महाराष्ट्र शिक्षक भरती 2023| Maharashtra shikshak Bharti 2023
राज्यात सन – 2017 मध्ये प्राथमिक व माध्यमिक स्तरावर एकूण १२ हजारच्या आसपास शिक्षक भरतीस सुरुवात झाली. मात्र पवित्र पोर्टल मार्फत गेल्या तीन वर्षापासून शिक्षक भरती प्रक्रिया सुरू आहे.दहा वर्षानंतर होत असलेल्या या भरती प्रक्रियेची डी.टी.एड., बी.एड. पदविका, पदवीधारक बेरोजगारांना प्रतीक्षा आहे. Maharashtra government teacher recruitment 2023.
शिक्षक भरती प्रक्रियेत तत्कालीन सरकारने राज्यातील एकूण २४ हजार जागा भरण्यात येतील असे सांगितले होते. प्रत्यक्षात सहा हजार जागा भरण्याची प्रक्रिया झाली.त्यामध्येही केवळ शासकीय पातळीवरच्या संस्थामधीलच शिक्षक भरती प्रक्रिया झाली. खाजगी संस्थावरील भरतीची प्रक्रिया कधी आणि केव्हा होणार, असा प्रश्न अनेक महिन्यापासून विद्यार्थ्यांना पडला आहे.
शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण उमेदवार
राज्यात शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 60 हजारांपेक्षा अधिक आहे तर, अभियोग्यता चाचणी यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दीड लाखांपेक्षा अधिक आहे. सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सन – 2020 चे शैक्षणिक वर्ष लांबणीवर पडले.मात्र शाळा सुरू होण्यापूर्वी भरतीची प्रक्रिया होणार की नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.Maharashtra government teacher recruitment 2023.
राज्यांमध्ये ही परिस्थिती केवळ शिक्षक भरतीची नाही. फडणवीस सरकारच्या कार्यकाळात घोषणा केलेल्या 72 हजार मेगाभरतीची हीच परिस्थिती आहे. सन – 2019 मध्ये सुरू झालेल्या मेगा भरतीतील काही मोजक्याच परीक्षा झाल्या. त्यामध्येही काही त्रुटी व अनियमितता झाल्याने परीक्षा देणाऱ्या मुलांनी तक्रारी केल्या. यामुळे याही परीक्षा न झाल्यामुळे ही भरती देखील विराम अवस्थेत आहे.
महाराष्ट्र मेगा भरती 2023- Maharashtra government teacher recruitment 2023.
मेगा भरतीला मूर्त स्वरूप न मिळाल्याने राज्यातील तब्बल 34 लाख 83 हजार विद्यार्थ्यांना अर्ज करूनही परीक्षेचे वाट पहावी लागत आहे.आता महाविकास आघाडी सरकारनेही शासकीय रिक्त पदांची मेगा भरती एप्रिलपासून सुरू करण्याचे नियोजन केले होते. मात्र राज्यातील कोरोनाच्या विळख्यामुळे ही प्रक्रिया देखील पुढे ढकलल्या आहेत.
तत्पूर्वी, महाआयटीच्या माध्यमातून पाच कंपन्या निश्चित केल्या जाणार असून त्यासाठी पुणे, नाशिक, दिल्ली व मुंबई येथून सहा कंपन्या इच्छुक असल्याचे महाआयटीकडून सांगण्यात आले. थोडक्यात, महाराष्ट्रामध्ये शिक्षक भरती असो वा मेगाभरती सर्वच भरत्या थांबलेल्या आहेत.
शिक्षक भरतीमध्ये अभियोग्यता परीक्षा दिलेल्या उमेदवारांना मुलाखतीशिवाय नियुक्त्या देणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा व खाजगी शाळा; तसेच मुलाखतीसह नियुक्त्या देणाऱ्या खाजगी संस्था, अशा दोन भागात प्राधान्यक्रम देण्यात आला. उमेदवारांना अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी परीक्षेतील गुण, जातीचा संवर्ग, समांतर आरक्षण, विषय, शैक्षणिक पात्रतेच्या आधारे प्राधान्य क्रमानुसार जागा उपलब्ध झाल्या.
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये थेट गुणवत्तेच्या आधारे तर खाजगी शैक्षणिक मुलाखतीच्या आधारे उमेदवारांची निवड करण्यात येणार होती. त्यापैकी थेट गुणवत्तेच्या आधारे जागांची निवड यादी 9 ऑगस्ट 2019 रोजी जाहीर झाली. मात्र 1 वर्ष झाल्यानंतरही मुलाखतीच्या आधारे निवडावयाच्या उमेदवारांची यादी अजूनही लावण्यात आलेली आहे. यासाठी अनेक गोष्टी कारणीभूत ठरलेल्या आहेत.
पवित्र पोर्टलवरील तांत्रिक अडचणी –
भरती प्रक्रिया राबवित असताना अनेक प्रकारच्या अनियमितता दिसून आल्या. परिणामी कोर्टामध्ये केस टाकण्यात आल्या.त्यामध्ये माध्यमिक साठी पात्र होण्यासाठी पदवीमध्ये आवश्यक असलेली 50 टक्के ची अट, ब्रिज कोर्स, NCTE नियमांची पायमल्ली, समांतर आरक्षण इ. अनेक केसेस कोर्टामध्ये चालू झाल्या. काही विद्यार्थ्यांना वैयक्तिक स्तरावरदेखील केस दाखल केली. या केसेसमुळे शिक्षक भरती प्रक्रियेमध्ये विलंब होत आहेच. त्याचबरोबर सरकारमध्ये असलेल्या उदासिनतेमुळे ही पवित्र पोर्टलवरील तांत्रिक अडचणींची कारणे सांगून विलंब केलेला आहे.
उमेदवारांनी वेळोवेळी आवश्यक गोष्टींचा पाठपुरावा करून, निवेदने देऊन, आंदोलने करून, भरती प्रक्रिया पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्न करत आहेत. तरीदेखील पहिली निवड यादी लागून वर्ष उलटून गेले पण पुढील याद्या लागण्याच्या सध्या तरी कोणतीही चिन्हे दिसत नाहीत.
राज्यात शिक्षक भरतीची प्रक्रिया Maharashtra government teacher recruitment 2023. अतिशय धीम्या गतीने सुरू असल्याने अनेक पात्र उमेदवार नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहे. परिस्थिती विरोधाभासाने भरलेली आहे. एकीकडे प्राथमिक तसेच माध्यमिक शाळांमध्ये शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. मुलांच्या शिकण्यावर मर्यादा येत आहे. मात्र दुसरीकडे पात्र उमेदवार असतानादेखील त्यांना नियुक्तीचे वाट पहावी लागत आहे.
बृहन्मुंबई महापालिकेच्या शाळांमधील शिक्षणसेवक पदासाठीची निवड यादी जाहीर करण्यात आली. मात्र ही यादी पूर्वीच्याच यादीला रिवाईज करून लावण्यात आली. अतिशय संथ गतीने चाललेल्या शिक्षक भरतीमुळे अनेक शाळांमध्ये शिक्षकांची पदे रिक्त असल्याने, विद्यार्थ्यांना अध्यापनासाठी पुरेशा प्रमाणात शिक्षक उपलब्ध नाहीत. त्यामुळे शिक्षक भरतीची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याची मागणी डी.एड, बी.एड, पात्रताधारक स्टुडंट्स असोसिएशनकडून करण्यात आली आहे.
सदरच्या भरतीमध्ये पहिल्या यादीमध्ये गणित / विज्ञान, माजी सैनिक इ. या जागांवरती पात्र उमेदवार न मिळाल्यामुळे रिक्त राहिलेल्या आहेत. या जागा थेट गुणवत्तेच्या आधारे भरावयाच्या असल्यामुळे त्या त्वरित याच अभियोग्यता चाचणी दिलेल्या पात्र उमेदवारांमधून भराव्यात यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. कारण या जागा पूर्णपणे भरल्याशिवाय खाजगी जागा भरणे शक्य होणार नाही. तसेच खाजगी जागा भरून घेण्यासाठी वेळ लागणार आहे. यामध्ये खाजगी शैक्षणिक संस्थांमध्ये एका जागेसाठी १० जण याप्रमाणे उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलविण्यात येणार आहे, तर एका उमेदवारांना दहा ठिकाणी मुलाखतीला जाता येणार आहे.
खाजगी संस्थांमध्ये उमेदवारांची निवड
खाजगी संस्थांमध्ये उमेदवारांची निवड ही मुलाखत व अध्यापन कौशल्य यातील 30 गुणांच्या आधारे होणार आहे. उच्चतम गुण प्राप्त करणाऱ्या उमेदवारांची संस्था निवड करणार आहे. मुलाखतीला उपस्थित असलेल्या सर्व उमेदवारांची संस्था गुणानुक्रमे यादी तयार करून ती संकेतस्थळावर प्रसिद्ध करणार आहे. ही प्रक्रिया नक्कीच वेळखाऊ असल्यामुळे टप्प्याटप्प्याने एक एक समस्या सोडविण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न केले पाहिजे. आणि येणाऱ्या काळामध्ये जास्तीत जास्त उमेदवारांना सहाय्यक शिक्षक पदावर काम करण्याची संधी निर्माण व्हायला हवी.Maharashtra government teacher recruitment 2023.