UPSC information in Marathi | UPSC Marathi Mahiti 2024 | कलेक्टर होण्यासाठी काय करावे

UPSC exam pattern in Marathi । UPSC exam details in Marathi | UPSC information in Marathi

upsc information in Marathi

UPSC information in Marathi भारतीय प्रशासन व्यवस्था चालवण्यासाठी उत्तम प्रशासकांची गरज असते.  उत्तम प्रशासकांची निवड करण्यासाठी लोकसेवा आयोग कार्यरत आहेत.  सनदी सेवकांची नेमणूक लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून होत असते. 

राज्य पातळीवर ती राज्य लोकसेवा आयोग आणि केंद्रीय पातळीवर ती संघ लोकसेवा आयोग कार्यरत असतो.  सनदी  सेवक म्हणून उत्तम प्रशासक निवडीसाठी आयोग विविध परीक्षा घेत असते.  योग्य उमेदवार व सक्षम प्रशासक निवडण्यासाठी तितकीच कार्यक्षम परिक्षा घ्यावी लागते.  या परीक्षांचे नियोजन राज्य लोकसेवा आयोग व केंद्रीय लोकसेवा आयोग करत असतात. upsc information in marathi

 केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या विविध परीक्षा होत असतात.  देशातील सर्वोच्च अशी नागरी सेवा परीक्षा केंद्रीय लोकसेवा आयोग घेतो. या परीक्षेमधून आयएएस, आयपीएस, आयएफएस असे विविध अधिकारी निवडले जातात.

आपल्यापैकी बर्‍याच विद्यार्थ्यांना प्रश्न पडलेला असतो की कलेक्टर होण्यासाठी काय करावे

 कलेक्टर होण्यासाठी काय करावे याचे उत्तर केंद्रीय नागरी सेवा परीक्षा द्यावी. वरवर पाहता उत्तर सोपे वाटत असले तरी यासाठी आयुष्याची बरीच वर्षे खर्ची घालावी लागतात.  देशातील सर्वोच्च अशी ही परीक्षा आहे याचे भान तयारी करताना प्रत्येक उमेदवाराने ठेवावे. 

 परीक्षा खूप कठीण असते याचा अर्थ असा होत नाही की अशक्य आहे.  योग्य मार्गदर्शन आणि वेळेचा प्रभावी वापर केल्यास कमी कालावधीत यूपीएससी परीक्षा पास होणे सहज शक्य आहे.

upsc information in marathi पाहण्याआधी परीक्षेसाठी वयोमर्यादा किती असते हे पाहूया.

यूपीएससी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्याचे वय कमीत कमी 21 वर्षे व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्याचे जास्तीत जास्त 32 वर्षे वयोमर्यादा आहे इतर सामाजिक आरक्षणानुसार ओबीसींसाठी तीन वर्षे शिथिलक्षम आणि अनुसुचित जाती जमातींसाठी पाच वर्षे शिथिलक्षम आहे.

upsc information in marathi यूपीएससी परीक्षेसाठी पात्रता

 आयएएस आयपीएस या अखिल भारतीय सेवा करिता फक्त भारतीय नागरिकच पात्र आहेत. इतर  सेवांसाठी नेपाळ, पाकिस्तान, भूतान, बांगलादेश, तिबेट व इतर काही देशातील स्थलांतरित नागरिकही ही निवडले जाऊ शकतात.

यूपीएससी परीक्षेसाठी शैक्षणिक पात्रता

यूपीएससी परीक्षा देणारा विद्यार्थी मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा. मुक्त विद्यापीठातील पदवी सुद्धा यासाठी ग्राह्य मानली जाते. पदवी ही किमान पात्रता  आहे सर्वोच्च पात्रता काहीही असू शकते.  

upsc information in marathi यूपीएससी परीक्षेसाठी शुल्क किती असतो?

 पूर्व परीक्षेसाठी शंभर रुपये व मुख्य परीक्षेसाठी दोनशे रुपये असे शुल्क परीक्षेसाठी युपीएससी आकारत असते.

upsc exam pattern in marathi यूपीएससी परीक्षेचे स्वरूप

 यूपीएससी परीक्षा तीन टप्प्यांमध्ये होत असते.  परीक्षेचा पहिला टप्पा पूर्व परीक्षेचा असतो.  पूर्वपरीक्षेत मिळणाऱ्या गुणांच्या आधारे मुख्य परीक्षा आयोजित केली जाते.  तिसऱ्या व अंतिम टप्प्यावर ती मुलाखत कार्यक्रम असतो.

upsc exam pattern in marathi पूर्व परीक्षा- 

पूर्व परीक्षेमध्ये हे दोन पेपर असतात.पूर्व परीक्षेमध्ये प्रश्न वस्तुनिष्ठ बहुपर्यायी असतात.  नकारात्मक गुणदान योजना लागू आहे.

पेपर 1 – 100 गुणांसाठी असतो. पेपर 1 मध्ये सामान्यज्ञान व चालू घडामोडी विषयक प्रश्नांचा समावेश असतो.

 पेपर 2 – 80 गुणांसाठी असतो. Civil Service Aptitude Test (CSAT)असे या पेपरचे नाव आहे.

क्रमांक पेपर प्रश्न संख्या अधिक तम गुण वेळ टीप
1 सामान्य ज्ञान General study (GS) 100 200 (प्रत्येक प्रश्नाला दोन गुण) दोन तास गुणवत्ता यादी साठी गुण ग्राह्य धरले जातात.
2 CSAT (Civil Service Aptitude Test) 80 200 ( प्रत्येक प्रश्नाला 2.5 गुण) दोन तास फक्त पात्रता पेपर. (66  गुण मिळाल्यास पात्र)
upsc exam information in marathi

मुख्य परीक्षा upsc information in marathi

 पूर्व परीक्षेत उमेदवारांना मिळणाऱ्या गुणांच्या आधारेमुख्य परीक्षेचे आयोजन केले जाते. 

पूर्व परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांना मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरतो मुख्य परीक्षेमध्ये एकूण नऊ पेपर असतात सर्व पेपर वर्णनात्मक असतात.  नऊ मधील भाषाविषयक दोन पेपर असतात. इंग्रजी भाषा व एक प्रादेशिक भाषा.  300 अधिक 300 गुणांचे हे भाषा विषय परीक्षा असते.  भाषा विषयाच्या पेपर मध्ये मिळणारे गुण मेरीट साठी गणले जात नाहीत.  म्हणजे हे फक्त पात्रता पेपर आहेत.

 यूपीएससी परीक्षेची गुणवत्ता यादी मुख्य सात लेखी पेपर वरती आधारित असते. सातही पेपर प्रत्येकी 250 गुणांचे असे एकूण सतराशे पन्नास गुणांचे असतात. 

क्र. पेपर पेपरचे नाव मिळणारे अधिकतम गुण
1 पेपर 1 निबंध लेखन 250
2 पेपर 2 सामान्य ज्ञान 1 250
3 पेपर 3 सामान्य ज्ञान 2 250
4 पेपर 4 सामान्य ज्ञान 3 250
5 पेपर 5 सामान्य ज्ञान 4 250
6 पेपर 6 वैकल्पिक विषय पेपर 1 250
7 पेपर 7 वैकल्पिक विषय  पेपर 2 250
8      
9   लेखी परीक्षेचे एकूण गुण 1750
10   मुलाखतीसाठी गुण 275
    एकूण गुण  2025
upsc exam information in marathi

अशाप्रकारे मुख्यपरीक्षा सतराशे पन्नास गुणांसाठी होते. 1750  गुणांपैकी  गुणवत्ता यादी जाहीर केली जाते.

 गुणवत्ता यादी नुसार मुलाखतीसाठी पात्र उमेदवार ठरवले जातात.  पात्र उमेदवारांची मुलाखत घेतली जाते.

 युपीएससी मुलाखत upsc information in marathi

 यूपीएससी परीक्षेची मुलाखत 275 गुणांची असते.  मुलाखत देशाच्या राजधानीच्या ठिकाणी म्हणजे नवी दिल्ली येथे घेतली जाते.  मुख्य परीक्षा आणि मुलाखत यांची एकत्रित गुणानुक्रमे यादी जाहीर केली जाते. आणि जेवढ्या जागांसाठी यु पी एस सी परीक्षा जाहीर केली होती तितक्यात जागा गुणवत्ता यादीतील उमेदवारांच्या माध्यमातून भरली जातात. 

योग्य मार्गदर्शन, प्रभावी अभ्यास, वेळेचे नियोजन आणि सातत्यपूर्ण सराव या आधारे यूपीएससी परीक्षा एक मराठी विद्यार्थी सुद्धा सहजतेने पास होऊ शकतो.  जिद्द, चिकाटी आणि महत्त्वाकांक्षेच्या आधारे परीक्षेला सामोरे जा.  आमच्या शुभेच्छा तुमच्या पाठीशी आहेत. 

अपेक्षा आहे कलेक्टर होण्यासाठी काय करावे आणि upsc information in marathi या दोन्ही प्रश्नांचे उत्तर मिळाले असेल.

 आणखी वाचनीय  व माहितीपूर्ण लेख वाचा.

Maharashtra public service commission |MPSC म्हणजे काय?

siac mumbai | प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्र | Siac Entrance Exam

rashtrapati rajwat, राष्ट्रपती राजवट

हे हि वाचा – डिजिटल माहिती

मी मागील 8 वर्ष MPSC आणि इतर स्पर्धा परीक्षेसंबंधी पुण्यामध्ये Classes घेत आहे, त्यामुळे या स्पर्धा कशा प्रकारे होतात, कोणते प्रश्न विचारले जातात आणि कोणत्या टॉपिक वर प्रश्न विचारले जातात या संबंधी ची पूर्ण माहिती मला असून मी माझा अनुभव या वेबसाइट द्वारे तुम्हा सर्वांपर्यंत पोचवायचा प्रयन्त करत आहे.

49 thoughts on “UPSC information in Marathi | UPSC Marathi Mahiti 2024 | कलेक्टर होण्यासाठी काय करावे”

  1. Sir ias exam la nibandh aapan marathi language madhun lihu shakto ka. As kahi at nahi na ki English madhech lihav lagel. Just only information. Please????????sir,

    Reply
  2. सर माझी 12 झाली आहे मी देऊ शकते का कलेक्टर ची exam

    Reply
    • ग्रॅज्युएशन असणं आवश्यक आहे. आपल्या अमूल्य प्रतिसादाबद्दल आभारी आहोत.

      Reply
    • पोलिस व वन विभागातील नियुक्तीसाठी शारीरिक पात्रता आवश्यक असतात. इतर पदांसाठी कोणतीही शारीरिक पात्रता नसते. तीन फुटाचा व्यक्ती सुद्धा जिल्हाधिकारी होऊ शकतो. आपल्या अमूल्य प्रतिसादाबद्दल आभारी आहोत.

      Reply
      • Sir,
        I have a one question question?
        मला आयपीएस अधिकारी भर्ती द्यायची आहे.आणि माझं education अजून पूर्ण व्हायचं आहे . पण आयपीएस अधिकारी होण्यासाठी सायन्स ची आवश्यकता आहे काय???

        Reply
        • सायन्स हवे असे काही बंधन नाही. आर्ट्स चा विद्यार्थी सुद्धा यु पी एस सी मधून आयएएस आयपीएस आयएफएस होऊ शकतो. आपल्या अमूल्य प्रतिसादाबद्दल आभारी आहे. वरती दिलेली माहिती आपल्या मित्र-मैत्रिणींची शेअर करा ही नम्र विनंती.

          Reply
    • इंग्रजी विषयाचा पेपर वगळता सर्व पेपर तुम्ही मराठी मध्ये देऊ शकता. आपल्या अमूल्य प्रतिसादाबद्दल आभारी आहोत. Share the link and support us.

      Reply
  3. इंग्रजी विषयाचा पेपर वगळता सर्व पेपर आम्ही मराठी मध्ये देऊ शकतो काय. आपल्या अमूल्य प्रतिसादाबद्दल आभारी आहोत.

    Reply
    • इंग्रजी सोडता बाकी सर्व पेपर मराठी भाषेत उपलब्ध आहेत

      Reply

Leave a Comment