जागतिक व्यापार संघटना | World Trade Organization Information in Marathi (WTO) 2024

जागतिक व्यापार संघटना | World Trade Organisation Information in Marathi(WTO) 2024

wto
जागतिक व्यापार संघटना wto

World Trade Organization Information in Marathi: Great Depression/जागतिक महामंदी च्या दरम्यान जगातील विविध अर्थव्यवस्था कोलमडल्या होत्या. या अर्थव्यवस्थांना सावरण्यासाठी आणि विस्कटलेल्या अर्थव्यवस्थेची घडी बसवण्यासाठी 1944 मध्ये ब्रेटन वूड परिषद जाली. यात जागतिक बँक व आंतरराष्ट्रीय नाणेनिधी या संस्था बरोबरच आंतरराष्ट्रीय व्यापार संघटना(World Trade Organization) स्थापन करण्याची शिफारस करण्‍यात आली होती.

ETO Full form in Marathi: World Trade Organization Marathi Meaning

विकसित राष्ट्रांनी मात्र अशा संघटनेला विरोध दर्शवला. 1945 मध्ये अमेरिकेने जागतिक व्यापार आणि रोजगार वाढवण्याच्या दृष्टीने काही प्रस्ताव मांडले. 1947 मध्ये आयात व्यापारावरील कर कमी करण्याच्या दृष्टीने एक यंत्रणा म्हणून करार केला या कराराला गॅट करार असे म्हटले जाते.

गॅट म्हणजे काय ? गॅट करार म्हणजे काय ? | What is Gatt in Marathi

GATT गॅट म्हणजे (General Agreement On Tariff And Trade)प्रशुल्क व व्यापार विषयक सामान्य करार होय. GATT करार 1 जानेवारी 1948 पासून अस्तित्वात आला. या करारावरती अशी टीका करण्यात आली की, हा करार  विकसित राष्ट्रांचे हितसंबंध जपणारा आहे.

विकसनशील राष्ट्रांनी अनेक वेळा आंतरराष्ट्रीय व्यापार संघटना स्थापण्याचा प्रयत्न केला. मात्र तो यशस्वी होऊ शकला नाही. गॅट कराराच्या उरुग्वे फेरी दरम्यान मर्राकेश करारानुसार 1 जानेवारी 1995 वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन/जागतिक व्यापार संघटना ची स्थापना करण्यात आली. 12 डिसेंबर 1995 रोजी गॅट करारानुसार होणाऱ्या सर्व चर्चा समाप्त करण्यात आल्या व आंतरराष्ट्रीय व्यापार संघटनेचे महत्त्व अधोरेखित केले गेले.

जागतिक व्यापार संघटना ही अंतरराष्ट्रीय संघटना असली तरी तिचे स्वतंत्र अस्तित्व आहे. युनोची ही संस्था नाही.WTOचे मुख्यालय जिनिव्हा येथे आहे.  गॅटची जागा व्यापार संघटनेने घेतली असली तरी गॅट करार WTO अंतर्गत अस्तित्वात आहे. 

जागतिक व्यापार संघटना माहिती | World Trade Organization information Marathi

जागतिक व्यापार संघटनेत सध्या 164 देश आहेत. जागतिक व्यापार संघटनेचे प्रशासन सदस्य राष्ट्र मार्फत चालवली जाते. WTO चे सर्वोच्च प्राधिकरण मंत्री स्तरीय परिषद आहे. यामध्ये सभासद राष्ट्रांचे वाणिज्यमंत्री सहभागी असतात आणि एक मताने निर्णय घेतला जातो. दर दोन वर्षांनी या परिषदेची सभा होत असते. दुसऱ्या स्तरावर साधारण परिषद असते. यामध्ये साधारण परिषद तक्रार निवारण यंत्रणा आणि व्यापार धोरण परीक्षण यंत्रणा असे विभाग असतात.

तृतीय स्तरावर इतर परिषदा असतात. यामध्ये 3 विभाग किंवा क्षेत्र दिसतात. वस्तू व्यापार विषयक परिषद, सेवा व्यापार विषयक परिषद आणि बौद्धिक मालमत्ता विषयक परिषद. चौथ्या पातळीवरती विविध समित्या व कार्य गट असतात. WTO चे महासंचालक सचिवालयाचे दैनंदिन कामकाज पाहत असतात. जागतिक व्यापार संघटना पुढील प्रकाशने प्रकाशित करत असते. World Trade report, world trade statistical review. 

जागतिक व्यापार संघटना उद्दिष्टे / WTO ची उद्दिष्टे

1) बहुपक्षीय व्यापार पद्धतीचा विस्तार करणे.2)  आंतरराष्ट्रीय व्यापार वृद्धिंगत करणे.3)  रोजगाराच्या संधी उपलब्ध करणे.4)  विकसनशील देशांना विकासासाठी सहाय्य करणे.5) अत्यल्प विकसित देशांना विकासाची संधी मिळावी यासाठी सकारात्मक उपाय योजना करणे.

जागतिक व्यापार संघटना / WTO ची कार्ये

 • 1) बहुपक्षीय करारांचे प्रशासन करणे.
 • 2) करातील शुल्कातील व्यापार चर्चेतून संमत करण्यात आलेल्या सवलतींच्या अंमलबजावणीवर देखरेख ठेवणे.
 • 3) आंतरराष्ट्रीय व्यापार संघटना म्हणून सदस्य राष्ट्रांच्या व्यापारी धोरणावर लक्ष ठेवणे.
 • 4) सदस्य राष्ट्रांच्या व्यापारविषयक तक्रारींचे निराकरण करणे.
 • 5) सदस्य राष्ट्रातील देशांना कठोर नियमावलीच्या आधारे समान वागणूक देणे.
 • 6) WTO एक व्यवस्थापकीय सल्लागार म्हणून कार्यरत असणे.

WTO च्या व्यापार व्यवस्थेची तत्त्वे –    

जागतिक व्यापार सुलभ करणे हे जागतिक व्यापार संघटनेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. यासाठी काही तत्त्वे निश्चित करणे गरजेचे आहेत.

1) भेदभाव विरहित व्यापार – सदस्य राष्ट्रांनी आपापसात व्यापार करताना भेदभाव करू नये. यासाठी पुढील दोन तरतुदीत दिलेल्या आहेत 

1) मोस्ट फेवर्ड नेशन (Most Favoured Nation MFN) – या अंतर्गत प्रत्येक सदस्य राष्ट्रांनी इतर सर्व राष्ट्रांना मोस्ट फेवर्ड नेशन असा दर्जा देऊन एका देशाला दिलेल्या सवलती इतर देशांना लागू कराव्यात.

2) राष्ट्रीय दर्जा (National Treatment) – सदस्य राष्ट्राने इतर देशांच्या वस्तू सेवा भांडवली इत्यादींना राष्ट्रीय असल्याप्रमाणे मानावे. 

2) अधिक मुक्त व्यापार –

सदस्य राष्ट्रांनी आपापसातील व्यापार अडथळे दूर करून जागतिक बाजारपेठ खुली करावी व अधिकाधिक मुक्त व्यापाराची संधी उपलब्ध करून द्यावी.

3) भविष्यकथन क्षमता –

म्हणजे कमी करण्यात आले व्यापार अडथळे मध्येच बदलू नये. हे अडथळे डब्ल्यूटीओ मध्ये बांधले जातील त्यामुळे व्यापार संस्थेच्या बाबतीत भविष्यकथन क्षमता असावी.

4) स्पर्धेला प्रोत्साहन –

वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन स्पर्धेला प्रोत्साहन देते. मात्र यासाठी स्पर्धा करत असताना अयोग्य मार्गांचा अवलंब करणे पूर्णतः निषिद्ध आहे. यामध्ये निर्यात अनुदान देणे, डंपिंग यासारख्या कृती जागतिक व्यापाराला अन्याय कारक मानल्या जातात. जागतिक व्यापारात निकोप स्पर्धा निर्माण करण्याची व्यवस्था व्यापार संघटना करत असते.

1) प्रशुल्क – 

प्रशुल्क म्हणजे आयात कर होय. देशी उत्पादन संस्थांना महत्त्व देण्याच्या दृष्टिकोनातून विविध देश प्रमाणापेक्षा जास्त आयात शुल्क लावतात. हा आयात शुल्क कमी करून जागतिक व्यापार सुलभ करण्यासाठी जागतिक व्यापार संघटना प्रयत्नशील असते. WTO मध्ये आयात करा संदर्भात बंधने सदस्य राष्ट्रांनी मान्य केलेली आहेत. 

2) कृषी विषयक करार –         

कृषी क्षेत्रातील उत्पादनांच्या बाबतीत जगामध्ये न्याय्य स्पर्धा निर्माण होण्याच्या दृष्टिकोनातून कृषी करार करण्यात आला. यामध्ये कृषी धोरणे बाजाराधिष्ठित करण्यावर भर देण्यात आला हा करार बाजार प्रवेश उपलब्ध करून देणे, देशांतर्गत मदतीचे नियमन करणे आणि निर्यात अनुदाने कमी करणे या तीन मुद्द्यांशी संबंधित आहे.

3) डम्पिंग विरोधी करार

वस्तूच्या उत्पादनासाठी लागणाऱ्या खर्चापेक्षा कमी किमतीत वस्तू विकणे म्हणजे डंपिंग होय. या करारानुसार सदस्य राष्ट्र डम्पिंग विषयक तक्रार आंतरराष्ट्रीय व्यापार संघटनेकडे नोंदवू शकतात.

4) बौद्धिक मालमत्ता हक्क करार

व्यक्ती व कंपन्यांच्या बौद्धिक मालमत्ता त्याला संरक्षण मिळावे या दृष्टीने हा करार महत्त्वाचा आहे. यामध्ये सात प्रकारच्या बौद्धिक मालमत्तांच्या संरक्षणाची तरतूद आहे.

 • 1) कॉपीराइट व संबंधित हक्क 
 • 2) पेटंट्स
 • 3) ट्रेड सिक्रेट
 • 4) इंटिग्रेटेड सर्किटचे लेआउट
 • 5) इंडस्ट्रियल डिझाईन्स
 • 6) भौगोलिक निर्देशक ए के
 • 7) ट्रेडमार्क सर्विसमार्क

जागतिक व्यापार संघटने विषयी अपेक्षित प्रश्नांची उत्तरे मिळाली असतील. जागतिक आरोग्य संघटने विषयी माहिती व इतर अनुषंगिक माहिती आपल्यापर्यंत या लेखाच्या माध्यमातून पोहोचली आहे.

प्रतिक्रिया द्यायला विसरू नका होय आम्ही तुमच्या प्रतिक्रियेची वाट पाहतोय.

हेही वाचा –

vidhan sabha, vidhan parishad,राज्य विधान मंडळ

Refference Books for Competitive Exam

मी मागील 8 वर्ष MPSC आणि इतर स्पर्धा परीक्षेसंबंधी पुण्यामध्ये Classes घेत आहे, त्यामुळे या स्पर्धा कशा प्रकारे होतात, कोणते प्रश्न विचारले जातात आणि कोणत्या टॉपिक वर प्रश्न विचारले जातात या संबंधी ची पूर्ण माहिती मला असून मी माझा अनुभव या वेबसाइट द्वारे तुम्हा सर्वांपर्यंत पोचवायचा प्रयन्त करत आहे.

2 thoughts on “जागतिक व्यापार संघटना | World Trade Organization Information in Marathi (WTO) 2024”

Leave a Comment