Talathi Bharti 2024 Apply Now

Talathi Bharti 2024 Apply Now | 4644 Posts

Talathi Bharti 2023

महाराष्ट्र शासनाने नुकतीच तलाठी भरती 2023 जाहीर केलेली आहे. यातील महत्त्वाचे मुद्दे म्हणजेच एकूण जागा वेतन पात्रता परीक्षा पद्धती परीक्षेसाठी आवश्यक पुस्तके या सर्व गोष्टींची माहिती या ठिकाणी देत आहोत.

महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाअंतर्गत तलाठी गट क संवर्गातील एकूण 4644 पदांच्या सरळ सेवा भरती करिता जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमि अभिलेख महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडून महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांच्या केंद्रावर ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल.

Talathi Salary

Talathi Salary – 25500-81100 या व्यतिरिक्त इतर भत्ते देय असतील. म्हणजे तुमच्या पगाराची सुरुवात सर्वसाधारणपणे 34 हजार पेक्षा जास्त असते. अंतिमतः किती जाईल रिटायर होईपर्यंत हे तत्कालीन परिस्थितीवर अवलंबून असेल मात्र सर्वसामान्यपणे आपण असे म्हणू शकतो की सव्वा लाखापर्यंत पगार तुमचा होईल.

Talathi Bharti 2023 Exam Date

तलाठी भरती 2023 परीक्षा दिनांक महाभुमी या संकेतस्थळावर शासनाकडून उपलब्ध करून देण्यात येईल.

तलाठी पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवाराकडे महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असल्याचे अधिवास प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

Talathi Bharti 2023 Qualification

Talathi Bharti 2023 Educational Qualification | तलाठी भरती शैक्षणिक पात्रता 

  • उमेदवार कोणत्याही शासन मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असावा.
  • माहिती तंत्रज्ञान विषयक परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक. नसल्यास नियुक्तीच्या दिनांकापासून दोन वर्षाच्या आत प्राप्त करणे आवश्यक राहील.
  • मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.

Talathi Bharti 2023 Qualificatio, तलाठी भरती पात्रता

  • भारतीय नागरिकत्व असावे.
  • वयोमर्यादा 18 ते 38 वर्ष
  • मागासवर्गांसाठी वयोमर्यादा 43 पर्यंत शिथिल
  • पदवीधर अंशकालीन उमेदवारांसाठी वयोमर्यादा 55 वर्ष राहील.

महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग 3 मार्च 2023 शासन निर्णय नुसार 31 डिसेंबर 2023 पूर्वी प्रसिद्ध होणाऱ्या भरती जाहिराती करता कमाल वयोमर्यादेच्या दोन वर्षे शिथिलता दिलेली असल्याने वर नमूद सर्व प्रवर्गासाठी कमाल वयोमर्यादेच्या दोन वर्षे इतकी शिथिलता असेल.

Talathi Bharti 2023 Syllabus 

तलाठी भरती परीक्षा पद्धती

अ. क्र. विषय प्रश्न संख्या गुण
1. मराठी 25 50
2. इंग्रजी 25 50
3. अंकगणित 25 50
4. सामान्यज्ञान 25 50
  एकुण 100 200

परीक्षा कालावधी – एकूण शंभर प्रश्नांच्या आणि 200 गुणांच्या तलाठी भरती परीक्षेसाठी दोन तास म्हणजेच एकूण 120 मिनिटे वेळ दिलेला असतो.

Best Book For Talathi Exam 2023

  • सदर परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने होणार आहे.
  • परीक्षेसाठी नकारात्मक गुणदान योजना लागू नाही.
  • सदर परीक्षेसाठी मौखिक परीक्षा किंवा मुलाखत घेण्यात येणार नाही.
  • गुणवत्ता यादीमध्ये उमेदवारांचा अंतर्भाव करण्यासाठी एकूण गुणांच्या किमान 45 टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक राहील.
  • सदर परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने असल्यामुळे एकापेक्षा जास्त सत्रामध्ये परीक्षा होणार आहे.
  • एकापेक्षा अधिक सत्रे होणार असल्याने मिळालेल्या गुणांचे समानीकरण (Normalization) होणार आहे.
  • अर्ज करताना उमेदवारांनी जिल्हा परीक्षा केंद्राची निवड करणे आवश्यक आहे.

Talathi Bharti 2023 Exam Fee

तलाठी भरती परीक्षा शुल्क

तलाठी भरती परीक्षेसाठी खुल्या प्रवर्गासाठी परीक्षा शुल्क 1000 रुपये तर राखीव प्रवर्गासाठी 900 रुपये इतके आहे.

Talathi Bharti 2023 application date

तलाठी भरती 2023 अर्ज सादर करण्याचा कालावधी

अर्ज सादर करण्याचा कालावधी दिनांक 26 जून 2023 पासून दिनांक 17 जुलै 2023 पर्यंत असेल.

Talathi Bharti Documents

talathi bharti 2023 documents

अधिक माहिती पाहण्यासाठी शासनाचे अधिकृत संकेतस्थळ

https://mahabhumi.gov.in

Best Book For Talathi Exam | Download Free Question Paper

Talathi Bharti Cut Off

तलाठी परीक्षा 2023 ची अपेक्षित तारीख काय आहे?

तलाठी परीक्षा 2023 ची परीक्षा विविध शिफ्टमध्ये होणार आहे. तारीख ही वेगळी असेल. सर्वसाधारणपणे ऑगस्ट आणि सप्टेंबर २०२३ मध्ये परीक्षा होणार आहे.

महाराष्ट्रात तलाठी परीक्षा कोण घेणार?

महाराष्ट्रात तलाठी भरती परीक्षा 2023 टी.सी.एस. ही कंपनी घेणार आहे.

तलाठी भरतीसाठी शिक्षण किती पाहिजे?

तलाठी भरतीसाठी किमान पात्रता कोणत्याही शाखेतील मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी ही आहे.

महाराष्ट्रातील तलाठी भरती चा पगार किती आहे?

Talathi Salary – 25500-81100 – या व्यतिरिक्त इतर भत्ते देय असतील. म्हणजे तुमच्या पगाराची सुरुवात सर्वसाधारणपणे 34 हजार पेक्षा जास्त असते. अंतिमतः किती जाईल रिटायर होईपर्यंत हे तत्कालीन परिस्थितीवर अवलंबून असेल मात्र सर्वसामान्यपणे आपण असे म्हणू शकतो की सव्वा लाखापर्यंत पगार तुमचा होईल.

मी मागील 8 वर्ष MPSC आणि इतर स्पर्धा परीक्षेसंबंधी पुण्यामध्ये Classes घेत आहे, त्यामुळे या स्पर्धा कशा प्रकारे होतात, कोणते प्रश्न विचारले जातात आणि कोणत्या टॉपिक वर प्रश्न विचारले जातात या संबंधी ची पूर्ण माहिती मला असून मी माझा अनुभव या वेबसाइट द्वारे तुम्हा सर्वांपर्यंत पोचवायचा प्रयन्त करत आहे.

Leave a Comment