Hotel management information in Marathi | हॉटेल मॅनेजमेंट कसे करावे? 2024

हॉटेल मॅनेजमेंट कसे करावे? | hotel management information in Marathi 2024

Hotel Management Information In Marathi / Career in Hotel Management

Hotel management information in Marathi
Hotel management information in marathi

            मित्रांनो अनेक लोकांच्या मनामध्ये हॉटेल मॅनेजमेंट म्हणजे नेमके काय? हॉटेल मॅनेजमेंट कोण करू शकतो? हा प्रश्न सर्वांना पडलेला असतो. याबद्दल संपूर्ण माहिती आपण या लेखामध्ये पाहणार आहोत. काही विद्यार्थ्यांना वाटते की हॉटेल मॅनेजमेंट म्हणजे आचारी चा कोर्स आहे. आम्हाला काय आचारी व्हायचं आहे का? इत्यादी अशा प्रकारचे प्रश्न पडलेले असतात. सर्व विद्यार्थ्यांना एवढच सांगू शकतो की हॉटेल मॅनेजमेंट म्हणजे फक्त आचारी बनणे असे काही नाही हॉटेल मॅनेजमेंट केल्यानंतर आपण मोठमोठ्या हॉटेल्स मध्ये म्हणजेच 5 स्टार हॉटेल मध्ये किंवा पंचतारांकित इत्यादी ठिकाणी मोठा शेफ बनू शकतो.

             हा कोर्स करण्यासाठी कोणत्याही शाखेचे बंधन नसते. कोणत्याही शाखेतील विद्यार्थी म्हणजेच आर्ट्स(Arts), कॉमर्स(Commerce) आणि सायन्स(Science) चे विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात. तर आपण आजच्या या लेखांमध्ये हॉटेल मॅनेजमेंट हा कोर्स कसा करावा? हॉटेल मॅनेजमेंट म्हणजे काय? हॉटेल मॅनेजमेंट ची प्रवेश प्रक्रिया कशी असते? हॉटेल मॅनेजमेंट केव्हा केला जातो? हॉटेल मॅनेजमेंट साठी शैक्षणिक योग्यता काय आहे किंवा आपण पात्र आहात का? हॉटेल मॅनेजमेंट नंतर काय? इत्यादी असे प्रकारची प्रश्न तुम्हाला पडले असतील त्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आजच्या या लेखांमधून मिळेल. तसेच हॉटेल मॅनेजमेंट ची संपूर्ण माहिती आपण मराठीमध्ये या लेखात पाहणार आहोत. 

हॉटेल मॅनेजमेंट (Hotel Management) म्हणजे काय? | Hotel Management Information In Marathi

             हॉटेल मॅनेजमेंट म्हणजेच हॉटेलला संपूर्णपणे मॅनेज करणे म्हणजेच हॉटेलमधील सर्व कामे व्यवस्थित पणे पार पाडणे किंवा चालविणे. विद्यार्थ्यांनी उत्कृष्टतेचा दर्जा राखणे देखरेख करणे आणि इतर जबाबदाऱ्यांमध्ये वेळ आणि विभागांचे व्यवस्थापन कार्यक्षमतेने हाताळणे ही कला शिकणे म्हणजेच हॉटेल मॅनेजमेंट होय. 

              आजच्या काळात हॉटेल मॅनेजमेंट ही खूप मोठी इंडस्ट्री बनली आहे. कारण भारतातील म्हणजेच देशातील लोक किंवा विदेशातील पर्यटक पर्यटनासाठी येत असतात किंवा जात असतात ही संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यासाठी त्यांना राहण्याची सोय व्हावी म्हणून हॉटेलस ची आवश्यकता असते. म्हणून दिवसेंदिवस हॉटेल मॅनेजमेंट ची गरज वाढत चालली आहे. 

हॉटेल मॅनेजमेंट (Hotel Management) हा कोर्स किती वर्षाचा असतो? | Hotel management course information in Marathi

            हॉटेल मॅनेजमेंट कोर्सचा कालावधी हा तीन वर्षाचा असतो. यामध्ये मॅनेजमेंटचे अनेक कोर्स आहेत जे की त्यांचा कालावधी चार वर्षाचा असतो. किंवा हॉटेल मॅनेजमेंटचा डिप्लोमा कोर्स सुद्धा आहे त्याचा कालावधी एक वर्षाचा असतो. 

शैक्षणिक पात्रता / Qualifications / Eligibility Criteria

            हॉटेल मॅनेजमेंट कोर्समध्ये अनेक प्रकारचे कोर्स उपलब्ध आहेत. जसे की डिप्लोमा कोर्स(Diploma Course), डिग्री कोर्स(Bachelor in Hotel Management Course), सर्टिफिकेट कोर्स(Certificate Course) त्यासाठी प्रत्येक कोर्स साठी वेगवेगळी शैक्षणिक पात्रता असते. आपण डिप्लोमा किंवा डिग्री कोर्स केल्यास आपल्याकडे अधिक पर्याय उपलब्ध आहेत. आणि हे कोर्स आपण 10वी किंवा 12वी नंतर करू शकतो. त्यासाठी विद्यार्थ्याला 10वी  किंवा 12वी मध्ये किमान 50% गुण असावे अनिवार्य असते. तसेच काही कॉलेजेस मध्ये प्रवेश परीक्षा(Entrance Exam) (जसे कि MHT CET) सुद्धा घेतली जाते. 

✓ Names of Entrance Exam:- 

 1. AIHMCT [Army Institute of Hotel Management and Catering Technology]
 2. BVP HM [Bharati Vidyapeeth University] 
 3. NCHMCT [National Council of Hotel Management and Catering Technology] 
 4. UPSEE [Uttar Pradesh state entrance exam]
 5. CSIR UGC NET [Council of Scientific and Industrial Research University Grants Commission National Eligibility Test] 

         इत्यादी अशा प्रकारचे प्रवेश परीक्षा घेतली जाते. किंवा काही खाजगी कॉलेजेस मध्ये स्वतःची प्रवेश परीक्षा Entrance Exam घेतली जाते. 

आपण डिप्लोमा, डिग्री किंवा सर्टिफिकेट कोर्स ची नावे, किती वर्षाचा कोर्स असतो आणि पात्रता काय हे पाहणार आहोत. खालीलप्रमाणे :- 

डिप्लोमा कोर्स / Diploma in Hotel Management Marathi Mahiti:- 

कोर्स ची नावे  कालावधी (Duration)  पात्रता (Qualification) 
Diploma in Hospitality and Tourism study  1 वर्ष 10 वी / 12 वी उत्तीर्ण 
Diploma in Food and Beverage service  1 वर्ष 10 वी / 12 वी उत्तीर्ण 
Diploma in Front Office Management   1 वर्ष 10 वी / 12 वी उत्तीर्ण 
Diploma in Hospitality Studies and Catering Technology  1 वर्ष  10 वी / 12 वी उत्तीर्ण 
Diploma in Accommodation Management  1 वर्ष  10 वी / 12 वी उत्तीर्ण 
Diploma in Culinary Arts and Bakery  1 वर्ष  10 वी / 12 वी उत्तीर्ण 
Hotel Management Information In Marathi

डिग्री कोर्स / Bachelor in Hotel Management in Marathi :- 

कोर्स ची नावे  कालावधी (Duration)  पात्रता (Qualification) 
Bachelor in Hotel Management 3 वर्ष 12 वी उत्तीर्ण 
हॉटेल मॅनेजमेंट कसे करावे? hotel management information in marathi

सर्टिफिकेट कोर्स / Certificate course in Hotel Management :- 

कोर्स ची नावे  कालावधी (Duration)  पात्रता (Qualification) 
Certificate course in Food and Beverage Service  6 महिने  किमान 10 वी पास 
Certificate course in Hospitality Management  6 महिने  किमान 10 वी पास
Certificate course in Front Office Management 6 महिने  किमान 10 वी पास
Certificate course in Accommodation Management  6 महिने  किमान 10 वी पास
Hotel Management Information In Marathi

हॉटेल मॅनेजमेंट Hotel Management कोर्स ची फी किती असते? 

              अर्थातच हा प्रश्न सर्व विद्यार्थ्यांना पडलेला असतो की हॉटेल मॅनेजमेंट या कोर्सची फी किती असते? सरकारी कॉलेजची(Government College) फी ही कमी असते व खाजगी कॉलेजेसची(Private College) जास्त असते. जर आपण सरकारी कॉलेज मधून हॉटेल मॅनेजमेंट कोर्स करणार असाल तर त्याची फी 40 हजार ते 70 हजार इतकी असते. आणि आपण जर खाजगी कॉलेजमध्ये प्रवेश घेणार असाल तर त्यांची फी ही 50 हजार ते 1 लाख पर्यंत इतकी असते. 

हॉटेल मॅनेजमेंट Hotel Management कोर्स नंतर काय?

 ∆ हॉटेल मॅनेजमेंट नंतर नोकरीची संधी :-  Hotel Management Information In Marathi

 1. Hotels / Resorts 
 2. Airline Kitchens 
 3. Indian Army and Navy 
 4. Catering Services
 5. Cruise liners 
 6. Restaurants /Clubs and Bars 

           इत्यादी या ठिकाणी आपण नोकरी करू शकता.

∆ Top Recruiting Companies after Hotel Management Courses :- 

   प्रतिष्ठित कंपन्यांची नावे खालील प्रमाणे :-

 • Taj Group of Hotels
 • 5 Star Hotels
 • Oberoi Group of Hotels
 • Casino Group of Hotels
 • Peerless Group of Hotels
 • Sarovar Park Group of Hotels
 • ITC Group of Hotels
 • Fortune Park Group of Hotels
 • The Manohar Group of Hotel
 • Shahi Palace Hotels 
 • Gazi Hotel, Jaisalmer

       इत्यादी या मोठ्या नामांकित किंवा पंचतारांकित हॉटेल्समध्ये शेफ म्हणून काम करण्याची संधी भेटते/ मिळते.

अंतिम निष्कर्ष / Hotel management information in Marathi

           तर विद्यार्थी मित्रांनो आपण आजच्या या लेखात हॉटेल मॅनेजमेंट कसा करावा? या बद्दल संपूर्ण माहिती मराठी मध्ये पाहिले. तुम्हाला सर्वांना या लेखांमधून समजले असेल की  Hotel Management म्हणजे काय? Hotel Management हा कोर्स किती वर्षाचा असतो? व त्यासाठी आपली शैक्षणिक पात्रता किंवा योग्यता काय आहे? इत्यादी अशा अनेक गोष्टी किंवा बाबींचा तुम्हाला सर्वांना कळालेच असेल. तरी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर Hotel Management कसा करावा? तुम्हाला या लेखातून हॉटेल मॅनेजमेंट Hotel Management बद्दल संपूर्ण माहिती मिळालीच असेल. तरी याबद्दल अजून काही माहिती हवी असेल किंवा Hotel Management बद्दल शंका असतील तर आपण कॉमेंट बॉक्स (Comment Section) मध्ये विचारू शकता.

          आमचा हाच प्रयत्न असतो की विद्यार्थ्याला हव्या असणाऱ्या सर्व विषयाची माहिती एकाच वेबसाईटवरुन आपल्यापर्यंत पोहोचविणे हाच आमचा उद्देश असतो. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आजच्या या लेखातून समजले असेल की Hotel Management हा कोर्स कसा करावा? Hotel management information in Marathi तर तुम्हाला हा लेख आवडल्यास जास्तीत जास्त तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करा जेणेकरून त्यांनाही समजेल की Hotel Management कसा करावा? किंवा Hotel Management म्हणजे काय? व त्यानुसार तुम्ही Hotel Management या कोर्सच्या तयारीला लागू शकाल.

धन्यवाद व तुम्हाला तुमच्या उज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा…. 

हे हि पहा …

Banking career information in Marathi 

ITI कसे करायचे? ऍडमिशन,फी, पात्रात, आणि नोकरीची संधी

मी मागील 8 वर्ष MPSC आणि इतर स्पर्धा परीक्षेसंबंधी पुण्यामध्ये Classes घेत आहे, त्यामुळे या स्पर्धा कशा प्रकारे होतात, कोणते प्रश्न विचारले जातात आणि कोणत्या टॉपिक वर प्रश्न विचारले जातात या संबंधी ची पूर्ण माहिती मला असून मी माझा अनुभव या वेबसाइट द्वारे तुम्हा सर्वांपर्यंत पोचवायचा प्रयन्त करत आहे.

24 thoughts on “Hotel management information in Marathi | हॉटेल मॅनेजमेंट कसे करावे? 2024”

 1. HOTEL MANAGEMENT COURSE WITHOUT ENGLISH KARU SHAKTO KA ….. ENGLISH COMPLECERRY AAHE KA

  AND EASY TOPIC KUTHLA AAHE

  Reply
  • मला पण हा कोर्स करायचं आहे पण मला फारशी इंग्लिश येत नाहीं.मला हा कोर्स करता येईल का..

   Reply
 2. Sir majhi 12 th jhali pan mala 12th madhi 40% aahe tr mi 10th bases var deploma karu shakto ka?
  (Aani jar 10th nantr 2 years nantr mi aajchy tarikhi madhi deploma la admission karu shakto ka 70% chy reference var?

  Reply
  • Indian School of Business Management and Administration – ISBM Thane
   location_on 209, 2nd Floor, Bal Ganesh Tower, Dada Patil Wadi Road, Near Platform No.1 Station , Thane, Maharashtra
   call phone_iphone 9321757598, 9146488277
   Rashtrasant Tukadoji Maharaj Nagpur University – RTMNU
   Approved By: UGC AICTE
   location_on Chhatrapati Shivaji Maharaj Administrative Premises, Ravindranath Tagore Marg, Nagpur, Maharashtra

   Reply
 3. सर मी कांदिवलीला राहते मला होटेल मॅनजमेट करायचे आहे तर सरकारी कॉलेज सुचवा नाव

  Reply
 4. Sir hotel management sathi kontya field jave lagtil for example science or commerce or art aashya kontya side jayla have

  Reply
 5. I want open resorts but I have no degree of hotel management.my education is B.A.english.my age 30 above

  Reply
 6. Sir Aapan HMCT baddal khup changali mahiti dili, parantu aapan fkt hya madhe Chef’s (Cook) baddal pan mahiti dilit, pan kharr tar baki Department sudha aahet jithe etr mulana carrier sathi khup scope aahe, jase ki F & B Service, Housekeeping, Front Office, Back Offices Job aahet…hya baddal pan mahiti dya, jyana kitchen mdhe interest nahi te hya department madhe kaam kru skatatat.

  Reply
  • wahhhh.. chan kalpana sir. lavakarach karu. आपल्या अमूल्य प्रतिसादाबद्दल आभारी आहोत.

   Reply
 7. नमस्कार सर,माझं नांवः प्रशांत नंदकिशोर सावंत आहे,मि 10वी पास व 12 वी पास आहे तर मि परभणी चा रहिवासी आहे तर मी हा हाॅटेल मेनेजमेंट कोर्स कुठं आहे,औरंगाबाद,नासिक,पुणे या ठिकाणा पैकी पाहीजे

  Reply
 8. सर मला पण hotel management बनायचं आहे. सर माझी 12 वी चालू आहे .

  Reply

Leave a Comment