Maharashtratil Parvat | महाराष्ट्रातील पर्वत रांगा | Maharashtratil parvat ranga

महाराष्ट्रातील पर्वत रांगा | Maharashtratil Parvat | maharashtra parvat ranga

Maharashtratil Parvat,
Maharashtratil Parvat

आजच्या लेख मध्ये आपण “महाराष्ट्रातील पर्वत रांगा (Maharashtratil Parvat )” या विषयावर चर्चा करणार आहोत. 

महाराष्ट्रामध्ये शंभू महादेव, सह्याद्री, सातपुडा, नांदेड डोंगर, हरिहरेश्वर, हिंगोली डोंगर, गरमसूर टेकड्या असे अनेक छोटे मोठे पर्वत आढळतात. 

महाराष्ट्रातील पर्वतांची नावे

सह्याद्री पर्वत रांगा बद्दल माहिती | Maharashtratil Parvat Sahyadri

भारताच्या पश्चिम किनार पट्टीस सह्याद्री हा समांतर पर्वत आहे. तर उत्तरेला सातमाळा डोंगरापासून दक्षिणेस कन्या-कुमारी पर्यंत सहयाद्री पर्वत रांगा पसरलेली आहे.

सह्याद्री पर्वताची लांबी सुमारे 1,600 किलो मीटर आहे. या पैकी महाराष्ट्रा मध्ये  720 किलो मीटर लांबीचा सह्याद्री पर्वत आहे. याला ‘पश्चिम घाट (Western Ghats)’ या नावाने ही ओळखले जाते. याची सरासरी उंची 915 ते 1,220 मी. आहे. महाराष्ट्रामध्ये सह्याद्रीची उंची उत्तरेकडे वाढत जाते, तर दक्षिणेकडे कमी होत जाते.

सह्याद्री पर्वतामध्ये उगम पावलेल्या नद्या (Rivers originating in the Sahyadri Hills in Marathi)

महाराष्ट्रा मधील नाशिक या जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर जवळ “गोदावरी” या नदीचा उगम झालेला आहे. गोदावरी नदीच्या उगमाच्या दक्षिणेस सुमारे 100 किलो मीटर अंतरावर भीमा शंकर येथे ‘भीमा नदी’ उगम पावते. भीमा नदी च्या दक्षिणे वर महाबळेश्वर येथे कृष्णा नदीचा उगम सुरु होतो, तर ‘कोयना नदी’ ही तेथूनच उगम पावते. 

Rivers in Maharashtra महाराष्ट्रातील नद्या, प्रमुख 3 नद्यांसह

शंभू महादेव डोंगर रांगा (Maharashtratil Parvat)

रायरेश्वर पासून ते शिंगणापूर पर्यंत पसरलेल्या पर्वत रांगेला ‘शंभू महादेव डोंगर रांग (Shambhu Mahadev Mountain Range)’ असे म्हणतात. भीमा व कृष्णा या नद्यांची खोरी वेग- वेगळी झालेली आहेत.

महाराष्ट्रामध्ये पठारावरील दक्षिणेकडील सर्वांत शंभू महादेव डोंगर रांग आहे. भीमा नदीच्या खोऱ्याच्या दक्षिणेस शंभू महादेव डोंगर आहे. या डोंगररांगा सातारा व सांगली जिल्ह्यामधून पुढे कर्नाटक पर्यंत जातात.

Best Forts in Maharashtra | महाराष्ट्रातील किल्ल्यांची माहिती

हरिश्चंद्रबालाघाट डोंगर रांगा (Harishchandra-Balaghat Mountain Range in Marathi)

गोदावरी नदीच्या दक्षिणेस हरिश्चंद्र-बाला घाट डोंगर रांगा वसलेल्या आहेत. तिच्या मुळे गोदावरी भीमा यांची खोरी वेगळी होतात.

डोंगर रांगांच्या पश्चिम भागास ‘हरिश्चंद्र घाट (Harishchandra Ghat)’ व पूर्व भागास ‘बाला घाट (Bala Ghat)’ या नावाने ही ओळख जाते. बाला घाट हा सपाट माथ्याचा प्रदेश आहे.

महाराष्ट्रातील डोंगर व त्यांचे जिल्हे (Location of hills and their districts in Maharashtra in Marathi)

 • अस्थंभा डोंगर हा नंदुरबार या जिल्ह्यामध्ये वसलेला आहे.
 • गाळणा हा डोंगर धुळे या जिल्ह्यामध्ये वसलेला आहे.
 • दरकेसा हा डोंगर गोंदिया या जिल्ह्यामध्ये वसलेला आहे.
 • चिरोली हा डोंगर गडचिरोली या जिल्ह्या मध्ये वसलेला आहे.
 • हिंगोली हा डोंगर हिंगोली या जिल्ह्यामध्ये वसलेला आहे.
 • मुदखेड हा डोंगर नांदेड या जिल्ह्यामध्ये वसलेला आहे.
 • गरामसूर हा डोंगर नागपूर या जिल्ह्यामध्ये वसलेला आहे.
 • भामरागड हा डोंगर गडचिरोली या जिल्ह्यामध्ये वसलेला आहे.
 • सुरजागड हा डोंगर गडचिरोली या जिल्ह्यामध्ये वसलेला आहे.
 • अजिंठा हा डोंगर औरंगाबाद या जिल्ह्यामध्ये वसलेला आहे.
 • वेरूळ हा डोंगर औरंगाबाद या जिल्ह्यामध्ये वसलेला आहे.

Maharashtratil Parvat | महाराष्ट्रातील पर्वत शिखरे (Mountain Peaks in Maharashtra in Marathi)

 • कळसूबाई या शिखराची उंची 1646 मीटर असून अहमदनगर या जिल्ह्यामध्ये आहे. 
 • साल्हेर या शिखराची उंची 1567 मीटर  असून नाशिक या जिल्ह्यामध्ये आहे. 
 • महाबळेश्वर या शिखराची उंची 1438 मीटर असून  सातारा या जिल्ह्यामध्ये आहे. 
 • हरिश्चंद्रगड या शिखराची उंची 1424 मीटर असून नगर या जिल्ह्यामध्ये आहे. 
 • सप्तशृंगी या शिखराची उंची 1416 मीटर असून नाशिक या जिल्ह्यामध्ये आहे. 
 • तोरणा या शिखराची उंची 1404 मीटर पुणे असून या जिल्ह्यामध्ये आहे. 
 • राजगड या शिखराची उंची 1376 मीटर पुणे असून या जिल्ह्यामध्ये आहे. 
 • रायेश्वर या शिखराची उंची 1337 मीटर पुणे असून या जिल्ह्यामध्ये आहे. 
 • शिंगी या शिखराची उंची 1293 मीटर रायगड असून या जिल्ह्यामध्ये आहे. 
 • नाणेघाट  या शिखराची उंची 1264 मीटर पुणे असून या जिल्ह्यामध्ये आहे. 
 • त्र्यंबकेश्वर या शिखराची उंची 1304 मीटर नाशिक असून या जिल्ह्यामध्ये आहे. 
 • बैराट या शिखराची उंची 1177 मीटर अमरावती असून या जिल्ह्यामध्ये आहे.
 • चिखलदरा या शिखराची उंची 1115 मीटर अमरावती असून या जिल्ह्यामध्ये आहे.

महाराष्ट्रातील डोंगर रांगा / टेकड्या / पर्वत रांगा ची माहिती (Mountain Ranges / Hills / Mountain Ranges in Maharashtra in Marathi)

1        मबई आणि  मुंबई उपनगर- अंटोप हिल, पाली, शिवडी,खंबाला, मलबार हिल.

2        रायगड:- सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सह्यान्द्री पर्वत

3        धुळे:- धानोरा सनी गाळण्या चे डोंगर.

4        नाशिक:- सह्यान्द्री, साल्हेर, गाळणा, मुल्हेर, वणी, सातमाळा डोंगर, चांदवड

5        पुणे:- सह्यान्द्री पर्वत, तसुबाई, हरिश्चंद्र, शिंगी, पुरंदर, अंबाला टेकड्या, ताम्हिनी. 

6        सांगली:- कामलभैरव, आष्टा, होणाई टेकड्या ,शुकाचार्य, दंडोबा, बेलगबाद, आडवा, मुचींडी.

7        सोलापूर:- बालाघाट डोंगर, महादेव पर्वत, शुकाचार्य. 

8        जालना:- अजिंठ्याची रांग व जाबुवंत टेकड्या. 

9        हिंगोली :- अजिंठ्याची रांगा आणि हिंगोलीचे पठार.

10      लातूर:- बालाघाटचे डोंगर रांगा 

11      बीड   बालाघाटचे डोंगर रांगा 

12      अकोला:- सातपुडा पर्वत आणि गाविलगड टेकड्या. 

13      अमरावती:- गाविलगडच्या रांगा, सातपुडा पर्वत, पोहरा आणि चिकोडी चे डोंगर

14      वर्धा:- गरमासुर, रावनदेव, मालेगाव, ब्राह्मणगाव, नांदगाव टेकड्या.

15      भंडारा:- अंबागडचे डोंगर, भिमसेन टेकड्या व गायखुरी. 

16      चंद्रपूर:- परजागड, चांदूरगडचे, चिमूर आणि मुल टेकड्या.

17      जळगाव:- अजिंठा, सातपुडा, सातमाळा, हस्तीचे डोंगर, शिरसोली.

18      नंदुरबार:- साततपुडा आणि तोरणमाळ चे डोंगर.

19      अहमदनगर:- सह्यान्द्री, हरिश्चंद्र डोंगर, कळसुबाई, अदुला आणि  बाळेश्वर. 

20      सातारा:- सह्यान्द्री, औध, परळी, बनमौली, मेंढोशी, महादेव,  यावतेश्वेर, आगाशिव. 

21      कोल्हापूर:- पन्हाळा, सह्यान्द्री, उत्त्तर आणि दक्षिण, दुध गंगा, चिकोडी रांग.

22      औरंगाबाद:- अजिंठा, सुरपलायान आणि सातमाळा. 

23      परभणी:- उत्तरेस अजिंठ्या चे डोंगर आणि दक्षिणेस बाला घाट रांग आहे. 

24      नांदेड:- सात माळा, निर्मल,मुद खेड आणि बाला घाटचे डोंगर,

25      उस्मानाबाद:- बाला घाट, तुळजापूर आणि नळदुर्ग डोंगर

26      यवतमाळ:- अजिंठ्याचे डोंगर आणि पुसदच्या टेकड्या.

27      बुलढाणा:- अजिंठा डोंगर आणि सात पुडा पर्वत रांगा. 

28      नागपूर:- सतपुड्याचे डोंगर, गरमसूर, पिल्कापर टेकड्या, महादागड. 

29      गोंदिया:- नवेगाव, चिंचगड, प्रताप गड, व दरकेसाचे डोंगर.

30      गडचिरोली:- चीरोळी, टिपागड, सिर्कोडा, सुरजा गड,भामरा गड, चिकियाला डोंगर.

महाराष्ट्रातील धरणे (Dams In Maharashtra)

मी मागील 8 वर्ष MPSC आणि इतर स्पर्धा परीक्षेसंबंधी पुण्यामध्ये Classes घेत आहे, त्यामुळे या स्पर्धा कशा प्रकारे होतात, कोणते प्रश्न विचारले जातात आणि कोणत्या टॉपिक वर प्रश्न विचारले जातात या संबंधी ची पूर्ण माहिती मला असून मी माझा अनुभव या वेबसाइट द्वारे तुम्हा सर्वांपर्यंत पोचवायचा प्रयन्त करत आहे.

Leave a Comment