पोलीस भरती 2024 सामान्य ज्ञान प्रश्नसंच | Police Bharti Important Questions in Marathi 2024

पोलीस भरती 2024 सामान्य ज्ञान प्रश्नसंच | Police Bharti Important Questions in Marathi 2024

Police Bharti Important Questions in Marathi: विद्यार्थीमित्रांनो Maharashtra Police Bharti Pariksha मध्ये जर तुम्हाला यशस्वी व्हायचे असेल तर तुम्हाला अधिकाधिक MCQs प्रश्नांचा सराव करणे गरजेचे आहे. याच गोष्टीचा विचार करून मी नितीन शिंदे तुम्हाला आजच्या या लेखात पोलीस भरतीच्या संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित महत्वाचे प्रश्न तुमच्या साठी घेऊन आलेलो आहे.

Maharashtra Police Bharti IMP GK Questions in Marathi च्या या लेखात दिलेले प्रश्न महाराष्ट्र पोलीस भरती सोबत राज्य राखीव पोलीस बल म्हणजे SRPF, रेल्वे पोलीस, उत्पादन शुल्क पोलीस, कारागृह पोलीस तसेच इतर सरळसेवा भरती परीक्षेसाठी अतिशय महत्वाचे प्रश्न आहे. पोलीस भरती 2024 सामान्य ज्ञान प्रश्नसंच या लेखात मी २०० पेक्षा अधिक मागील वर्षी पोलीस भरती परीक्षेत विचारले गेलेले प्रश्न संग्रहित केलेले आहेत. तुम्हाला एखादा प्रश्न समजला नसेल किंव्हा काही शंका असेल तर खाली कंमेंट करून नक्की सांगा.

Police Bharti Important Questions in Marathi 2024

Police Bharti Important Questions in Marathi 2024
Police Bharti Important Questions in Marathi 2024

Q.1) “वेदांत कॉलेजची”स्थापना खालीलपैकी कोणी केली होती?

1) वि. रा. शिंदे
2) स्वामी विवेकानंद
3) राजा राम मोहन राय
4) लोकमान्य टिळक

उत्तर: 3) राजा राम मोहन राय

Q. 2) महाराष्ट्रामध्ये एकूण प्रशासकीय विभाग किती आहेत ?

1) 5
2) 6
3) 7
4) 8

उत्तर: 2) 6

Q.3) 26 ऑगस्ट 1982 रोजी चंद्रपूर जिल्ह्यामधून कोणता नवीन जिल्हा निर्माण करण्यात आला ?

1) गोंदिया
2) भंडारा
3) गडचिरोली
4) नंदुरबार

उत्तर: 3) गडचिरोली

Q.4) पंढरपूर हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे ?

1) इंद्रायणी
2) भीमा
3) प्रवरा
4) कृष्णा

उत्तर: 2) भीमा

Q.5) मोडक सागर हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे ?

1) सोलापूर
2) सातारा
3) अहमदनगर
4) ठाणे

उत्तर: 4) ठाणे

Q.6) हापूस आंब्यासाठी प्रसिद्ध असलेला जिल्हा कोणता आहे ?

1) कोल्हापूर
2) यवतमाळ
3) रत्नागिरी
4) सिंधुदुर्ग

उत्तर: 3) रत्नागिरी

Q.7) फणसाड हे महाराष्ट्रामध्ये अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ?

1) कोल्हापूर
2) रायगड.
3) गोंदिया
4) चंद्रपूर

उत्तर: 2) रायगड

Q.8) एलिफंटा व घारापुरी लेणी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे ?

1) पुणे
2) औरंगाबाद
3) गोंदिया
4) रायगड

उत्तर: 4) रायगड

(9) दादासाहेब फाळके पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षापासून झालेली आहे?

1) 1965
2) 1970
3) 1977
4) 1969

उत्तर: 4) 1969

10) काझीरंगा नॅशनल पार्क कोणत्या राज्यात आहे?

1) गुजरात
2) उत्तर प्रदेश
3) आसाम.
4 ) मध्य प्रदेश

उत्तर: 3) आसाम

11) जिम कॉर्बेट नेशनल पार्क कोणत्या राज्यात आहे?

1) उत्तर प्रदेश
2) मध्य प्रदेश
3) उत्तराखंड
4) गुजरात

उत्तर: 3) उत्तराखंड

12) ओझोन दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो?

1) 16 सप्टेंबर
2) 2 ऑक्टोबर
3) 17 ऑक्टोबर
4) 22 नोव्हेंबर

उत्तर: 1) 16 सप्टेंबर

13) गर्भलिंग चिकित्सा प्रतिबंधक अधिनियम कोणत्या वर्षी पास झाला आहे?

1) 1990
2) 1991
3) 1994
4) 1995

उत्तर: 3) 1994

14) 1992 मध्ये पहिली जागतिक वसुंधरा परिषद कोठे संपन्न झाली?

1) ब्राझील
2) फ्रान्स
3) भारत
4) भूतान

उत्तर: 1) ब्राझील

15) पुल्लर लेणी खालील पैकी कोणत्या जिल्ह्यांमध्ये आढळतात?

1) नागपूर.
2) पुणे
3) भंडारा
4) यवतमाळ

उत्तर: 1) नागपूर

16) भामरागड टेकड्या खालीलपैकी कोठे स्थित आहेत?

1) गोंदिया
2) नंदुरबार
3) गडचिरोली
4) अहमदनगर

उत्तर: 3) गडचिरोली

17) खालील पैकी कुठल्या जिल्ह्यामध्ये साक्षरता दर हासर्वात कमी आहे?

1) गडचिरोली
2) गोंदिया
3) नंदुरबार
4) अमरावती

उत्तर: 3) नंदुरबार

18) WTO ची स्थापना खालीलपैकी कोणत्या सालीझाली होती?

1) 1990
2) 1994
3) 1995
4) 1996

उत्तर: 3) 1995

19) जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे?

1) न्यूयॉर्क
2) पॅरीस
3) जिनिव्हा
4) हाँगकाँग

उत्तर: 3) जिनिव्हा

20) भारतामधील 14 प्रमुख व्यापारी बँकांचे राष्ट्रीयीकरण केव्हा करण्यात आले?

1) 1948
2) 1950
3) 1969
4) 1966

उत्तर: 3) 1969

Maharashtra Police Bharti Sarav Paper

Maharashtra Police Bharati Question Paper

Maharashtra Police Bharati Question Paper
Maharashtra Police Bharati Question Paper

21) भारतामधील पवन ऊर्जा क्षेत्रामध्ये खालीलपैकी अग्रेसर राज्य कोणते आहे?

1) आंध्र प्रदेश
2) तमिळनाडू
3) गुजरात
4) महाराष्ट्र

उत्तर: 2) तमिळनाडू

22)”द नेम ऑफ पीपल”हे पुस्तक कोणी लिहिलेआहे?

1) के आर नारायण.
2) तलिस्मा नसरीन
3) पी व्ही नरसिंहराव
4) मनमोहन सिंग

उत्तर: 1) के आर नारायण.

23) भूतान या देशाला भारताच्या किती राज्यांच्या सीमा जोडतात?

1) 2
2) 3
3) 4.
4) 5

उत्तर: 3) 4

24) भारतामध्ये होमरूल चळवळ कोणी सुरू केली?

1) एनी बेसेन्ट
2) मदर तेरेसा
3) महात्मा गांधी
4) अगरकर

उत्तर: 1) एनी बेसेन्ट

25) भारतीय राज्यघटनेची पहिली बैठक कधी झाली ?

1) 26 नोव्हेंबर 1950
2) 15 ऑगस्ट 1947
3) 9 डिसेंबर 1946
4) 19 नोव्हेंबर 1944

उत्तर: 3) 9 डिसेंबर 1946.

26) धनविधेयक सर्वप्रथम …… मध्ये मांडतात ?

1) लोकसभा.
2) राष्ट्रपती कार्यालय
3) राज्यसभा
4) यापैकी नाही

उत्तर: 1) लोकसभा.

27) राष्ट्रपती राज्यसभेवर किती सभासद नियुक्त करतात?

1) 12
2) ।
3) 10
4) 6

उत्तर: 1) 12

28) प्रशासकीय विभागानुसार सर्वात कमी वनक्षेत्र कोणत्या विभागांमध्ये आहे?

1) नाशिक
2) अमरावती
3) पुणे
4) औरंगाबाद

उत्तर: 4) औरंगाबाद

29) महाराष्ट्र मध्ये एकूण क्षेत्रफळाच्या सुमारे किती टक्के क्षेत्र गोदावरी खोऱ्याने व्यापलेले आहे?

1) 40
2) 49
3) 55
4) 45

उत्तर: 2) 49

30) खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये पंचायत राज अस्तित्वात नाही?

1) आसाम
2) केरळ
3) नागालँड
4) त्रिपुरा

उत्तर: 3) नागालँड.

31) महर्षी कर्वे यांनी 1944 मध्ये …. कशाची स्थापना केली?

1) भारतीय नारी संघ
2) भारतीय संघ
3) भारतीय समता संघ
4) समता संघ

उत्तर: 4) समता संघ

32) फाइकोलॉजी मध्ये कशाचा अभ्यास केला जातो?

1) फुले
2) शैवाल
3) म्युकर
4) यापैकी नाही

उत्तर: 2) शैवाल

33) पहिले महायुद्ध खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरु झाले होते?

1) 1912
2) 1913
3) 1914
4) 1915

उत्तर: 3) 1914

34) 6 एप्रिल 1930 रोजी गांधीजींनी येथे मिठाचा कायदा मोडला?

1) दांडी.
2) साबरमती
3) धारासना
4) गांधिनगर

उत्तर: 1) दांडी

35) राष्ट्रीय सभेचे ग्रामीण भागातील पहिले अधिवेशन 1936 आली कोठे भरले होते?

1) रामगड
2) फैजपूर
3) प्रतापगड
4) मुंबई

उत्तर: 2) फैजपूर.

36) आझाद हिंद सरकारची स्थापना खालीलपैकी कोणी केली?

1) नेताजी सुभाष चंद्र
2) रासबिहारी बोस
3) लाला हरदयाल
4) श्यामजी कृष्ण वर्मा

उत्तर: 2) रासबिहारी बोस

37) आणीबाणी मध्ये लोकसभेचा कार्यकाळ एका वेळी किती वर्षांनी वाढवता येतो?

1) एक.
2) दोन
3) तीन
4) चार

उत्तर: 1) एक.

38) अंदमान आणि निकोबार बेटे खालीलपैकी कोणत्या उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात येतात ?

1) कलकत्ता
2) मुंबई
3) मद्रास
4) आसाम

उत्तर: 1) कलकत्ता

39) राज्य विधिमंडळाचे वरिष्ठ सभागृह कोणते आहे ?

1) विधानसभा
2) विधान परिषद
3) लोकसभा
4) राज्यसभा

उत्तर: 1) विधानसभा

40) केशवकुमार या टोपण नावाने लेखन करणाऱ्या लेखकाचे नाव काय आहे?

1) कृ. के. दामले
2) रा. ग. गडकरी
3) प्र. के. अत्रे
4) वि. वा. शिरवाडकर

उत्तर: 2) रा. ग. गडकरी (राम गणेश गडकरी)

पोलीस भरती जनरल नॉलेज प्रश्न

पोलीस भरती जनरल नॉलेज प्रश्न
पोलीस भरती जनरल नॉलेज प्रश्न

41) आंतरराष्ट्रीय बालकामगार विरोधी दिवस कधी साजरा केला जातो?

1) 12 जुन
2) 14 जुन
3) 12 जुलै
4) 14 जुलै

उत्तर: 1) 12 जुन

42) सियाचिन ग्लेशियर हे कोणत्या राज्यात आहे?

1) हिमाचल प्रदेश
2) अरुणाचल प्रदेश
3) जम्मू-काश्मीर
4) सिक्किम

उत्तर: 3) जम्मू-काश्मीर

43) राष्ट्रपती राजवट घटनेच्या कोणत्या कलमानुसार लागवड करता येते?

1) कलम 356
2) कलम 358
3) कलम 360
4) कलम 370

उत्तर: 1) कलम 356

44) शांतता! कोर्ट चालू आहे हे नाटक कोणी लिहिले आहे?

1) विजय तेंडुलकर
2) वसंत बापट
3) संतोष पवार
4) वसंत कानेटकर

उत्तर: 1) विजय तेंडुलकर

45) समाजवादच का? हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेले पुस्तक आहे?

1) लाला लाजपत राय
2) रवींद्रनाथ टागोर
3) जयप्रकाश नारायण
4) दादाभाई नौरोजी

उत्तर: 3) जयप्रकाश नारायण.

46) नाईटिंगेल ऑफ इंडिया असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते?

1) लता मंगेशकर
2) सरोजिनी नायडू
3) इंदिरा गांधी
4) राणी लक्ष्मीबाई

उत्तर: 2) सरोजिनी नायडू

47) बार्डोली सत्याग्रह खालीलपैकी कोणत्या वर्षी झाला होता?

1) 1922
2) 1924
3) 1928
4) 1930

उत्तर: 3) 1928.

48) भारतात रेल्वे ची सुरुवात झाली त्यावेळेस भारताचे गव्हर्नर जनरल कोण होते?

1) लॉर्ड डलहौसी
2) लॉर्ड कॅनिंग
3) लॉर्ड माऊंटबॅटन
4) लॉर्ड ऍटली

उत्तर: 1) लॉर्ड डलहौसी

49) पुणे येथे आर्य महिला समाजाची स्थापना कोणी केली?

1) सावित्रीबाई फुले
2) पंडिता रमाबाई
3) इरावती कर्व
4) अनुताई वाघ

उत्तर: 2) पंडिता रमाबाई

50) 1887 मध्ये….. भारतीय राष्ट्रीय सामाजिक परीषद ची स्थापना कोणी केली?

1) केशवचंद्र सेन
2) एम. जी. रानडे
3) गो. कृ. गोखले
4) दादाभाई नौरोजी

उत्तर: 2) एम. जी. रानडे.

51) भारतामध्ये इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठ ची स्थापना दिल्ली येथे कोणत्या वर्षी करण्यात आली?

1) 1985
2) 1995
3) 1976
4) 1975

उत्तर: 1) 1985.

52) सार्वजनिक काका असे खालीलपैकी कोणाला म्हणत असत ?

1) गोपाळ हरी देशमुख
2) गणेश वासुदेव जोशी
3) विष्णुशास्त्री पंडित
4) दादाभाई नौरोजी

उत्तर: 2) गणेश वासुदेव जोशी

53) भारतामध्ये थिऑसॉफिकल सोसायटीची स्थापना कोणी केली?

1) ऍनी बेझंट
2) बी.जी. टिळक
3) लोकमान्य टिळक
4) उमेशचंद्र बॅनर्जी

उत्तर: 1) ऍनी बेझंट

54) भारतीय राज्य घटनेचे कलम 214 हे कशा संबंधीचे कलम आहे?

1) राज्यांसाठी उच्च न्यायालय
2) उच्च न्यायालय
3) राज्यांचे राज्यपाल
4) जिल्हा न्यायाधीशांची नियुक्ती

उत्तर: 2) उच्च न्यायालय

55) संसदेची सर्वात मोठी समिती कोणती आहे?

1) लोकलेखा समिती
2) अंदाज समिती
3) सार्वजनिक समिती
4) हिशोब समिती

उत्तर: 1) लोकलेखा समिती

56) कोणत्या पदार्थाचे विशिष्ट उष्माधारकता सर्वाधिक असते?

1) पारा
2) चांदी
3) पाणी
4) लोखंड

उत्तर: 3) पाणी

57) ओझोन वायू चे मोजमाप खालीलपैकी कोणत्या एककात केले जाते?

1) डॉब्सन
2) ओझोनोमीटर
3) ओझोन लेयार
4) ओझोन डिवाइस

उत्तर: 1) डॉब्सन

58) महात्मा ज्योतिबा फुले यांना महात्मा ही पदवी कुठे व केव्हा दिली?

1) मुंबई 1888
2) पुणे 1877
3) सातारा 1873
4) कोल्हापूर 1887

उत्तर: 1) मुंबई 1888

59) पेलाग्रा हा रोग कोणत्या पदार्थाच्या अभावामुळे होतो?

1) कॅल्शियम
2) इन्सुलिन
3) नियासीन
4 ) फ्लोरिंन

उत्तर: 3) नियासीन

60) उजनी हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे ?

1) कोल्हापूर
2) सांगली
3) सोलापूर
4) गोंदिया

उत्तर: 3) सोलापूर

Police Bharti GK Questions in Marathi

Police Bharti GK Questions in Marathi
Police Bharti GK Questions in Marathi

61) ब्लास्ट हा रोग कोणत्या पिकावर पडतो?

1) तांदूळ
2) कापूस
3) हळद
4) भुईमूग

उत्तर: 1) तांदूळ

62) अग्निजन्य खडकापासून खालीलपैकी कोणती मृदा बनते?

1) रेगूर मृदा
2) जांभी मृदा
3) गाळाची मृदा
4) तांबडी मृदा

उत्तर: 1) रेगूर मृदा

63) भुईमुगाच्या उत्पादनामध्ये कोणत्या राज्याचा प्रथम क्रमांक लागतो?

1) उत्तर प्रदेश
2) गुजरात
3) बिहार
4) राजस्थान

उत्तर: 2) गुजरात.

64 ) गुलमर्ग, सोनमर्ग ही थंड हवेची ठिकाणे कोणत्या राज्यामध्ये आहे?

1) जम्मू-काश्मीर
2) हिमाचल प्रदेश
3) उत्तराखंड
4) पश्चिम बंगाल

उत्तर: 1) जम्मू-काश्मीर

65) मांजरा नदी खालील पैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये उगम पावते?

1) जालना
2) उस्मानाबाद
3) बीड
4) नाशिक

उत्तर: 3) बीड

66) दुध गंगा प्रकल्पाचा फायदा होणारा जिल्हा कोणता आहे?

1) सोलापूर
2) कोल्हापूर
3) पुणे
4) अहमदनगर

उत्तर: 2) कोल्हापूर

67) उत्तर आफ्रिकेमधील वाळवंटी प्रदेशाचे नाव काय आहे?

1) सहारा
2) अटाकामा
3) कॉलोराडो
4) मसाई

उत्तर: 1) सहारा

68) रूरकेला लोह पोलाद कारखाना कोणत्या राज्यात आहे?

1) मध्यप्रदेश
2) ओरिसा
3) बिहार
4) पश्चिम बंगाल

उत्तर: 2) ओरिसा

69) भारतीय राज्यघटनेमध्ये समानतेचा हक्क कोणत्या कलमा मध्ये देण्यात आलेला आहे?

1) कलम 14 ते 18
2) कलम 19 ते 22
3) कलम 23 ते 24
4) कलम 25 ते 28

उत्तर: 1) कलम 14 ते 18

70) काचेला गडद निळा रंग देण्यासाठी कोणते ऑक्साईड वापरले जाते?

1) फेरस ऑक्साईड
2) कोबाल्ट ऑक्साईड
3) मॅग्नीज डाय-ऑक्साइड
4) कॅडमियम सल्फाइड

उत्तर: 2) कोबाल्ट ऑक्साईड

71) हवेमध्ये कार्बन-डाय-ऑक्साइडचे शेकडा प्रमाण किती आहे?

1) 0.07%
2) 0.04%
3) 0.78%
4) 78%

उत्तर: 2) 0.04%

72) खालीलपैकी कोणत्या पदार्थाचे सर्वात जास्त द्रवणांक आहे?

1) पाणी
2) पारा
3) हवा
4 ) ऑक्सिजन

उत्तर: 2) पारा

73) मानवी चेहऱ्यामध्ये एकूण हाडांची संख्या किती असते?

1) 23
2) 14
3) 21
4) 16

उत्तर: 2) 14

74) भारतीय राज्यघटनेचे कोणते कलम जीविताची हमी देते?

1) कलम 18
2) कलम 19
3) कलम 21
4) कलम 20

उत्तर: 3) कलम 21

75) भारतीय राज्यघटनेमध्ये पंचायत राज हा विषय कोणत्या भागामध्ये आहे?

1) भाग 5
2) भाग 7
3) भाग 9
4) भाग 11

उत्तर: 3) भाग 9

76) “मी नास्तिक का”आहे हा ग्रंथ खालील पैकी कोणी लिहिला होता?

1) राजगुरू
2) भगतसिंग
3) मदनलाल धिंग्रा
4) चंद्रशेखर आजाद

उत्तर: 2) भगतसिंग

77) अभिनव भारत या संघटनेची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती?

1) 1900
2) 1904
3) 1905
4) 1927

उत्तर: 2) 1904

78 गीतांजली हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले होते?

1) रवींद्रनाथ टागोर
2) बंकिमचंद्र चॅटर्जी
3) रामप्रसाद बिस्मिल
4) सरोजिनी नायडू

उत्तर: 1) रवींद्रनाथ टागोर

79) इंडियन ओपिनियन हे वृत्तपत्र कोणी सुरु केले होते?

1) महात्मा गांधी
2) ऍनी बेझंट
3) लाला लजपत राय
4) शिरीष कुमार घोष

उत्तर: 1) महात्मा गांधी

80) कोकणामधील अगदी उत्तरेकडे असणारी नदी खालीलपैकी कोणती आहे?

1) पाताळगंगा
2) दमणगंगा
3) वाशिष्टी
4) सावित्री

उत्तर: 2) दमणगंगा

Police Bharti question paper in Marathi

Police bharti question paper in Marathi
Police bharti question paper in Marathi

81) जागतिक अन्न दिवस कधी साजरा केला जातो?

1) 11 जुलै
2) 12 जून
3) 16 ऑक्टोबर
4 ) 3 मे

उत्तर: 3) 16 ऑक्टोबर

82) ‘it’s always possible”हे पुस्तक खालीलपैकी कोणाचे आहे?

1) किरण बेदी
2) मनमोहन सिंग
3) राम मनोहर लोहिया
4) अटल बिहारी वाजपेयी

उत्तर: 1) किरण बेदी

83) ज्ञानपीठ पुरस्काराची सुरुवात कधी पासून करण्यात आली?

1) 1964
2) 1965
3) 1967
4) 1968

उत्तर: 2) 1965

84) भारतीय भू-सेना दिन कधी साजरा केला जातो?

1) 15 ऑक्टोबर
2) 15 जानेवारी
3) 15 नोव्हेंबर
4) 3 जुन

उत्तर: 2) 15 जानेवारी

85) महाराष्ट्रातील सर्वात कमी लांबीची नदी कोणती आहे?

1) नर्मदा
2) तापी
3) वर्धा
4) भीमा

उत्तर: 1) नर्मदा

86) महाराष्ट्रातील जायकवाडी प्रकल्पाच्या जलाशयाचे नाव काय आहे?

1) शिवसागर
2) नाथ सागर
3) इंदिरा सागर
4) गोविंद सागर

उत्तर: 2) नाथ सागर

87) महाराष्ट्रामध्ये तारापूर या ठिकाणी कोणत्या प्रकारची विद्युत निर्मिती केली जाते?

1) औष्णिक ऊर्जा
2) अणू उर्जा
3) पवन विद्युत
4) जलविद्युत

उत्तर: 2) अणू उर्जा

88) “रेहेकुरी अभयारण्य पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?

1) अहमदनगर
2) बीड
3) लातूर
4) अकोला

उत्तर: 1) अहमदनगर

89) अरबी समुद्राच्या किनारपट्टी लगतच्या सखल भागास काय म्हणतात ?

1) वलाटी
2) खलाटी
3) खाडी
4) बेट

उत्तर: 2) खलाटी

90 ) इकोलॉजी म्हणजेच खालीलपैकी कोणते शास्त्र होय?

1) पर्यावरण
2) जीव
3) रसायन
4) परिस्थितीकी शास्त्र

उत्तर: 4) परिस्थितीकी शास्त्र

9I) आनंद ह्या शब्दाचा खालीलपैकी समानार्थी नसलेला शब्द कोणता आहे?

1) हर्ष
2) मोद
3) प्रमोद
4) गेह

उत्तर: 4) गेह

92) शब्द समुहाबद्दल एक शब्द निवडायचा आहे. नवीन मतांचा पुरस्कार करणारा…….

1) सुधारणावादी
2) प्रतिगामी
3) अधोगामी
4) नवमतवादी

उत्तर: 4) नवमतवादी

93) खालीलपैकी कोणते पठार टेबल लँड म्हणून ओळखले जाते?

1) तोरणमाळ
2) पाचगणी
3) अहमदनगर
4) त्रंबकेश्वर

उत्तर: 2) पाचगणी

94) सातारा, सांगली, कराड, कोल्हापूर ही शहरे खालीलपैकी कोणत्या नदीच्या खोऱ्यात वसलेली आहेत?

1) गोदावरी
2) भीमा
3) कृष्णा
4) तापी

उत्तर: 3) कृष्णा

95) हैदराबाद मुक्तिसंग्रामाचे नेतृत्वा खालील पैकी कोणी केले?

1) स्वामी विवेकानंद
2) स्वामी रामानंद तीर्थ
3) राम मनोहर लोहिया
4) स्वामी श्रद्धानंद

उत्तर: 2) स्वामी रामानंद तीर्थ

96) लोकमान्य टिळक हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे नेते होते ?

1) जहाल मतवादी
2) मवाळ मतवादी
3) माओवादी
4) साम्यवादी

उत्तर: 1) जहालमतवादी

97) सुप्रसिद्ध”दासबोध”या ग्रंथाचे कर्ते खालीलपैकी कोण आहेत?

1) संत तुकाराम
2) संत रामदास
3) संत ज्ञानेश्वर
4) संत एकनाथ

उत्तर: 2) संत रामदास

98) हिरव्या वनस्पती खालीलपैकी कशाच्या स्वरूपामध्ये अन्न साठवण करतात?

(1) ग्लुकोज
2) फ्रक्टोज
3) माल्टोज
4) स्टार्च.

उत्तर: 4) स्टार्च

99) सूर्यकुलात सर्वाधिक उपग्रह असणारा ग्रह कोणता आहे?

1) शनि
2) नेपच्यून
3) गुरू
4) मंगळ

उत्तर: 1) शनि

100) हॉर्स पावर हे खालीलपैकी कशाचे एकक आहे?

1) बल
2) शक्ती
3) दाब
4) तापमान

उत्तर: 2) शक्ती

Maharashtra Police Constable Exam Previous Years Question Paper

Maharashtra Police Constable Exam Previous Years Question Paper
Maharashtra Police Constable Exam Previous Years Question Paper

101) रेगुलेटिंग एक्ट नुसार भारताचा पहिला गव्हर्नर जनरल कोण बनला?

1) लॉर्ड कॉर्नवालीस
2) वॉरन हेस्टिंग्स
3) लॉर्ड विल्यम बेटिंग
4) लॉर्ड वेलस्ली

उत्तर: 2) वॉरन हेस्टिंग्स

102) तैनाती फौजेचा जनक खालीलपैकी कोणास म्हटले जाते?

1) रॉबर्ट क्लाइव्ह
2) लॉर्ड रिपन
3) लॉर्ड वेलस्ली
4) लॉर्ड डलहौसी

उत्तर: 3) लॉर्ड वेलस्ली

103)”संवाद कौमुदी”व मिरत उल अखबार हि वृत्तपत्रे कोणी सुरू केली?

1) स्वामी विवेकानंद
2) स्वामी दयानंद सरस्वती
3) राजाराम मोहन रॉय
4) वि. रा. शिंदे

उत्तर: 3) राजाराम मोहन रॉय

104) रौलट कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी चा कायदा आहे?

1) 1909
2) 1919
3) 1920
4) 1930

उत्तर: 2) 1919

105) ताश्कंद करार् 1966 मध्ये कोणत्या दोन देशांमध्ये झाला होता?

1) भारत- चीन
2) भारत-पाकिस्तान
3) भारत- अफगाणिस्तान
4) भारत जपान

उत्तर: 2) भारत-पाकिस्तान

106) “विद्यार्थी “हे मासिक खालीलपैकी कोणी सुरू केले होते?

1) डॉ. पंजाबराव देशमुख
2) सानेगुरुजी
3) गोपाळ गणेश आगरकर
4) बाळशास्त्री जांभेकर

उत्तर: 2) सानेगुरुजी

107) भारतीय राज्यघटनेमध्ये स्वातंत्र्याचा अधिकार कोणत्या कलमांमध्ये दिलेला आहे?

1) कलम 19 ते 22
2) कलम 25 ते 28
3) कलम 29 ते 30
4) कलम 32

उत्तर: 1) कलम 19 ते 22

108) उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस कोणता असतो?

1) 22 डिसेंबर
2) 21 जुन
3) 21 मार्च
4 ) 3 मे

उत्तर: 2) 21 जुन

109) पटना हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे?

1) गंगा
2) यमुना
3) ब्रह्मपुत्रा
4) हुबळी

उत्तर: 2) यमुना

110) रॉकी पर्वतरांग कोणत्या खंडामध्ये आहे?

1) युरोप
2) आफ्रिका
3) उत्तर अमेरिका
4) दक्षिण अमेरिका

उत्तर: 3) उत्तर अमेरिका

111) “ड” वनसत्वाचे रासायनिक नाव खालीलपैकी काय आहे ?

1) रेटिनॉल
2) थायमीन
3 ) नायसीन
4) कॅल्शिफेरोल

उत्तर: 4) कॅल्शिफेरोल.

112) ग्लाकोमिया हा रोग शरीराच्या कोणत्या भागाला होतो?

1) मेंदू
2) डोळा
3) छाती
4) यकृत

उत्तर: 2) डोळा

113) खालीलपैकी कोणता रोग हा दूषित पाण्यापासून पसरतो?

1) कॉलरा
2) घटसर्प
3) हिवताप
4) अमांश

उत्तर: 1) कॉलरा

114) जागतिक लोकसंख्या दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो?

1) 2 मे
2) 18 जुन
3) 11 जुलै
4) 15 ऑगस्ट

उत्तर: 3) 11 जुलै

115) कोणत्या वर्षी भारतात आयात-निर्यात बँकेची स्थापना करण्यात आली होती?

1. १९८२
2. १९८५
3. १९८३
4. १९८४

उत्तर: 1. १९८२

116) भारताचे आंतरराष्ट्रीय खेळाडू रश्मी कुमारी ही कोणत्या खेळाशी निगडीत आहे?

1. कॅरम
2. टेबल टेनिस
3. कुस्ती
4. नेमबाजी

उत्तर: 1. कॅरम

117) घाना पक्षी अभयारण्य कोणत्य राज्यात आहे?

1. गुजरात
2. उत्तर प्रदेश
3. आसाम
4. राजस्थान

उत्तर: 4. राजस्थान

118) सह्याद्रीचे सर्वात उंच शिखर कोणते ?

1. धुपगड
2. महादेव
3. महाबळेश्वर
4. कळसुबाई

उत्तर: 4. कळसुबाई

119) विक्रम साराभाई अंतराळ केंद्र कुठे आहे?

1. मुंबई
2. तिरुवअनंतपुरम
3. बंगळूरू
4. श्रीहरीकोटा

उत्तर: 2. तिरुवअनंतपुरम

120) पोलाद या संमिश्रामध्ये खालीलपैकी कशाचा समावेश असतो?

1. कार्बन व क्रोमियम
2. यापैकी नाही
3. लोह + कार्बन
4. कार्बन + निकेल

उत्तर: 3. लोह + कार्बन

Police Bharti previous year question paper in Marathi

Police Bharti previous year question paper in Marathi
Police Bharti previous year question paper in Marathi

121) उत्तर प्रदेशातील पारंपारिक नृत्यशैली कोणती?

1. कथक
2. भरतनाट्यम
3. कुचीपुडी
4. कथकली

उत्तर: 1. कथक

122) भागीरथी व अलकनंदा या दोन नद्यांचा संगम कोठे होतो?

1. अजमेर
2. देवप्रयाग
3. कानपूर
4. पाटणा

उत्तर: 2. देवप्रयाग

123) गॉड ऑफ स्माल थिंग्ज’ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?

1. अरुंधती रॉय
2. सलमान रश्दी
3. खुशवंत सिंग
4. झुंपा लाहिरी

उत्तर: 1. अरुंधती रॉय

124 ) नटसम्राट या नाटकाचे लेखक कोण आहेत?

1. यापैकी नाही
2. मंगेश पाडगावकर
3. श्री. वि. वा. शिरवाडकर
4. श्रीमती दुर्गा भागवत

उत्तर: 3. श्री. वि. वा. शिरवाडकर

125) भारताचा राष्ट्रपती हा केंद्र शासनाचा कोणता प्रमुख असतो?

1. वास्तविक
2. नामधारी
3. तात्पुरता
4. कायमस्वरूपी

उत्तर: 2. नामधारी

126) भारतीय कृषी अनुसंधान संस्था कोठे आहे?

1. मुंबई
2. कानपूर
3. नवी दिल्ली
4. कर्नाल

उत्तर: 3. नवी दिल्ली

127) महादेव डोंगररांगांमुळे भीमा नदीचे खोरे कोणत्या नदीच्या खोऱ्यापासून वेगळे झालेले आहे?

1. गंगा
2. कोयना
3. गोदावरी
4. कृष्णा

उत्तर: 4. कृष्णा

128) देवगड पवनऊर्जा प्रकल्प कोणत्या जिल्हात आहे?

1. सिंधुदुर्ग
2. सातारा
3. सांगली
4. बीड

उत्तर: 1. सिंधुदुर्ग

129) चिखलदरा पर्वत शिखर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे?

1. अहमदनगर
2. नाशिक
3. सातारा
4. अमरावती

उत्तर: 4. अमरावती

130) मुंबई विद्यापीठाची स्थापन केव्हा झाली ?

1. सन १८५७
2. सन १९२५
3. सन १९४८
4. सन १८६०

उत्तर: 1. सन १८५७

131) महाराष्ट्र राज्यात एकूण किती जिल्हा परिषदा आहेत?

1. ३४
2. ३६
3. ४०
4. ३०

उत्तर: 1. ३४

132) केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालय चे नवीन नाव काय आहे ?

1) विकास मंत्रालय
2) शिक्षण मंत्रालय
3) मनुष्यबळ मंत्रालय
4) सर्वांगीण विकास मंत्रालय

उत्तर: 2) शिक्षण मंत्रालय

133) पूर्व मध्य रेल्वेचे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे?

1) गोरखपुर
2) हजीपुर
3) कोलकत्ता
4) जबलपूर

उत्तर: 2) हजीपुर

134) वाफेच्या इंजिनाचा शोध खालीलपैकी कोणी लावला?

1) स्टीफन स्टिव्हन्सन
2) जॉर्ज ऑरवेल
3) जेम्स वॅट
4) एडिसन

उत्तर: 3) जेम्स वॅट

135) भारतातील पहिली मोनोरेल कोणत्या शहरांमध्ये धावली ?

1) दिल्ली
2) बंगलोर
3) मुंबई.
4) अहमदाबाद

उत्तर: 3) मुंबई

136) भारतामध्ये रेल्वेचे किती विभाग आहेत?

1) 16
2) 17
3) 18
4) 19

उत्तर: 4) 19

137) सारनाथ येथील मूळ स्तंभ वर किती सिंह आहेत?

1) 2
2) 3
3) 4
4) 5

उत्तर: 3) 4

138) आगकाडीच्या निर्मितीसाठी खालीलपैकी कोणत्या पदार्थाचा उपयोग केला जातो ?

1) पिवळा फॉस्फरस
2) तांबडा फॉस्फरस
3) गंधक
4) सल्फर

उत्तर: 2) तांबडा फॉस्फरस

139) प्रसिद्ध दलाल स्ट्रीट कोणत्या शहरामध्ये आहे?

1) पुणे
2) मुंबई
3) दिल्ली
4) कलकत्ता

उत्तर: 2) मुंबई

140) “अ लाँग वॉक टु फ्रीडम “हे आत्मचरित्र खालील पैकी कोणाचे आहे?

1) डॉ. नेल्सन मंडेला
2) बराक ओबामा
3) डोनाल्ड ट्रम्प
4) जो बाईडेन

उत्तर: 1) डॉ. नेल्सन मंडेला

Police bharti sarav paper online

Police bharti sarav paper online
Police bharti sarav paper online

141) श्रीहरीकोटा “हे उपग्रह प्रक्षेपण स्तळ खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे?

1) केरळ
2) तामिळनाडू
3) आंध्रप्रदेश
4) कर्नाटक

उत्तर: 3) आंध्रप्रदेश

142) सेल्युलर जेल खालीलपैकी कुठे आहे?

1) दादरा नगर हवेली
2) चंदीगड
3) दमन
4) पोर्ट ब्लेअर

उत्तर: 4) पोर्ट ब्लेअर

143) शिका संघटित व्हा संघर्ष करा असा संदेश खालीलपैकी कोणी दिली?

1) महर्षि कर्वे
2) महात्मा फुले
3) शाहू महाराज
4) डॉ. बाबासाहेब आंबेडकर

उत्तर: 4) डॉ. बाबासाहेब आंबेडकर

144) लिंबाच्या रसामध्ये कोणते अॅसिड असते?

1) सायट्रिक आम्ल
2) हायड्रोक्लोरिक
3) सल्फ्युरिक आम्ल
4) नायट्रिक

उत्तर: 1) सायट्रिक आम्ल

145) सर्वाधिक शहरी लोकसंख्या कोणत्या राज्यामध्ये आहे?

1) तमिळनाडू
2) कर्नाटक
3) महाराष्ट्र
4) गुजरात

उत्तर: 3) महाराष्ट्र

146) “युनिसेफ “ही संस्था कोणाविषयी संबंधित आहे ?

i) गरीब जनता
2) स्त्रिया
3) लहान मुले
4) दुष्काळ पिडीत

उत्तर: 3) लहान मुले

147) मिठागरांचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते?

1) मुंबई
2) रायगड.
3) सिंधुदुर्ग
4) ठाणे

उत्तर: 2) रायगड.

148) भारतामध्ये तंबाखू संशोधन केंद्र खालीलपैकी कोठे आहे?

1) कोल्हापूर
2) राजमहेंद्री (आंध्रप्रदेश)
3) चेन्नई
4) मुंबई

उत्तर: 2) राजमहेंद्री (आंध्रप्रदेश)

149) “माणदेशी माणूस “या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहे?

1) ग दि माडगूळकर
2) व्यंकटेश माडगूळकर
3) प्रल्हाद केशव अत्रे
4) बहिणाबाई चौधरी

उत्तर: 2) व्यंकटेश माडगूळकर.

150) ग्रँडस्लॅम हा शब्द कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

1) फुटबॉल
2) टेबल टेनिस
3) लॉन टेनिस
4) बास्केटबॉल

उत्तर: 3) लॉन टेनिस

151) संगणक हे खालीलपैकी कोणते साधन आहे?

1) इलेक्ट्रिकल
2) मेकानिकल
3) स्पुटनिक
4) इलेक्ट्रॉनिक्स

उत्तर: 3) स्पुटनिक

152) खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातून तापी नदी वाहत नाही?

1) जळगाव
2) नंदुरबार
3) नाशिक
4) धुळे

उत्तर: 4) धुळे

153) स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी 1904 मध्ये खालील पैकी कोणते क्रांतिकारकांची संघटना स्थापन केली?

1) अभिनव भारत
2) अनुशीलन समिती
3) गदर
4) भारत सेवक समाज

उत्तर: 1) अभिनव भारत

154) बालकुपोषणाशी संबंधित कार्य करणारी खालीलपैकी कोणती हस्ती आहे?

1) डॉ. अभय बंग
2) बाबा आमटे
3) बाबा आढाव
4) डॉ. श्रीराम लागू

उत्तर: 1) डॉ. अभय बंग

155) खालीलपैकी कोणती नदी कोकणातील नाही?

1) वाशिष्टी
2) उल्हास
3) सावित्री
4) कोयना

उत्तर: 4) कोयना

156) संघटित गुन्हेगारी वर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणते कायद्याचा वापर केला जात आहे?

1) UPPA act
2) NDPS act
3) MPID act
4) MCOCA act

उत्तर: 4) MCOCA act

157) “दीक्षाभूमी “हे महत्त्वपूर्ण ठिकाण खालीलपैकी कोणत्या शहरांमध्ये आहे?

1) नागपूर
2) वर्धा
3) अमरावती
4) अकोला

उत्तर: 1) नागपूर

158) राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली?

1) 1993
2) 1978
3) 1999
4) यापैकी नाही

उत्तर: 1) 1993

159) “अल्झायमर “हा कोणत्या अवयवा संबंधीचा विकार आहे?

1) यकृत
2) स्वादूपिंड
3) मेंदू
4) थायरॉईड

उत्तर: 3) मेंदू

160) मुंबई प्रांतात देवदासी प्रथेविरुद्ध कोणी परिषद भरवली?

1) वि रा शिंदे
2) महात्मा फुले
3) धोंडो केशव कर्वे
4) गो.ग आगरकर

उत्तर: 1) वि रा शिंदे

Maha Police bharti Question Paper

Maha Police bharti Question Paper
Maha Police bharti Question Paper

161) खालीलपैकी कोणती संमिश्र हे तांब्याचे संमिश्र नाही?

1) पितळ
2) ब्राँझ
3) जर्मन सिल्वर
4) स्टेनलेस स्टील

उत्तर: 4) स्टेनलेस स्टील

162) भारतीय राज्यघटनेचे कलम 25 कशा संबंधित आहे?

1) समानतेचा अधिकार
2) संपत्तीचा अधिकार
3) धर्मस्वातंत्र्याचा अधिकार
4) शिक्षणाचा अधिकार

उत्तर: 3) धर्मस्वातंत्र्याचा अधिकार

163) गौतम बुद्धांनी प्रथम उपदेश केलेले सारनाथ हे ठिकाण खालीलपैकी कोठे आहे?

1) महाराष्ट्र
2) मध्य प्रदेश
3) उत्तर प्रदेश
4) बिहार

उत्तर: 3) उत्तर प्रदेश

164) हैदराबाद स्टेट काँग्रेस स्थापना 1938 मध्ये खालील पैकी कोणी केली ?

1) स्वामी रामानंद तीर्थ
2) डॉ. राम मनोहर लोहिया
3) विश्वनाथ लवांदे
4) डॉ. टी. बी. कुन्हा

उत्तर: 1) स्वामी रामानंद तीर्थ

165) भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना कधी झाली?

1) 5 एप्रिल 1934
2) 1 एप्रिल 1935
3) 1 मार्च 1935
4) जानेवारी 1935

उत्तर: 2) 1 एप्रिल 1935

166) सोने या पदार्थाची रासायनीक संज्ञा कोणती आहे ?

1) Ag
2) Au
3) Mg
4) Hq

उत्तर: 2) Au

167) “हॅरी पॉटर “या कादंबरीचे लेखक कोण आहेत?

1) आ. ल. स्टाईन
2) जे. के. रोलींग
3) एमिट ब्लम अन
4) बराक ओबामा

उत्तर: 2) जे. के. रोलींग

168) हंटर कमिशनची नेमणूक केव्हा करण्यात आली?

1) 1782
2) 1881
3) 1882
4) 1982

उत्तर: 3) 1882

169) कटक मंडळे कोणाच्या नियंत्रणाखाली काम करतात?

1) राष्ट्रपती
2) संरक्षण मंत्रालय
3) पंतप्रधान
4) राष्ट्रपती

उत्तर: 2) संरक्षण मंत्रालय

170) मेरी कोम हे ऑलिम्पिक विजेते खेळाडू कोणत्या राज्यातील आहे?

1) मेघालय
2) अरुणाचल प्रदेश
3) मणिपूर
4) त्रिपुरा

उत्तर: 3) मणिपूर.

171) “नाल सरोवर पक्षी अभयारण्य”कोणत्या राज्यात आहे?

1) मध्य प्रदेश
2) गुजरात
3) उत्तर प्रदेश
4) यापैकी नाही

उत्तर: 2) गुजरात.

172) महाराष्ट्राचा कोणता जिल्हा संपूर्णपणे भीमा नदीच्या खोऱ्यात येतो?

1) अहमदनगर
2) पुणे
3) नंदुरबार
4) नाशिक

उत्तर: 2) पुणे

173) तोडा ही आदिवासी जमात खालील पैकी कोणत्या राज्यात आढळते ?

1) नागालँड
2) तामिळनाडू
3) आंध्र प्रदेश
4) आसाम

उत्तर: 2) तामिळनाडू

174) डाफला ही आदिवासी जमात खालील पैकी कोणत्या राज्यात आढळते?

1) छत्तीसगड
2) झारखंड
3) अरुणाचल प्रदेश
4) सिक्कीम

उत्तर: 3) अरुणाचल प्रदेश

175) भारतीय राज्यघटनेमध्ये भाग दोन मध्ये काय स्पष्ट करण्यात आलेले आहे?

1) मूलभूत अधिकार
2) मूलभूत कर्तव्य
3) नागरिकता
4) संघराज्य व त्याचे क्षेत्र

उत्तर: 3) नागरिकता

176) भारतीय संविधानामध्ये दहा मूलभूत कर्तव्य चा समावेश केव्हा करण्यात आला?

1) 1951
2) 1969
3) 1976
4) 1975

उत्तर: 3) 1976

177) रामनाथ कोविंद हे भारताचे कितवे राष्ट्रपती होते?

1) 12 वे
2) 15 वे
3) 14 वे
4) 13 वें

उत्तर: 3) 14 वे

178) लोकसभा अध्यक्ष यांची निवड कोण करतात?

1) लोकसभा सदस्य
2) सर्व संसद सदस्य
3) राष्ट्रपती
4) या पैकी नाही

उत्तर: 1) लोकसभा सदस्य

179) मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली ?

1) 1960
2) 1862
3) 1935
4) 1961

उत्तर: 2) 1862

180) बेडूक हा कोणत्या वर्गातला प्राणी आहे?

1) अभयचर
2) सस्तन
3) मस्य
4) उभयचर

उत्तर: 4) उभयचर

Maharashtra Police bharti paper set

Maharashtra Police bharti paper set
Maharashtra Police bharti paper set

181) महाराष्ट्राचे निमलष्करी दल खालीलपैकी कोणते आहे ?

1) GRF
2) CRPF
3) SRPF
4) CISF

उत्तर: 3) SRPF

182) श्री बाबा आमटे यांचा हेमलकसा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे?

1) वर्धा
2) चंद्रपूर
3) गडचिरोली
4) गोंदिया

उत्तर: 3) गडचिरोली

183) महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ खालील पैकी कोणत्या ठिकाणी आहे?

1) लातूर
2) अकोला
3) अमरावती
4) उस्मानाबाद

उत्तर: 2) अकोला

183) मोसंबी संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे?

1) पाडेगाव
2) राजगुरुनगर
3) श्रीरामपूर
4) दौलताबाद

उत्तर: 3) श्रीरामपूर

184) चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?

1) अकोला
2) अमरावती
3) यवतमाळ
4) औरंगाबाद

उत्तर: 3) यवतमाळ.

185) महाराष्ट्राचे मँचेस्टर असे खालीलपैकी कोणत्या शहराला ओळखले जाते?

1) मुंबई
2) इचलकरंजी
3) मालेगाव
4) मनमाड

उत्तर: 2) इचलकरंजी

186) सहस्रकुंड धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?

1) परभणी
2) लातूर
3) नांदेड
4) उस्मानाबाद

उत्तर: 3) नांदेड

187) मयुरेश्वर हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?

1) सांगली
2) सातारा
3) पुणे
4) बुलढाणा

उत्तर: 3) पुणे

188) तुमसर ही राज्यातली तांदळाची प्रमुख बाजारपेठ खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?

1) भंडारा
2) यवतमाळ
3) उस्मानाबाद
4) नंदुरबार

उत्तर: 1) भंडारा

189) “सांताक्रुज “हे विमानतळ खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे?

1) मुंबई
2) औरंगाबाद
3) नाशिक
4) पुणे

उत्तर: 1) मुंबई

190) | मे 1981 रोजी रत्नागिरी जिल्ह्याचे विभाजन होऊन खालीलपैकी कोणता नवीन जिल्हा निर्माण झाला?

1) रायगड
2) सिंधुदुर्ग
3) सांगली
4) सातारा

उत्तर: 2) सिंधुदुर्ग

191) महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य कर्नाळा हे खालील पैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?

1) रत्नागिरी
2) रायगड
3) ठाणे
4) अकोला

उत्तर: 2) रायगड

192) महाराष्ट्रातील पूर्ण विद्युतीकरण झालेला पहिला जिल्हा कोणता आहे?

1) लातूर
2) वर्धा
3) वाशिम
4) रायगड

उत्तर: 2) वर्धा

193) पाचगणी हे थंड हवेचे ठिकाण खालील पैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?

1) रायगड
2) रत्नागिरी
3) सातारा
4) सोलापूर

उत्तर: 3) सातारा

194) उजनी हे महत्त्वाचे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे?
1) सातारा
2) सांगली
3) कोल्हापूर
4) सोलापूर

उत्तर: 4) सोलापूर

195) लाकडी खेळणी तयार करण्यासाठी खालीलपैकी कोणते ठिकाण प्रसिद्ध आहे?

1) पोंभुर्ले
2) सावंतवाडी
3) अक्कलकोट
4) मालवण

उत्तर: 2) सावंतवाडी

196) महाराष्ट्राचे पूर्व पश्चिम अंतर खालील पैकी किती किमी आहे?

1) 700km
2) 800km
3) 900 km
4) 1200km

उत्तर: 2) 800km

197) महाराष्ट्रातील एकूण जिल्ह्यांची संख्या किती आहे?

1) 32 जिल्हे
2) 35 जिल्हे
3) 34 जिल्हे
4) 36 जिल्हे

उत्तर: 4) 36 जिल्हे

198) कोल्हापूर हा जिल्हा खालील पैकी कोणत्या प्रशासकीय विभागात येतो?

1) मुंबई
2) अमरावती
3) औरंगाबाद
4) पुणे

उत्तर: 4) पुणे

199) मराठी भाषेमध्ये पहिले मासिक कोणते आहे?

1) दर्पण
2) दिग्दर्शन
3) ज्ञानप्रकाश
4) मुंबई टाइम्स

उत्तर: 2) दिग्दर्शन

200) ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे महाराष्ट्राचे पहिले व्यक्ती कोण आहेत?

1) धोंडो केशव कर्वे
2) वि स खांडेकर.
3) आचार्य विनोबा भावे
4) आनंदीबाई जोशी

उत्तर: 2) वि स खांडेकर

विद्यार्थीमित्रांनो Police Bharti Important Questions in Marathi 2024 च्या या लेखात मी अतिशय महत्वाचे मागील वर्षी पोलीस भरती परीक्षेत विचारले गेलेले महत्वाचे प्रश्न तुमच्या सोबत शेअर केलेले आहेत. त्यामुळे परीक्षेला जाताना हे प्रश्न वाचून नक्की जा. तसेच जस कि मी तुम्हाला सांगितले स्पर्धा परीक्षेत तुम्ही जेवढे जास्त MCQs प्रश्नांचा सराव कराल तेवढा तुम्हाला फायदा होईल. त्यासाठी तुम्ही Police Bharti Sarav Paper या लिंक वर क्लिक करा.

या वर्षी होणाऱ्या महाराष्ट्र पोलीस भरती चा syllabus जाणून घेण्यासाठी या लिंक वर क्लिक करा.

हे देखील वाचा

Maharashtra Police Bharti Question Paper in Marathi

Maharashtra Police Bharti Exam Question Paper

Birthday wish for sister in Marathi Text

मी मागील 8 वर्ष MPSC आणि इतर स्पर्धा परीक्षेसंबंधी पुण्यामध्ये Classes घेत आहे, त्यामुळे या स्पर्धा कशा प्रकारे होतात, कोणते प्रश्न विचारले जातात आणि कोणत्या टॉपिक वर प्रश्न विचारले जातात या संबंधी ची पूर्ण माहिती मला असून मी माझा अनुभव या वेबसाइट द्वारे तुम्हा सर्वांपर्यंत पोचवायचा प्रयन्त करत आहे.

Leave a Comment