MPSC Helpline Number For Queries and Problems
महाराष्ट्र लोकसेवा आयोग विविध परीक्षा घेत असते या परीक्षांसाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने फॉर्म भरावे लागतात. हे फॉर्म भरत असताना विद्यार्थी/उमेदवारांना विविध प्रकारच्या अडचणी येत असतात. परीक्षेसाठी चे असणारे शुल्क अदा करताना सुद्धा विविध अडचणी निर्माण होत असतात.
काही वेळेस अधिकृत संकेतस्थळावर काही व्यत्यय असल्यास उमेदवारांना परीक्षेसाठी अर्ज करताना अडचणी निर्माण होतात. अशा वेळेस विद्यार्थ्यांना उमेदवारांना योग्य मार्गदर्शन पर सल्ल्याची आवश्यकता असते. किंबहुना सर्वच प्रक्रिया हि ऑनलाईन पद्धतीने होत असल्याने माहिती मिळविण्यास खात्रीशीर स्त्रोत उपलब्ध होत नाही.अशा परिस्थितीत टोल फ्री हेल्पलाईन विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे ठरू शकते.
महाराष्ट्रामध्ये सर्व परीक्षा ऑनलाईन होत असताना दिनांक 11 मार्च 2021 रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोग कडून एक प्रसिद्धी पत्रक जारी करण्यात आले. याद्वारे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने टोलफ्री क्रमांकाची घोषणा केली आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून विविध भरती प्रक्रिया राबवण्यात येतात. भरती प्रक्रिया राबवत असताना उमेदवारांना विविध शंका येत असतात. विविध अडचणी निर्माण होत असतात. या अडचणींच्या निवारणासाठी आयोगाकडून क्रमांक ची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
MPSC Helpline Number Toll Free
- १८०० १२३४ २७५
- १८०० २६७३ ८८९
- या MPSC Helpline Number कोणत्या प्रकारची माहिती मिळेल?
या MPSC Helpline Number वरती ऑनलाइन अर्ज करत असताना ऑनलाईन अर्ज प्रणाली आणि सर्व सामान्य स्वरूपाच्या शंका व अडचणी यांचे निवारण केले जाईल. तसेच तांत्रिक मदत व अर्ज भरण्याच्या प्रक्रियेबाबत अडचणींचे निवारण केले जाईल.
- MPSC Helpline Number कधी पासून कार्यान्वित होणार आहे?
सदर हेल्पडेस्क २ मार्च २०२१ पासून कार्यान्वित होणार आहे.
- विद्यार्थी उमेदवारांनी MPSC Helpline Number वरती कधी संपर्क साधावा?
दिलेला मदत क्रमांक 24 तास सुरू राहणार नाही. यासाठी सोमवार ते शुक्रवार सकाळी ९ ते रात्री ८ पर्यंत संपर्क साधावा आणि शनिवार-रविवार या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सकाळी ९:३० ते संध्याकाळी ६:३० पर्यंत संपर्क साधता येईल.
वरील टोल फ्री क्रमांक व्यतिरिक्त उमेदवारांना ई-मेल द्वारे देखील संपर्क साधता येतो. [email protected] या ईमेल आयडीवर उमेदवारांना तांत्रिक बाबींच्या अनुषंगाने संपर्क साधता येईल.
MPSC Helpline Number या ठिकाणी आपल्याला मिळाला असेल सोबत महाराष्ट्र लोकसेवा आयोग कशा पद्धतीने आपल्याला मदत करू शकते याची माहिती आपल्याला मिळाली असेल.
आणखी वाचा….
MPSC Books List In Marathi for mpsc exam 2021
UPSC information in Marathi । upsc 2021 | कलेक्टर होण्यासाठी काय करावे
धन विधेयक आणि वित्तीय विधेयक|वित्तीय विधेयकाचे 3 प्रकार |Money bill