MPSC Exam Important Questions in Marathi | Rajyaseva Mains Question Paper 2024

MPSC Exam Important Questions in Marathi | Rajyaseva Mains Question Paper 2024

१) 9 डिसेंबर 1946 रोजी दिल्ली येथे घटना समितीची पहिली बैठक घेण्यात आली या समितीचे तात्पुरते अध्यक्ष म्हणून पुढीलपैकी कोणत्या व्यक्तीने कामकाज पाहिले?

 • a) डॉ. बी आर आंबेडकर
 • b) डॉ. राजेंद्र प्रसाद
 • c) डॉ. सच्चिदानंद सिन्हा
 • d) पंडित जवाहरलाल नेहरू

उत्तर – डॉ. सच्चिदानंद सिन्हा


२) घटना समितीमध्ये एकूण किती महिला होत्या?

 • a) 8 
 • b) 9 
 • c) 10 
 • d) 15

उत्तर – 15


३) संविधान सभेबाबत खालीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत?

अ) ती प्रौढ मताधिकार यावर आधारित नव्हती.

ब) ती प्रत्यक्ष निवडलेली संस्था होती.

क) ब्रिटिश भारतात 292 जागा देण्यात आल्या होत्या.

ड) टीव्ही विविध समित्या द्वारे कार्य करीत असे.

 • a)अ आणि ब 
 • b) ब आणि क 
 • c) अ आणि ड
 • d) अ ब क आणि ड

उत्तर – अ आणि ड


४) सामायिक सूची कोणत्या देशाच्या राज्यघटनेतून घेण्यात आलेली आहे?

 • a) कॅनडा
 • b) अमेरिका
 • c)ऑस्ट्रेलिया
 • d) जर्मन

उत्तर – ऑस्ट्रेलिया


५) भारत हे संघराज्य आहे खालीलपैकी कोणते तत्व संघराज्याला आधार देत नाही?

 • a) एक राज्यघटना 
 • b) द्विगृही कायदेमंडळ 
 • c) राज्यघटनेचे सर्वोच्चता 
 • d) न्यायालयीन पुनर्विलोकन 

उत्तर – एक राज्यघटना


६) जर लोकशाहीचे मूल्यमापन केले तर खालील विधान लोकशाही व्यवस्थेला अनुसरून नाही कोणते ते ओळखा?

 • a) मुक्त आणि निपक्षपाती निवडणुका
 • b) व्यक्तीची प्रतिष्ठा
 • c) अल्पसंख्यांकांचे शासन
 • d) कायद्यासमोर समानता

उत्तर – अल्पसंख्यांकांचे शासन


७)आर्थिक न्यायाचे तत्व हे भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या दोन भागात समाविष्ट केलेले आहे?

 • a) राज्यघटनेची उद्देशिका आणि राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे
 • b) राज्यघटनेची उद्देशिका आणि मूलभूत हक्क
 • c) मूलभूत हक्क आणि राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे
 • d) वरीलपैकी कोणतेही नाही

उत्तर – राज्यघटनेचे उद्देशिका आणि राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे


८) भारतीय नागरिकत्व कायदा केव्हा संमत केला?

 • a) 1950
 • b) 1952
 • c) 1955
 • d) 1958 

उत्तर – 1955


९)भारतीय राज्य घटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमात सहा ते चौदा वयोगटातील सर्व मुलांसाठी मोफत व सक्तीच्या शिक्षणाची तरतूद केली आहे?

 • a)कलम 21 C 
 • b) कलम 21 A
 • c) कलम 51 A 
 • d) कलम 25 C

उत्तर – कलम 21 A


१०) भारतीय राज्यघटनेचे कलम 48 हे कशाशी संबंधित आहे?

 • a) समान नागरी कायदा 
 • b) पंचायत राज 
 • c) गोवंश हत्या बंदी 
 • d) महिला सबलीकरण

उत्तर – गोवंश हत्या बंदी


११) राज्यसभेचे अध्यक्ष सभागृहातील मतदानात भाग घेऊ शकत नाही कारण……

 • a) उपराष्ट्रपती असल्यामुळे 
 • b) तसा प्रस्थापित संकेत आहे 
 • c) तो राज्यसभेचा सदस्य नसतो 
 • d) तो राजकीय दृष्ट्या तटस्थ असतो

उत्तर – तो राज्यसभेचा सदस्य नसतो.


१२) घटनादुरुस्ती विधेयकाबाबत पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?

 • a) हे विधेयक फक्त लोकसभेच मांडता येते. 
 • b) या विधेयकाला राष्ट्रपतींच्या शिफारशींची गरज नसते. 
 • c) हे विधेयक प्रत्येक सभागृहाने विशेष बहुमताने पारित करणे बंधनकारक असते. 
 • d) 24 व्या घटनादुरुस्तीने राष्ट्रपतींना या विधेयकाला संमती देणे बंधनकारक करण्यात आले आहे.

उत्तर – हे विधेयक फक्त लोकसभेत मांडता येते.


१३) खालील विधानापैकी बरोबर नसलेली विधाने ओळखा.

अ) भारतीय घटना ताठर आहे पण लवचिक नाही.

ब)भारतीय घटना लवचिक आहे पण ताठर नाही.

क)भारतातील न्यायव्यवस्था स्वतंत्र आहे पण एकात्मिक नाही. 

ड) भारतातील न्यायव्यवस्था स्वतंत्र आहे व एकात्मिक सुद्धा आहे.

 • a) केवळ अ व क 
 • b) केवळ अ व ड
 • c) केवळ ड
 • d) केवळ अ ब क

उत्तर – केवळ अ ब क


१४) या विधेयकाला संसदेच्या प्रत्येक सभागृहाने विशेष बहुमताने संमत करणे बंधनकारक आहे.

उत्तर – घटनादुरुस्ती विधेयक


१५) न्यायालयीन पुनर्विलोकन (कलम 13) कोठून  भारतीय राज्यघटनेमध्ये स्वीकारण्यात आलेले आहे?

 • a) ब्रिटिश घटना 
 • b) अमेरिकेची घटना 
 • c) भारत सरकार कायदा 1935 
 • d) आयर्लंडची घटना

उत्तर – अमेरिकेची घटना


१६)नागरिकत्व कायदा 1955 नुसार खालीलपैकी कोणत्या पर्यायाद्वारे एखादी व्यक्ती भारताचा नागरिक बनू शकत नाही?

 • a) भूमी अधिग्रहित झाल्यामुळे
 • b) वारसा हक्काने
 • c) जन्म भारतात झाल्याने
 • d) राष्ट्रीयीकरणाद्वारे

उत्तर – राष्ट्रीयीकरणाद्वारे


१७)पुढीलपैकी कोणत्या खटल्याचा परिणाम म्हणून संसदेने 24 वी घटनादुरुस्ती कायदा संमत केला?

 • a) गोलकनाथ खटला 
 • b) मिनर्वा मिल्स खटला 
 • c) केशवानंद भारती खटला 
 • d) शंकरी प्रसाद खटला 

उत्तर – गोलकनाथ खटला


१८)खालीलपैकी कोणत्या प्रकरणात भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने राज्य घटनेच्या मूलभूत संरचनेत संस्थेला बदल करता येणार नाही असा निर्णय दिला?

 • a) शंकरी प्रसाद विरुद्ध भारत सरकार 
 • b) गोलकनाथ विरुद्ध पंजाब राज्य 
 • c) केशवानंद भारती विरुद्ध केरळ राज्य 
 • d) मिनर्वा मिल्स लिमिटेड विरुद्ध भारत सरकार 

उत्तर – केशवानंद भारती विरुद्ध केरळ राज्य


१९) खालील पैकी सत्य विधान ओळखा.

अ)भारताच्या संविधानानुसार काही मूलभूत हक्के ही फक्त भारताच्या नागरिकांनाच तर काही हक्क सर्वांना लागू होता.

ब)राज्यघटनेने नागरिकांना बहाल केलेले मूलभूत हक्क अमर्याद नाहीत. 

क) मूलभूत हक्कांमध्ये घटनादुरुस्ती शिवाय बदल करता येत नाही.

 • a) अ ब क
 • b) ब क
 • c) अ क
 • d) अ ब

उत्तर – अ ब क


२०) मूलभूत हक्क संबंधी खालील विधानांचा विचार करा.

अ)भारतीय राज्यघटनेचे भाग 3 मध्ये मूलभूत हक्क समाविष्ट करण्यात आले आहेत.

ब)भाग-3 ला भारताची मॅग्ना कार्टा असे संबोधले जाते.

क)घटनाकरत्यांनी हे मूलभूत हक्क USA च्या घटनेवरून घेतले आहेत.

वरील विधानापैकी अचूक विधाने ओळखा.

 • a) अ आणि क
 • b) अ ब आणि क
 • c) अ आणि ब
 • d) ब आणि क

उत्तर – अ ब आणि क


MPSC Exam Question MPSC Exam Question 2021

polity questions for mpsc exam practice

शिक्षक होण्यासाठी काय करावे? शिक्षक होण्यासाठी पात्रता

मी मागील 8 वर्ष MPSC आणि इतर स्पर्धा परीक्षेसंबंधी पुण्यामध्ये Classes घेत आहे, त्यामुळे या स्पर्धा कशा प्रकारे होतात, कोणते प्रश्न विचारले जातात आणि कोणत्या टॉपिक वर प्रश्न विचारले जातात या संबंधी ची पूर्ण माहिती मला असून मी माझा अनुभव या वेबसाइट द्वारे तुम्हा सर्वांपर्यंत पोचवायचा प्रयन्त करत आहे.

Leave a Comment