Maharashtra Samaj Sudharak MCQ Quiz in Marathi

Maharashtra Samaj Sudharak MCQ Quiz in Marathi

Maharashtra Samaj Sudharak MCQ Quiz in Marathi: विद्यार्थीमित्रांनो, आपल्या महाराष्ट्रात अनेक महान समाजसुधारक होऊन गेले आहेत जे समाजात केलेल्या कार्यासाठी आज अमर झालेले आहेत. या सर्वच समाजसुधारकांनी समाजविरुद्ध जाऊन समाज सुधारणेसाठी खूप मोठे कार्य केले आहे. मित्रांनो जर तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत तर समाजसुधारकासंबंधी प्रश्न सर्वच स्पर्धापरीक्षांमध्ये विचारले जातात.

Maharashtra Samaj Sudharak MCQ Quiz in Marathi 2024

1. सन 1910 च्या अखेरीस मुकुंदराव पाटील या ब्राम्हणोत्तर नेत्याने…… हे साप्ताहिक सुरू केले होते?

A. ज्ञानसागर
B. भ्रममती
C. दिनमित्र
D. गरिबांचा कैवारी

2. …… हा जहाल ब्राम्हणोत्तर नेता छत्रपती शाहूंच्या उत्तेजनेने स्थापन करण्यात आलेल्या तरुण मराठा या वृत्तपत्राचा संपादक होता?

A. वालचंद कोठारी
B. दिनकर शंकर जवळकर
C. मुकुंदराव पाटील
D. भास्करराव जाधव

3. ब्राह्मणांची बाजू सरकारसमोर मांडणाच्या दृष्टिकोनातून अण्णासाहेब लठ्ठे यांनी सन 1918 मध्ये सुरू केलेले इंग्रजी पत्र…..

A. जस्टीस
B. डेक्कन रयत
C. छत्रपती
D. यांपैकी नाही

4. खालीलपैकी कोणाचा उल्लेख प्रार्थना समाजाचे क्रियाशील कार्यकर्ते म्हणून करता येणार नाही?

A. आत्माराम पांडुरंग
B. महादेव गोविंद रानडे
C. विष्णुशास्त्री चिपळूणकर
D. रा. गो. भांडारकर

5. स्त्री शिक्षणाचे कार्य करणाऱ्या स्टुडंट्स लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी चे पहिले अध्यक्ष व मुंबईतील राणीचा बाग(जिजामाता उद्यान), अल्बर्ट म्युझियम, पेटिट इन्स्टिट्यूट आधी संस्थांच्या स्थापनेत पुढाकार घेणारे व्यक्तिमत्व म्हणून आपणास…… यांचा उल्लेख करावा लागेल?

A. भाऊ दाजी लाड
B. फिरोजशहा मेहता
C. नाना शंकरशेठ
D. बेहरामजी मलबारी

6. गुजरातमधील कच्छ व काठेवाड या भागांतील बालकन्या-हत्येच्या प्रथेवर शोध निबंध लिहून या अनिष्ट प्रथेकडे समाजाचे त्याचे लक्ष वेधले….

A. डॉ. भाऊ दाजी लाड
B. मनीभाई देसाई
C. वैकुंठभाई मेहता
D. ठक्कर बाप्पा

7. लोकमान्य टिळकांनी आपल्या….. या ग्रंथातून वेदांचा कालनिर्णय हा विषय हाताळला व वेदांचा काळ सुमारे इ. स. पूर्व सुमारे 4500 वर्ष असल्याचे प्रतिपादन केले?

A. डी आर्किट होम इन दी वेदाज
B. वेदांगज्योतिष
C. दि ओरीओन 
D. गीतारहस्य

8. ……. या ग्रंथाच्या माध्यमातून लोकमान्य टिळकांनी वेदांमधील ऋचांचा आधार घेऊन आर्यांचे मूलस्थान उत्तर ध्रुव प्रदेशात असल्याचे आग्रहाने प्रतिपादले?

A. डी आर्किट होम इन दी वेदाज 
B. केसरी
C. गीतारहस्य
D. वेदांगज्योतिष

9. सन 1922 मध्ये छत्रपती मेळावा सुरू करणारे ब्राम्हणोत्तर लीगचे नेते कोण?

A. ‘भाला’कार भोपटकर
B. केशवराव जेधे
C. मुकुंदराव पाटील
D. भास्करराव जाधव

10. हिंदू धर्मीय बाल-विधवांच्या प्रश्नांचा उहापोह करणाऱ्या ‘स्त्रीधर्मनीती’ व ‘दि हाय कास्ट हिंदू वुमन’ या ग्रंथाच्या कर्त्या…..?

A. पंडिता रमाबाई
B. रमाबाई रानडे
C. इरावती कर्वे
D. सरोजिनी नायडू

11. आधुनिक मराठी गद्याचे जनक म्हणून ओळखले जाणारे ‘निबंधमाला’ कार …

A. कवी केशवसुत
B. शी. म. परांजपे
C. कृ. प. खाडिलकर
D. विष्णुशास्त्री चिपळूणकर

12. आळंदीत जाऊन 1583 मध्ये ज्ञानेश्वरांच्या समाधीचा जीर्णोद्धार केला व त्यानंतर 1584 मध्ये ज्ञानेश्वरीच्या शुद्ध-अशुद्ध पाठांची चिकित्सा करून ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत तयार केली….

A. संत एकनाथ
B. समर्थ रामदास
C. संत तुकाराम
D. दासोपंत

13. संत बहिणाबाई खालीलपैकी कोणास समकालीन होत्या?

A. संत ज्ञानेश्वर
B. संत नामदेव
C. संत एकनाथ
D. संत तुकाराम

14. ……. हिचा उल्लेख ‘आद्य मराठी कवियत्री’ असा करणे चुकीचे ठरणार नाही?

A. संत मुक्ताबाई
B. महदंबा( महदायीसा)
C. संत जनाबाई
D. संत कान्होपात्रा

15. पुण्यातील ‘सार्वजनिक सभे’वर लोकमान्य टिळकांनी व त्यांच्या अनुयायांनी वर्चस्व प्रस्थापित केल्यानंतर सार्वजनिक सभेतून बाहेर पडून सन 1896 मध्ये येथे डेक्कन सभेची स्थापना कोणी केली?

A. गो.ग आगरकर
B. विष्णुशास्त्री चिपळूणकर
C. सार्वजनिक काका
D. न्या. म. गो. रानडे

16. इ.स. सन 1924 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बहिष्कृत हितकारणी ही संस्था स्थापन केली….. हे या संस्थेचे ब्रीदवाक्य होते?

A. ‘जिंकू किंवा मरू’
B. ‘शिकवा, चेतवा व संघटित करा’
C. ‘हाती घ्याल ते तडीस न्या’
D. ‘कमवा आणि शिका’

17. राजश्री शाहू यांच्या मृत्यूनंतर….. यांनी ‘सर्चलाईट विझला’ या मथळ्याचा मृत्युलेख लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या?

A. महर्षी वी.रा. शिंदे
B. मुकुंदराव पाटील
C. दिनकरराव जवळकर
D. प्रबोधनकार ठाकूर

18. 30 नोव्हेंबर 1880 रोजी लॉर्ड लिटन च्या भेटीच्या निमित्ताने पुणे शहराचे सुशोभीकरण करण्यासाठी करावयाच्या खर्चास विरोध करणारे तत्कालीन पुणे नगरपालिकेचे नगरसेवक कोण?

A. लोकमान्य टिळक
B. नारायणराव लोखंडे
C. महात्मा ज्योतिबा फुले
D. गोपाळ हरी देशमुख

19. ‘मराठी क्षत्रिय आहेत’ असे शास्त्राद्वारे प्रतिपादन करून…… यांनी वेदोक्त प्रकरणे शाहू महाराजांचा पक्ष घेतला?

A. लोकमान्य टिळक
B. विष्णुशास्त्री चिपळूणकर
C. भाऊशास्त्री लेले
D. राजारामशास्त्री भागवत

20. ‘अर्ली हिस्टरी ऑफ डेक्कन’ या ग्रंथाचे कर्ते कोण?

A. न्या. म.गो. रानडे
B. लोकमान्य टिळक
C. गो.ग आगरकर
D. रा. गो. भांडारकर 

Samajsudharak general knowledge in Marathi

21. 11 मार्च 1889 रोजी पंडिता रमाबाई यांनी अनाथ व विधवा महिलांसाठी…… ही संस्था सुरू केली

A. आनंदभवन
B. शारदासदन
C. सेवासदन
D. मुक्तीसदन

22. …… यांनी पंढरपूरचे विठ्ठल मंदिर अनुसूचित जातींना खुले व्हावे म्हणून महाराष्ट्रात जनमत संघटित केले होते आणि 1946 च्या कार्तिकी एकादशीस ‘बोर्डी’ येथे उपोषण केले होते?

A. ठक्कर बाप्पा
B. एस. एम. जोशी
C. साने गुरुजी
D. सेनापती बापट

23. …… यांनी प्रथम मुंबईत गिरणी कामगारांची चळवळ सुरू केली त्यामुळे ते महाराष्ट्रातील कामगार चळवळीचे जनक मानले जातात?

A. महात्मा ज्योतिराव फुले
B. नाना शंकरशेठ
C. कासवजी दावर
D. नारायण मेघाजी लोखंडे

24. “हिंदू लोकांमध्ये मूर्खपणा वाढवा तो दूर होण्याकरिता हे गुरु दूरदेशातून ईश्वराने पाठवले आहेत……. ईश्वराने ही शहाणपणाने योजना केली आहे; लोकांची झोप जाण्यास दुसरा इलाज नव्हता”. 4 फेब्रुवारी 1849 रोजीच्या आपल्या पत्रात असे कोणी म्हटले आहे?

A. सार्वजनिक काका
B. लोकहितवादी
C. नानाशंकर शेठ
D. महात्मा ज्योतिराव फुले

25. सन 1877 मध्ये ज्योतिबा फुले यांचे अनुयायी…… यांनी पुण्यात ‘दीनबंधू’ हे पत्र सुरू केले?

A. नारायण मेघाजी लोखंडे
B. दिनकर शंकरराव जवळकर
C. विष्णू विष्णुशास्त्री चिपळूणकर
D. कृष्णाजी पांडुरंग भालेकर

26. हिंदू धर्मातील अनिष्ट प्रथांना विरोध करणाऱ्या व विधवा पुनर्विवाह, स्त्री शिक्षण आदी बाबींचा पुरस्कार करणाऱ्या……. यांनी रोजी पुनरुज्जीवनवादी सुधारणावादाचा किंवा परंपरानिष्ठ परिवर्तन वादाचा पाया घातला?

A. डॉ. भाऊ दाजी लाड
B. बाळशास्त्री जांभेकर
C. विष्णुशास्त्री चिपळूणकर
D. गोपाळ गणेश आगरकर

27. ‘मुंबईचे आद्य शिल्पकार व पहिले नागरिक’ या शब्दात सुप्रसिद्ध इतिहासकार प्रा. न. र. फाटक यांनी कोणास गौरविले आहे?

A.दादाभाई नवरोजी
B. महादेव गोविंद रानडे
C. जगन्नाथ शंकरशेठ मुरकुटे
D. यांपैकी नाही

28. ‘लोकहितवादी’ यांचे मूळ आडनाव काय होते?

A. देशमुख
B. गोखले
C. पडवळ
D. सिद्धये 

29. सप्टेंबर, 1917 मध्ये मद्रासमधील ब्राम्हणोत्तर नेत्यांनी ‘साउथ इंडियन लिबरल फेडरेशन’ ची स्थापना केली हि संघटना…… या नावाने प्रसिद्ध झाली?

A. समता पार्टी
B. चेड्डीआर पार्टी
C. जस्टीस पार्टी
D. डेक्कन पार्टी

30. तिच्या आधारे मतदारसंघाची मागणी करणे घातक असल्याचा इशारा देणाऱ्या भगवंत बळवंत पाळेकर यांनी सन 1917 मध्ये…… नावाचे साप्ताहिक सुरू केले?

A. दिनमित्र
B. जस्टीस
C. जागृती
D. विद्या विलास

31. लोकमान्य टिळकांच्या केसरीला उत्तर देण्यासाठी वालचंद कोठारी या ब्राम्हणोत्तर नेत्याने 19 जुलै 1917 रोजी……. हे पत्र सुरू केले?

A. वनराज
B. भगवा झेंडा
C. विजयी मराठा
D. जागरूक

32. ‘चैतन्यगाथा’ हा सुप्रसिद्ध ग्रंथ…… या क्रांतिकारक स्वातंत्र्ययोध्याने लिहिला आहे?

A. सेनापती बापट
B. वि. दा. सावरकर
C. भाई डांगे
D. भाई मिरजकर

33. खालीलपैकी कोणाचा उल्लेख थोर गांधीवादी विचारवंत व भारतातील सहकारी चळवळीचे एक आद्य प्रणेते म्हणून करता येईल?

A. वि. म. दांडेकर
B. वैकुंठभाई मेहता
C. मानवन्द्रे नाथ रॉय
D. धनंजय राव गाडगीळ

34. समाजसेवक बाबा आमटे यांनी खालीलपैकी कोणता किताब भारत सरकारला परत केले?

A. पद्मविभूषण
B. रॅमन मॅगसेसे
C. आंतरराष्ट्रीय गांधी शांतता पुरस्कार
D. डॉ बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार

35. महाराष्ट्र दर्शन या ग्रंथाचे लेखक कोण आहेत?

A. वि. वा. शिरवाडकर
B. इरावती कर्वे
C. ग. बा. सरदार
D. शिवाजी सावंत

Samajsudharak prashn uttar in Marathi

36. जहाल अग्रलेखासाठी प्रसिद्ध असलेले संपादक…… हे स्वराज्य या वृत्तपत्राशी, पहिला पांडव या नाटकाशी व विंध्याचल या प्रसिद्ध कादंबरीचे निगडित आहेत.

A. प्रबोधनकार ठाकरे
B. शि. म. परांजपे
C. गो. ग. आगरकर
D. लोकमान्य टिळक

37. चार वेळा मुंबई महानगरपालिकेचे अध्यक्षपद भूषवणाऱ्या काँग्रेसच्या आद्यपर्वातील….. या राष्ट्रवादी नेतास मुंबईतील नागरी शासनाचा पिता म्हणून गौरविले जाते?

A. फिरोजशहा मेहता
B. जमशेदजी जीजीभॉय
C. नाना शंकर शेठ
D. दादाभाई नवरोजी

38. सत्यशोधक समाजाचे कार्यकर्ते व एक क्रांतिकारक असलेल्या….. यांनी सन 1925 मध्ये बलुतेदार-कुळांचा संप घडवून आणून समाजपरिवर्तनाच्या दिशेने एक आगळे पाऊल टाकले?

A. सेनापती बापट
B. यशवंतराव चव्हाण
C. स्वातंत्र्यवीर सावरकर
D. क्रांतिसिंह नाना पाटील

39. आदिवासी दिनाच्या उद्धारासाठी आयुष्य वेचणारे थोर गुजराती समाजसेवक, आदिवासी सेवा मंडळाचे संस्थापक व भारत सेवक समाजाचे कार्यकर्ते……?

A. मनीभाई देसाई
B. वैकुंठभाई मेहता
C. ठक्कर बाप्पा
D. फिरोजशहा मेहता

40. मुंबई गिरणी कामगार संघ 1884 या भारतातील पहिल्या कामगार संघटनेचे व महात्मा फुले यांचे सत्यशोधक समाजातील निष्ठावंत सहकारी…..

A. कृष्णराव भालेराव
B. केशवराव जेधे
C. नारायण मेघाजी लोखंडे
D. मुकुंदराव पाटील

41. परमहंस सभेचे सभासद असलेल्या…… यांनी हिंदू धर्मातील अनिष्ट रूढींना प्रखर विरोध करून स्त्री शिक्षण व विधवा पुनर्विवाह यांचा जोरदार पुरस्कार केला. तथापि त्यांनी स्वतः ख्रिस्ती धर्म स्वीकारलेला असल्याने त्यांच्या या प्रयत्नांची फारशी दखल घेतली गेली नाही?

A. डॉ. भाऊ दाजी लाड
B. गोपाळ हरी देशमुख
C. बाबा पदमनजी
D. रेव्हरंड ना.वा. टिळक

42. सन 1848 ते 1850 या काळात गोपाळ हरी देशमुख यांनी ‘प्रभाकर’ या साप्ताहिकातून लिहिलेली पत्रे ‘शतपत्रे’ म्हणून ओळखले जातात. प्रत्यक्षात या पत्रांची संख्या किती आहे?

A. 95
B. 108
C. 102
D. 99

43. एकेकाळी मुंबईचे अनभिषिक्त सम्राट गणले जाणारे…… हे जसे मुंबई विधिमंडळावर निवड होणारे ‘पहिले हिंदी सदस्य’ आणि मुंबई विद्यापीठाचे ‘पहिले फेलो’ होत; तसेच ते ‘मुंबई रेल्वेचे पहिले प्रवासी’ ही होत.

A. फिरोजशहा मेहता
B. जगन्नाथ शंकरशेठ मुरकुटे
C. भाऊ दाजी लाड
D. महादेव गोविंद रानडे

44. रेव्हरंड हिल्सन यांच्यासारख्या ख्रिस्ती धर्मउपदेशाकाबरोबर जाहीर वादविवाद करून हिंदू धर्मावरील पिकेस सडेतोड प्रत्युत्तर देणारे ‘हिंदू धर्माभिमानी’ म्हणून खालीलपैकी कोणाचा उल्लेख करावा लागेल?

A. विष्णुशास्त्री पंडित
B. बाळशास्त्री जांभेकर
C. विष्णू भिकाजी गोखले उर्फ विष्णुबुवा ब्रह्मचारी
D. डॉ. भाऊ दाजी लाड

45. वज्रसूची या ग्रंथाच्या आधारे तुकाराम तात्या पडवळ यांनी…… या टोपण नावाने सन 1861 मध्ये ‘जातीभेद विवेकसार’ हा ग्रंथ प्रसिद्ध केला?

A. एक हिंदू
B. एक ब्रिजवासी आर्य
C. एक परमहंस
D. एक सत्यशोधक

46. एक समाजसेवक व संशोधक म्हणून मान्यता पावलेल्या…… यांनी आपल्या मूळ वैद्यकीय व्यवसायाचाही उपयोग समाजसेवेसाठी केला व धर्मादाय दवाखाना चालविला?

A. लोकहितवादी
B. बाबा पदमजी
C. डॉ. भाऊ दाजी लाड
D. नाना शंकर शेठ

47. सरकारी नोकरी सोडून विजय मराठा वृत्तपत्र पुण्यात सुरू करणारे ब्राह्मण उत्तर नेते?

A. मुकुंदराव पाटील
B. श्रीपतराव शिंदे
C. केशवराव ठाकरे
D. भास्करराव जाधव

48. छत्रपती शाहूंच्या हयातीतच वेळप्रसंगी त्यांच्यावरही टीका करणारी प्रबोधन या पत्राचे कर्ते कोण?

A. दिनकर शंकर जवळकर
B. केशवराव ठाकरे
C. मुकुंदराव पाटील
D. भाई माधवराव बागल

49. आंतरजातीय विवाह शास्त्रसमंत नसले तरी ते कायदेशीर मानले जावेत अशा आशयाचे विधेयक…… यांनी सन 1918 मध्ये मध्यवर्ती कायदेमंडळात मांडले होते?

A. वालचंद कोठारी
B. विठ्ठलभाई पटेल
C. बेहरामजी मलबारी
D. तात्यासाहेब केळकर

50. व्यक्ती वादाला भौतिकवाद व बुद्धिवाद यांची जोड देऊन सर्वांगीण सामाजिक सुधारणांचा आग्रह धरणारे सुधारक म्हणून ओळखले जातात?

A. गोपाळकृष्ण गोखले
B. महात्मा फुले
C. गोपाळ गणेश आगरकर
D. राजश्री शाहू महाराज

तर विद्यार्थीमित्रांनो, तुम्हाला Maharashtra Samaj Sudharak MCQ Quiz in Marathi या लेखात काही चुकीचे वाटत असेल किंव्हा तुम्हाला काही समजले नसेल तर कंमेंट करून नक्की सांगा. तसेच तुम्हाला महाराष्ट्रातील समाजसुधारक या टॉपिक वर अजून PYQ प्रश्न हवे असतील तर कंमेंट मध्ये नक्की सांगा.

हे देखील वाचा

भारतातील काही समाजसुधारक व पदव्या

महाराष्ट्रातील 18 व्या शतकातील समाजसुधारक

महाराष्ट्रातील प्रमुख समाजसुधारक

मी मागील 8 वर्ष MPSC आणि इतर स्पर्धा परीक्षेसंबंधी पुण्यामध्ये Classes घेत आहे, त्यामुळे या स्पर्धा कशा प्रकारे होतात, कोणते प्रश्न विचारले जातात आणि कोणत्या टॉपिक वर प्रश्न विचारले जातात या संबंधी ची पूर्ण माहिती मला असून मी माझा अनुभव या वेबसाइट द्वारे तुम्हा सर्वांपर्यंत पोचवायचा प्रयन्त करत आहे.

Leave a Comment