CTET Exam Date 2020 | ctet exam date changed

CTET EXAM DATE 2020-21

सीटीईटी परीक्षेसंदर्भात Ctet exam date केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने अधिकृत सार्वजनिक सूचना नुकतीच जाहीर केलेली आहे आहे. सीटीईटी परीक्षा 2020 5 जुलै 2020 रोजी देशभरात आयोजित केली जाणार होती.

कोरोना महामारी संकटामुळे ही परीक्षा पुढे ढकलण्यात आलेली होती. मात्र अद्याप त्याची अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नव्हती. ती तारीख सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन या अधिकृत मंडळाने सीटीईटी परीक्षा 2020 साठीची परीक्षा तारीख जाहीर केलेली आहे.

सीटीईटी परीक्षा 2020 (ctet exam date 2020) ची आता पुढील वर्षी म्हणजे 2021 मध्ये आयोजित केली जाणार आहे. केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा सीटीईटी आता 31 जानेवारी 2021 रोजी होणार आहे.

पूर्वी ही परीक्षा देशभरात 112 शहरांमध्ये आयोजित केली जाणार होती.आता ही परीक्षा पूर्ण देशभरात एकूण 135 शहरांमध्ये आयोजित केली जाणार आहे. Covid-19 हे यासाठी प्रामुख्याने कारण समजले जाते. सामाजिक सुरक्षित अंतर ठेवून परीक्षेचे आयोजन करण्यासाठी असे करण्यात आले आहे असे केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

सदर माहिती सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन यांनी सार्वजनिक सूचना काढून 4 नोव्हेंबर 2020 रोजी जाहीर केलेले आहे.परीक्षा तारखे सोबतच आणखी महत्त्वाची माहिती मंडळाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी कळवण्यात आलेली आहे. ही माहिती मुलाचे परीक्षा केंद्र बदल करण्यासंदर्भात आहे.

Covid-19 मुळे बऱ्याच उमेदवारांनी आपले ठिकाण बदललेले आहे. परीक्षेसाठी परीक्षा केंद्रावर ती पोहोचण्यास अडथळे येऊ शकतात.अशा स्थलांतरित झालेल्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षेचे केंद्र बदलण्यासाठी अवधी देण्यात आलेला आहे. अधिक माहिती हवी असेल तर पुढील संकेतस्थळाला तुम्ही भेट देऊन माहिती मिळवू शकता.

परीक्षा केंद्र बदलण्यासाठी अवधी पुढील प्रमाणे..
7 नोव्हेंबर 2020 ते 16 नोव्हेंबर 2020 पर्यंत

ctet exam date 2020-21
ctet exam date 2020

सूचनेद्वारे केंद्रीय शिक्षण मंडळाने विद्यार्थ्यांच्या मनातील संभ्रम दूर करून अभ्यासाची दिशा ठरविण्यास संदर्भात महत्त्वाचे पाऊल उचलले आहे असे म्हणता येते. परीक्षेच्या तारखेत संदर्भात विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असणारा गोंधळ पूर्ण होईल आणि परीक्षेची तयारी विश्वासाने करता येईल यासाठी ही माहिती महत्त्वाची ठरते आयोगाचे अधिकृत सूचना पत्र खालील प्रमाणे आहे.

MAHA TET Result 2020

जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा JNVST

महापारेषण मध्ये 8500 जागांची भरती – महापारेषण भरती 2020

मी मागील 8 वर्ष MPSC आणि इतर स्पर्धा परीक्षेसंबंधी पुण्यामध्ये Classes घेत आहे, त्यामुळे या स्पर्धा कशा प्रकारे होतात, कोणते प्रश्न विचारले जातात आणि कोणत्या टॉपिक वर प्रश्न विचारले जातात या संबंधी ची पूर्ण माहिती मला असून मी माझा अनुभव या वेबसाइट द्वारे तुम्हा सर्वांपर्यंत पोचवायचा प्रयन्त करत आहे.

Leave a Comment