Rojagar Hami Yojana in Marathi | Sampurn gramin rojagar yojana Information in Marathi 2024

Rojagar Hami Yojana in Marathi | Sampurn gramin rojagar yojana Information in Marathi 2024

सर्व महत्वाच्या दारीद्र्य निर्मुलन योजना yojana येथे पाहणार आहोत. 

जवाहर रोजगार योजना jawahar rojagar yojana

1 एप्रिल 1989 रोजी सुरू करण्यात आलेल्या जवाहर रोजगार योजनेत बदल करण्यात येऊन काही नवीन योजना सुरू करण्यात आल्या होत्या.

जवाहर रोजगार योजना jawahar rojagar yojana

सहाव्या पंचवार्षिक योजनेत सुरू करण्यात आलेल्या पुढील दोन योजनांचे एकत्रीकरण करून सातव्या योजनेत एक एप्रिल 1989 रोजी जवाहर रोजगार योजना सुरू करण्यात आली.

नॅशनल रुरल एम्प्लॉयमेंट प्रोग्रॅम

रुरल लँडलेस एम्प्लॉयमेंट गॅरंटी प्रोग्रॅम

जवाहर रोजगार योजना एक महत्त्वाची मजुरी रोजगार योजना होती. जवाहर रोजगार योजना  पंचायतराज संस्थांच्या माध्यमातून देशातील सर्व खेड्यामध्ये राबवली जात होती. ग्रामीण भागात टिकाऊ पायाभूत सुविधा निर्मिती या योजनेच्या माध्यमातून केली गेली.

जवाहर ग्राम समृद्धी योजना | Jawahar gram samrudhi yojana in Marathi

जवाहर रोजगार योजनेची पुनर्रचना करून 1 एप्रिल 1999 रोजी तिच्या जागी जवाहर ग्राम समृद्धी योजना सुरू करण्यात आली. 

 या योजनेचा उद्देश 

1.ग्रामीण भागात टिकाऊ पायाभूत सुविधांची निर्मिती होण्याबरोबरच जनतेला शाश्वत रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे.

2. ग्रामीण बेरोजगारांसाठी मजुरी रोजगाराची निर्मिती करणे.

संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना  | Sampurn gramin rojagar yojana in Marathi

जवाहर ग्राम समृद्धी योजना आणि आश्वासित रोजगार योजना यांचे एकत्रीकरण करून 25 सप्टेंबर 2001 पासून संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना सुरू करण्यात आली.

 ही योजना 2 फेब्रुवारी 2006 पासून कार्यान्वित झालेल्या राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेमध्ये वर्ग करण्यात आली. 1 एप्रिल 2008 रोजी हे विलीनीकरण पूर्ण झाले.

स्वर्ण जयंती शहरी रोजगार योजना Swarn jayanti shahari rojagar yojana in Marathi 

1 डिसेंबर 1997 पासून ही योजना कार्यान्वित करण्यात आली. तेव्हा चालू असलेल्या तीन योजनांचे एकत्रीकरण करून स्वर्णजयंती शहरी रोजगार योजना सुरू करण्यात आली. या योजनेत शहरी भागातील बेरोजगार तसेच अर्ध बेरोजगार यांना स्वयंरोजगार व मजुरी रोजगाराची तरतूद होती लाभार्थ्यांची निवड शहरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत घरोघरी जाऊन केली जात असे. योजनेचा वित्तपुरवठा केंद्र व राज्य सरकार मध्ये 75:25 या प्रमाणात केला जात असे.

राष्ट्रीय शहरी आजीविका अभियान Rashtriy shahari ajivika abhiyan in Marathi

23 सप्टेंबर 2013 पासून सरकारने सुवर्ण जयंती शहरी रोजगार योजने ला अभियानाचे स्वरूप देऊन त्याचे रूपांतर राष्ट्रीय शहरी आजीविका अभियानामध्ये केले आहेत. ते देशातील 971 शहरांमध्ये जात होते 20 फेब्रुवारी 2016 रोजी या अभियानाचे नाव बदलून दीनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय शहरी आजीविका अभियान असे केले आहे. हे अभियान आता देशातील सर्व 4041 वैधानिक शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राबवले जाणार आहे.

स्वर्णजयंती ग्राम स्वरोजगार योजना Swarn jayanti gram swarojagar yojana in Marathi

1 एप्रिल 1999 पासून पुढील सहा योजनांचे एकत्रीकरण करून ही योजना सुरू करण्यात आली. 

  1. एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम (IRDP)
  2. स्वयंरोजगारासाठी ग्रामीण तरुणांना प्रशिक्षण (TRYSEM)
  3. ग्रामीण क्षेत्रातील स्त्रिया व मुलांचा विकास 
  4. दशलक्ष विहिरींची योजना 
  5. गंगा कल्याण योजना 
  6. ग्रामीण कारागिरांना सुधारित अवजारांचा पुरवठा

उद्दिष्टे-

स्वयंरोजगाराच्या सर्व बाबींचा सर्वांगीण विचार करण्यात आला. त्यामध्ये गरीब लोकांना स्वयंसहायता, संघटित करणे, प्रशिक्षण, विद्युत पुरवठा, तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा, विपणन इत्यादींचा समावेश होता.

ग्रामीण कुटुंबांना बँक, पतपुरवठा, सरकारी अनुदाने यांच्या सहाय्याने काही उत्पन्न मिळवून देणारी मालमत्ता देऊन तीन वर्षाच्या कालावधीत दारिद्रयरेषेच्या वर आणणे हे या योजनेचे मूळ उद्दिष्ट होते.

योजनेनुसार अनुदान प्रकल्प किमतीच्या तीस टक्के किंवा कमाल साडेसात हजार रुपये एवढे होते.

ग्रामीण भागातील दारिद्रय रेषेखालील कुटुंबे या योजनेचे लक्ष गट होते मात्र त्यातही दुर्बल घटकांसाठी विशेष सुविधा होत्या त्यापैकी 50 टक्के अनुसूचित जाती जमातीसाठी 40 टक्के स्त्रियांसाठी तर तीन टक्के अपंगासाठी राखून ठेवण्यात आलेल्या होत्या.

राष्ट्रीय ग्रामीण आजीविका अभियान | Rashtriy gramin ajivika abhiyan in Marathi

ग्रामीण विकास मंत्रालयाने प्राध्यापक रामकृष्ण समितीच्या शिफारशींच्या आधारे 2010-11 मध्ये स्वर्णजयंती रोजगार योजनेची पुनर्रचना करून 3 जून 2012 रोजी राष्ट्रीय ग्रामीण आजीविका अभियान सुरू केले. या अभियानाला आजिविका असे नाव देण्यात आले.

उद्दिष्ट 

ग्रामीण दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांचे दारिद्र्य कमी करण्यासाठी स्वयंरोजगार व मजुरी रोजगाराच्या विविधिकृत संपती निर्माण करणे व शाश्वत आधारावर उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करणे.

नोव्हेंबर 2015 मध्ये या अभियानाचे नाव बदलून दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियान असे करण्यात आले आहे.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना | Rojagar hami yojana in Marathi

7 सप्टेंबर 2005 रोजी राष्ट्रीय ग्रामीण हमी रोजगार हमी कायदा याची नोंदणी करण्यात आली. Rojagar hami yojana.

2 फेब्रुवारी 2006 रोजी एक नवीन योजना देशातील दोनशे जिल्ह्यांमध्ये राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना Rojagar hami yojana या नावाने सुरू करण्यात आली तेव्हा तत्कालीन दोन योजनांचे वर्गीकरण यात करण्यात आले. संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना आणि फुड फॉर वर्क प्रोग्रॅम.

1 एप्रिल 2008 पासून योजना देशभरात लागू करण्यात आली.  2 ऑक्टोबर 2009 रोजी म्हणजे महात्मा गांधी यांच्या 140 व्या जन्मदिवसा वर या योजनेचे नाव बदलून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना mahatma gandhi Rojagar hami yojana असे करण्यात आले.

Rojagar hami yojana – उद्दिष्टे

ग्रामीण कुटुंबातील तरुण सदस्य व कुशल अंगमेहनतीची काम करू इच्छितात अशा प्रत्येक कुटुंबातील किमान एका व्यक्तीला एका वर्षात 100 दिवसाचा मजुरी रोजगार पुरवण्याचे आम्ही सरकारने या योजनेच्या माध्यमातून दिली आहे. Rojagar hami yojana

     प्रत्येक कुटुंब शंभर दिवसाच्या रोजगाराचे विभाजन कुटुंबाच्या प्रौढ सदस्यांमध्ये करू शकतो अशा प्रकारची ही जगातील पहिलीच योजना आहे.

     योजनेअंतर्गत अर्जदाराने अर्ज केल्यापासून 15 दिवसाच्या आत त्याच्या घरापासून पाच किलोमीटर अंतराच्या परिसरात त्याला रोजगार पुरवला जाईल. अन्यथा त्या त्या राज्य सरकारांनी जाहीर केल्याप्रमाणे त्यांना प्रतिदिन बेरोजगारी भत्ता दिला जाईल.

talathi bharti question paper with answer| Talathi bharti 2021

SSMMS is the portal of Telangana State for book sand order online and also tracking of status. 

मी मागील 8 वर्ष MPSC आणि इतर स्पर्धा परीक्षेसंबंधी पुण्यामध्ये Classes घेत आहे, त्यामुळे या स्पर्धा कशा प्रकारे होतात, कोणते प्रश्न विचारले जातात आणि कोणत्या टॉपिक वर प्रश्न विचारले जातात या संबंधी ची पूर्ण माहिती मला असून मी माझा अनुभव या वेबसाइट द्वारे तुम्हा सर्वांपर्यंत पोचवायचा प्रयन्त करत आहे.

2 thoughts on “Rojagar Hami Yojana in Marathi | Sampurn gramin rojagar yojana Information in Marathi 2024”

Leave a Comment