President of India in Marathi | Indian President Information in Marathi 2024

भारताचे राष्ट्रपती | President of India in Marathi | Indian President Information in Marathi 2024

भारताचे राष्ट्रपती President of India कोण असा प्रश्न सर्वांनाच काहीवेळा पडतो  या प्रश्नाचे उत्तर आणि सविस्तर घटनात्मक माहिती या लेखामध्ये आपण पाहणार आहोत.  सध्या भारताचे राष्ट्रपती Indian President श्रीमती. द्रौपदी मुर्मु आहेत. 

Indian President Information in Marathi
Indian President Information in Marathi
राष्ट्रपती पदाची निवड, पात्रता, राष्ट्रपतींना कोण कोणती कामे करावी लागतात, राष्ट्रपतींच्या संदर्भात घटनात्मक प्रयोजने काय आहेत या सर्वांचा सविस्तर आढावा घेणार आहोत.

भारतीय राज्यघटनेच्या भाग पाच मधील प्रकरण एक राष्ट्रपती व उपराष्ट्रपती यांच्याशी संबंधित तरतुदी स्पष्ट करणारे आहे.राष्ट्रपती हे भारताचे राज्य प्रमुख असून सर्व कारभार त्यांच्या नावाने चालवला जातो.

कलम 52 मध्ये भारताचा एक राष्ट्रपती असेल President of India अशी तरतूद करण्यात आली आहे.कलम 53 एक नुसार भारताच्या संघराज्याच्या कार्यकारी अधिकार राष्ट्रपतीकडे असेल याची तरतूद करण्यात आली आहे. कलम 53 (2) नुसार राष्ट्रपती भारतातील संरक्षक दलाचे सरसेनापती असतील.

President of India in Marathi | राष्ट्रपतीची निवडणूक पद्धत कशी असते?

राष्ट्रपतीची निवडणूक प्रत्यक्ष प्रौढ सार्वत्रिक मतदानाच्या पद्धतीने न होता अप्रत्यक्षपणे होते. कलम 54 नुसार राष्ट्रपतींच्या निवडणुकीची पद्धत स्पष्ट करण्यात आली आहे. राष्ट्रपती च्या निवडणुकीमध्ये

 • संसदेच्या दोन्ही सभागृहाचे निर्वाचित सदस्य
 • राज्यांचा विधानसभाचे निर्वाचित सदस्य
 • दिल्ली व पद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशांच्या विधानसभांचे निर्वाचित सदस्य भाग घेत असतात.

निवडणूक पद्धत

कलम 55 मध्ये राष्ट्रपतीचे निवडणुकीची पद्धत देण्यात आलेली आहे.

राज्याच्या विधानसभा सदस्यांच्या मताचे मूल्य – राज्याच्या विधानसभेच्या सदस्यास त्या राज्याच्या लोकसंख्येला त्या विधानसभेच्या निर्वाचित सदस्य च्या एकूण संख्येने भागले असतात येणाऱ्या भागाकारात एक हजाराच्या जितक्या पट्टी असतील तितकी मते देण्याचा अधिकार असेल. 84 व्या घटना दुरुस्तीनुसार 2001 ची लोकसंख्या यासाठी गृहित धरली जाते.

संसदेच्या सदस्यांच्या मताचे मूल्य – संसदेच्या सदस्यास सर्व राज्यांच्या विधानसभा सदस्यांना वरील प्रमाणे नियमित दिलेल्या मताचे एकूण संख्या दोन्ही सभागृहातील निर्वाचित सदस्यांच्या एकूण संख्येने भागले असता जी संख्या येथे तितकी मते असतील.

राष्ट्रपतींची President of India निवडणूक एकल संक्रमणीय मता द्वारे प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धतीने केली जाते.

President of India – Droupadi Murmu

निवडणूक वाद

राष्ट्रपतीच्या निवडणुकीसंबंधी निर्माण झालेल्या शंका व तक्रारींचे निरसन केवळ सर्वोच्च न्यायालयातच केलं जातं. सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक अवैध ठरवली तरी राष्ट्रपतींनी या आधी केलेल्या कोणत्याही कृती रद्द होत नाहीत व पुढेही अमलात राहतात.

पदावधी

कलम 56 एक नुसार राष्ट्रपतीचा पदावधी पाच वर्ष इतका असतो.

याशिवाय तर राष्ट्रपती President of India आपल्या पदाचा राजीनामा उपराष्ट्रपतीस संबोधून देऊ शकतात.राष्ट्रपतींनी घटना भंग केल्यास कलम 61 मध्ये सांगितलेल्या महाभियोग प्रक्रियेद्वारे पदावरून दूर करता येते.

कलम 57 नुसार राष्ट्रपती पुनर नेमणुकीस पात्र असतात.

राष्ट्रपतींची पात्रता | Rashtrapati Patrata in Marathi

कलम 58 मध्ये राष्ट्रपती पदासाठीची पात्रता देण्यात आलेली आहे.

 • तो भारताचा नागरिक असावा.
 • वयाची पस्तीस वर्षे पूर्ण केलेली असावीत
 • तो लोकसभा सदस्य म्हणून निवडून येण्यास पात्र असावा.
 • केंद्र व राज्य सरकारच्या अखत्यारित कोणतेही लाभाचे पद धारण करणारा नसावा.

आवेदन भरताना राष्ट्रपती पदासाठी 50 मतदारांनी पाठिंबा व 50 मतदारांनी अनुमोदन देणे गरजेचे असते.

राष्ट्रपती पदाच्या अटी | Rashtrapati Padachya Ati in Marathi

 • संसदेच्या कोणत्याही सभागृहाचा सदस्य नसावा.
 • राष्ट्रपतीला आपल्या निवासस्थानाचा निशुल्क वापर करता येतो.
 • राष्ट्रपतीला संस्थेच्या कायद्याने निश्चित केलेले पगार व भत्ते विशेष अधिकार प्राप्त होतील.
 • पदावधी दरम्यान पगार व भत्ते यांच्यामध्ये नुकसानकारक बदल केला जाणार नाही.

2018-19 च्या अर्थसंकल्पानुसार राष्ट्रपतींचा पगार वाढवून पाच लाख रुपये प्रति महिना इतका करण्यात आलेला आहे.

कलम 60 नुसार राष्ट्रपतींनी घ्यावयाचे शपथ किंवा प्रतिज्ञा देण्यात आलेली आहे.

महाभियोग | Mahabhiyog Mahiti in Marathi

कलम 61 मध्ये राष्ट्रपती वर महाभियोग प्रक्रिया कशी करावी याचे वर्णन देण्यात आलेले आहे. महाभियोग घटनाभंग या एकाच कारणावरून लावता येतो. 

महाभियोगाची प्रक्रिया संसदेचे कोणते सभागृह आखडून सुरू करण्यात येऊ शकते. महाभियोग प्रक्रियेत संसदेच्या दोन्ही सभागृहातील निर्वाचित सदस्य भाग घेत असतात. संसदेच्या दोन्ही सभागृहातील नामनिर्देशित सदस्य राष्ट्रपतीच्या निवडणुकीत भाग घेत नाहीत मात्र महाभियोग प्रक्रियेमध्ये भाग घेऊ शकतात.

पद रिक्त होणे

कलम 62 1 नुसार राष्ट्रपतीचा पदावधी संपण्याच्या आत पुढील राष्ट्रपतीच्या निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण करण्यात यावी अशी तरतूद आहे. मृत्यू राजीनामा पदच्युती या कारणामुळे राष्ट्रपती पद रिक्त राहिले तर सहा महिन्याच्या आत निवडणूक घेतली पाहिजे.

जेव्हा उपराष्ट्रपती भारताचे सरन्यायाधीश किंवा सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश राष्ट्रपती म्हणून काम करतात तेव्हा त्यांना राष्ट्रपतींचे सर्व अधिकार पगार व भत्ते विशेष अधिकार प्राप्त होतात.

भारताच्या राष्ट्रपतींचे अधिकार व कार्य

President of India कार्यकारी अधिकार

 • भारत सरकारचा कारभार राष्ट्रपतींच्या नावाने चालवला जातो. राष्ट्रपतींनी काढावयाच्या आदेश या संबंधात नियमावली राष्ट्रपती तयार करू शकतात.
 • राष्ट्रपती पंतप्रधान व पंतप्रधानांच्या सल्ल्याने इतर मंत्र्यांची नेमणूक करतात.
 • राष्ट्रपती महान्यायवादी यांची नेमणूक करतात. महान्यायवादी आपले पद राष्ट्रपतीच्या मर्जीने धारण करतो.
 • भारताचे महालेखापाल, मुख्य निवडणूक आयुक्त व इतर निवडणूक आयुक्त, संघ लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष सदस्य, राज्यपाल, वित्त आयोगाचे अध्यक्ष व सदस्य, यांची नेमणूक राष्ट्रपती करतात.
 • केंद्र शासनाच्या कामकाजाची कोणतीही माहिती मागू शकतात.
 • राष्ट्रपती आंतरराज्य परिषदेची नियुक्ती करू शकतात.

President of India in Marathi | कायदेविषयक अधिकार

 • संसदेचे अधिवेशन बोलावणे, सत्र समाप्ती, तसेच पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार लोकसभा विसर्जित करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना आहे.
 • संसदेची संयुक्त बैठक बोलावण्याचा अधिकार राष्ट्रपतींना आहे.
 • लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर पहिल्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राष्ट्रपती अभिभाषण करतात.
 • लोकसभेचे अध्यक्ष उपाध्यक्ष ही दोन्ही पदे रिक्त असल्यास लोकसभेचे कामकाज चालवण्यासाठी इतर सदस्य अध्यक्ष म्हणून राष्ट्रपती नेमू शकतात.
 • राष्ट्रपती राज्यसभेवर साहित्य विज्ञान कला सामाजिक सेवा या क्षेत्रातील विशेष ज्ञान आणि अनुभव असणाऱ्या बारा व्यक्तींना नामनिर्देशित करू शकतात.
 • अँग्लो-इंडियन समाजातील प्रतिनिधी निवडून आला नसेल तर दोन सदस्यांना लोकसभेवर नामनिर्देशित करू शकतात.
 • संचित निधीतून करावयाच्या खर्चाचे विधेयक, नवीन राज्य निर्मिती, राज्यांच्या सीमा बदलण्याचे विधेयक अशा प्रकारची काही विधेयके राष्ट्रपतींच्या पूर्वपरवानगीने संसदेत मांडावे लागतात.
 • कोणतेही विधेयक राष्ट्रपतींच्या संमतीशिवाय कायद्यात रूपांतर होत नाही.
 • राष्ट्रपतींना अध्यादेश काढण्याचा अधिकार असतो.

President of India वित्तीय अधिकार

 • अर्थ विधेयक केवळ राष्ट्रपतींच्या पूर्व परवानगीनेच लोकसभेत मांडता येते.
 • राष्ट्रपती संसदेत वार्षिक वित्तीय विवरणपत्र मांडण्याचे घडवून आणतात.
 • दर पाच वर्षांनी वित्त आयोगाची नेमणूक राष्ट्रपती करतात.

न्यायविषयक अधिकार

 • राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयातील सर न्यायाधीश व इतर न्यायाधीश व उच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या नेमणुका करतात.
 • राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाकडे कायदेशीर सल्ला मागू शकतात.
 • अपराधाबद्दल दोषी ठरविण्यात आलेल्या व्यक्तीला शिक्षेत बदल, क्षमादान करण्याचा, शिक्षा तहकुबी देण्याचा, शिक्षेत विश्राम किंवा सूट देण्याचा, शिक्षा निलंबित करण्याचा किंवा सौम्य करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना आहे.

परराष्ट्र विषयक अधिकार

 • सर्व आंतरराष्ट्रीय करार व तह राष्ट्रपतींच्या नावाने केले जातात.
 • भारताचे राजदूत व राजनितिक अधिकारी यांच्या नेमणुका राष्ट्रपती करतात. आंतरराष्ट्रीय मंचावर राष्ट्रपती भारताचे प्रतिनिधित्व करतात.

लष्करी अधिकार

 • राष्ट्रपती संरक्षक दलाचे सरसेनापती म्हणून कार्य करतात.
 • या अधिकारानुसार राष्ट्रपती स्थलसेना हवाई सेना नौसेना प्रमुखांची नेमणूक करतात.
 • युद्ध आणि शांतता या विषयाचे निर्णय राष्ट्रपती च्या आदेशानुसार ठरतात.

आणीबाणी विषयक अधिकार

राष्ट्रपतींना देशातील संकटाचा सामना करता यावा म्हणून आणीबाणी विषयक अधिकार कलम 352, 356, 360 नुसार देण्यात आलेले आहेत.

भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे होते.

सध्या 2017 पासून रामनाथ कोविंद हे भारताचे राष्ट्रपती आहेत. व्यक्ती म्हणून 14 वे राष्ट्रपती आहेत तर निवडणूक कालावधीनुसार पंधरावे राष्ट्रपती आहेत.

21 जुलै 2022 रोजी आलेल्या मतदान च्या निकालानुसार भारताचे नवनियुक्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु या होऊ शकतात. जोपर्यंत शपथविधी त्यांचा पूर्ण होत नाही तोपर्यंत त्यांना नवनियुक्त राष्ट्रपती म्हणता येत नाही. यांचा शपथविधी दिनांक 25 जुलै 2000 22 रोजी झाला.

Click for more about President – Droupadi Murmu

Official Site

भारतीय बँक, बँकांचा इतिहास, Banks Information In Marathi

मी मागील 8 वर्ष MPSC आणि इतर स्पर्धा परीक्षेसंबंधी पुण्यामध्ये Classes घेत आहे, त्यामुळे या स्पर्धा कशा प्रकारे होतात, कोणते प्रश्न विचारले जातात आणि कोणत्या टॉपिक वर प्रश्न विचारले जातात या संबंधी ची पूर्ण माहिती मला असून मी माझा अनुभव या वेबसाइट द्वारे तुम्हा सर्वांपर्यंत पोचवायचा प्रयन्त करत आहे.

2 thoughts on “President of India in Marathi | Indian President Information in Marathi 2024”

Leave a Comment