Banking career information in Marathi | IBPS Information in Marathi

Banking career information in Marathi | प्रोबेशनरी ऑफिसर, Bank po

Banking career information in Marathi
banking career information in marathi

banking career information in marathi – स्पर्धात्मक परीक्षेतून करिअर करणाऱ्या विद्यार्थ्यांना एमपीएससी आणि यूपीएससी हे दोन मार्ग म्हणजे स्वर्गाचे द्वार वाटत असतात.  या दोन्ही परीक्षांमध्ये यशस्वी होण्याचे प्रमाण कमी असले तरी जिद्दीने तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना यश हे मिळतेच. 

एमपीएससी, यूपीएससी नंतर स्पर्धात्मक परीक्षेचे क्षेत्र म्हणून बँकिंग क्षेत्राकडे पाहिले जाते. मात्र बँकिंग क्षेत्रामध्ये कोण कोणत्या पदांसाठी स्पर्धात्मक परीक्षा होते याचे ज्ञान नसते. त्या परीक्षा कधी होतात याच्या संदर्भात माहिती नसते.  परीक्षा देण्याची प्रक्रिया काय आहे हे ही माहित नसते. म्हणूनच या लेखामध्ये आपल्या या सर्व प्रश्नांसोबत इतर प्रश्नांची उत्तरे मिळतील.  

एमपीएससी यूपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांना जर विचारले की या दोन क्षेत्रा व्यतिरिक्त तुझा पर्याय काय असेल? तर क्षणार्धात उत्तर येईल प्रोबेशनरी ऑफिसर होणे.  मग हा प्रोबेशनरी ऑफिसर होण्यासाठी आपल्याला काय करावे लागते?

आजच्या काळातल्या कोणत्याही युवकाला जर प्रश्न विचारला तुला सरकारी नोकरी पाहिजे की खाजगी क्षणाचाही विलंब न करता उत्तर मिळेल सरकारी. 

12 वी नंतर काय करावे? 12 vi nantar kay karave ? Best For You.

बँकेमध्ये मात्र खाजगी सरकारी आणि सहकारी असे तीन प्रकार पहावयास मिळतात.  बँकेच्या मालकी स्वरूपानुसार पडणाऱ्या या प्रकारांमध्ये मिळणाऱ्या पगारामध्ये सुद्धा फरक असतो. करिअरचा विचार करत असताना कामासोबतच कमाईचा विचार प्रकर्षाने होतो. 

खाजगी बँका या खाजगी मालकांच्या असतात त्यामुळे खाजगी बँकांमध्ये बँक कर्मचाऱ्यांचे पगार सुद्धा मर्यादित असतात.  सहकारी बँकांमध्ये खाजगी बँकांच्या तुलनेने पगार थोडासा जास्त मिळतो. सरतेशेवटी सरकारी बँकांमध्ये बँक कर्मचाऱ्यांचे पगार हे भरपूर असतात.

स्वातंत्र्यानंतर भारतामध्ये बँकांचे राष्ट्रीयीकरण घडवून आणण्यात आले. इंदिरा गांधींच्या काळात एका रात्रीत खाजगी बँका या सरकारी बँका बनल्या. यानंतरही काळाच्या ओघात काही बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले.

  राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये वेळोवेळी विविध पदांची भरती निघत असते यामध्ये मुख्यतः लिपीक संवर्गातील पदे व प्रोबेशनरी ऑफिसर साठी भरती निघत असते.  याबरोबरच इतर  विशेषीकृत पदांची भरती होत असते.

देशामध्ये सध्या 27 राष्ट्रीयकृत बँका आहेत यापैकी काही बँकांनी एकत्र येऊन सामायिक लिपिक परीक्षा व सामायिक प्रोबेशनरी ऑफिसर परीक्षा 2011 पासून घेण्याचे ठरवले आहे.  याप्रमाणे ही सामायिक परीक्षा दरवर्षी होत असते.  म्हणजे एकाच परीक्षेद्वारे यामधील विविध बँकांमध्ये आपल्याला काम करण्याची संधी मिळू शकते. 

या परीक्षा घेण्याचे काम आयबीपीएस IBPS इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग परसोंनेल सेलेक्शन ही देशपातळीवरील संस्था करत असते. या परीक्षेसाठी आयबीपीएस अंतर्गत आपल्याला फॉर्म भरावे लागत असतात. 

Banking career information in Marathi – बँकेमध्ये भरली जाणारी विविध पदे

  • प्रोबेशनरी ऑफिसर/ मॅनेजमेंट ट्रेनी
  • लिपिक वर्ग
  • स्पेशलिस्ट ऑफिसर

यातील प्रोबेशनरी ऑफिसर/मॅनेजमेंट ट्रेनी याविषयी सविस्तर माहिती येथे पाहणार आहोत. Banking career information in Marathi अंतर्गत एका करियर ची माहिती आपल्याला मिळेल

प्रोबेशनरी ऑफिसर 

प्रोबेशनरी ऑफिसर व मॅनेजमेंट ट्रेनी पदासाठी सामायिक परीक्षा दरवर्षी घेतली जाते.  प्रोबेशनरी ऑफिसर पदासाठी घेतली जाणारी परीक्षा आयबीपीएस द्वारे घेण्यात येते.  या परीक्षेसाठी अर्ज संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर ती करावा लागतो.

प्रोबेशनरी ऑफिसर शैक्षणिक पात्रता

 प्रोबेशनरी ऑफिसर पदाची परीक्षा देणारा विद्यार्थी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असावा. 

 प्रोबेशनरी ऑफिसर पदासाठी वयोमर्यादा

  • खुला प्रवर्ग –  किमान 20 वर्षे ते कमाल 30 वर्षे
  • मागासवर्गीय प्रवर्ग –  किमान 20 वर्षे कमाल 33 वर्षे
  • अनुसूचित जाती/जमाती प्रवर्ग –  किमान 20 वर्षे कमाल 35 वर्षे

प्रोबेशनरी ऑफिसर्स निवडप्रक्रिया    

पूर्व परीक्षा –  पूर्व परीक्षा 100 गुणांची घेतली जाते.  पूर्व परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचे स्वरूप वस्तुनिष्ठ बहुपर्यायी असून ही परीक्षा ऑनलाईन होते. परीक्षेसाठी वेळ एक तासाचा असतो.  यासाठी विषय पुढील प्रमाणे आहेत. 

प्रोबेशनरी ऑफिसर परीक्षेचे माध्यम – 

प्रोबेशनरी ऑफिसर परीक्षा हिंदी किंवा इंग्रजी या दोनच भाषेमधून देता येते.  इतर प्रादेशिक भाषेमध्ये या परीक्षा देता येत नाहीत.

प्रोबेशनरी ऑफिसर परीक्षा अभ्यासक्रम

शंभर गुणांच्या पूर्वपरीक्षेसाठी तीन विषय अंतर्भूत असतात. 

  विषय प्रश्न संख्या गुण वेळ
1 इंग्रजी भाषा 30 30 20
2 क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड 35 35 20
3 रीजनिंग 35 35 20
  एकूण 100 100 60 मिनिटे
Banking career information in Marathi

पूर्व परीक्षा ही चाळणी परीक्षा असल्याने एकूण भरावयाच्या पद संख्येच्या 20 पट अधिक उमेदवारांची मुख्य परीक्षेसाठी निवड होते.  अंतिम निवड होताना पूर्व परीक्षेतील गुण विचारात घेतले जात नाहीत. 

नकारात्मक गुणदान – पूर्व आणि मुख्य परीक्षेसाठी नकारात्मक गुणदान योजना आहे. (Negative Marking system) पूर्व आणि मुख्य परीक्षा मधील प्रश्नांच्या उत्तरा मधील प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी एक चतुर्थांश म्हणजेच 0.25  इतके गुण कमी केले जातात.  वेगळ्या भाषेत सांगायचे झाले तर चार प्रश्न चुकले तर आपला एक मार्क वजा होतो.

प्रोबेशनरी ऑफिसर मुख्यपरीक्षा अभ्यासक्रम

मुख्य परीक्षा 225 गुणांसाठी घेतली जाते. मुख्य असते मुख्य परीक्षेमध्ये प्रश्नांचे स्वरूप वस्तुनिष्ठ बहुपर्यायी (Objective) असते. मुख्य परीक्षा सुद्धा ऑनलाईन घेतली जाते.  परीक्षेसाठी कालावधी 3.30 तासांचा असतो.

  विषय प्रश्न संख्या गुण वेळ 
1 Reasoning & computer aptitude 45 60 60 mins
2 English Language 35 40 40 mins
3 Data interpretation & analysis 35 60 45 mins
4 General economy & banking awareness 40 40 35 mins
  Total 155 200 3 hours
वर्णनात्मक भाग (Letter writing & Essay) 2 25 30 mins
Banking career information in Marathi

आयबीपीएस परीक्षांचे वैशिष्ट्य म्हणजे ये या परीक्षेमध्ये प्रत्येक सेक्शन नुसार कट ऑफ लागत असतो.  तसेच एकत्रित कठोर होत सुद्धा लागत असतो.  म्हणून उमेदवाराने परीक्षेला सामोरे जाताना हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे की एकत्रित मार्का सोबतच त्या त्या विषयातील कट ऑफ च्या मार्कांचा मागोवा घेतला पाहिजे. 

मुलाखत 

मुख्य परीक्षेनंतर उमेदवारांना मुलाखतीच्या टप्प्याला सामोरे जावे लागते.  मुलाखती साठी 100 गुण असतात. मुलाखतीमध्ये संवाद क्षमता आणि व्यक्तिमत्व पाहिले जाते. 

अंतिम निवड

उमेदवारांची अंतिम निवड करताना उमेदवारांची अंतिम निवड करताना मुख्य परीक्षेतील गुणांना 80 टक्के भार तर मुलाखतीतील गुणांना 20 टक्के भार असेल. मुख्य परीक्षा व मुलाखत तिच्या एकत्रित गुणांनुसार उमेदवारांची निवड केली जाते.

अशा पद्धतीने बँकिंग क्षेत्रामध्ये करिअर करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एका नव्या क्षेत्राचा मागोवा आपण याठिकाणी घेतला. Banking career information in Marathi.

 Banking career information in Marathi सोबत इतर क्षेत्रांमध्ये रुची असल्यास पुढील लेख उपयुक्त ठरतील…. 

NDA Admission Process in Marathi|एन डी ए परीक्षा 2023

NEET Exam Information in Marathi | Neet Exam 2023

मी मागील 8 वर्ष MPSC आणि इतर स्पर्धा परीक्षेसंबंधी पुण्यामध्ये Classes घेत आहे, त्यामुळे या स्पर्धा कशा प्रकारे होतात, कोणते प्रश्न विचारले जातात आणि कोणत्या टॉपिक वर प्रश्न विचारले जातात या संबंधी ची पूर्ण माहिती मला असून मी माझा अनुभव या वेबसाइट द्वारे तुम्हा सर्वांपर्यंत पोचवायचा प्रयन्त करत आहे.

3 thoughts on “Banking career information in Marathi | IBPS Information in Marathi”

Leave a Comment