ऑक्टोबर २०२० महिन्याच्या चालू घडामोडी chalu ghadamodi / current affairs
भारतातील जैवविविधता संवर्धनाच्या दृष्टीने ‘नॅशनल बोर्ड ऑफ वाईल्ड लाईफ’ तर्फे 2 ऑक्टोंबर ते 8 ऑक्टोंबर हा आठवडा भारतीय वन्यजीव सप्ताह 2020 म्हणून साजरा करण्यात आला.
2020 वर्षाचे वन्यजीव सप्ताहाचे संकल्प सूत्र
Sustaining all life on earth
(पृथ्वीवरील सर्व सजीव टिकविणे)
400 किलोमीटर वरील लक्षाचा वेध घेणाऱ्या सुपरसॉनिक ब्राह्मोस क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी ठरली. ब्राम्होस हे भारत व रशियाने एकत्रितपणे विकसित केलेले क्षेपणास्त्र आहे.
मुलांसाठी प्रसिद्ध ‘ चांदोबा’ मासिकातील चित्रांचे चित्रकार के.सी. शिवशंकर यांचे निधन. ते 97 वर्षाचे होते. मूळचे तेलुगु मासिक असलेल्या ‘चंदामामा’ चे प्रचंड लोकप्रियतेमुळे 13 भारतीय भाषांमध्ये प्रकाशित होऊ लागले.
अमेरिकन कवयित्री लुईस ग्लक यांना साहित्यातला नोबेल पुरस्कार – 2020 जाहीर झाला. लुईस ग्लक यांच्या काव्यात्मक आवाजातून निर्माण होणारे वैयक्तिक अस्तित्वाचे सार्वभौमत्व निर्माण होते असे नोबेल समितीने म्हटले आहे.
डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन ने DRDO हवाई दलासाठी विकसित केलेल्या संपूर्ण स्वदेशी बनावटीच्या रुद्रम-१ या रेडिओ लहरी वेधी क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वीरित्या पार पडली. कोणत्याही प्रकारचे लहरी किंवा संकेत पकडण्यासाठी हे क्षेपणास्त्र तत्पर आहे.
संयुक्त राष्ट्राच्या जागतिक अन्न अभियानास (WFP) 2020 चा शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला.
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या पुष्पा भावे यांचे निधन. महाराष्ट्राच्या सामाजिक आणि वाड.मयीन क्षेत्रात त्यांनी भरीव योगदान दिले.
हिमाचल प्रदेश, रोहतांग मध्ये जगातील सर्वाधिक लांबीच्या अटल बोगद्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. लडाख या नवनिर्मित केंद्रशासित प्रदेशाची राजधानी लेह ते मनाली या मार्गावर हा बोगदा आहे.
अटल बोगद्याची वैशिष्ट्ये-
- 1) अति उंचावरील सर्वाधिक लांबीचा बोगदा,
- 2) समुद्रसपाटीपासून दहा हजार फूट (3 हजार मीटर) उंचीवरील बोगदा.
- 3) जगातील सर्वात लांब बोगदा लांबी – 9.02 km.
- 4) मनाली ते लाहौल – स्पिती या भागांना जोडतो.
- 5) सर्व हवामानात या बोगद्यातून वाहतूक सुरू राहणार.
- 6) हिमालयाच्या पीर पंजाल पर्वतरांगेत हा बोगदा आहे.
- 7) घोड्याच्या नालेसारखा यातील मार्गीकांचा आकार आहे.
‘ हेपॅटायटिस – सी ‘ या विषाणूच्या शोधाबद्दल अमेरिकन शास्त्रज्ञ हार्वे जे ऑल्टर, चार्ल्स एम. राईस आणि ब्रिटिश शास्त्रज्ञ मायकेल हॉटन यांना संयुक्तपणे वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार 2020 जाहीर झाला. यांच्या संशोधनामुळे रक्तातील ‘ हेपॅटायटीस – सी ‘ या रोगाचे मुख्य कारण स्पष्ट होण्यास मदत झाली.
कृष्ण विवरांची निर्मिती व शोध यांसाठी 2020 चा भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला. जर्मनीचे रेनहार्ड गेन्झेल,अमेरिकेच्या आंद्रेआ गेझ आणि ब्रिटनचे रॉजर पेनरोज यांना हा प्रश्न प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाला.
भारतीय वंशाचे शिक्षण तज्ञ श्रीकांत दातार यांची हार्वर्ड बिझनेस स्कूलच्या अधिष्ठाता पदी निवड झाली आहे.
दातार हे संस्थेचे ११ वे अधिष्ठाता आहेत.
हार्वर्ड बिझनेस स्कूलच्या ११२ वर्षांच्या इतिहासात लागोपाठ दुसऱ्यांदा भारतीय वंशाच्या व्यक्तीची निवड झाली आहे.
ते नितीन नोहरिया यांचे उत्तराधिकारी आहेत.
दातार हे मुंबई विद्यापीठ आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेन्ट अहमदाबाद चे माजी विद्यार्थी असून सध्या ते उद्योग व्यवस्थापन विषयात अर्थर लोविस डिकन्स चे प्राध्यापक आहेत. हॉर्वर्ड बिझनेस स्कूलचे वरिष्ठ सहाय्यक अधिष्ठाता आहेत. दातार एक जानेवारीपासून अधिष्ठाता पदाचा कार्यभार स्वीकारतील असे अध्यक्ष लॅरी बॅकाव यांनी सांगितले.
सेरेब्रल पाल्सी आजाराने ग्रस्त असलेल्या १३ वर्षीय कणाद पिंपळनेरकर याने हिमालयात 13000 फुटापर्यंत गिर्यारोहण केले. आशिया बुक्स ऑफ रेकॉर्ड मध्ये याची नोंद झाली.
सेरेब्रल पाल्सी – एक न्युरोलॉजिकल समस्या आहे. यामुळे मुलांमधील विकसनशील मेंदूला दुखापत होते. सेरेब्रल पाल्सी मुळे चालू व स्नायू समन्वयासाठी अडथळे निर्माण होतात. मेंदू निर्माण होण्याच्या टप्प्यात झालेल्या दुखापतीमुळे सेरेब्रल पाल्सी आजार होतो.
जनुकीय संपादनासाठी वापरण्यात येणाऱ्या रेणवीय कात्र्यांच्या संशोधनाला 2020मध्ये म्हणजे यावर्षी रसायनशास्त्राचे नोबेल पारितोषिक जाहीर झाले. या शोधामुळे अनेक अनुवंशिक आजार व कर्करोगही बरा करता येऊ शकतो. रसायन शास्त्र नोबेल पुरस्काराचे मानकरी – इमॅन्युएल शापेंटी (फ्रान्स) व जेनिफर ए. डाउडना (अमेरिका) या दोन महिलांना हा पुरस्कार जाहीर झाला.
केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांचे निधन झाले. २००२ मध्ये रामविलास पासवान यांनी लोकजनशक्ती पक्षाची स्थापना केली होती.
ज्येष्ठ अभिनेते अविनाश खर्शीकर यांचे वयाच्या ६८ व्या वर्षी निधन.
विश्व मराठी परिषद फरक हे पहिले विश्व मराठी ऑनलाईन संमेलन २८ ते ३१ जानेवारी २०२१ रोजी होणार आहे. ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉक्टर अनिल काकोडकर महा संमेलनाध्यक्ष असतील. पंचवीस देशातील महाराष्ट्र मंडळांच्या सहकार्याने हे संमेलन आयोजित केले जाणार आहे.
फ्रेंच खुली टेनिस स्पर्धा २०२० महिला गटात पोलंडच्या इगा श्वीऑनटेक हिने बाजी मारली. श्वीऑनटेक हीचे हे पहिलेवहिले ग्रँडस्लॅम आहे. तिने सोफिया केनिन हिचा पराभव केला. सोफिया केनिन ही ऑस्ट्रेलिया ओपन टेनिस स्पर्धा २०२० जिंकणारी अमेरिकन खेळाडू आहे.
केंद्रीय जलशक्ति मंत्री गजेंद्र सिंह यांच्या कडून स्वच्छ भारत पुरस्कार 2020 जाहीर.
एकूण तीन श्रेणीमध्ये हा पुरस्कार दिला जातो.
- स्वच्छ सुंदर सामुदायिक सौचालय – गुजरात
- सामुदायिक स्वच्छालय अभियान – उत्तर प्रदेश व गुजरात
- गंदगी से मुक्त – तेलंगाना व हरियाणा