Maharashtra Police Bharti Exam Question Paper 2024
Maharashtra Police Bharti Exam Question Paper: नमस्कार विद्यार्थीमित्रांनो, २०२४ मध्ये खूप मोठी महाराष्ट्र पोलीस भरती होणार आहे याबाबत तुम्हाला समजले असेलच, म्हणूनच अजून पर्यंत अभ्यासाला सुरवात केली नसाल तर आताच अभ्यासाला लागा. आजच्या या लेखात मी तुमच्या साठी घेऊन आलो आहे पोलीस भरती २०२४ संबंधी महत्वाचे १०० प्रश्न.
हे सर्व PYQ questions असून या मध्ये मी चालू घडामोडी संबंधी देखील प्रश्न समाविष्ट केलेले आहेत. हे सर्व प्रश्न परीक्षेला जाण्यापूर्वी वाचून नक्की जा.
Q1. “संगाई महोस्तव” कोणत्या राज्यात साजरा केला जातो?
A. आसाम
B. नागालंड
C. मणिपूर
D. मिझोरम
Q2. महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या विरोधी पक्ष नेते पदी म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे?
(A) अशोक चव्हाण
(B) विजय वडेट्टीवार
(C) बाळासाहेब थोरात
(D) जयंत पाटील
Q3. राजमाता जिजाऊ यांचे जन्मस्थळ असलेले ‘सिंदखेड राजा’ हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?
A. जळगाव
B. औरंगाबाद
C. बुलढाणा
D. यवतमाळ
Q4. “आसीम मुनीर” कोणत्या देशाचे सेनाप्रमुख बनले आहे?
A. बांग्लादेश
B. अफगाणिस्तान
C. पाकिस्तान
D. श्रीलंका
Q5. संत तुकडोजी महाराज यांचा गुरुकुंज आश्रम कुठे आहे?
A. शेगाव
B. नागपूर
C. गोंदिया
D. मोझरी
Q6. ज्यांच्या नावाने ‘रॅमन मॅगसेसे पुरस्कार’ दिला जातो ते रॅमन मॅगसेसे ……. या देशाचे अध्यक्ष होते?
A. झोंबीया
B. फिलीपीन्स
C. मॉरिशस
D. नामिबिया
Q7. शिवाजी महाराज…….. किल्ल्यावर मुक्कामास असताना आदिलशहाचा सरदार सिद्दी जोहर याने किल्ल्याला वेढा घातला. त्यामुळे महाराजांना किल्ल्यातच अडकून पडावे लागले?
A. राजगड
B. पन्हाळा
C. विशालगड
D. पुरंदर
Q8. अणुभट्यांमध्ये इंधन म्हणून कशाचा वापर करतात?
A. कोळसा
B. निऑन
C. युरेनियम
D. हेलियम
Q9. ‘याकूब मेनन’ या बॉम्बस्फोटातील आरोपीस कुठे फाशीची शिक्षा दिली गेली?
A. आर्थर रोड जेल
B. येरवडा जेल
C. नागपूर जेल
D. तिहार जेल
Q10. रेगूर मृदा खालीलपैकी कोणत्या प्रदेशात मोठ्या प्रमाणावर आढळते?
A. कोकणातील डोंगराळ प्रदेशात
B. दख्खनचा पठारी प्रदेशात
C. कोकण किनारपट्टीच्या चिंचोळी मैदानात
D. भामरागडच्या डोंगरी प्रदेशात
Police bharti Books in Marathi
Q11. महाराष्ट्रात ठिबक सिंचन पद्धती कोणत्या पिकासाठी जास्त उपयुक्त ठरत आहे?
A. ऊस
B. कापूस
C. फलोत्पादन
D. तेलबिया
Q12. …….या किल्ल्याला ब्रिटिश लोक पूर्वेकडील जिब्राल्टर असे म्हणत असत?
A. जंजिरा
B. कर्नाळा
C. रायगड
D. कोंढाणा
Q13. ना.धो. महानौर यांचे नुकतेच निधन झाले. ते कोणत्या क्षेत्रात कर्यरत होते?
(A) उद्योग
(B) शास्त्रज्ञ
(C) अभिनय
(D) साहित्य
Q14. ऑपरेशन फ्लड योजना कशाशी संबंधित आहे?
A. पूरनियंत्रण
B. पूर व्यवस्थापन
C. वाढीव दुध उत्पादन व संकलन
D. वाढीव अन्न उत्पादन
Q15. आशियातील सर्वात मोठे कृषी विश्वविद्यालय कोठे आहे?
A. हिसार
B. पुणे
C. राहुरी
D. दापोली
Q16. भारतातील केंद्रीय नारळ संशोधन संस्था कोठे आहे?
A. गुजरात
B. पश्चिम बंगाल
C. केरळ
D. महाराष्ट्र
Q17. पुढील संख्यांचे मध्यमान किती? 44,67,98,74,82
A. 77
B. 72
C. 73
D. 75
Q18. एकलहरे औष्णिक विद्युत प्रकल्प राज्यातील कोणत्या जिल्ह्यात आहे?
A. चंद्रपूर
B. नागपूर
C. अकोला
D. नाशिक
Q19. एकदिवसीय क्रिकेट वर्ल्ड कप मधील भारत पाकिस्तान क्रिकेट सामना किती लोकांनी ऑनलाईन प्लॅटफॉर्म वर पाहून नवा विक्रम केला आहे?
(A) २.५ कोटी
(B) ३ कोटी
(C) ३.५ कोटी
(D) ४ कोटी
Q20. केंद्र सरकार कोणत्या योजने द्वारे देशातील शालेय विद्यार्थ्यांचे एकच ओळखपत्र तयार करणार आहे?
(A) एक देश एक विध्यार्थी
(B) वन नेशन वन स्टुडंट
(C) एकात्म भारत
(D) इंडिया स्टुडंट
Q21. ‘द अनटचेबल्स’ या ग्रंथाचे लेखक कोण आहेत?
A. महात्मा फुले
B. बाबासाहेब आंबेडकर
C. वि रा शिंदे
D. रा र डोंगरे
Q22. पाणी पंचायत या संकल्पनेचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते?
A. विलासराव देशमुख
B. सुधारक नाईक
C. विलासराव साळुंखे
D. अण्णा हजारे
Q23. हंगामी पोलीस पाटलाची तात्पुरती नेमणूक करण्याचा अधिकार?
A. तहसीलदार
B. उपजिल्हाधिकारी
C. जिल्हाधिकारी
D. यापैकी नाही
Q24. ‘तोडा’ ही आदिवासी जमात खालील पैकी कोणत्या ठिकाणी आढळते?
A. सह्याद्री
B. अरवली
C. निलगिरी
D. विंध्य
Q25. भारताने कोणत्या देशातील “मोंगला बंदराचा” विकासासाठी योजना सुरू केली आहे
A) म्यानमार
B) इंडोनेशिया
C. बांगलादेश
D. मालदीव
Q26. LPG सिलेंडर मधून गॅस गळती होत असताना दुर्गंध कशामुळे येतो?
A. प्रोपेन
B. ब्युटेन
C. इथिल मेरपॅप्टन
D. यापैकी नाही
Q27. जागतिक हिवताप दिवस केव्हा साजरा केला जातो?
A. 22 एप्रिल
B. 25 एप्रिल
C. 12 मे
D. यापैकी नाही
Q28. माणसाचा डोळा किती मेगापिक्सलचा असतो?
A. 576
B. 200
C. 300
D. 2000
Q29. गर्भलिंग कायदा कोणत्या वर्षी अमलात आला?
A. 1994
B. 1996
C. 1998
D. 2000
Q30. कोणता पहिला फुटबालर आहे ज्याने ५ वर्ल्ड कप मध्ये गोल केले आहे?
A. नेमार
B. क्रिस्तियानो रोनाल्डो
C. लिओनल मेस्सी
D. यापैकी नाही
Q31. ताजमहालचा रंग पांढरा असून पिवळा कशामुळे होत आहे?
A. आम्लवर्षा
B. जुना झाल्यामुळे
C. अति उन्हामुळे
D. यापैकी नाही
Q32. परागकणांच्या अभ्यासाला काय म्हटले जाते?
A. पैलिनोलॉजी
B. सिस्कोलॉजी
C. बायोलॉजी
D. यापैकी नाही
Q33. ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स मध्ये १३२ देशाच्या यादीत भारत कितव्या स्थानावर आहे?
(A) ३४
(B) ४०
(C) ३३
(D) ४४
Q34. समोरील वाहनाला ओलांडून पुढे जाताना कोणत्या बाजूने ओव्हरटेक करावे?
A. डाव्या
B. त्या साईडला जागा मिळेल
C. उजव्या
D. यापैकी नाही
Q35. टोकियो ऑलम्पिक मध्ये भारतीय खेळाडूंनी किती पदके मिळवली?
A. १ सुवर्ण, २ रोप्य, ४ कांस्य
B. 4 सुवर्ण, १ रोप्य, २ कांस्य
C. 1 सुवर्ण, 4 रोप्य, २ कांस्य
D. 2 सुवर्ण, १ रोप्य, २ कांस्य
Q36. महाभारतातील धृतराष्ट्र या राजाच्या पत्नीचे नाव काय होते?
A. कुंती
B. माधुरी
C. गांधारी
D. हिडिंबा
Q37. भारतातील सर्वात प्राचीन पर्वत रांग खालीलपैकी कोणती आहे?
A. सह्याद्री
B. सातपुडा
C. अरवली
D. विंध्य
Q38. भारतामध्ये सर्वाधिक अंतर्गत वाहतूक कोणत्या मार्गाने होते?
A. विमान
B. रेल्वे
C. बस
D. ऑटो
Q39. भारतातील सर्वात अति पूर्वेकडचा राज्य खालीलपैकी कोणता आहे?
A. गुजरात
B. पश्चिम बंगाल
C. अरुणाचल प्रदेश
D. मिझोराम
Q40. ‘खनिज संपत्तीचे भांडार’ असे खालीलपैकी कोणत्या भारतीय पठारास म्हणतात?
A. अरवली
B. निलगिरी
C. सह्याद्री
D. छोटा नागपूर
Q41. भारतातील बहुसंख्य जनतेचे मुख्य अन्न खालील पैकी कोणते आहे?
A. ज्वारी
B. तांदूळ
C. गहू
D. बाजरी
Q42. तिहार जेल हे खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे?
A. मुंबई
B. औरंगाबाद
C. दिल्ली
D. पुणे
Q43. भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या साली विमानमार्गाने दळणवळणास प्रारंभ झाला होता?
A. 1920
B. 1931
C. 1924
D. 1966
Q44. मसाले पदार्थ उत्पादनात सर्वात अग्रेसर राज्य कोणते आहे?
A. कर्नाटक
B. केरळ
C. तामिळनाडू
D. उत्तराखंड
Q45. खालीलपैकी कोणत्या बंदरास मुक्त बंदर म्हणून ओळखले जाते?
A. मुंबई
B. कोचीन
C. कांडला
D. मगलोर
Q46. ट्रांस हिमालय नदी म्हणून कोणत्या नदीला संबोधले जाते?
A. यमुना
B. गंगा
C. सतलज
D. कावेरी
Q47. खालीलपैकी कोणत्या राज्याची राज्यभाषा उर्दू आहे?
A. आंध्र प्रदेश
B. जम्मू काश्मीर
C. मेघालय
D. त्रिपुरा
Q48. शरावती नदीवरील जोग धबधबा हा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे?
A. बिहार
B. कर्नाटक
C. राजस्थान
D. तामिळनाडू
Q49. 101 वी घटनादुरुस्ती ही पुढीलपैकी कोणत्या विषयाशी संबंधित आहे?
A. अबकारी कर
B. उत्पन्न कर
C. विक्रीकर
D. वस्तू व सेवा कर
Q50. खालीलपैकी मूळ संख्या कोणती?
A. 49
B. 79
C. 69
D. 99
Q51. अहमदनगर-कल्याण मार्गावर कोणता घाट आहे?
A. वरंधा
B. अंबोली
C. माळशेज
D. खंबाटकी
Q52. पुणे जिल्ह्यातील भाटघर धरण हे…… नदीवर बांधलेले आहे?
A. पवना
B. भीमा
C. वेलवंडी
D. मुळा
Q53. भारत सरकारने कोणत्या दिवशी चलनातून 500 व 1000 रुपयांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतला?
A. 5 नोव्हेंबर 2016
B. 8 नोव्हेंबर 2016
C. 7 ऑक्टोबर 2016
D. 8 ऑक्टोबर 2016
Q54. डिजिटल क्रांती पासून दूर राहिलेल्या विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी……. नावाची ऑनलाइन शिक्षण उपक्रम यंत्रणा उभारण्यात आली आहे?
A. संजीवनी
B. स्वयम्
C. अस्मिता
D. सारथी
Q55. इस्रोने नवीन नकाशा यंत्रणा कोणत्या नावाने विकसित केली आहे?
A. निर्भय
B. अस्त्र
C. भुवन
D. गुगल
Q56. नीरा नरसिंहापूर हे तीर्थक्षेत्र पुणे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात येते?
A. बारामती
B. दौंड
C. पुरंदर
D. इंदापूर
Q57. दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे?
A. चेन्नई
B. सिकंदराबाद
C. मुंबई
D. दिल्ली
Q58. प्रदूषण मुक्त नद्यांसाठी ‘राष्ट्रीय नदी संरक्षण’ कार्यक्रमात महाराष्ट्रातील गोदावरी, तापी, कृष्णा, पंचगंगा आणि…….. या नद्यांचा समावेश आहे?
A. भीमा
B. पवना
C. मुळा-मुठा
D. कुकडी
Q59. बहुजन समाजाला राजकीय निर्णय प्रक्रियेत सामावून घेण्यासाठी…… यांनी 1916 रोजी ‘डेक्कन रयत असोसिएशन’ ही संस्था स्थापन केली?
A. महात्मा फुले
B. छत्रपती शाहू महाराज
C. महर्षी कर्वे
D. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
Q60. ‘आता कुठे मला संगीताचा अर्थ कळत आहे’ काळ ओळखा.
A. रीती भूतकाळ
B. साधा वर्तमान काळ
C. अपूर्ण वर्तमान काळ
D. पूर्ण वर्तमान काळ
Q61. ‘त्याने बैलास मारले’ यामधील ‘ मारले’ या क्रियापदाचा प्रकार ओळखा?
A. अकर्मक
B. सकर्मक
C. उभयविध
D. व्दिकर्मक
Q. 62. कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक धरणे असल्यामुळे त्याला पाणी पिकवणारा जिल्हा म्हणून ओळखतात?
A. गडचिरोली
B. भंडारा
C. ठाणे
D. रायगड
Q63. आशियाई महिला हॉकी चॅम्पियन करंडक स्पर्धा भारतात कोठे होणार आहे?
(A) जयपूर
(B) भुवनेश्वर
(C) रांची
(D) पुणे
Q64. पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्यास पृथ्वीचे……… म्हणतात?
A. परिवलन
B. परिभ्रमण
C. गती
D. यापैकी नाही
Q65. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी कोणत्या ठिकाणी बौद्ध धर्म स्वीकारला?
A. मुंबई
B. महाड
C. नागपूर
D. पुणे
Q66. महाराष्ट्रातील……. हा विभाग पूर्वी निजामाच्या राज्यात होता?
A. कोकण
B. विदर्भ
C. मुंबई
D. मराठवाडा
Q67. ब्रिटिश हिंदुस्थानचे पहिले व्हॉईसरॉय………. होते?
A. लॉर्ड हेस्टिंग
B. लॉर्ड कॅनिंग
C. लॉर्ड माऊंटबॅटन
D. लॉर्ड आयर्विन
Q68. देशात सायबर गुन्ह्यामध्ये महाराष्ट्र कितव्या क्रमांकावर आहे?
(A) पहिल्या
(B) तिसऱ्या
(C) चौथ्या
(D) पाचव्या
Q69. नागझिरा अभयारण्य कुठे आहे?
A. गडचिरोली
B. गोंदिया
C. वर्धा
D. भंडारा
Q70. आंबा घाट कुठून कुठे जाताना येतो?
A. पुणे ते सातारा
B. पुणे ते नाशिक
C. कोल्हापूर ते रत्नागिरी
D. गोवा ते सिंधुदुर्ग
Q71. नॅशनल डिफेन्स अकॅडमी कुठे आहे?
A. देहरादून
B. खडकवासला
C. गोरखपुर
D. रायपुर
Q72. कस्तुरी मांजर महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात आढळते?
A. गोंदिया
B. रायगड
C. वाशिम
D. सोलापूर
Q73. उजनी धरण कोणत्या तालुक्यात आहे?
A. बारामती
B. पंढरपूर
C. करमाळा
D. माढा
Q74. जगातील सात समुद्रात यशस्वी जलतरण मोहीम करणारा पहिला भारतीय….. आहे?
A. राज तिलक
B. संजीव जयस्वाल
C. किरण भूत
D. रोहन मोरे
Q75. युरोपीय संसदेने कोणत्या देशाला “आतंकवाद प्रायोजक देश” घोषित केला आहे?
A. कॅनडा
B. रशिया
C. अमेरिका
D. जपान
Q76. ऑनलाईन गेमिंग आणि कॅसिनो मध्ये दर्शनी मुल्यावर किती टक्के GST लावण्याचा निर्णय GST परिषेदेने घेतला आहे?
(A) २५%
(B) २८ %
(C) २०%
(D) २७%
Q77. राजा रवि वर्मा हे प्रख्यात…… होते?
A. संगीतकार
B. चित्रकार
C. नृत्यकार
D. दिग्दर्शक
Q78. ‘संवाद कौमुदी’ कोणाशी संबंधित आहे?
A. अरविंद घोष
B. रवींद्रनाथ टागोर
C. राजाराम मोहन रॉय
D. लोकमान्य टिळक
Q79. पुढीलपैकी कोणता महाराष्ट्रातील जलदुर्ग नाही?
A. मुरुड जंजिरा किल्ला
B. बेकल किल्ला
C. विजयदुर्ग किल्ला
D. उंदेरी किल्ला
Q80. ‘व्हॅली ऑफ फ्लावर्स’ राष्ट्रीय उद्यान युनेस्को जागतिक वारसा स्थान आहे, भारतातील कोणत्या राज्यात आहे?
A. गुजरात
B. राजस्थान
C. उत्तराखंड
D. जम्मू काश्मीर
Q81. बाबा महाराज सातारकर यांचे मूळ नाव काय होते?
(A) नीलकंठ ज्ञानेश्वर गोरे
(B) तुकाराम गोरोबा मोरे
(C) ज्ञानेश्वर रावसाहेब पाटील
(D) सदानंद केशव साखरे
Q82.क्रिकेट एशिया कप 2023 चे विजेतेपद कोणत्या संघाने जिंकले ?
A. पाकिस्तान
B. भारत
C. बांगलादेश
D. श्रीलंका
Q83.महाराष्ट्र राज्यात १५ ऑक्टोबर हा दिवस कोणता दिन म्हणून साजरा करतात?
A. कृषी दिन
B. कामगार दिन
C. पुस्तक दिन
D. वाचन प्रेरणा दिन
Q84.जगातील सर्वोत्कृष्ट विमानतळाच्या यादीत कोणत्या देशातील चांगी एअरपोर्ट प्रथम स्थानी आहे?
A. चीन
B. मलेशिया
C. सिंगापूर
D. जपान
Q85.कोणत्या दिवशी राष्ट्रीय जाहिरात दिन साजरा करतात?
A. ४ ऑक्टोबर
B. ११ ऑक्टोबर
C. १४ ऑक्टोबर
D. ८ ऑक्टोबर
Q86.कोणत्या भारतीय खेळाडू ला वर्ल्ड अथलेटीक ऑफ द इअर साठी नामांकन मिळाले आहे?
A. ओजस देवतळे
B. अविनाश साबळे
C. नीरज चोप्रा
D. अदिती स्वामी
Q87.भारतात कोणती व्यक्ती सर्वात श्रीमंत महिला ठरली आहे?
A. राखी झुंझूनवाला
B. सावित्री जिंदाल
C. फाल्गुनी नायर
D. किरण मुझुमदार शॉ
Q88.‘बिन भाड्याचे घर’ या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय होतो ?
A. बंगला
B. इमारत
C. तुरुंग
D. सदन
Q89.‘केसाने गळा कापणे’ या वाक्प्रचाराचा अर्थ काय होईल ?
A. त्रास देणे
B. खून करणे
C. केस कापणे
D. विश्वासघात करणे
Q90.शिरोडा समुद्रकिनारा (Beach) महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे ?
A. नाशिक
B. रत्नागिरी
C. सिंधुदुर्ग
D. हिंगोली
Q91.ओरसंग नदी ही कोणत्या नदीची उपनदी आहे ?
A. कोयना नदी
B. तापी नदी
C. कृष्णा नदी
D. नर्मदा नदी
Q92.२०२८ लॉस एंजिलिस ऑलिम्पिक मधून कोणत्या खेळाला वगळण्यात आले आहे?
A. कबड्डी
B. कुस्ती
C. बॉक्सिंग
D. टेनिस
Q93.केंद्र सरकारच्या कुसुम योजने अंतर्गत महाराष्ट्र राज्यात किती कृषी पंपाचे वाटप केले जात आहे?
A. २ लाख
B. ५ लाख
C. १ लाख
D. ३ लाख
Q94.नवी दिल्ली येथे ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराचे वितरण कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे?
A. अनुराग ठाकूर
B. दौपद्री मुर्मू
C. ओम बिर्ला
D. जगदीप धनकड
Q95.जागतिक पोस्टल दिवस दरवर्षी केव्हा साजरा करण्यात येत असतो ?
A. ०५ ऑक्टोबर
B. ०९ ऑक्टोबर
C. १९ ऑक्टोबर
D. १२ ऑक्टोबर
Q96.राष्ट्रीय लता मंगेशकर पुरस्कार – 2022 या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे ?
A. उत्तम सिंग
B. कुमार सानू
C. आनंद-मिलिंद
D. शैलेंद्र सिंग
Q97.2022 चा राष्ट्रीय किशोर कुमार पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे ?
A. अमिताभ बच्चन
B. धर्मेंद्र देओल
C. अक्षय कुमार
D. संजय दत्त
Q98.चीनमधील झालेल्या आशियाई खेळ 2023 मध्ये भारताने किती पदके जिंकली ?
A. ३८३
B. १०७
C. १९०
D. १८८
Q99.जागतिक नेत्र दिवस’ किंवा ‘जागतिक दृष्टी दिवस’ केव्हा साजरा करण्यात येत असतो ?
A. ऑक्टोबरचा दुसरा गुरुवार
B. ऑक्टोबरचा पहिला गुरुवार
C. ऑक्टोबरचा दुसरा बुधवार
D. ऑक्टोबरचा दुसरा सोमवार
Q100.बिशनसिंग बेदी यांचे निधन झाले ते कोणत्या खेळाशी संबंधित होते?
(A) फुटबॉल
(B) टेनिस
(C) हॉकी
(D) क्रिकेट
मित्रांनो Maharashtra Police Bharti Exam Question Paper 2024 या लेखात दिलेल्या प्रश्नांसंबंधी तुमच्या काही शंका असतील तर खाली कंमेंट करून नक्की विचारा.
हे देखिल वाचा: