सप्टेंबर २०२० महिन्याच्या चालू घडामोडी येथे आपण पाहणार आहोत. Current Affairs of September 2020
- ज. द. यू. (JDU) चे खासदार हरिवंश नारायण सिंह यांची सलग दुसऱ्यांदा राज्यसभेवर उपसभापती म्हणून निवड.
- संयुक्त राष्ट्राच्या महिला स्थिती आयोगावर सदस्यपदी भारताची निवड. चीनवर मात करून भारत बनला सदस्य. लिंग समानता व महिला सक्षमीकरण या महत्त्वाच्या मुद्द्यावर हा आयोग कार्य करतो.
- १६ सप्टेंबर जागतिक ओझोन संरक्षण दिन.
- जपानच्या पंतप्रधानपदी योशिहिडे सुगा यांची निवड जपानच्या संसदेने केली. सिंझो अबे हे सर्वाधिक काळ जपानचे पंतप्रधान होते. यांनी प्रकृतीच्या कारणावरून राजीनामा दिला.
- भारताची अर्थव्यवस्था या आर्थिक वर्षात म्हणजेच आर्थिक वर्ष 2020 – 21 मध्ये कोरोना साथीमुळे 9 टक्क्यांनी आंकुंचन पावेल असे मत आशियाई विकास बँकेने (ADB) व्यक्त केले आहे.
- प्राज इंडस्ट्रीज चे संस्थापक डॉक्टर प्रमोद चौधरी यांना प्रतिष्ठेचा जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर पुरस्कार जाहीर.30 देशांमध्ये कार्यरत असलेल्या आणि जैव तंत्रज्ञानाची सर्वात मोठे व्यापार संघटना असलेल्या आयोगा बायोटेक्नॉलॉजी असोसिएशनच्या वतीने 2008 पासून हा पुरस्कार देण्यात येतो. जैव आधारीत अर्थव्यवस्था स्थापित करण्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल चौधरी यांना हा पुरस्कार जाहीर झाला.
- टाईम्स मॅगेझिनने 2020 च्या जगातील प्रभावशाली व्यक्तींची यादी प्रसिद्ध केली. यामध्ये नरेंद्र मोदी यांच्यासह शाहीन बागच्या बिल्किस यांचा समावेश करण्यात आलेला आहे. बिल्किस यांनी CAA विरोधात आंदोलनात सहभाग घेतला होता. त्यांचे वय 82 वर्ष आहे. यादीमध्ये सुंदर पिचाई, आयुष्मान खुराणा, सोबत एच.आय.व्हि वर संशोधन केलेले प्राध्यापक रवींद्र गुप्ता समावेश करण्यात आला आहे.
- गोल्डन गर्ल – अत्याधुनिक विमानांचा भारतीय एअर फोर्स मध्ये समावेश करण्यात आला. ‘गोल्डन अॅरो’ म्हणून ओळखल्या जाणार्या पहिल्या स्क्वार्डन मध्ये महिला पायलट शिवांगी सिह यांचा समावेश करण्यात आलेला आहे. म्हणून देशभरात गोल्डन गर्ल म्हणून ओळखले जाते.
Current Affairs of September 2020 – पहा भारताची आर्थिक स्वातंत्र्य स्थिती सप्टेंबर २०२०
- ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ आणि अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉक्टर शेखर बसू यांचे कोरोनाने निधन
- प्रसिद्ध पार्श्वगायक एस. पी. बालसुब्रमण्यम यांचे निधन. बालसुब्रमण्यम यांनी 40000 गाण्यांना आवाज दिला आहे.
- बिहार विधानसभेची निवडणूक लोक तीन टप्प्यांमध्ये ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये होणार. कोरोना कालावधीमध्ये होणारी देशातील पहिली निवडणूक आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने 28 ऑक्टोबर, 3 नोव्हेंबर आणि 7 नोव्हेंबर अशा तीन टप्प्यांमध्ये निवडणुका होणार असल्याचे जाहीर केले. बिहार विधानसभा निवडणुक एकूण 243 विधानसभा सदस्यांच्या जागेसाठी होणार आहेत.
- नियोजन आयोगाचे माजी उपाध्यक्ष मॉन्टेकसिंग अहलुवालिया यांच्या पत्नी प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ ईशर अहलूवालिया यांचे कर्करोगाने निधन.
- शांतीस्वरूप भटनागर पुरस्कार
वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेतर्फे दिला जाणारा शांतीस्वरूप भटनागर पुरस्कार विज्ञान व संशोधन क्षेत्रातील योगदानासाठी दिला जातो. यंदा हा पुरस्कार देशातील बारा वैज्ञानिकांना जाहीर झाला. त्यापैकी महाराष्ट्रातील चार संशोधकांना हा पुरस्कार मिळालेला आहे.
- डॉ. अमोल कुलकर्णी
- डॉ. सूर्येंदू दत्ता
- डॉ. किंशूक दासगुप्ता
- डॉ. यू. के. आनंदवर्धनन
विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या 45 वर्षापर्यंतच्या शास्त्रज्ञांना मागील पाच वर्षाच्या संशोधनाबद्दल हा पुरस्कार दिला जातो. CSIR चे संस्थापक संचालक शांतीस्वरूप भटनागर यांच्या नावाने हा पुरस्कार दिला जातो पाच लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.