BIMSTEC Information in Marathi | बिमस्टेक म्हणजे  काय?

BIMSTEC | बिमस्टेक म्हणजे  काय ?

गल्लीपासून दिल्लीपर्यंत आणि दिल्लीपासून ते दुबई, वॉशिंग्टन पर्यंत विविध संघटना पाहायला मिळतात. या संघटना अस्तित्वात का येतात?  तर आपले विविध उद्देश साध्य करण्यासाठी अशा संघटना अस्तित्वात येतात. एकमेकांना सहकार्य करण्याच्या उद्देशाने संघटना अस्तित्वात येत असतात. अशाच एका संघटनेचा आढावा या लेखांमधून घेत आहोत.  

6 जून 2022 रोजी बिम्सटेक या संघटनेची स्थापना 25 वर्ष पूर्ण झाली. यानिमित्त बिम्सटेक विषयी माहिती जाणून घेऊयात.

बिमस्टेक म्हणजे  काय? 

 बिमस्टेक ही सात सदस्य राष्ट्र असणारी आंतरराष्ट्रीय सहकार्य संघटना आहे. बिमस्टेक  म्हणजेच BIMSTEC  होय.  याचे विस्तृत रूप म्हणजे Bay of Bangal Initiative for Multi-Sectoral Technical and Economical Cooperation.

BIMSTEC  या संघटनेची स्थापना  बँकॉक घोषणापत्रा द्वारे 6 जून 1997 रोजी करण्यात आली. या संघटनेचे सचिवालय बांगलादेशाची राजधानी असणारे ढाका या शहरांमध्ये आहे.  यामध्ये एकूण सात सदस्य देश असून ही एक प्रादेशिक सहकार्य संघटना आहे. 

BIMSTEC Countries

सुरुवातीला यामध्ये चार सदस्य एकत्र येऊन BISTEC  अशी संघटना स्थापन केली.1997 च्या शेवटी म्यानमार या संघटने मध्ये सामील झाला. 2004 मध्ये नेपाळ भूतान हे दोन देश या संघटनेचे सदस्य झाले.

BIMSTEC  मधील सात सदस्य देश पुढील प्रमाणे –   बांगलादेश, भूतान, भारत, म्यानमार, नेपाळ, श्रीलंका आणि थायलंड. 

SAARC Full Form सार्क संघटना

BIMSTEC Full Form

 पूर्वी या संघटनेचे नाव – Bangladesh India Myanmar,Sri lanka,Thailand Economic Cooperation  असे होते.

 2004 मध्ये नेपाळ व भूतान या देशांचा समावेश झाल्याने या संघटनेचे नाव BIMSTEC – Bay of Bangal Initiative for Multi-Sectoral Technical and Economical Cooperation असे झाले.

 बिमस्टेक संघटनेचा उद्देश दक्षिण आशिया तसेच आग्नेय आशियातील बंगालच्या उपसागरात भोवतालचा प्रदेश जोडणे आणि आर्थिक सहकार्य करणे असा आहे. Official Website

जागतिक व्यापार संघटना World Trade Organization (WTO)

 

मी मागील 8 वर्ष MPSC आणि इतर स्पर्धा परीक्षेसंबंधी पुण्यामध्ये Classes घेत आहे, त्यामुळे या स्पर्धा कशा प्रकारे होतात, कोणते प्रश्न विचारले जातात आणि कोणत्या टॉपिक वर प्रश्न विचारले जातात या संबंधी ची पूर्ण माहिती मला असून मी माझा अनुभव या वेबसाइट द्वारे तुम्हा सर्वांपर्यंत पोचवायचा प्रयन्त करत आहे.

Leave a Comment