे जैन हिंदू बौद्ध अशा अकरा लेण्या आढळतात
9. कार्ला लेणी – Karla Leni
- या लेण्या आपल्याला पुणे जिल्ह्यात लोणावळा जवळ घाटात आहेत.
- कारला लेणी सोळा बौद्ध लेण्यांचा समूह असून त्यातील एक चैत्यगृह व इतर विहार आहेत.
- या लेण्यांना भारत सरकारने महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे.
10. बेडसे लेणी – Bedse Leni
- या लेणी आपल्याला महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील कामशेत जवळ बेडसे येते आहेत.
- येथील स्तंभ हे मौर्य शैलीतील आहेत.
- भारत सरकारने या लेण्यांना महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे
11. खरोसा लेणी – Kharosa Leni
- लातूर जिल्ह्यातील औसा तालुका मधील खरोसा या गावांमध्ये या लेण्या आहेत.
- येथे बारा लिहिणे आहेत.ज्या जांभ्या प्रकारच्या दगडात कोरले आहेत.
- येथे बौद्ध मूर्ती आहे व एक शिवलिंग आहे.
लेण्या व जिल्हे –
– मागाठाणे, लोणाड या लेण्या मुंबईमध्ये आहेत.
– सोपारा व लोणंद या लेण्या ठाने जिल्हामध्ये आहेत.
– एलिफंटा, चौल व गांधार पाणी या लेण्या आपल्याला रायगड जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतात
– खेड लेणी व पन्हाळकाजी लेणी या आपल्याला रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतात
– वाडा व कुणकेश्वर या दोन लेणी आपल्याला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतात.
– कुंभोज व खिद्रापूर लेणी आपल्याला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतात.
– हरिपूर लेणी आपल्याला सांगली जिल्ह्यामध्ये पाहायला मिळते.
– पंडूदरा, कल्याणगड व वाई धावडी हे आपल्याला सातारा जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतात.
– कार्ले, भाजे, लेण्याद्री व पाताळेश्वर लेणी या आपल्याला पुणे जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतात.
– म्हाडा व दहिगाव लेणे आपल्याला सोलापूर जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतात.
– हरिश्चंद्रगड, भातोळी, टाकळी, पळशी या लेण्या आपल्याला अहमदनगर जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतात.
– पांडवलेणी ,चांभार लेणी, मांगीतुंगी, चांदवड,अंकाई टंकाई या लेणी आपल्याला नाशिक जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतात.
– अजिंठा, वेरूळ, घटोत्कच, पितर खोरे लेणी या आपल्याला औरंगाबाद जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतात.
– पारगाव लेणी शिवलेली या आपल्याला बीड जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतात.
-भोकरदर लेणी आपल्याला जालना जिल्ह्यामध्ये पाहायला मिळते.
– धाराशिव लेणी व तेर लेणे आपल्याला उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतात.
– निलंगा,खारोसा लेने आपल्याला लातूर जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतात.
-बामणी या नावाची लेणी आपल्याला परभणी जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतात.
– माहूर, शिवूर, कंधार या लेण्या आपल्याला नांदेड जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतात.
– लोणार व सिंदखेडराजा लेणी आपल्याला बुलढाणा जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतात.
– दारव्हा ते यवतमाळ जिल्ह्यामध्ये पाहायला मिळते.
-मार्कंडा लेणी आपल्याला गडचिरोली मध्ये पाहायला मिळते.
– भांडण व भद्रावती लेणी आपल्याला चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतात.
– पौनी व अड्याळ नावाची लेणी आपल्याला भंडारा जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतात.
– मनसर, अंभोर नावाची लेणी आपल्याला नागपूर जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतात.
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०
लेणी म्हणजे काय ?
प्राचीन काळामध्ये खडकावर केलेल्या कोरीव कामाला लेणी असे म्हणतात.
घारापुरी लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे ?
घारापुरी लेणी रायगड जिल्ह्यात आहे.
एलिफंटा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे ?
एलिफंटा लेणी रायगड जिल्ह्यात आहे. घारापुरी लेण्या एलिफंटा लेणी म्हणून ओळखल्या जातात.
पुल्लर लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे ?
पुल्लर लेणी नागपूर जिल्ह्यात आहेत.
Elephanta Leni kontya jilhyat ahe?
Elephanta leni Raygad jilhyat ahe.
ajintha leni kontya jilhyat ahe ?
ajintha leni aurangabad jilhyat ahe.
ajintha leni cha shodh koni lavala?
अजिंठा लेण्या चा शोध ब्रिटिश अधिकारी जॉन स्मिथ याने लावला.