चित्रपट दिग्दर्शक कसे बनावे? | How to become Director In Marathi

चित्रपट दिग्दर्शक कसे बनावे? How to become director In Marathi

director

How to become Director In Marathi: जेव्हा आपण टिव्हीसमोर बसुन एखादा चित्रपट बघत असतो.तेव्हा तो चित्रपट बघुन आपल्याही मनात कधीतरी विचार येत असतो की असाच एखादा चित्रपट मी सुदधा बनवेल आणि काही मुला मुलींना तर चित्रपट निर्मिती क्षेत्रात काम करण्याची इतकी आवड असते की त्यासाठी ते आपले घरदार सोडुन सरळ मुंबईला निघत असतात.

अशा खुप जणांची उदाहरणे आज आपणास पाहावयास मिळतात जे चित्रपटात काम करण्यासाठी(चित्रपट दिग्दर्शक,चित्रपट अभिनेता, संगीतकार इत्यादी) होण्यासाठी घरातुन पायी खिशात काही पैसे नसताना निघाले होते आणि आज त्याच चित्रपट क्षेत्रात काम करत असलेल्या व्यक्तींचे आज मुंबईमध्ये आपापले अलिशान बंगले आहेत,कार आहेत त्यांच्या घरात काम करण्यासाठी नोकरचाकर देखील आहेत.

अशीच आपल्यातीलही काही सर्वसामान्य मुलामुलींची आवड असते की आपण चित्रपट सृष्टीत काम करावे मोठा चित्रपट निर्माता तसेच दिग्दर्शक बनावे.

म्हणुन आपल्यातील अशाच काही चित्रपट दिग्दर्शक बनण्याची आवड असलेल्यांना चित्रपट दिग्दर्शक कसे बनावे? आणि त्यासाठी आपण काय काय करावे?कोणते शिक्षण घ्यावे?कोणता कोर्स करावा?हे समजण्यासाठी आज आपण चित्रपट दिग्दर्शन क्षेत्राविषयी सविस्तरपणे माहीती जाणुन घेणार आहोत.

चित्रपट दिग्दर्शक कोण असतो? | Who is Film Director in Marathi

चित्रपट दिग्दर्शक हा एक असा व्यक्ती असतो जो संपुर्ण चित्रपटाचे दिग्दर्शन (चित्रपट रचना करणारा) करण्याचे काम करत असतो.आणि दिग्दर्शक हा फक्त चित्रपटातच नसतो तर वेगवेगळया मालिका,वेबसीरीज यांच्यामध्ये सुदधा एक दिग्दर्शक असतो.

चित्रपट दिग्दर्शकाचे काम काय असते?

 • एक चित्रपट दिग्दर्शक हा पुर्ण चित्रपट तसेच कथा समजून घेत असतो आणि त्याच्या मध्ये अभिनय करत असलेल्या नट तसेच नटीला त्यातील त्यांची भुमिका काय आहे हे समजावून सांगण्याचे काम करत असतो.
 • कोणता चित्रपटामध्ये आपल्याला कोणत्या अभिनेत्रीला नटी म्हणुन घ्यायचे आहे तसेच कोणत्या अभिनेत्याला नट म्हणुन घ्यायचे आहे किंवा नाही घ्यायचे हे ठरवण्याचे काम देखील चित्रपट दिग्दर्शकाचे असते.
 • चित्रटामध्ये जो संवाद घडत असतो त्या संवादामध्ये कोणत्या पात्राने काय बोलावे काय नही बोलावे हे ठरवण्याचा अधिकार तसेच काम चित्रपट दिग्दर्शकाचे असते.
 • कोणत्या चित्रपटात किती गाणे ठेवायचे आणि ते गाणे केव्हा लावायचे आणि किती वेळासाठी लावायचे हे देखील चित्रपट दिग्दर्शकच ठरवत असतो.
 • कोणत्या दिवशी आणि चित्रपटाची शुटींग कुठे होणार आहे?कधी होणार आहे?आणि किती वेळासाठी होणार आहे? हे देखील ठरवायचे काम चित्रपट दिग्दर्शक करत असतो.
 • अणि सगळयात शेवटी चित्रपटाची शुटिंग करून झाल्यानंतर एडिटिंग करण्याच्या वेळेला देखील कोणता सीन ठेवायचा कोणता सीन कट करायचा हे ठरवण्यासाठी चित्रपट दिगदर्शकाला मध्यस्थी ठेवण्यात येते.

चित्रपट दिग्दर्शक बनण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय असावी लागते?

तसे पाहायला गेले तर चित्रपट दिग्दर्शक बनण्यासाठी आपल्याला कोणत्या एका विशिष्ट प्रकारचे शिक्षण घ्यावेच लागते अशी कोणतीच अट असलेली आपल्याला दिसुन येत नाही.पण उत्तम चित्रपट दिग्दर्शक बनण्यासाठी आपल्याला चित्रपटांचे चांगले ज्ञान असणे फार गरजेचे असते.आणि त्यासाठी आपल्याला भरपुर चित्रपट बघण्याची आवड असायला हवी.

आज आपल्या भारतात अशा खुप संस्था आहेत ज्या चित्रपटनिर्मितीचे कोर्स आपल्या संस्थेमध्ये शिकविण्याचे काम करतात.मग तिथे कोर्स करून झाल्यानंतर आपण अनुभवासाठी एखाद्या मोठया चित्रपट दिग्दर्शकाच्या मार्गदर्शनाखाली त्याचा असिस्टंट म्हणुन देखील सुरूवातीला काम करू शकता.

चित्रपट दिग्दर्शकाचे प्रशिक्षण देणारी संस्थाने कोणकोणती आहेत?

भारतामध्ये काही अशा संस्था देखील आज उपलब्ध आहेत ज्या आपल्याला चित्रपट निर्मितीसाठी आवश्यक असणारे प्रशिक्षण देण्याचे काम करत असतात.आणि इथे आपण चित्रपट निर्मितीसाठी आवश्यक असणारे वेगवेगळे कोर्स देखील करू शकतो.अशा काही संस्थांची नावे पुढीलप्रमाणे:

 • फिल्म अँण्ड टेलिव्हिझन इंस्टिटयुट (पुणे )
 • सत्यजीत राय फिल्म अँण्ड टेलिव्हिझन इंस्टिटयुट इन (कोलकत्ता)
 • एल व्ही प्रसाद फिल्म इंस्टिटयुट (चेन्नई)
 • गर्व्हमेंट फिल्म अँण्ड टेलिव्हिझन इंस्टीटयुट(बंगलोर)
 • अरिना अँनिमेशन(बँगलोर)
 • अडयार फिल्म इंस्टीटयुट (चेन्नई)

भारतातील पाच सगळयात श्रीमंत चित्रपट दिग्दर्शकांची नावे काय आहेत?

 • रोहित शेटटी
 • करन जोहर
 • राजकुमार हिरानी
 • एस एस राजामौली
 • राकेश रोशन

चित्रपट दिग्दर्शक कोणकोणत्या क्षेत्रात काम करू शकतात?

 • बाँलिवुडचे चित्रपट
 • साऊथचे चित्रपट
 • भोजपुरी चित्रपट
 • वेबसीरीज
 • मालिका
 • जाहीरात चित्रपट
 • शैक्षणिक चित्रपट

चित्रपट दिग्दर्शक बनण्यासाठी कोणकोणते कोर्स करणे खुप गरजेचे असते?

● डिप्लोमा इन फिल्म डायरेक्शन

● पी जी डिप्लोमा इन फिल्म डायरेक्शन

● मास कम्युनिकेशन

● बी एस सी इन फिल्म मेकिंग

चित्रपट दिग्दर्शक बनण्यासाठी कराव्या लागत असलेल्या कोर्सची फी किती असते?आणि त्या कोर्सचा कालावधी काय असतो?

जर आपण चित्रपट दिग्दर्शक बनण्यासाठी चित्रपट निर्मितीतील एखादा सर्टिफिकिट कोर्स करावयाचे ठरवले तर तिथे आपल्याला कमीत तीन ते पाच महिने एवढा कालावधी हा कोर्स पुर्ण करण्यासाठी लागत असतो.आणि ह्या कोर्ससाठी आपल्याला साधारणत 40 ते 70 हजार एवढी फी भरावी लागत असते.आणि ह्यात जे डिप्लोमाचे आणि पोस्ट ग्रँज्युएशनचे कोर्स असतात ते कमीत कमी एक किंवा दोन वर्ष एवढया कालावधीत पुर्ण होणारे असतात.आणि ह्यांची आपल्याला दरवर्षी एक ते लाख इतकी फी भरावी लागत असते.

जर आपण बीएसी इन सिनेमा तसेच बीएससी इन फिल्म मेकिंग हे कोर्स करायचे ठरवले तर ह्या कोर्सेससाठी आपल्याला तीन वर्षाचा कालावधी द्यावा लागत असतो.आणि ह्यात फी पण आपल्याला प्रत्येक वर्षाला एक लाखापर्यत भरावी लागत असते.

चित्रपट दिग्दर्शकाचे वेतन काय असते? | Salary of Movie Director in Marathi

चित्रपट दिगदर्शकाचे वेतन किती असते हे जर आपण सांगावयास गेले तर असे दिसुन येते की कोणत्याही चित्रपट दिग्दर्शकाचे वेतन हे निश्चित कधीच नसते.जसा चित्रपट दिग्दर्शनाचा प्रकल्प त्यांच्या हातात येत असतो त्याच्या एकुण बजेटनुसार चित्रपट दिग्दर्शकाला त्याचे वेतन दिले जात असते.

आणि घरी सत्य परिस्थिती ही आहे की सुरूवातीलाच कोणत्याही नवीनतम चित्रपट दिग्दर्शकाला जेव्हा तो इंटर्नशिप करत असतो तेव्हा वेतन दिले जात नसते.आणि जे काही त्याला शिकत असताना पैसे भेटत असतात ते खुपच कमी असतात.

आणि असिस्टंट डायरेक्टरचे वेतन बघायला गेले तर ते 30 ते 35 हजारापर्यत असते.पण त्यातही कमी जास्त होत असते.आणि मग जसजसा त्याचा त्या क्षेत्रातील अनुभवात वाढ होत जाते तो महिन्याला लाखो देखील कमवत असतो.

चित्रपट सृष्टीत दिग्दर्शनाचे काम कसे मिळवावे?

चित्रपट दिगदर्शक बनण्यासाठी आज हजारो तसेच लाखो मुले मुली आज फिल्म मेकिंगचे शिक्षण घेतात.वेगवेगळे सर्टिफिकिट कोर्स देखील करत असतात.पण जेव्हा कार्यक्षेत्रामध्ये प्रवेश करून आपल्या ध्येयाच्या तसेच स्वप्रांच्या दिशेने धावण्याची वेळ येते तेव्हा खुप चित्रपट क्षेत्रात काम करु इच्छित मुलामुलींची निराशा होत असते.कारण त्यांच्याकडे त्या क्षेत्रात कामाची संधी मिळण्यासाठी त्या क्षेत्रात कोणाशी ओळख नसते.त्यामुळे त्यांना लगेच त्या क्षेत्रात काम करण्याची संधी प्राप्त होत नसते.

पण यात घाबरण्याचे कोणतेही कारण नाही यासाठी आपण चित्रपट क्षेत्रात आधीपासुन कार्यरत असलेल्या लोकांशी ओळखी पाळखी वाढविणे गरजेचे आहे.
आपल्याला जर डायरेक्शनच्या क्षेत्रात काम हवे असेल फिल्म प्रोडक्शन क्षेत्रातील लोकांशी आपल्या ओळखी वाढवाव्यात.त्यांच्या संपर्कात राहावे.

मुंबईत गोरेगाव येथे जिथे चित्रपटांची टिव्ही मालिकांची रोज शुटिंग होत असते अशा ठिकाणी जावे आणि तिथे डायरेक्टरला आपल्याला देखील ह्या क्षेत्रात काम करण्याची एक संधी द्यावी अशी नम्रपणे विनंती करावी.
शक्यता आपल्याला सुरुवातीला लगेच काम मिळणारही नाही कारण चित्रपट क्षेत्रात देखील आज खुप स्पर्धा आहे.त्यामुळे अशा क्षेत्रात आपल्याला लगेच संधी मिळणे थोडे अवघडच आहे.पण आपण खचुन जाऊ नये अणि निरंतर प्रयत्न करत राहावे.

एक उत्तम चित्रपट दिग्दर्शक बनण्यासाठी आपल्या अंगी कोणते गुण असणे गरजेचे आहे?

 • निर्मितीशील बुदधी असावी.
 • चित्रपट क्षेत्राचे उत्तम ज्ञान असायला हवे.
 • चांगली कल्पणाशक्ती असायला हवी.
 • हिंदी आणि इंग्रजी दोन्ही भाषांवर आपले चांगले प्रभुत्व असायला हवे.

हेही वाचा….

डॉक्टर कसे होतात ?

Banking career information in Marathi

CA information in Marathi

मी मागील 8 वर्ष MPSC आणि इतर स्पर्धा परीक्षेसंबंधी पुण्यामध्ये Classes घेत आहे, त्यामुळे या स्पर्धा कशा प्रकारे होतात, कोणते प्रश्न विचारले जातात आणि कोणत्या टॉपिक वर प्रश्न विचारले जातात या संबंधी ची पूर्ण माहिती मला असून मी माझा अनुभव या वेबसाइट द्वारे तुम्हा सर्वांपर्यंत पोचवायचा प्रयन्त करत आहे.

Leave a Comment