Mumbai Police Previous Year Question Paper 2024

Mumbai Police Previous Year Question Paper

विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रात लवकरच मोठी पोलीस भरती होणार आहे तुम्ही सुद्धा हजर मुंबई पोलीस भरती परीक्षेची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी मी आजच्या या लेखामध्ये घेऊन आलेलो आहे Mumbai Police Previous Year Question Paper 2024. त्यामुळे परीक्षेला जाण्यापूर्वी आजच्या या लेखात दिलेले प्रश्न एकदा नजरे खालून नक्की घाला जेणेकरून तुम्हाला मुंबई पोलीस भरती परीक्षा मध्ये प्रश्न कोणत्या प्रकारे विचारले त्यातील याची थोडी आयडिया येईल.

Mumbai Police Previous Year Question Paper 2024

Mumbai Police Previous Year Question Paper
Mumbai Police Previous Year Question Paper

1) खालीलपैकी कोणत्या देशाकरिता भारताने नवीन संसद इमारत बांधली आहे?

A. भूतान
B. अफगणिस्तान
C. नेपाळ
D. मालदीव

2) कोणत्या कमिटीने भारतीय क्रिकेट बोर्ड नवीन बनविण्याकरिता सर्वोच्च न्यायालयात अहवाल सादर केला आहे?

A. एच.एल. दत्तू कमिटी
B. आर. एम. लोधा कमिटी
C. चंद्रा कमिटी
D. यापैकी कोणताही नाही.

3) FIR म्हणजे काय?

A. Free Information Report
B. First Information Report
C. Frequent Information Report
D. Fast Information Report

4) खालीलपैकी कोणत्या केसेस सर्वोच्च न्यायालयाचे संसदेकडे मुस्लिम महिलांकरिता (Protection of Rights on Divorce) कायदा 1986 अन्वये वर्ग केल्या.

A. महम्मद अहमद खान वि. शाह बानो बेगम
B. सय्यद इकबाल हुसेनं वि. सय्यद
C. डॅनिअल लतिफ वि. युनियन ऑफ इंडिया
D. नुरसाहा खातुन वि. मो. कासिम

5) भारतात पहिली सर्व साधारण निवडणूक केव्हा झाली?

A. सन 1951-1952
B. सन 1950-51
C. सन 1949-50
D. सन 1948-49

6) AGMARK म्हणजे काय?

A. वस्तूचे नाव
B. विपणन संशोधन संस्था
C. सरकारी सहकारी संस्थेमार्फत पुरविण्यात येणारी अंडी
D. शेती उत्पादनावरील प्रमाणित चिन्ह

7) खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने भारतरत्न आणि निशान-ए-पाकिस्तान हे दोन्ही पुरस्कार मिळविलेले आहेत?

A. मोरारजी देसाई
B. महात्मा गांधी
C. अयुब खान
D. मौलाना अब्दुल कलाम आझाद

8) भारतातील कोणती पाणबुडी अणुशक्तीचा वापर करू शकते?

A. आयएनएस
B. आयएनएस अरिहंत
C. आयएनएस विराट
D. आयएनएस शत्रुशंक

9) खालीलपैकी कोणता भाग भारत व श्रीलंका यांना दुगाभतो?

A. पात्कची सामुद्रधनी 
B. मॅक मोहन रेषा
C. गाजा ट्रिप
D. रॅडक्लिफ लाईन

10) साखरेचे भांडार म्हणून खालीलपैकी कोणते राज्य ओळखले जाते?

A. मध्य प्रदेश
B. उत्तर प्रदेश
D. अरुणाचल प्रदेश
D. पंजाब

11) दक्षिण मध्य रेल्वे विभागाचे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे?

A. सिकंदराबाद
B. नागपूर
C. हावडा
D. यापैकी नाही

12) साबरमती नदीचा उगम खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगेतून होतो?

A. अरवली
B. पूर्व पाट
C. पश्चिम घाट
D. विध्य

13) खालीलपैकी कोणत्या राज्यात सर्वात जास्त नागरीकरण झालेले आहे?

A. राजस्थान
B. महाराष्ट्र
C. केरळ
D. पंजाब

14) गौतम बुद्धांनी प्रथम उपदेश केलेले सारनाथ हे ठिकाण खालीलपैकी कोठे आहे?

A. औरंगाबाद
B. वाराणसी
C. भोपाळ
D. पटना

15) भारतातील पहिली अणुभट्टी खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखली जाते?

A. रोहिणी
B. वैशाली
C. अप्सरा
D. कामिनी

16) खालीलपैकी कोणत्या ठिकाणी जहाज तोडण्याचे कार्य सर्वात जास्त केले जाते?

A. मुंचई
B. अलंग 
C. विझाग
D. कांडला

17) ‘यांगोन’ हे शहर खालीलपैकी कोठे आहे?

A. थायलंड
B. म्यानमार
C. इथोपिया
D. इस्टोनिया

18) खालीलपैकी कोणत्या वर्षी रॉबर्ट क्लाईव्ह बंगाल, बिहार आणि ओरिसा मुघल राज्यकत्र्त्यांकडून दिवाणी स्वीकारली?

A. सन 1761
B. सन 1765
C. सन 1778
D. सन 1781

19) ‘सत्यमेव जयते’ हे घोष वाक्य कोणी लोकप्रिय केले.

A. सरदार वल्लभभाई पटेल
B. लोकमान्य टिळक
C. मदन मोहन मालवीय
D. सरोजनी नायडू

20) 1853 मध्ये भारतास रेल्वे व टेलिग्राफ कोणी परिचित केले?

A. लॉर्ड डलहौसी 
B. लॉर्ड मिंटो
C. लॉर्ड कॅनिंग
D. लॉर्ड आयर्विन

Mumbai police bharti question paper in marathi

Mumbai police bharti question paper in marathi
Mumbai police bharti question paper in marathi

21) दौलताबादचा किल्ला कोणी बांधला?

A. रजिया सुलतान
B. इब्राहीम लोदी
C. मोहम्मदबिन तुगलक
D. सिकदर लोदी

22) जैन धर्मातील पहिला तिर्थनकार कोण होता?

A. पार्श्वनाथ
B. आदिनाथ
C. ऋषभदेव
D. महावीर

23) मैगस स्थेनिस या लेखकाने चंद्रगुप्त मौर्य यांच्या काळातील समाजव्यवस्थेचे वर्णन कोणत्या पुस्तकात केले आहे?

A. इंडीका
B. मोरीका
C. मंगनिका
D. यापैकी नाही

24) खालीलपैकी कोणते काव्य संस्कृत महाकवी कालिदास यांचे नाही?

A. पंचतंत्र
B. मेघदुतम्
C. कुमारसंभवम्
D. अभिव्यशाकुंतलम

25) खालीलपैकी कोणी कनोजच्या लढाईत हुमायुनचा पराभव केला व नवी दिल्ली येथील जुना किल्ला बांधला ?

A. शेर शाह सुरी
B. आदिलशहा
C. मलिकजुर
D. यापैकी नाही

26) पानिपतचे पहिले युद्ध कोणामध्ये झाले?

A. बाबर व दौलतखान
B. बाबर व राणासिंग
C. बाबर व आलम खान
D. बाबर व इब्राहीन लोदी

27) वास्को-द-गामा यांनी 1498 साली नवीन सागर मार्ग शोधून भारतातील कोणत्या ठिकाणी पोहोचले?

A. पुलिकत
B. करीकल
C. गोवा
D. कालिकत

28) सोमनाथ येथील मंदिर सन 1026 साली कोणी उद्धवस्त केले.

A. गजनीचा महंमद
B. मोहम्मद घोरी
C. बाबर
D. इब्राहीम लोदी

29) ‘कलर ब्लाईंड’ हा दृष्टिदोष असणारी व्यक्ती खालीलपैकी कोणत्या रंगामध्ये फरक करू शकत नाही?

A. पिवळा व हिरवा
B. काळा व निळा
C. लाल व हिरवा
D. निळा व हिरवा

30) ‘जल्लीकट्टू’ हा सण कोणत्या राज्यात साजरा करतात?

A. केरळ
B. कर्नाटक
C. आंध्र प्रदेश
D. तामिळनाडू

31) ‘कुर्द’ ही जमात खालीलपैकी कोणत्या देशात आढळत नाही?

A. इराक
B. सिरिया
C. तुर्कस्थान
D. पाकिस्तान

32) भारताचे राष्ट्रपती हे खालीलपैकी कोणत्या राज्यातील मुळचे रहिवाशी आहेत?

A. बिहार
B. उत्तर प्रदेश
C. मध्य प्रदेश
D. पश्चिम बंगाल

33) ‘अमरचित्र कथा’ हे लहान मुलांसाठीचे पुस्तक कोणी सुरू केले?

A. बालकवी
B. वि. वा. शिरवाडकर
C. अनंत पाई
D. कवी ग्रेस

34) सितार नावाचे वाद्य खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने शोधून काढले?

A. आमिर खुस्रो 
B. खय्याम
C. मीर बाकी
D. इलाही जमादार

35) भारताचे राष्ट्रपती खालीलपैकी कोण निवडते?

A. लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, विधान परिषद
B. लोकसभा, विधानसभा, राज्यसभा
C. लोकसभा, राज्यसभा, विधान परिषद
D. लोकसभा, विधानसभा, विधान परिषद

36) युरोपीयन लोकांना शिक्षा देण्याचे अधिकार भारतीय न्यायाधिशांना देणाऱ्या कायद्याचे नाव काय होते?

A. व्हर्नाक्युलर प्रेस अॅक्ट
B. ईल्बर्ट बील 
C. होमरूल कायदा
D. चार्टड अॅक्ट

37) खालीलपैकी कोणते झाड हे जमिनीतील पाण्याची पातळी खालवण्यासाठी कारणीभूत आहे?

A. पेरू
B. आंबा
C. निलगिरी
D. संत्रा

38) राष्ट्रपती व उपराष्ट्रपती हे हजर नसल्यास राष्ट्रपती पदाचा कार्यभार कोण पाहतो?

A. लोकसभा अध्यक्ष
B. पंतप्रधान
C. सरन्यायाधीश
D. महाअधिवक्ता

39) महाराष्ट्राच्या समुद्र किनाऱ्याची लांबी किती?

A. 278 कि.मी.
B. 720 कि.मी.
C. 7200 कि.मी.
D. 720 मैल

40) साल्हेर व मुल्हेर हे किल्ले कोणत्या जिल्ह्यात आहेत?

A. नदरबार
B. नाशिक
C. पुळे
D. ठाणे

Police Bharti Mumbai question paper

Police bharti mumbai question paper
Police bharti mumbai question paper

41) सात बेटांचे शहर हे कोणत्या शहराला म्हणतात?

A. चेन्नई
B. मुंबई
C. कोलकत्ता
D. दिल्ली

42) 2005 मध्ये मुंबई शहरातील कोणत्या नदीमुळे पूरस्थिती तयार झाली होती?

A. उल्हास
B. बोरी
C. मिठी
D. तोरणा

43) काळाघोडा उत्सव कोणत्या शहरात साजरा करण्यात येतो?

A. नाशिक
B. चेन्नई
C. पुणे
D. मुंबई

44) ‘आर्कऑलॉजी ऑफ नॉलेज’ हा ग्रंथ…. यांने लिहिला.

A. कार्ल मॉक्स
B. मायकेल फुको
C. सुसिओ फेबर
D. व्हॉल्टेअर

45) जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय…….. या शहराचे उत्खनन करताना सापडले.

A. दिल्ली
B. हडप्पा
C. उर
D. कोलकाता

46) भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र…. यांनी सुरू केले.

A. जेम्स ऑगस्टस हिकी
B. सर जॉन मार्शल
C. अॅलन ह्यूम
D. लोकमान्य टिळक

47) निवडणूक आयुक्तांची नेमणूक………….. करतात.

A. राष्ट्रपती
B. प्रधानमंत्री
C. लोकसभा सभापती
D. उपराष्ट्रपती

48) जस्टीस पार्टी या ब्राह्येतर चळवळीचे रूपांतर.. या राजकीय पक्षात झाले.

A. आसाम गण परिषद
B. शिवसेना
C. द्रविड मुनेत्र कळघम
D. जम्मू आणि काश्मिर नॅशनल कॉन्फरस

49) महाराष्ट्र शासनाचे लोकराज्य हे ……..आहे.

A. दैनिक
B. साप्ताहिक
C. मासिक
D. त्रैमासिक

50) पाचड येथे…….. यांची समाधी आहे.

A. राजामाता जिजाबाई
B. कस्तुरबा गांधी
C. महादजी शिंदे
D. तानाजी मालुसरे

51) चार्ल्स डार्विनने…. या ग्रंथात उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला.

A. हिस्ट्री ऑफ ऑर्कियालॉजी
B. ओरीजीन ऑफ स्पीसीज
C. ओरिजीन ऑफ बॉटनी
D. एशियाटिक रिसर्पस

52) भारतात इ.स. 1856 मध्ये…. यांनी पुरातत्व विभागाची स्थापना केली.

A. लॉर्ड रॉबिन्सन
B. सर जॉन मार्शल
C. राखालदास बॅनर्जी
D. लॉर्ड डलहौसी

53) ज्ञान मिळविण्यासाठी प्रश्न पद्धतीचा वापर…. करत असे.

A. प्लेटो
B. संक्रिटीस
C. ग्लेसर फेल्ड
D. हिरोडोटस

54) ‘कॉम्पॅक्ट डिस्क’ ही कोणी शोधून काढली?

A. गहेबर्ग
B. ग्रहम बेल
C. फिलीप्स व सोनी
D. जॉन न्युसन

55) खालीलपैकी कोणते पाण्यात मिसळणारे विटॅमिन आहे?

A. विटॅमिन-सी 
B. विटॅमिन-डी
C. विटॅमिन-३
D. विटॅमिन-के

56) खालीलपैकी कोणता मानवनिर्मित प्रथम उपग्रह आहे?

A. स्कायलॅब
B. स्पुटनिक-1
C. आर्यभट्ट
D. इनसेंट 3 ई

57) इस्रोचे पुर्ण नाव काय?

A. इंटर नॅशनल स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन
B. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेसन
C. इंडस्ट्रिअल सिक्युरिटी अॅन्ड रिसर्च ऑर्गनायझेशन
D. यापैकी नाही.

58) वाळूवर चालणे हे कॉक्रीट रोडवर चालण्यापेक्षा कठीण आहे. कारण-

A. वाळू मऊ आहे.
B. घर्षण कमी आहे
C. घर्षण जास्त आहे
D. यापैकी नाही

59) हॅलेचा धुमकेतू किती वर्षातून एकदा दिसतो.

A. 40 वर्षाने
B. 50 वर्षान
C. 76 वर्षानी
D. 86 वर्षानी

60) खालीलपैकी कोणते ठिकाण पेट्रोलियम पदार्थाच्या निर्मितीशी संबंधित नाही.

A. बॉम्बे हाय
B. कावेरी बेसिन
C. अंकलेश्वर
D. कोचीन

Mumbai police bharti Exam Paper

Mumbai police bharti Exam Paper
Mumbai police bharti Exam Paper

61) पूर्ण वाढ झालेल्या मनुष्यामध्ये किती हाडे असतात?

A. 202
B. 204
C 206
D. 208

62) इलेक्ट्रीक बल्बमध्ये खालीलपैकी कोणता वायू भरलेला असतो?

A. नायट्रोजन 
B. हायड्रोजन
C. कार्बन डायऑक्साईड
D. ऑक्सिजन

63) ‘नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट अॅथोरटी’चे प्रमुख कोण आहेत?

A. पंतप्रधान
B. गृहमंत्री
C. राष्ट्रपती
D. यापैकी नाही

64) खालीलपैकी काय प्रदूषण करीत नाही?

A. बरमल पॉवर प्रकल्प
B. न्युक्लिअर पॉवर प्रकल्प
C. हायड्रो इलेक्ट्रीक पॉवर प्रकल्प
D. अॅटॉमिक पावर प्रकल्प

65) आम्ल वर्षा ही खालीलपैकी कोणत्या वायुच्या हवेतील प्रदुषणामुळे होते?

A. CO₂
B. CO
C. NH,
D. NOX & SO2

66) चिपको चळवळ’ ही कशाशी संबंधित आहे?

A. वृक्षतोड
B. जलसंवर्धन
C. व्याघ्र संवर्धन
D. धरण संरक्षण

67) राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी अनुसंधान संस्था ही कोठे आहे?

A. राची
B. कटक
C. जमशेदपूर
D. नागपूर

68) सापेक्षताचा सिद्धांत कोणत्या संशोधकाशी संबंधित आहे?

A. इसेक न्युटन
B. एल्बर्ट आइनस्टाइन 
C. ग्रहम बेल
D. लियनार्दो दा विची

69) भारतीय राज्यघटनामध्ये कुठल्या कलमात भारताचे प्रत्येक नागरिकाचे मुलभूत कर्तव्य नमुद केलेली असेल?

A. 53 क
B. 50 क
C. 52 क
D. 51 क

70) तंबाखुमध्ये ……….. हे धोकादायक रसायन असते.

A. युरिया
B. निकोटिन 
C. युरिक आम्ल
D. कॅल्शिअम कार्बोनेट

71) स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी 1904 मध्ये कोणती क्रांतीकारकांची संघटना स्थापना केली.

A. अभिनव भारत 
B. अनुशीलन समिती
C. गदर
D. भारत सेवक समाज

72) महाराष्ट्रात उच्च न्यायालयाचे खंडपीठ कुठे नाही?

A. औरंगाबाद
B. नागपूर
C. पुणे 
D. ठाणे

73) 26 नोव्हेंबर, 2008 रोजी मुंबई येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय पातळीवर…. ही तपास यंत्रणा स्थापन करण्यात आली?

A. नॅशनल इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सी
B. दहशतवाद विरोधी पथक
C. केंद्रीय अन्वेषण ब्युरो
D. फोर्स वन

74) भारताच्या राष्ट्रीय फुटबॉल संघाचा कर्णधार कोण आहे?

A. बाईचुंग भूटिया
B. सुनिल छेत्री
C. हितेश वर्मा
D. अनिरुद्ध थापा

75) देशातील पहिला विधी अधिकारी कोणास संबोधतात?

A. चिफ जस्टीस ऑफ इंडिया
B. सॉलिसीटर जनरल ऑफ इंडिया
C. अॅटर्नी जनरल ऑफ इंडिया
D. अॅडव्होकेट जनरल ऑफ इंडिया

76) भारतीय राज्यघटनेत सेक्युलर आणि सोशालिस्ट हे शब्द कितव्या घटनादुरुस्ती अन्वये समाविष्ट करण्यात आले?

A. 24 ची
B. 25 वी
C. 42 वी
D. 44 ची

77) ‘वंदे मातरम्’ हे गीत खालीलपैकी कोणत्या साहित्यातील आहे?

A. गितांजली
B. आनंद मठ 
C. उत्सर्ग
D. यापैकी कोणतेही नाही

78) मूलभूत हक्क खालीलपैकी कोणत्या कायद्यान्वाये थांबविण्यात आले?

A. राईट टू प्रॉपर्टी
B. राईट टु फ्रिडम ऑफ स्पिच
C. राईट टू कॉन्स्टीट्युशन रेमेडीज
D. राईट डु इक्वॅलिटी

79) खालीलपैकी कोणती घटनात्मक संस्था नाही?

A. इलेक्शन कमिशन
B. फायनान्स कमिशन
C. इंटर स्टेट कौन्सिल
D. नॅशनल अॅडव्हायझरी कौन्सिल

80) संसदेच्या प्रत्येक बैठकीच्या पहिल्या तासाला  …. म्हणून संबोधतात?

A. शून्य तास
B. प्रश्नांचा तास
C. वादविवाद तास
D. चर्चा तास

Navi Mumbai police Bharti questions paper

Navi Mumbai police bharti questions paper
Navi Mumbai police bharti questions paper

81) भारतात खालीलपैकी कोणते अधिकार पंचायतीस देण्यात आलेले नाहीत?

A. आर्थिक विकासासाठी योजना तयार करणे,
B. सामाजिक न्याय वाढविणाऱ्या योजनांना प्रोत्साहन देणे,
C. कर, शुल्क आणि फी इत्यादी गोळा करणे.
D. कायदा व सुव्यवस्था राखणे

82) खालील शब्दांपैकी मराठी खीलिंग शब्द ओळखा

A. रूपचा
B. झाडू
C. गरज
D. चरखा

83) शाश्वत म्हणजे…………

A. नश्वर असते
B. कायम न टिकणारे
C. तकलादू
D. कायम टिकणारे

84) ‘भाजीपाला घेऊन बाबा घरी आले.’ अधोरेखित शब्दाचा समास ओळखा.

A. समाहार
B. इतरेतर
C. द्विगू
D. यापैकी नाही

85) चुकीची जोडी ओळखा

A. सुख-आनंद 
B. अनाथ-सनाथ
C. बहुत थोडके
D. अन्यायी-न्यायी

86) ‘तू वकिली कर’ हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे?

A. विधानार्थी
B. आज्ञार्थी
C. प्रश्नार्थी
D. उद्‌गारवाचक

87) ‘केवडी रंगांची उधळण झाली आहे बाहेर.’ या वाक्यातील नाम ओळखा.

A. रंग
B. उधळण
C. आहे
D. बाहर

88) ‘आकाशाला भिडणे’ या वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा.

A. उंची वाढणे
B. सर्वोच्च बिंदू गाठणे 
C. उंच उडणे
D. आभाळात जाणे

89) चुकीची जोडी ओळखा.

A. उष्ण – थंड
B. भेद – साम्य
C. समता – सारखे
D. सुगंध – दुर्गंध

90) ‘कूस बदलणे’ या वाक्यप्रचाराचा अर्थ

A. पक्ष बदलणे
B. गाव बदलणे
C. एका कुशीवरून दुसऱ्या कुशीवर वळणे
D. वर्ग बदलणे

Mumbai police bharti sarav paper

Mumbai police bharti sarav paper
Mumbai police bharti sarav paper

91) गटात व बसणारा शब्द लिहा.

A. चित्र
B. शिल्प
C. रंगीत
D. संगीत

92) खालील अपूर्णांकामध्ये जास्त किंमत कोणती?

A. 3/5
B. 4/3
C. 2/5
D. 1/2

93) पुढील क्रमवारीतील गहाळ नबंर भरा.

1, 1, 2, 3, 5, 8……
A. 21
B. 8
C. 11
D. 13 

94) हुड फुस हे …………… केवलप्रयोगी अव्यय आहे.

A. शोकदर्शक
B. तिरस्कारदर्शक 
C. मौनदर्शक
D. विरोधदर्शक

95) तीन अंकांची बेरीज 132 आहे. पहिला अंक दुसऱ्याच्या दुप्पट आणि तिसरा अंक पहिल्याच्या 1/3 आहे तर दुसरा अंक कोणता?

A. 32
B. 36
C. 48
D. 60

96) एका रेल्वे सरासरी 40 कि.मी. प्रति तास या वेगाने धावल्यास अंतिम ठिकाणी वेळेवर पोहोचते. जेव्हा तिचा सरासरी वेग 35 कि. मी. प्रति तास होतो तेव्हा ती तिच्या अंतिम ठिकाणी 15 मिनिट उशीरा पोहोचते तर त्या रेल्वेने कापलेले अंतर किती?

A. 30 कि.मी.
B. 40 कि.मी.
C. 70 कि.मी.
D. 80 कि.मी.

97) झुलन गोस्वामी ही तिच्या करिअरच्या 18 व्या इनिंगमध्ये 102 धावा काढते. आणि त्यामुळे तिची धावांची सरासरी 5 ने वाढते. तर 18 व्या इनिंग नंतर तिची सरासरी किती?

A. 17
B. 21
C. 26
D. 28

98) एका स्टॅण्डवर काही मोटार सायकली व तीन चाकी रिक्षा उभ्या आहेत. त्यांच्या चाकांची एकत्रित संख्या 45 असून हॅण्डलची संख्या 19 आहे तर मोटार सायकली व तीन चाकी रिक्षा अनुक्रमे किती आहेत?

A. 12, 7
B. 7, 12
C 13,6
D. 6, 13

99) एका धावण्याच्या शर्यतीत अमरच्या पुढे 7 स्पर्धक होते. अशोक अमरच्या मागे 4 था होता. अशोकचा शेवटून 8 वा क्रमांक होता तर त्या शर्यतीत एकूण किती स्पर्धेक होते?

A. 19
B. 20
C. 21
D. 18

100) एका दुकानदाराने 10 रु. प्रति बल्ब या दराने 200 बल्ब आणले. त्यातील 10 बल्ब खराब निघाल्याने त्याने ते फेकून दिले. उरलेले बल्ब त्याने 12 रु. प्रति बल्ब दराने विकले तर त्याला किती टक्के फायदा झाला?

A12
B. 14
C. 16
D. 17

हे देखील वाचा

Dharashiv police Bharti Question Paper

Maharashtra Police Bharti Sarav Paper

मी मागील 8 वर्ष MPSC आणि इतर स्पर्धा परीक्षेसंबंधी पुण्यामध्ये Classes घेत आहे, त्यामुळे या स्पर्धा कशा प्रकारे होतात, कोणते प्रश्न विचारले जातात आणि कोणत्या टॉपिक वर प्रश्न विचारले जातात या संबंधी ची पूर्ण माहिती मला असून मी माझा अनुभव या वेबसाइट द्वारे तुम्हा सर्वांपर्यंत पोचवायचा प्रयन्त करत आहे.

Leave a Comment