भारताची लोकसभा । Lok Sabha In Marathi

17 वी लोकसभा 2019 | Lok Sabha In Marathi

      मित्रांनो आजच्या या लेखात आपण 17 वी लोकसभा याबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत. 17 वी लोकसभा भारतामध्ये सध्या अस्तित्वात आहे. भारतासाठी कायदे करणाऱ्या संसदेचा आणि लोकशाही प्रशासन व्यवस्थेचा एक महत्वाचा भाग म्हणजे लोकसभा.

    भारतात 17 वी लोकसभेची निवडणूक 2019 ला झाली. आपण आजच्या या लेखात लोकसभा म्हणजे काय? लोकसभेची निवडणूक केव्हा होते? इत्यादी अशे अनेक लोकसभे बद्दल ची संपूर्ण माहिती पाहणार आहोत.

Lok Sabha In Marathi
Lok Sabha In Marathi

∆ लोकसभेचे पदाधिकारी :

  1. लोकसभेचे अध्यक्ष : ओम बिर्ला 
  2. लोकसभेचे उपाध्यक्ष : TBD (रिक्त)
  3. लोकसभेचे विरोधी पक्ष नेता : TBD (रिक्त)

∆ लोकसभा म्हणजे काय? Lok Sabha In Marathi

       लोकसभा हे भारतीय संसदेचे कनिष्ठ सभागृह आहे. लोकसभे चे सदस्य हे जनतेने निवडून दिलेले प्रतिनिधी असतात. लोकसभे ची निवडणूक ही भारतीय प्रौढ नागरिकांचा समावेश असलेल्या मतदारसंघातून निवडणूक केली जाते. प्रत्येक लोकसभेचा कालावधी हा जास्तीत जास्त 5 वर्षाचा असतो. 

∆ 17 वी लोकसभा निवडणूक : 

       17 वी लोकसभा निवडणूक ही 2019 ला झाली. त्यामध्ये 17 व्या लोकसभेसाठी मतदान 7 टप्यात पार पडले. 

       मतदानाचा पहिला टप्पा हा 11 एप्रिल 2019 रोजी पार पडला. दुसरा टप्पा हा 18 एप्रिल 2019 ला झाला, तिसरा टप्पा हा 23 एप्रिल ला पार पडला, चौथा टप्पा 29 एप्रिल ला झाला, पाचवा टप्पा 6 मे रोजी झाला, सहावा टप्पा 12 मे रोजी आणि सातवा टप्पा हा 19 मे ला झाला अशाप्रकारे सतरावे लोकसभेचे निवडणूक सात टप्प्यात मतदान झाले. आणि मतमोजणी 23 मे 2019 रोजी झाली. 

∆ निवडणुकीसाठी किती मतदार संघ होते ?  

     भारताच्या राज्घटनेप्रमाणे लोकसभेचे सदस्य 552 होते. यामध्ये (550 निर्वाचित + 2 नियुक्त) त्यामध्ये 530 सदस्य भारताच्या राज्याचे प्रतिनिधी होते, 20 सदस्य हे केंद्रशासित प्रदेशाचे प्रतिनिधी होते, तर त्यामधील दोन सदस्य हे अँग्लो-इंडियन समाजाचे प्रतिनिधी होते. पण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये 104 च्या घटना दुरुस्ती नंतर दोन पदे रद्द करण्यात आले होते. लोकसभा तसेच विधानसभा मध्ये अँग्लो-इंडियन समाजासाठी असणाऱ्या राखीव जागा 2020 पासून रद्द करण्यात आलेल्या आहेत.

∆ महाराष्ट्रात किती मतदार संघ होते 

     महाराष्ट्र राज्यात एकूण 48 मतदार संघ होते. 

∆ पंतप्रधान कोणत्या मतदारसंघातून निवडून आले 

     पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वाराणसी मतदार संघ, उत्तर प्रदेश या मतदारसंघातून निवडून आले होते. 

∆ भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार तरतूद केली ?

      भारतीय राज्यघटनेच्या कलम 81 नुसार लोकसभेची तरतूद केली गेली आहे. कलम 81 हा लोकसभेच्या रचनेसाठी लागू आहे. 

∆ लोकसभा आणि राज्यसभा या दोघांमध्ये काय फरक आहे ? 

     लोकसभा :  

         लोकसभा हे भारतीय संसदेचे कनिष्ठ सभागृह आहे. लोकसभेची तरतूद ही भारतीय राज्यघटनेच्या कलम 81 च्या नुसार केली गेली आहे. लोकसभेमध्ये धनविषयक प्रस्ताव मांडला जातो. लोकसभेचा कालावधी हा जास्तीत जास्त पाच वर्षाचा असतो. लोकसभेमध्ये येणारे सदस्य हे लोकांमार्फत निवडून येतात.

     राज्यसभा : 

          राज्यसभा हे भारतीय संसदेचे वरिष्ठ सभागृह आहे. राज्यसभेची तरतूद ही भारतीय राज्य घटनेच्या कलम 80 च्या अनुसार केली गेली आहे. राज्यसभेचा कालावधी हा सहा वर्षाचा असतो. सहा वर्षाचा कालावधी असून येथे दर दोन वर्षांनी काही सदस्य निवृत्त होऊन त्या जागी नवीन सदस्य येतात. राज्यसभेमध्ये येणारे सदस्य हे राज्यांच्या विधानसभेने निवडून दिलेले असतात. 

∆ निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेमध्ये काही महत्त्वाचे मुद्दे मांडले गेले होते ते मुद्दे खालीलप्रमाणे होते 

  • 2019 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये 90 कोटी इतके लोक म्हणजेच मतदार मतदान करतील. 2014 च्या तुलनेत 2019 ला सात कोटी इतके मतदार वाढले होते. 2019 ला पहिल्यांदाच अठरा-एकोणीस वर्षाचे दीड कोटी मतदार मतदान करतील. आठ कोटी 43 लाख इतके नवीन मतदार यंदाच्या निवडणुकीत मतदान करतील. असे निवडणूक आयुक्तांनी सांगितले होते किंवा माहिती दिली होती. 
  • EVM (Electronic Voting Machine) याच्या सुरक्षेसाठी ही काटेकोर बंदोबस्त केला जाणार आहे. व EVM चे जीपियस ट्रॅकिंग केला जाणार आहे. 
  • मतदार यादीमधे आपलं नाव आहे का नाही हे पाहण्यासाठी निवडणूक आयोगाने हेल्पलाईन नंबर दिला आहे. 1950 हा हेल्पलाईन नंबर आहे ह्या नंबर वर किंवा क्रमांकावर फोन करून मतदार यादीत आपलं नाव आहे का नाही हे पाहिलं जाईल. 
  • संवेदनशील भागांमध्ये सुरक्षेसाठी CRPF चे जवान तैनात केले जातील.

अंतिम निष्कर्ष : 

         तर मित्रांनो आजच्या या लेखात आपण 17 वी लोकसभा Lok Sabha In Marathi याबद्दल माहिती पाहण्याचा प्रयत्न केला. यामधे आपण लोकसभेचे अनेक माहिती सुद्धा मिळविण्याचा प्रयत्न केला. यामध्ये लोकसभा म्हणजे काय? लोकसभेमध्ये किती सदस्य किंवा मतदार संघ असतात? इत्यादी अशा प्रकारचे आपण अनेक 17 वी लोकसभे बद्दलची माहिती पाहण्याचा प्रयत्न केला. 

       तर मित्रांनो आपणास हा लेख आवडल्यास जास्तीत जास्त आपल्या मित्र मैत्रीणीना शेअर करा जेणेकरून त्यांना ही 17 वी लोकसभा किंवा निवडणूक या बद्दल संपूर्ण माहीत मिळेल. जरा आपल्याला अजून काही 17 वी लोकसभे बद्दलची माहिती (Information) हवी असेल किंवा काही शंका असतील तर आपण कॉमेंट बॉक्स (Comment Section) मध्ये विचारू शकता. आम्ही तुम्हाला पुरेपूर माहिती देण्याचा प्रयत्न करू. 

    धन्यवाद…. 

अधिक माहितीसाठी पुढील लेख वाचू शकता…

Indian Parliament

मी मागील 8 वर्ष MPSC आणि इतर स्पर्धा परीक्षेसंबंधी पुण्यामध्ये Classes घेत आहे, त्यामुळे या स्पर्धा कशा प्रकारे होतात, कोणते प्रश्न विचारले जातात आणि कोणत्या टॉपिक वर प्रश्न विचारले जातात या संबंधी ची पूर्ण माहिती मला असून मी माझा अनुभव या वेबसाइट द्वारे तुम्हा सर्वांपर्यंत पोचवायचा प्रयन्त करत आहे.

3 thoughts on “भारताची लोकसभा । Lok Sabha In Marathi”

  1. सतराव्या लोकसभेमध्ये झालेल्या एकूण मतदारांची अंतिम टक्केवारी किती होती.

    Reply
  2. 2019 मध्ये लोकसभेच्या निवडणुकीत झालेल्या एकूण मतदानाची टक्केवारी किती होती

    Reply

Leave a Comment