Banks Information In Marathi | भारतीय बँक, बँकांचा इतिहास

Banks Information In Marathi | भारतीय बँक, बँकांचा इतिहास

भारतीय बँक(Indian Banks) व्यवसाय याविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत.  अर्थशास्त्र हा विषय मुख्यतः अर्थ या घटकाभोवती केंद्रित झालेला दिसतो. मात्र या विषयाची दुसरी बाजू अशी सांगता येईल की, विकास साधणे हा महत्त्वाचा असतो आणि विकास साधण्याच्या प्रक्रियेत अर्थ महत्त्वाचे असते. अर्थव्यवहार ज्या ठिकाणी केले जातात अशा ठिकाणाला आपण बँक असे म्हणतो.                

मात्र फक्त बँकेतच अर्थ व्यवहार होतात असे नाही. भारतीय बँक(Indian Banks) व्यवसाय संदर्भात या ठिकाणी दोन प्रकारे वर्गीकरण केलेले दिसते. तर त्यामध्ये पहिला वर्गीकरण भारतीय नाणे बाजार आणि दुसरं वर्गीकरण भारतीय भांडवली बाजार अशा पद्धतीचे दिसून येते. भारतीय भांडवली बाजाराचा अभ्यासाचा संबंध एकंदर विकास प्रक्रियेशी आहे. 

एखाद्या देशाची अर्थव्यवस्था विकसित आहे असे जेव्हा आपण म्हणत असतो. तेव्हा त्या अर्थव्यवस्थेतील वित्तीय व्यवस्था विकसित असते. हे खऱ्या अर्थाने याठिकाणी लक्षात घेणे गरजेचे आहे. वित्त म्हणजे कर्जाने देऊ केलेला किंवा घेतला जाणारा पैसा होय. मानवाच्या विविध गरजा भागवण्यासाठी त्याला वित्ताची किंवा पैशाची आवश्यकता असते. मात्र प्रत्येक वेळी या वित्ताची उपलब्धता होते असे नाही. अशा व्यवस्थेत त्याला पैशाची व्यवस्था बँक यासारख्या माध्यमातून करता येते.     Banks Information In Marathi          

मानवी गरजा भागवण्याच्या दृष्टिकोनातून अशा वित्ताची गरज भागवली जाते. त्यास वित्तीय व्यवस्था म्हणता येऊ शकते. वित्त बाजार म्हणजे पैशाचे व्यवहार जिथे होतात तो बाजार होय. या बाजारामध्ये कालावधी विचारात घेतला जातो.

Banks Information In Marathi

1) भारतीय नाणे बाजार (Indian Money Market): या बाजारात अल्पकालीन म्हणजे तेरा महिन्यापेक्षा कमी मुदतीचे व सर्व बँक व्यवहार हे भारतीय नाणे बाजार या अंतर्गत येतात. भारतीय नाणे बाजारात संघटित क्षेत्राचा तसेच असंघटित क्षेत्राचा देखील समावेश होतो. संघटित क्षेत्रामध्ये सावकार, सराफी पेढीवाले, बँकेतर वित्तीय संस्था यांचा समावेश होतो. तर संघटित क्षेत्रामध्ये  व्यापारी बँकांचा समावेश होतो.  उदा. सार्वजनिक क्षेत्रातील बँका, खाजगी क्षेत्रातील बँका, सहकारी क्षेत्रातील बँका, परकीय बँका इत्यादी. यामध्ये सर्व साधारण व्यवहार तेरा महिन्यापर्यंत या कालावधीसाठी होतात. मात्र कृषीसाठी हा कालावधी 15 ते 18 महिन्यापर्यंत असू शकतो.

2) भारतीय भांडवली बाजार (Indian Capital Market): या बाजारात दीर्घकालीन निधीची देवाण-घेवाण होत असते. म्हणून वित्तीय व्यवस्थेच्या अशा बाजाराला भांडवली बाजार असे म्हणतात. एका वर्षापेक्षा अधिक कालावधीचे व्यवहार भांडवल बाजारात केले जातात.

साधारणतः पाच वर्षापर्यंतच्या कालावधीला मध्यम कालीन व्यवहार आणि वीस ते पंचवीस वर्षापर्यंतच्या कालावधीला दीर्घकालीन व्यवहार मानले जाते. भारतीय भांडवल बाजार मध्ये पुढील संस्थांचा समावेश होतो. व्यापारी बँक, मर्चंट बँक, पतदर्जा ठरवणाऱ्या संस्था, विमा कंपन्या.

भारतीय बँका (Indian Banks) – Banks Information In Marathi

बँक म्हणजे काय?

“बँक म्हणजे पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी उभारलेली संस्था जी मागणी केल्यावर ग्राहकाला पैसे परत देते.”
बँकिंग नियमन कायदा 1949 च्या कलम 5 (1)( बी) नुसार – बँक म्हणजे मागणी करताक्षणी परत करण्याच्या अटीवर स्वीकारलेल्या ठेवीतून ग्राहकांना धनादेश, ड्राफ्ट, ऑर्डर व अन्य मार्गांनी पैसे काढण्याची परवानगी देणे व ठेवींचा पैसा कर्जाने देण्यासाठी किंवा गुंतवणूक करण्यासाठी वापरणे होय.

भारतीय बँकांचे वर्गीकरण पुढील दोन प्रकारात केले जाते 

1) संघटित बँका
2) असंघटित बँका

1) संघटित बँका: संघटित बँकिंग क्षेत्र हे एक प्रकाराचे व्यवस्थित असलेले बँकिंग नेटवर्क आहे. असं म्हणता येईल. यासाठी आर.बी.आय. R.B.I. भारतातील सर्वोच्च बँक आहे. याच्या नियंत्रणाखाली या सर्व बँका कार्यरत असतात. यामध्ये सार्वजनिक बँका पासून ते सहकारी क्षेत्रातील, खाजगी क्षेत्रातील सर्व बँकांचा समावेश होतो. परकीय बँकांना सुद्धा संघटित बँकिंग क्षेत्रांमध्ये गणले जाते.

2) असंघटित बँका: असंघटित बँक या क्षेत्रांमध्ये खाजगी सावकार, सराफी पेढीवाले यासारख्या लोकांचा समावेश होतो.

भारतीय बँक(Indian Banks) व्यवसायाची ऐतिहासिक पार्श्वभूमी –    Banks Information In Marathi      

1770 मध्ये भारतात ‘बँक ऑफ हिंदुस्तान’ ही पहिली बँक स्थापन झाली. ही बँक अलेक्झांडर अँड कंपनीने कलकत्त्याला स्थापन केलेली होती. मात्र ही बँक 1832 मध्ये बंद पडली.

1806 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीने ‘बँक ऑफ कलकत्ता’ ही पहिली प्रेसिडेन्सी बँक स्थापन केली. 1840 मध्ये दुसरी प्रेसिडेन्सी ‘बँक ऑफ बॉम्बे’ या नावाने स्थापन करण्यात आली. आणि 1843 मध्ये ‘बँक ऑफ मद्रास’ ही तिसरी प्रेसिडेन्सी बँक स्थापन करण्यात आली. 1865 मध्ये अलाहाबाद बँक, अलायन्स बँक ऑफ सिमला या बँकांची स्थापना करण्यात आली. Banks Information In Marathi

1881 मध्ये मर्यादित जबाबदारीच्या तत्त्वावर अवध कमर्शियल बँक या बँकेची स्थापना करण्यात आली. मर्यादित जबाबदारीच्या तत्वानुसार बँकेमध्ये गुंतवणूकदार असतात. यांची जबाबदारी कमी असते.

त्यामुळे भांडवलदार अशा प्रकारच्या बँका स्थापन करण्याला प्राधान्य देतात. 1894 मध्ये पंजाब नॅशनल बँकेची स्थापना झाली आणि संपूर्ण भारतीयांच्या मालकीची ही पहिलीच बँक होती. RBI  कायदा 1934 द्वारे 1 एप्रिल 1935 मध्ये रिझर्व बँक ऑफ इंडियाची स्थापना झाली.

1 जानेवारी 1949 रोजी आरबीआयचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. आणि 1949 मध्ये बँकिंग विनियमन कायदा (बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट) संमत करण्यात आला. या कायद्याद्वारे सर्व भारतीय बँकांना आरबीआयच्या नियंत्रणाखाली आणण्यात आले.

 बँकिंग कंपनी अॅक्ट 1961 नुसार बँकांचे सक्तीने विलीनीकरण करण्याचा अधिकार आरबीआयला प्राप्त झाला. यामुळे बँकांच्या कार्यक्षमतेत सुधारणा झाली व भारतीय बँकिंग व्यवस्था देखील सुधारू लागली. Banks Information In Marathi

बँक ऑफ बॉम्बे, बँक ऑफ बेंगाल आणि बँक ऑफ कलकत्ता या तिन्ही बँकांचे एकत्रीकरण करून 1921 आली. एकच इंपीरियल बँकेची स्थापना करण्यात आली. 1 जुलै 1955 रोजी एस.बी.आय. कायदा 1955 अन्वये इंपीरियल बँकेला ताब्यात घेऊन तिचे स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये रुपांतर करण्यात आले. ए.डी.गोरवाला समितीने 1954 च्या आपल्या अहवालात अशी शिफारस केलेली होती.

एस.बी.आय. संलग्न बँक कायदा 1959 नुसार 8 संस्थानिकांच्या बँका एस.बी.आय. ने ताब्यात घेतल्या. म्हणून त्या एस.बी.आय.च्या सहयोगी बँक म्हणून ओळखल्या जातात. यापैकी बँक ऑफ बिकानेर आणि बँक ऑफ जयपुर या दोन बँकांचे विलीनीकरण करून स्टेट बँक ऑफ बिकानेर अँड जयपुर अशी 1963 मध्ये स्थापना करण्यात आली. 

19 जुलै 1969 रोजी 14 खाजगी बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले. यासाठी 50 कोटींपेक्षा अधिक ठेवी असलेल्या बँकांची निवड करण्यात आली . आर्थिक सत्तेचे केंद्रीकरण रोखण्यासाठी व कृषि,  लघुउद्योग, ग्रामीण विकास यासारख्या अग्रक्रम क्षेत्राला कर्ज पुरवठा करण्यासाठी ही कृती सरकार मार्फत करण्यात आली. 15 एप्रिल 1990 रोजी पुन्हा सहा बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले. मात्र यासाठी दोनशे कोटी पेक्षा अधिक ठेवी ज्या बँकांनी गोळा केलेल्या आहेत अशा बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले.
1991 च्या मोठ्या आर्थिक बदलानंतर भारतीय रिझर्व बँकेने जानेवारी 1993 मध्ये नवीन खाजगी बँका स्थापन करण्याला संमती दिली. यानुसार स्थापन झालेल्या बँकांना नवीन खाजगी बँका असे म्हणण्यात येऊ लागले. 

1994 मध्ये सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे आंशिक खाजगीकरण करण्यात आले. त्यानुसार या बँकांना स्वतःचे शेअर्स वितरित करून भांडवल उभा करण्याची सवलत देण्यात आली.  प्रत्यक्ष परकीय गुंतवणुकीसाठी सुद्धा बँकिंग व्यवसाय खुला करण्यात आला. सध्या भारतातील खाजगी बँकांमध्ये 74 टक्के पर्यंत परकीय गुंतवणूक करण्याची परवानगी आहे. 

सरकारी बँकांमधील किंवा सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमधील भारत सरकारची मालकी 51 टक्क्यापेक्षा कमी असणार नाही ही अट देण्यात आलेली आहे.

बँकांची कार्ये (Functions of Banks) |  Banks Information In Marathi

    ठेवी ठेवणे आणि कर्ज देणे या प्रमुख कार्यांच्या व्यतिरिक्त बँकांना पुढील प्रमाणे कार्ये करावी लागतात. Banks Information In Marathi.

Refference Books for Competitive Exam

1) ठेवी स्वीकारणे: बँका चालू खाते, बचत खाते, आवर्ती खाते, मुदतठेव यांचे खाते इत्यादी खात्यांच्या माध्यमातून लोकांच्या कडून ठेवी गोळा करतात. चालू व बचत खात्यातील ठेवी खातेदाराने मागणी करताच बँकेला द्यावी लागतात. तर मागणी ठेवी व मुदत ठेवी या मागणी केल्यानंतर किंवा ठराविक कालावधीनंतर परत द्यावी लागतात.

2)  कर्जे देणे: बँका जमा झालेल्या ठेवीतून किंवा अधिकर्ष सवलती देतात आणि त्यातून स्वतःसाठी नफा कमवतात. बँका वेगवेगळ्या प्रकारच्या कर्जावर वेगवेगळ्या व्याजदर आकारतात. मात्र भारतीय बँकावर 2010 पासून बेस रेटचे बंधन टाकण्यात आले आहे.

 बेस रेट हा किमान व्याजाचा दर असतो. आणि बँका यापेक्षा कमी दराने कर्ज देऊ शकत नाहीत असा बेस रेट प्रत्येक बँक स्वतः ठरवत असते व जाहीर करत असते.

3) पतनिर्मिती करणे: 

पतनिर्मिती म्हणजे काय?

पंकजला घर घ्यायचे होते .त्याच्याकडे एक लाख रुपये शिल्लक होते .त्याने नीलकंठ बिल्डर्सकडून घर घेतले आणि त्याला एक लाख रुपये दिले. नीलकंठ बिल्डरने ते ॲक्सिस बँकेत ठेवी स्वरूपात ठेवले .ॲक्सिस बँकेने त्यातील दहा हजार रुपये स्वतः जवळ ठेवले  व 90 हजार रुपये कर्ज स्वरूपात संदीपला दिले. संदीपने त्या पैशाचे रामराज्य बिल्डरकडून एक घर घेतले.रामराज्य बिल्डरने ते पैसे सारस्वत बँकेत ठेवले . वरील उदाहरणात पंकजकडे एक लाख रुपये होते. यावर अतुल ,पंकज आणि संदीप या तिघांनी २,७०,000 रुपयांची घरे घेतली .

 बाजारात एक लाख रुपये ओतले असता आणि बँकांनी एक लाख 70 हजार रुपये जास्तीचे तयार केले. याला पतनिर्मिती म्हणतात. अशी पतनिर्मिती बँका करत असतात.

4) दुय्यम कार्ये: बँकांच्या दुय्यम कार्यामध्ये ग्राहकांना अनुषंगिक सेवा कार्यांचा समावेश होतो.  यामध्ये पैशाची पाठवणी करणे, ग्राहकांसाठी विश्वस्त, मृत्युपत्र इत्यादी कार्यांचा समावेश होतो.

अनुसूचित व बिगर अनुसूचित बँका – Banks Information In Marathi

1) अनुसूचित बँका Scheduled Banks –
                          ज्या बँकांचा समावेश 1934 च्या आरबीआय कायद्यानुसार दुसऱ्या अनुसूचीमध्ये करण्यात येतो त्या बँकांना अनुसूचित बँका असे म्हणतात. यासाठी पुढील निकष ठेवण्यात आलेले आहेत. बँकेचे भागभांडवल व राखीव निधी पाच  लाख रुपया पेक्षा कमी नसावे आणि बँकेने ठेवीदारांच्या हितासाठी काम करावे. अनुसूचित बँकांमध्ये एसबीआय व तिच्या सहयोगी बँका, राष्ट्रीयीकृत बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका, खाजगी अनुसूचित बँका, परकीय बँका, राज्य सहकारी बँका यांचा समावेश होतो.

2) बिगर अनुसूचित बँका: दुसऱ्या अनुसूचीमध्ये नसणाऱ्या बँकांना बिगर अनुसूचित बँका असे म्हणतात. या बँकांना आरबीआयची कर्जे पुनर्वित्त आणि विनिमय पत्रांची पुनर्वटणी या सुविधा प्राप्त होत नाहीत.यामध्ये जिल्हा मध्यवर्ती, सहकारी बँका, प्राथमिक सहकारी पतसंस्था यासारख्या संस्थांचा समावेश होतो.

भारतातील कार्यरत बँका, Banks Information In Marathi

1) सार्वजनिक क्षेत्रातील बँका: यामध्ये शासनाची मालकी 51 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त असते. एसबीआय बँक समूह प्रादेशिक ग्रामीण बँका राष्ट्रीयीकृत बँका यांना सार्वजनिक क्षेत्रातील बँका म्हणता येईल.

2)खाजगी क्षेत्रातील बँका: खाजगी क्षेत्रातील बँकाचे पुन्हा दोन प्रकार पडतात. भारतातील खाजगी बँका व परकीय खाजगी बँका.

भारतातील खाजगी बँका, Private Banks Information In Marathi:  भारतातील खाजगी बँकांचे(Indian Banks) पुन्हा तीन प्रकार पडतात. जुन्या खाजगी बँका, नव्या खाजगी बँका व स्थानिक क्षेत्रीय बँका. 1969 च्या बँकांच्या राष्ट्रीयीकरण प्रक्रियेमधून ज्या बँका राहिल्या होत्या मात्र त्यांचे व्यापारी बँक म्हणून कार्य चालू होते अशा बँकांना जुन्या खाजगी बँका असे म्हणतात.

1993 मध्ये खाजगी क्षेत्रात नवीन बँका स्थापन करण्याबाबत मार्गदर्शक तत्वे जाहीर करण्यात आली व नव्या खाजगी बँका स्थापन करण्याची संमती देण्यात आली. अशा बँकांना नव्या खाजगी बँका असे म्हणतात. ग्रामीण भागातून बचती गोळा करून त्यांचा वापर स्थानिक भागातच करणे या मुख्य हेतूसाठी स्थानिक क्षेत्रीय बँका 1996 – 97 पासून स्थापन करण्यात आल्या.

या बँकांचे कार्यक्षेत्र तीन सलग जिल्ह्यांचा प्रदेश असेल व यांचे भागभांडवल किमान पाच कोटी रुपये असावे अशा  प्रकारच्या हटिया बँकांना होत्या.

3) परकीय बँका: भारतीय अर्थव्यवस्थेतील उदारीकरणाचा दृष्टिकोन स्वीकारल्यानंतर 1993 पासून परकीय बँकांना भारतीय क्षेत्रात कार्य करण्याची संधी देण्यात आली. सध्या विविध देशातील परकीय बँका भारतात कार्यरत आहेत.

भारतात सर्व प्रथम 1987 मध्ये ATM सुरू करणारी HSBC ही परकीय बँक आहे.

1) स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank of India) –Banks Information In Marathi

ये.डी. गोरवाला समितीच्या शिफारशीवरून 8 मे 1955 ला स्टेट बँक ऑफ इंडिया कायदा 1955 संमत केला. आणि 1जुलै 1955 इम्पेरियल बँकेचे हस्तांतर होऊन तिचे नाव स्टेट बँक ऑफ इंडिया करण्यात आले. आठ संस्थानामध्ये कार्यरत असणाऱ्या संस्थानिक बँकांचे स्टेट बँकेमध्ये विलीनीकरण करण्यात आले. 

स्टेट बँक ऑफ इंडिया ही सरकारी व्यापारी बँक म्हणून कार्यरत आहे. यामध्ये भारत शासनाचा वाटा 58.47 टक्के आहे. स्टेट बँकेचे मुख्यालय मुंबई येथे आहे. स्टेट बँकेचे अधिकृत भांडवल सुरुवातीला 20 कोटी होते, 1985 मध्ये ते 200 कोटी, 1991मध्ये 1000 कोटी व 2010 नंतर 5000 कोटी रुपये करण्यात आले.

स्टेट बँकेची उद्दिष्टे-

  1. ग्रामीण व दुर्बल  घटकापर्यंत बँकिंग व्यवसाय पोहोचविणे.
  2. रिझर्व बँकेचे चलन विषयक धोरण यशस्वी करणे.
  3. लघु उद्योगांना कर्ज पुरवणे.
  4. शासकीय नियंत्रणाखाली व्यापारी बँकिंग मधला भाग आणणे.
  5. स्टेट बँक ही देशातील सर्वात मोठी बँक आहे आणि या बँकेचा विस्तार देशभर आहे 31 मार्च 2018 रोजी देशभरात 22414 शाखा स्टेट बँकेच्या होत्या.
  6. एकूण 35 देशांमध्ये 206 शाखा स्टेट बँकेच्या आहेत. स्टेट बँकेचे सुमारे 60000 एटीएम कार्यरत आहेत.

2) राष्ट्रीयीकृत बँका | Nationalized Banks Information In Marathi
                          आर्थिक नियोजनाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी व खाजगी क्षेत्राचे वर्चस्व अर्थव्यवस्थेतून कमी करण्यासाठी बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले. यामध्ये 1969 व 1980 यादरम्यान बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले. या बँकांना शासकीय हस्तांतरीत किंवा राष्ट्रीयकृत बँका म्हणून गणले जाते.
                          सध्या भारतात अठरा बँका राष्ट्रीयीकृत आहेत कारण देना बँक या राष्ट्रीयकृत बँकेचे नुकतेच विलीनीकरण बँक ऑफ बडोदा मध्ये झाले आहे.
(In April 2019, Vijaya Bank and Dena Bank were merged with Bank of Baroda)

3) प्रादेशिक ग्रामीण बँका | Regional Rural Banks Information In Marathi
                        1975 च्या एम नरसिंहन समितीने प्रादेशिक ग्रामीण बँका स्थापन करण्याची शिफारस केली. यामागे मुख्य उद्देश ग्रामीण भागात बँकिंग व्यवस्थेचा प्रकार करणे  हा होता. यानुसार 2 ऑक्टोबर 1975 ला पाच प्रादेशिक ग्रामीण बँकांची स्थापना करण्यात आली.
महाराष्ट्रात महाराष्ट्र ग्रामीण बँक व विदर्भ कोकण ग्रामीण बँक या दोन प्रादेशिक ग्रामीण बॅंका कार्यरत आहेत.

4) सहकारी बँका – Cooperative Banks Banks Information In Marathi
                    सुरुवातीला स्वातंत्र्यापूर्वी 1904 मध्ये सहकारी पतपुरवठा संस्था कायद्यान्वये भारतात सहकारी बँका उभारणेस सुरुवात झाली. महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था कायदा 1960 मध्ये संमत करण्यात आला. यामध्ये प्राथमिक कृषी पतसंस्था, जिल्हा सहकारी बँका, राज्य सहकारी बँका असे स्तर दिसतात. राज्य सहकारी बँकेचे राज्यातील सर्व बँका वर नियंत्रण असते तर राज्य सहकारी बँकेवर नाबार्डचे नियंत्रण असते.

5) नाबार्ड (National bank for Agriculture and Rural Development) Banks Information In Marathi –
                                  बी शिवरामन समितीच्या(कृषी व ग्रामीण विकासासाठी व्यवस्थात्मक पुरवठा पुनरावलोकन समिती) शिफारशीनुसार  12 जुलै 1982 रोजी नाबार्ड ची स्थापना करण्यात आली.  नाबार्डचे मुख्यालय मुंबईमध्ये असून नाबार्डचे अधिकृत भांडवल सुरुवातीला 100 कोटी होते. ते आता 5000 कोटी रुपये करण्यात आले आहे.
                        पुनर्वित्त पुरवठा करणे या प्रमुख उद्देशाने नाबार्ड ची स्थापना करण्यात आली. ग्रामीण उद्योग व ग्रामीण विकास हे नाबार्डचे प्राधान्य क्षेत्र आहे.

कार्ये –

  1. ग्रामीण मधील वित्तीय संस्थांची शिखर संस्था म्हणून कार्य करणे.
  2. ग्रामीण पायाभूत सुविधा विकास करण्यासाठी कर्जपुरवठा करणे.
  3.  सहकारी बँका प्रादेशिक ग्रामीण बँका यांचे पतनियोजन, तपासणी व पुनर्वित्त पुरवठा करणे.
  4.  ग्रामीण भागात पतपुरवठा करणाऱ्या संस्था व संघटना मार्गदर्शन करणे. प्रशिक्षण देणे. त्यांच्यावर देखरेख ठेवणे. यासारख्या कार्यांचा समावेश नाबार्डच्या कार्यामध्ये होतो.

अशा प्रकारे भारतातील बँक विषयक विविध माहिती आपण या ठिकाणी पाहिली.  भारतातील बँकांची माहिती बँकांचे प्रकार भारतीय बँक व्यवस्थेची सुरुवात असे विविध मुद्दे या ठिकाणी या लेखाच्या माध्यमातून  स्पष्ट करण्यात आलेले आहेत. Banks Information In Marathi मध्ये माहिती शोधणार्‍या असंख्य विद्यार्थी व पालक मित्र आणि सुज्ञ नागरिकांना अपेक्षा आहे की हा लेख उपयुक्त वाटला असेल. 

 आणखी माहितीपूर्ण लेख पुढील प्रमाणे…

mahanyaywadi | महान्यायवादी- म्हणजे काय?, नेमणूक,कामे,अधिकार | 2023

UPSC information in Marathi । upsc 2023 | कलेक्टर होण्यासाठी काय करावे

MahaTET Result Watch Here

मी मागील 8 वर्ष MPSC आणि इतर स्पर्धा परीक्षेसंबंधी पुण्यामध्ये Classes घेत आहे, त्यामुळे या स्पर्धा कशा प्रकारे होतात, कोणते प्रश्न विचारले जातात आणि कोणत्या टॉपिक वर प्रश्न विचारले जातात या संबंधी ची पूर्ण माहिती मला असून मी माझा अनुभव या वेबसाइट द्वारे तुम्हा सर्वांपर्यंत पोचवायचा प्रयन्त करत आहे.

1 thought on “Banks Information In Marathi | भारतीय बँक, बँकांचा इतिहास”

Leave a Comment