Pashusanvardhan Vibhag Bharti 2023|पशुसंवर्धन विभाग भरती २०२३

पशुसंवर्धन विभाग भरती २०२३ महाराष्ट्र

Pashusanvardhan Vibhag Bharti

महाराष्ट्र शासन अखत्यारीतील पशुसंवर्धन विभाग अंतर्गत पशुसंवर्धन विभाग भरती २०२३ साठी Pashusanvardhan Vibhag Bharti 2023 जाहिरात नुकतीच प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. 

सदर जाहिरातीमधून पशुसंवर्धन आयुक्तालयातील दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील गट क संवर्गातील सरळ सेवेची पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.

जाहिराती मध्ये नमूद केल्याप्रमाणे रिक्त पदांच्या भरती करिता पात्र उमेदवाराकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

ऑनलाइन पद्धतीने अर्ज दिनांक २७ मे २०२३ पासून दिनांक ११ जून २०२३ रोजी रात्री ११:५९ पर्यंत करता येईल.

क्रमांकपदाचे नावपदसंख्या
पशुधन पर्यवेक्षक३७६
वरिष्ठ लिपिक गट क ४४
लघुलेखक उच्चश्रेणी
लघुलेखक निम्नश्रेणी१३
प्रयोगशाळा तंत्रज्ञ
तारतंत्री
यांत्रिकी
बाष्पक परिचर
एकूण446

Pashusanvardhan Vibhag Bharti 2023 Eligibility

पशुसंवर्धन विभाग भरती 2023 पात्रता पशुसंवर्धन विभाग भरती 2023 वयमर्यादा

जाहिरातीत नमूद केलेल्या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वय दिनांक १ मे 2023 रोजी गणण्यात येईल.

जाहिरातीत नमूद केलेल्या पदांसाठी वयोमर्यादा किमान वय १८ वर्षे असावे तर कमाल वयोमर्यादा ३८ वर्षापेक्षा जास्त नसावी.

मागासवर्गीय उमेदवारांसाठी वयोमर्यादा ४३ वर्षापर्यंत शिथिलक्षम आहे.

(याव्यतिरिक्त वयोमर्यादेमध्ये सवलत देण्याविषयी नवीन नियम लागू असणार आहे.)

Pashusanvardhan Vibhag Bharti 2023 Qualification, पशुसंवर्धन विभाग भरती 2023 शैक्षणिक पात्रता,

१) पशुधन पर्यवेक्षक

उमेदवार माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण झालेला असावा आणि

पशुसंवर्धन आयुक्तालयाने चालविलेला किंवा महाराष्ट्र राज्यातील सांविधिनिक कृषी विद्यापीठाने चालवलेला किंवा महाराष्ट्र राज्यातील समतोल विद्यापीठाने चालविलेला पशुधन पर्यवेक्षक प्रशिक्षण अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा.

किंवा

महाराष्ट्र राज्याच्या तंत्रशिक्षण परीक्षा मंडळामार्फत किंवा महाराष्ट्र राज्यातील संविधानिक कृषी विद्यापीठाने किंवा महाराष्ट्र राज्यातील समतोल्य विद्यापीठाने चालविलेला दोन वर्षाचा दुग्ध व्यवसाय व्यवस्थापन व पशुसंवर्धन पदविका अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा.

किंवा

महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर यांच्यामार्फत चालवण्यात येणारा दोन वर्षाचा पशुधन व्यवस्थापन व दुग्धोत्पादन पदविका अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा.

किंवा

महाराष्ट्र राज्यातील सांविधिनिक कृषी विद्यापीठाची किंवा त्यास समतुल्य विद्यापीठाची बी. व्ही. एस. सी. किंवा बी. व्ही. एस. सी. अँड ऍनिमल हजबंड्री ही पदवी धारण केलेली असावी.

२) वरिष्ठ लिपिक 

सांविधिक विद्यापीठाची पदवी

३. लघुलेखक  (उच्चश्रेणी)

१) माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र

२) लघुलेखनाचा वेग किमान १२० शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान ४० शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखनाचा वेग किमान ३० शब्द प्रति मिनिट, या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र.

४. लघुलेखक(निम्नश्रेणी)

१) माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र

२) लघुलेखनाचा वेग किमान १०० शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान ४० शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखनाचा वेग किमान ३० शब्द प्रति मिनिट, या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र.

५. प्रयोगशाळा तंत्रज्ञ

१) रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, जीवशास्त्र किंवा सुक्ष्मजीवशास्त्र मुख्य विषयासह विज्ञानाची पदवीधारक आणि I

२) महाराष्ट्र राज्यातील सांविधिक विद्यापीठाव्दारे किंवा हाफकाईन बायो- फार्मास्युटिकल कॉर्पोरेशन लि. मुंबई यांचे व्दारे आयोजीत प्रयोगशाळा वैद्यकिय तंत्रज्ञानाचा डिप्लोमा धारक असावा.

६. तारतंत्री

१) औद्योगिक प्रशिक्षण संस्था किंवा इतर मान्यताप्राप्त संस्थेचे तारतंत्री ट्रेडचे प्रमाणपत्र

२) विद्युत उपकरणांचा देखभाल व दुरूस्तीचा १ वर्षाचा अनुभव

७. यांत्रिकी

१) माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण.

२) महाराष्ट्र बाष्पके आणि धुराचा उपद्रव संस्थेचे (Institute of Boilrs and Smoke Nuisance of Maharashtra State) अथवा इतर मान्यताप्राप्त संस्थेचे व्दितीय श्रेणीचे प्रमाणपत्र बाष्पक

३) बाष्पक परिचर नियम, २०११ च्या नियम ४१ अंतर्गत निर्दिष्ट केल्यानुसार ब किंवा क प्रमाणपत्र धारक असावा

४)उमेदवार नोंदी ठेवण्यास आणि तापमानाची नोंद घेण्यास सक्षम असला पाहिजे.

Pashusanvardhan Vibhag Bharti २०२३ उमेदवारांची निवड

सर्व पदांसाठी फक्त मराठी माध्यमातून संगणक प्रणाली द्वारे ऑनलाईन परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपात घेण्यात येईल. 

ऑनलाइन परीक्षेत प्राप्त गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार उमेदवारांची निवड केली जाईल.

गुणवत्ता यादीत अंतर्भाव होण्यासाठी उमेदवाराने किमान 45 टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक राहील.

संगणक आधारित परीक्षेद्वारे घेण्यात येणाऱ्या ऑनलाइन परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपात असेल व प्रत्येक प्रश्नास दोन गुण असतील.

Pashusanvardhan Vibhag Bharti 2023 Syllabus , पशुसंवर्धन विभाग भरती 2023 अभ्यासक्रम

ज्या पदांसाठी शारीरिक व व्यावसायिक चाचणी आवश्यक नाही अशा पदाकरिता उमेदवारांची निवड करताना संगणक आधारित घेण्यात येणारी ऑनलाइन परीक्षा पुढील प्रकारे असेल. 

परीक्षेसाठी असणारा कालावधी दोन तासांचा राहील.

क्रमांकविषयप्रश्न संख्यागुण
१)मराठी२५५०
२)इंग्रजी२५५०
३)सामान्य ज्ञान२५५०
४)बुद्धिमत्ता चाचणी२५५०
१००२००

ज्या पदांसाठी शारीरिक व व्यावसायिक चाचणी आवश्यक आहे अशा पदांकरिता उमेदवारांची निवड करताना संगणक आधारित घेण्यात येणारी ऑनलाईन परीक्षा पुढील प्रकारे असेल. तसेच शारीरिक चाचणी व्यवसायिक चाचणी करिता ८० गुणांची परीक्षा असेल.

क्रमांकविषयप्रश्न संख्यागुण
१)मराठी१५३०
२)इंग्रजी१५३०
३)सामान्य ज्ञान१५३०
४)बुद्धिमत्ता चाचणी१५३०
एकूण६०१२०

 शारीरिक चाचणी किंवा व्यवसायिक चाचणीसाठी ८० गुण म्हणजेच ४० प्रश्नांची  मांडणी केलेली असेल. अशा पद्धतीने एकूण २०० गुणांची ही परीक्षा असेल.

पशुसंवर्धन विभाग भरती २०२३ परीक्षा तारीख | Pashusanvardhan Vibhag Bharti 2023 Exam Date

महाराष्ट्र पशुसंवर्धन विभाग भरती २०२३  परीक्षा तारीख स्वतंत्रपणे अधिकृत वेबसाईट वरती जाहीर करण्यात येईल असे स्पष्ट करण्यात आले आहे. 

 यासाठी अधिकृत वेबसाईट. – वेबसाइट

Pashusanvardhan Vibhag Bharti Preparation पशुसंवर्धन विभाग भरती 2023 तयारी

 पशुसंवर्धन विभाग भरती 2023 तयारी करिता आवश्यक संदर्भ पुस्तकांची सूची येथे देत आहोत. 

 याव्यतिरिक्त खाली दिलेली संदर्भ ग्रंथ सूची देखील तुम्ही अभ्यासू शकता. 

Reference Books for Competitive Exam in Maharashtra.

TCS/IBPS Pattern Book

मी मागील 8 वर्ष MPSC आणि इतर स्पर्धा परीक्षेसंबंधी पुण्यामध्ये Classes घेत आहे, त्यामुळे या स्पर्धा कशा प्रकारे होतात, कोणते प्रश्न विचारले जातात आणि कोणत्या टॉपिक वर प्रश्न विचारले जातात या संबंधी ची पूर्ण माहिती मला असून मी माझा अनुभव या वेबसाइट द्वारे तुम्हा सर्वांपर्यंत पोचवायचा प्रयन्त करत आहे.

Leave a Comment